Login

यशस्वी स्त्रीच्या मागे भाग १

यशस्वी स्त्रीच्या मागे असणारा पुरुष
" प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो हे वाक्य तर आपण भरपूर वेळा ऐकले आहे , पण मी ही गोष्ट आनंदाने सांगू इच्छिते की माझ्या यशाच्या मागे एका पुरुषाचा हात आहे.... तो पुरुष म्हणजे माझा नवरा,  माझ्या जीवनाचा साथीदार, माझा शुभम...

आज मी इथे उभी आहे... आज माझं अस्तित्व आहे.... मी एक नामांकित वकील म्हणून आज सगळ्यांना माहित आहे... या गोष्टीचा पूर्ण श्रेय मी माझ्या नवऱ्याला देईल कारण जेव्हा तो माझ्या आयुष्यात आला तेव्हा मी तुटले होते, कमी शिकलेली, नवऱ्याला सोडून पळून गेलेली एक अबला स्त्री होते....

आज तुमच्यासमोर उभी असलेली स्त्री जी दुसऱ्यांच्या हक्कासाठी लढत असते,  तिला कधी स्वतःच्या हक्कासाठी ही लढता आले नाही... आपल्या आयुष्याला कंटाळलेली एक अशी स्त्री जी जीवन आणि मृत्यूच्या वाटेवर उभी होती तिकडून मला आयुष्याच्या दिशेने परत खेचून आणणारे आणि माझं आयुष्य इतकं सुंदर पद्धतीने घडवणारे माझे शुभम त्यांच्यामुळेच आज मी इकडे उभी आहे.... 

माझ्या आयुष्यात एक काळ असा होता की मला वाटलं हेच शेवट, पण तेव्हा मला शुभम भेटले ज्यांनी मला आपली बायको म्हणून नाही तर समाजामध्ये " सुखदा " म्हणून ओळख दिली...
त्यांनी मला चालायला शिकवलं, पळायला शिकवलं आणि स्वप्न बघण्यासाठी प्रेरित केलं...

मी शुभम ची पत्नी आहे – पण त्याआधी मी सुखदा आहे आणि ही ओळख मला त्याने दिली.

त्याचं आभार शब्दांत मांडता येत नाहीत... पण एकच म्हणेन – ‘माझं आयुष्य त्याने सुंदर केलं." सुखदाच भाषण संपलं तसं तिकडे बसलेल्या सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवायला सुरुवात केली.... तिचं भाषण ऐकताना शुभमच्या चेहऱ्यावर समाधानाचा हसू होते तसेच डोळ्यांमध्ये आनंद अश्रू ही भरले होते... सुखदा ही भरल्या डोळ्यांनी हसत त्याच्याकडे पाहत होती... ती तशीच स्टेजवरून खाली उतरली आणि सरळ त्याच्या दिशेने चालत पुढे गेली....

सुखदा शुभम देशमुख... त्या शहरातली एक नामांकित वकील... अवघ्या काही महिन्यातच नाव इतक्या उंचावर आणून ठेवले होते... वकील म्हणून तिने पदवी धारण केल्यापासून ते आजपर्यंत ती एकही केस हारली नव्हती...

गरजू लोकांना, अबला स्त्रीला न्याय मिळवून देणे, गरिबांच्या हक्काचे प्रश्न सोडवणे, सत्याच्या मागे खंबीरपणे उभे राहणे यामुळेच अगदी कमी वेळात तिची ओळख , तिची प्रसिद्धी झाली होती...

" इकडे तुला , तुला भेटलेल्या प्रसिद्धी बद्दल सांगण्यासाठी बोलावले होते,  पण तुझ्या या भाषणामध्ये सगळीकडे फक्त माझं नाव आणि माझेच कौतुक चालू होते.... " शुभम आनंदाने पुढे येऊन तिचा हात आपल्या हातात घेत प्रेमाने तिच्याकडे बघून बोलतो...

" मला भेटलेल्या या प्रसिद्धीचं खरं कारण तुम्ही आहात शुभम आणि तेच मी आज जगाला सांगितले आहे... माझ्यासाठी तुम्ही किती महत्त्वाचे आहात हेच मला तुम्हाला सांगायचं होतं... आज मी ज्या ठिकाणी उभी आहे तिकडे तुम्ही मला पोचवले आहे..... " सुखदा त्याच्याकडे पाहून हळव्या स्वरात बोलते...

त्यांची गाडी जवळ येते तसे दोघे पण गाडीमध्ये जाऊन बसतात..... सगळ्यांकडून वाजत असणाऱ्या टाळ्यांचा गडगडाट अजून चालूच असतो... सगळ्यांकडे एक वार पाहून ती हात जोडते आणि त्यांची गाडी चालू होते... त्यांची गाडी घराच्या दिशेने धावत असते....  सुखदा मात्र खिडकीतून बाहेर पाहत वेगळ्या दुनियेमध्ये हरवलेली असते....

" सुखदा , काय झालं ? तू ठीक आहेस ना ? " तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव पाहून शुभम काळजीने तिच्याकडे पाहत तिला विचारतो....

" शुभम मला अजूनही तो दिवस आठवतो,  जर त्या दिवशी तुम्ही मला भेटला नसता , सर आज कदाचित मी या जगातच नसते..." सुखदा खोल श्वास घेत खिडकीतून बाहेर पहातच बोलते...

" सुखदा तुला माझ्या आयुष्यात येऊन माझे आयुष्य सुंदर स्वप्नांनी सजवायचं होते आणि म्हणूनच कदाचित त्या दिवशी आपली पहिली भेट झाली... " शुभम तिला आपल्यासमोर वळवत तिचा हात आपल्या हातात घेत प्रेमाने बोलतो....