लक्ष्मी आली दारा भाग -5

लक्ष्मी
मागील भागात आपण पाहिलं की, रिया ला मुलगी होते... श्रीधर राव आणि विद्या ताई दोघेही आनंदाने त्या दोघींचं करतात... आता पाहूया पुढे..,

त्या खोलीत अजूनही एक तिच्यासारखीच बाळंतीन होती... तिच्या बरोबर तिची आई होती..,..श्रीधर बाहेर गेल्यावर ती रियाला म्हणाली......,


" तुझे आई बाबा खूपच चांगले आणि सुसंस्कृत आहेत........तुझी आई तर रात्री कितीतरी वेळ तुझ्या पाय दाबत होती...... रात्रभर ती झोपलीच नाही....... किती काळजी करतात तुझी......."


ह्यावर रियाला काय बोलावे तेच उमजेना... तरी सुद्धा ती मान खाली घालून म्हणाली.....,

" ते माझे आई वडील नाहीत.... सासू सासरे आहेत.... "


", काय म्हणतेस? खरच की काय....? सासू सुने चे पाय दाबू शकते ह्यावर विश्वास बसत नाही आहे .... हो की नाही आई.....?"


ती स्त्री आपल्या आई कडे पाहून म्हणाली तशी तिची आई सुद्धा म्हणाली...,


"खरं सांगतेस अशीही सासू असते ? कालपासून स्वतः जेवणही न करता सुनेची सेवा करणारी सासू तुला मिळाली आहे. तू खरोखर भाग्यवान आहेस ....मला व इथल्या सर्व स्टाफ ला वाटलं कि ते तुझे आई वडील आहेत म्हणून ..खरच जगातील सगळ्या सासवा अश्या झाल्या तर एकही सून विष पिऊन, फाशी घेऊन, स्वतःला पेटवून किंवा गाडीखाली येऊन आत्महत्या करणार नाही आणि आपल्या जीवाला मुकणार नाही.....

तेव्हा तुला एकाच सांगते पोरी... रागावू नकोस, तुझ्या सासू सासऱ्यांना कधीही दुखावू नकोस त्यांच्या म्हातारपणी त्यांची सेवा कर..... त्यांचे लाख मोलाचे आशीर्वाद आपल्या पदराशी बांधून ठेव ...माझ्या मुलीची सासू बघ मुलगी झाली तर बघायला पण आली नाही

हे बोलताना त्या स्त्री चा  कंठ भरून आला होता ...तेवढ्यात तिच्या मुलीने आवाज दिला त्यामुळे ती तिच्या कडे गेली ...

त्यानंतर एकवार आपल्या बाळाकडे नजर टाकून रिया शांत पडली ...ते पण शांत झोपलं होत.....

ती विचार करत होती तिची आई आणि सासू दोघीही स्त्रियाच पण दोघींमध्ये किती फरक आहे, एक फक्त अधिकार गाजवते तर दुसरी प्रेम देते , नम्रता दाखवते वेळप्रसंगी सेवा देखील करते.....एकीला स्वतःच्या लेकीचं घर फुटायला हवं तर दुसरी ला लेकाचा संसार सुखाचा हवा आहे . एक फक्त स्त्री आणि जननी आहे तर दुसरी खऱ्या अर्थाने आई जिच्यावर प्रेम करावे श्रद्धा ठेवावी व मान द्यावा अशी एक आदर्श स्त्री आहे ....


" रिया बाळा, चहा आणला आहे..... विद्याला यायला थोडा वेळ आहे ..गरम आहे तोवर पिऊन घे म्हणजे कस तुला हुशारी जाणवेल "


श्रीधर रावांच्या आवाजात प्रेम , आपुलकी, नम्रता होती ...त्यांच्या आवाजाने ती विचारातून बाहेर आली पण तिला काही बोलायला सुचतच नव्हतं.....ती अजून पर्यंत एकही शब्द त्या दोघांशी बोलली नव्हती...... ती विचारात होती........


