Login

यशस्वी स्त्रीच्या मागे भाग २

यशस्वी स्त्रीच्या मागे असणारा पुरुष
" सुखदा तुला माझ्या आयुष्यात येऊन माझे आयुष्य सुंदर स्वप्नांनी सजवायचं होते आणि म्हणूनच कदाचित त्या दिवशी आपली पहिली भेट झाली... " शुभम तिला आपल्यासमोर वळवत तिचा हात आपल्या हातात घेत प्रेमाने बोलतो....

आता पुढे,

" हे काय करता तुम्ही , स्वतःचा आयुष्य असे संपवणे हा कुठला शहाणपणा आहे ? " खाली पाण्यात उडी मारणाऱ्या महिले चा अचानक हात खेचून तिला मागे ओढत शुभम रागाने तिच्याकडे पाहून त्याचे शब्द उद्गारतो...

" सोडा मला,  सोडा... मला जगायचं नाही.... " ती मुलगी रागाने त्याच्या हातातून आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करु लागते...

" देवाने तुम्हाला इतके सुंदर आयुष्य दिले आहे ते असे संपवण्यासाठी... " शुभम तरीही तिला तिला समजावण्याचा प्रयत्न करत बोलतो....

" सुंदर आयुष्य... " एवढेच  बोलून त्याच्याकडे पाहून ती खिन्न पने हसते , तिच्या त्या हसण्यामध्ये लपलेले दुःख मात्र त्याच्या नजरेतून सुटत नाही...

" हे बघा,  तुमच्या सोबत काय झाले आहे याबद्दल मला तरी काही माहित नाही पण आयुष्यातल्या सगळ्या जखमा पुसण्यासाठी हाच एक शेवटचा उपाय नाही.... तुम्ही आधी शांत व्हा आणि माझ्यासोबत चला.... " असे बोलून शुभम जबरदस्ती तिचा हात पकडून तुला आपल्या गाडीमध्ये बसवतो... तिचाही राग आता बऱ्याच प्रमाणात शांत झालेला असतो...  ती शांतपणे गाडीत बसून राहते..   तो एक नजर तिच्याकडे पाहून गाडी चालू करतो... काही वेळातच त्याची गाडी एका चार मजली इमारतीच्या समोर येऊन उभी राहते.... ती मुलगी शांतपणे समोरच्या इमारतीकडे पाहू लागते....

" मी बाहेर गेट जवळच आहे...  तुम्ही जरा बाहेर येता का ? " शुभम  गाडी थांबवून फोनवर बोलून फोन ठेवून देतो.... ती मुलगी अजूनही शांतपणे तसेच बसून असते.... काही वेळातच समोरच्या इमारती मधून एक पन्नाशीच्या आसपास असलेली बाई त्यांच्या दिशेने पुढे चालत येऊ लागते...

" काय झालं शुभम,  तू आता यावेळी इकडे काय करत आहे आणि ही कोण आहे? " ती बाई एक नजर शुभम कडे पाहून त्याच्या बाजूला बसलेल्या त्या मुलीकडे पाहत शांतपणे विचारते... शुभम त्यांनी जे काही बघितलं आणि तिला कशाप्रकारे समजावून इकडे घेऊन आला ते सगळं त्या बाईला सांगतो...

" ठीक आहे....  तिला मी माझ्यासोबत घेऊन जाते...  आता खूप उशीर झाला आहे... तू ही  घरी जा... " ती बाई गाडीचा दरवाजा खोलून त्या मुलीला हात पकडून खाली उतरायला सांगते... अशी ती मुलगी शांतपणे गाडीतून खाली उतरते आणि त्या बाई सोबत निघून जाते... शुभम एक नजर त्या दोघींकडे पाहून आपली गाडी चालू करत आपल्या घरी जातो...

दुसऱ्या दिवशी सकाळी शुभम लवकरच त्या ठिकाणी परत आलेला असतो... ते ठिकाण म्हणजे महिला अनाथ आश्रम... या आश्रमात सगळ्या वयांच्या महिलांचा संभाळ केला जात होता... त्याची काकी या आश्रमाकडे लक्ष देत होती... शुभम ही आवडीने आपल्या काकूची सगळी मदत करत होता.. त्याला स्वतःलाही समाजासाठी काहीतरी करायला खूप आवडत होते... तो स्वतः डॉक्टरीचा शिक्षण घेत होता पण त्यासोबत वेळ मिळेल तसा आपल्या काकीला ही मदत करत होता.... शुभम आपली गाडी एका बाजूला पार्क करून सरळ इमारतीच्या आत निघून जातो...

" शुभम आज सकाळी सकाळी इकडे , आज तुला कॉलेजला जायचं नव्हते का? हे तुझं कॉलेज चे शेवटचं वर्ष आहे त्यामुळे मन लावून अभ्यास करायला पाहिजे ना... " काकी त्याला सकाळीच इकडे आलेले पाहून आश्चर्याने विचारते...

" काकी ती मुलगी , ती कशी आहे आता ? ती तुझ्यासोबत काही बोलली का ? ती स्वतःचा जीव देण्याचा का प्रयत्न करत होती, तू तिला काही विचारलेस का ? " शुभम उत्सुकतेने आपल्या काकी कडे पाहून विचारू लागतो...