Login

यात्रा - भाग 9

Marathi Story Yatra - Fortuitous Circumstance
यात्रा - भाग 9

मागच्या भागात आपण वाचले यात्रेत तमाशा ठेवण्यावरून दोन ग्रुपमध्ये खडाजंगी चालू झाली होती.
आता पुढे....

"काय बापूसाहेब मगाच पासनं तूमी तमाशा तमाशा लाऊन ठेवलंय, अहो तमाशा नाय आरकेश्ट्रा म्हणत्यात त्याला." ......
विजय सरदेसाई (आबासाहेबांचा विरोधक)दारातूनयेताना म्हणाला.
त्याच्याबरोबर त्याचा लहान भाऊ अजयही होता.
त्याच्या आवाजाने चाललेला गोंधळ शांत झाला. सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या.

"आत्ता आल लक्षात हे तुझं कारस्थान आहे तर"...रमेश चिडून म्हणाला.

हे प्रकरण वेगळ्याच वळणावर जातंय हे लक्षात आल्यावर अजिंक्यने साक्षीला आतमध्ये जाण्याचा इशारा केला. साक्षी आत गेली.

"कायतरी काय बोलतोय रमेश याच्यात कशाच कारस्थान.गावात लोकांच्या करमणुकीसाठी कायतरी ठेवलं म्हणजे कारस्थान झालं काय.
आर विचार की अजिंक्यला, शहरात असतो का नाय आरकेश्ट्रा."
विजय अजिंक्य च्या गळ्यात हात टाकत म्हणाला.

हे बघून आबासाहेब खूप चिडले.ते बोलणार तोच आपल्या खांद्यावरचा विजयचा हात बाजूला करत अजिंक्य पुढे आला

"करमणुकीचा विषय आहे ना मग त्यात एवढा गोंधळ कशासाठी आणि त्यासाठी आर्केश्ट्रा ची काय गरज. मनोरंजनासाठी आपण मुलांचे प्रोग्राम ठेऊ शकतो.आपल्याच मुलांचे नाटक, डान्स, जे काही मुलं सादर करू शकतील ते प्रोग्राम ठेऊ यामुळे मुलांनाही एन्जॉय करता येईल आणि घरातील लेडीजलाही.आणि जर तुम्हालाही डान्स करायचा असेल तुम्ही पण करा."

एका व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवत अजिंक्य म्हणाला.

हे एकूण सगळेच शांत झाले. गावातील लोक एकमेकांकडे बघायला लागले.
आपला डाव फस्तोय हे विजयच्या लक्षात आले तो अजून काही बोलणार तोच आबासाहेब म्हणाले

"ठरल तर मग तो आरकेश्ट्रा कॅन्सल आणि पोरांसाठी कार्यक्रम ठेवायचा बस आता याच्यावर पुण्यांदा चर्चा होणार नाही.निघा आता."

"बर चालतंय कि पोरांबरोबर आपणही नाचू." ....एक व्यक्ती
यावर हसत सगळे निघून गेले.

"आबासाहेब हे बरोबर नाही.".

'काय बरोबर नाही विजयराव.आव का त्या भाबड्या लोकांना नादी लावता. हिंमत आसल तर निवडणुका जिंकून दाखवा."

बघाच तुम्ही आबासाहेब यावेळेस गुलाल सरदेसाईचाच
उधळणार,येतो "असे म्हणत दोन्ही हात जोडत दोन्ही भाऊ गेले.

"काय चाललंय हे सगळे ...मी म्हणत होता ना हे असं राजकारण करू नका."

"आम्ही काय बी करत नाय अजिंक्यराव, समोरून आल्याल्यांना फगस्त परतून लावतो हा पर आज तुम्ही जे केलं ना त्यानं त्या विज्याच नाक चांगलच ठेचलं."
बापूसाहेब म्हणाले.

"मी फक्त पर्याय काढला"
अस म्हणून अजिंक्य रूम मध्ये गेला. त्याला घडलेला प्रकार अजिबात आवडलेला नव्हता.