आपण इतके वाईट कठोर वागलो ,त्यांना त्रास दिला तरीही हे दोघे आपल्यावर किती प्रेम करत आहेत.. माझी काळजी घेत आहे आहेत, तिचे डोळे आणि मन दोन्ही भरून आले होते ...तिने थोडी हालचाल केली,  उठून बसायला पण तिला जमलं नाही ते समजून श्रीधर राव बाजूच्या स्त्री ला म्हणाले ....,


" ताई थोडा त्रास देतोय ..पण माझ्या सुनेला जरा आधार देऊन बसवा ..म्हणजे तिला चहा पिता येईल..... "


श्रीधर रावानी त्या स्त्री ला विनंती केली आणि ती स्त्री रिया ला चहा पाजू लागली तसे श्रीधर राव बाहेर निघून गेले .......काही वेळाने विद्या मस्त मऊशार खिचडी घेऊन आली आणि येताना तिने बाळासाठी व रिया साठी मस्त धुतलेले स्वच्छ कपडे आणले होते ...ते तिला चेंज करून नंतर विद्या ने स्वतःच्या हाताने तिला खिचडी भरवली ...आज त्या खिचडीची चव तिला अमृतासारखी लागत होती ..ती एकटक विद्या ताईंकडे पाहत होती पण काही बोलत नव्हती,  शब्दच फुटत नव्हते तिचे .....




संध्याकाळी  पाच वाजता रिया चे मम्मी पप्पा आले....त्यावेळी विद्या बाळाला घेऊन बसली होती..... ते दोघ हि तयारी करून कुठेतरी चालले होते कारण त्यांचे कपडे भरजरी होते आणि आणि त्यांच्या पर्फ्यूम चा सुगंध पूर्ण वॉर्ड मध्ये दरवळला होता ...त्यांनी तोंड देखील त्या दोघाना नमस्कार केला ...आणि बाजूच्या खुर्चीवर बसले ...त्यांनी एकदाही रिया ची तब्येत विचारली नाही कि बाळाला घेतलं नाही.......विद्या ताई समोरून त्यांना बाळाला देत होते.... पण सवय नाही असं सांगून त्यांनी बाळाला घेतलं नाही..... पण रिया ला माहित होत की त्यांना त्यांच्या कपड्यांची काळजी होती......


विद्या ताईंनी त्यांच्या समोर रियाचे केस विंचरून दिले ...तिला चहा परत दिला आणि त्यांना सुद्धा विचारलं पण त्यांनी वाकडे तोंड करत नकार दिला ....त्या नंतर त्यांनी आपले जे तिला नको होत ते साहित्य जमा केले आणि रिया कडे वळून म्हणाल्या ...,

"रिया बाळा आमच्या कडून जेवढं होईल तेवढं आम्ही केलं ...आता तुझे आई बाबा आले आहेत, आता आमची गरज नाही इथे ....तेव्हा मी माझ्या घरी जाते ...डॉक्टरांना विचारले दोन दिवसात तुझे टाके काढले कि तुही तुझ्या घरी जाशील ...आज पर्यंत चा सगळा बिल आणि औषधचा खर्च भरला आहे, त्याच्या पावत्या ठेवल्या आहेत.......आदित्य ला आशीर्वाद सांग ...जमलं तर एकदा छकुलीला भेटून जाऊ आम्ही ...आता येते काळजी घे ...."


एवढा बोलून त्यांनी आपली पिशवी उचलली पण चालताना त्यांचा पदर अडकला म्हणून तो काढण्यासाठी त्या मागे फिरल्या तर रिया नेच त्यांचा पदर पकडून ठेवला होता ...आणि ती रडत होती .....

विद्या ने हे काय म्हणत तिचा पदर सोडवून घ्यायचा प्रयत्न केला तर  रिया ने अजून गट्ट पकडला आणि म्हणाली ...,

" आई तुमच्या ह्या वेड्या, मूर्ख मुलीला माफ नाही करणार का ? चुकले मी खूप चुकले ...मला माफ करा ..".

असं म्हणून ती रडू लागली,

तस विद्या ने हि तिला आपल्या छातीशी कवटाळले ...आणि म्हणाली ...,

"अग वेडी आहेस का????? आई आपल्या मुलावर रागावते का कधी.....अग एवढ्या मुलींमधून तुझी निवड केले मी ...काहीतरी होत म्हणूनच ना.......तेव्हा स्वतःला तू मूर्ख समजू नकोस ...तू सून नाही लेक आहेस आमची ...अदिती एवढीच जवळची आहेस तू माझ्या ....तुला मी सून कधी मानलेच नाही ..लेक आहेस तू माझी........"


आपल्या सासू च्या मनाचा मोठे पणा पाहून तिला खूप रडायला आलं....ह्या देवमाणसांशी आपण आपल्या आई च्या सांगण्या वरून असं वागलो ह्या गोष्टीचा तिला प्रचंड पश्चाताप झाला आणि तिला अजून रडायला आलं ...



होईल का त्यांच नातं नीट?
क्रमश

🎭 Series Post

View all