Login

रिमझिम बरसणारा पाऊस आणि मी

U Me & Rain

रिमझिम बरसणारा पाऊस आणि ????️

त्यात मातीचा प्रफुल्लित करणारा सुगंध

त्यातच तुझ्या मिठितला उबदार स्पर्श

खूपच सुंदर आणि जरा हटके आहे 

कारण तुझ्या माझ्या प्रेमाचा ओलावा आहे♥️

म्हणूनच पाऊस आणि मी असा वेगळा गोडवा आहे

पाऊस येतो नकळत मला चिंब चिंब भिजवतो????️

आणि मग हलकेच तुझ्या आठवणीत मला नेतो????

आपल्या गोड गोड अश्या स्मृतींना उजाळा देतो

कधी रिमझिम बरसणारी, तर कधी चिंब चिंब भिजवणारी????️

तर कधी मुसळधार कोसळणारी, तर कधी प्रेमाचा स्पर्श देणारी♥️

अशी कशी रे तुझी हि आठवण मला सारखी सारखी येणारी

कधी प्रेमाचा ओलावा जपणारी, तर कधी दुःख हळूच लपवणारी

कधी तुला आरशात पाहून लाजणारी,कधी मनाला वेड लावणारी????

अशी ही तुझी आठवण आणि ही सर पावसाची मनाला स्पर्श करणारी 

श्रावणी देशपांडे????

0