" अजिंक्य उद्या मंदिरात किती वाजता जायचे आहे?"
बराच वेळ शांत बसलेल्या अजिंक्य ला बोलत करण्यासाठी साक्षीने विचारले.

"सात वाजता"
त्याच एवढंच उत्तर ऐकुन

"अजिंक्य काय झालंय? मघाशी जे झाले त्यामुळे अपसेट आहेस का तू?"

"साक्षी मला नाही आवडत आबासाहेबांना अस कोणी काही बोललेलं. कसा बोलत होता तो विजय.म्हणूनच मला राजकारणच नाही आवडत."

"जाऊदे ना.संपला ना तो विषय. नाहीतर जाच्यासाठी आलोय ते एन्जॉय करायचे राहील."

"असे कसे राहील....उद्या सात वाजताच आपण मंदिरात जाणार आहोत आणि त्यानंतर तुला गाव दाखवतो."
***********
दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे तयार होऊन साक्षीची वाट बघत होते.
"राधे बघ जरा जाऊन झाल का नाय साक्षीचं"

"व्हय आक्कासाहेब"

असं म्हणून राधा साक्षीच्या रूमकडे जायला वळली आणि खाली येणाऱ्या साक्षीला बघून म्हणाली

" वहिनीसाहेब आव आख्या गावात तुमच्यासारखं कोण नाय.काय झ्याक दितायसा."
हे एकूण सगळ्यांचे लक्ष साक्षी कडे गेले.


साक्षीने हिरव्या रंगाची, त्याच्यावर सोनेरी रंगाच्या बुट्या,असणारी नऊवारी साडी नेसली होती.गुलाबी रंगाच्या ब्लाऊज वर सोनेरी नाजूक नक्षीमुळे साक्षीच्या सौंदर्यात भर पडली होती.गळ्यात नाजूक सोन्याचा नेकलेस आणि लक्ष्मी हार,कानात सोन्याचे झूमके,हातात प्लेन हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि त्याबरोबरच सोन्याच्या पाटल्या,बोटात नाजूक अंगठी, नाकात नथ, लांब केसांचा बांधलेला आंबडा आणि त्यावर मनसोक्त पहुडलेले मोग्र्याचे गजरे. ओठांवर डार्क गुलाबी लिपस्टिक,डोळ्यात हलकेसे काजळ आणि कपाळावर चंद्रकोर.

साक्षी चे रुप पाहून सगळेच स्तब्ध झाले होते.

अजिंक्यची तर तिच्यावरून नजरच हटत नव्हती.ते बघून विलास हळूच त्याच्या कानात म्हणाला

" वहिनीच आहेत."

हे एकूण अजिंक्य भानावर आला आणि म्हणाला

"निघायचं."

जया आणि राही पळत साक्षी कडे येऊन म्हणाल्या
" खूप छान दिसते तू नऊवारी साडीत."

तेवढ्यात छाया आणि विनायकराव आले...

"अय्या वहिनी नऊवारी साडी? काय छान दिसताय."
छाया हसून म्हणाली.

आक्कासाहेब आपल्या सुनेला नऊवारीत पाहून भरून पावल्या होत्या.

"बर आता निघायचं का? अजिंक्य पुन्हा एकदा म्हणाला."

"हो निघू."...सगळे निघाले.

आदित्यला राधा ने घेतले होते.

अजिंक्य साक्षी जवळ आला
" आज स्वर्गातील अप्सरा खाली आल्याचा भास होतोय."

"अप्सरेकडे नाही तर पुजेकडे लक्ष द्यावे नाहीतर आबासाहेबांचा रोष ओढावून घ्याल अजिक्यराव."
दोघेही हसतात.

सगळे गावात पोहचतात....


क्रमशः


कशी होईल महादेवाची पूजा ? सगळे व्यवस्थित होईल का ? वाचू पुढील भागात.


0

🎭 Series Post

View all