लक्ष्मी आली दारा

लक्ष्मी
मागील भागात आपण पाहिलं की, रिया ला दिवस भरल्यामुळे ऍडमिट केल होत, हे विद्याला समजताच तिने हॉस्पिटल कडे धाव घेतली... आता पाहूया पुढे....,



विद्या नर्स च बोलणे ऐकत असताना जाऊ की नको ह्या विचारात होतीच की तिथे एक ज्येष्ठ सदगृहस्थ आले जे रिया चे घरमालक होते आणि ज्यांनी तिला ऍडमिट केलं होत ...त्यांनी ऑबसेर्व्हशन केलं ..थोडी फार आदित्य च्या चेहऱ्याशी मिळतीजुळती असणारी हीं स्त्री आदित्य ची आई असावी असा त्यांनी अंदाज लावला ...त्यात ती एकदम आपुलकीने रिया ची चौकशीं करत होती, ज्यातून त्यांची काळजी स्पष्ट होत होती ते त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना विचारलं,


"नमस्कार, मी सुरेश......तुम्ही आदित्य च्या आई ना ?  मी आदित्य चा घरमालक, आणि मीच रिया ला ऍडमिट केल आहे..... "

तस विद्या ने त्यांचे आभार मानले ...,

" हो मीच आदित्य ची आई रिया माझी सून आहे ..., धन्यवाद तुम्ही तिला वेळेत ऍडमिट केलं;....."


"अहो त्यात काय माझ्या जागी कुणीही असत तरी त्याने तेच केलं असत .....चला त्या फॉर्म वर सही करा ..."

तशी विद्या त्या नर्स सोबत आत गेली आणि डॉक्टराना भेटली ...त्या डॉक्टर खूप चांगल्या होत्या ...त्यांनी विद्या ताईनं बसायला सांगितलं ....,

विद्या ताई त्यांना म्हणाल्या ...,

"मॅडम , मी रिया ची सासू आहे ....त्या फॉर्म वर सही केली आणि फीस सुद्धा घेऊन आले ...पण ऑपेरेशन ची फी ३०००० हजार आहे आणि मी १५ हजार च सध्या आणले आहेत सध्या पण काळजी करू नका मी माझ्या पतींना सांगते ते घेऊन येतील,पण तुम्ही ऑपेरेशन मात्र लगेच सुरु करा ., वेळ करू नका..... पैसे वेळेत मिळतील
.....मला माझी सून आणि नातवंड दोन्ही हि हवेत ..."

विद्या ताई हात जोडून काकुळतीने डॉक्टरांना म्हणाली ...


"तुम्ही अजिबात घाबरू नका, काळजी ही करू नका. पैसे तिथे कॅश काउंटर वर भरा... मोबाईल आणला आहे का? नसेल तर बाजूला च फोन आहे... फोन करून पैसे ही मागवून घ्या. आणि  हा घाबरू नका, तुमच्या सुने ची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतोय...."

डॉक्टर विद्या ताईंना आश्वस्त करत म्हणाल्या.....

विद्या ने कॅश कॉउंटर वर पैसे भरून पावती घेतली.... तिथूनच फोन करून त्यांनी ही आनंदाची बातमी श्रीधर रावांना दिली...आणि पैसे घेऊन त्वरित त्या हॉस्पिटल ला यायला सांगितलं...... तोपर्यंत तिचं ऑपेरेशन चालू झालं होत.... विद्या ताई ऑपेरेशन थिएटर च्या बाहेर बसून देवाची प्रार्थना करत होत्या... 


त्यानंतर एका तासा भरातच श्रीधर राव देखील तिथे पोहचले.. पण रिया चे आई वडील मात्र अजून पर्यंत पोहचले नव्हते.... श्रीधर राव देखील विद्या च्या शेजारी बसून आपल्या नातवंडांसाठी मनातल्या मनात जप करू लागले आणि थोड्याच वेळात नर्स बाहेर आले ती त्या दोघांना म्हणाली,

"अभिनंदन तुमचे......, मुलगी झाली आहे......बाळ व बाळाच्या आईची तब्येत उत्तम आहे......."


ते ऐकून दोघांनी देवाला हात जोडले...

त्यानंतर आणखी थोड्याच वेळात दुसरी नर्स बाहेर आली......ती कपड्या मध्ये गुंडाळलेल्या एका बाळाला घेऊन आली.......बाळाला बघताच दोघांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू उभे राहिले.... विद्या ने बाळाला आपल्या हातात घेऊन श्रीधर रावांना खूण केले तसे ती खूण समजून त्या नर्स ला 1000 रुपये दिले आणि म्हणाले....,


" तुमचे तोंड गोड करण्यासाठी ही आमच्याकडून भेट आहे धन्यवाद..... "

ते घेऊन नर्स आत मध्ये गेली, त्यानंतर दोघेही नवरा-बायको बाळाचे कौतुक करण्यात दंग झाले....काही वेळाने स्टेचरवरून रियालाही आणली... तिला बेडवर झोपवून बाळाला पाळण्यात झोपवलं......


इकडे रिया अजून औषधंच्या अमलाखाली होती.... म्हणून विद्या ने काही सूचना देऊन श्रीधर रावांना घरी पाठवले व स्वतः एका खुर्ची वर बसून राहिली...... ती मध्ये च रिया कडे बघत होती तर मध्येच बाळाकडे.....


साधारण चार ते पाच तासांनी रियाला जाग आली तेव्हा तिने पाहिले तर तिची सासू तीच्या जवळ बसलेली होती आणि तिच्या मांडीवर एक बाळ होतं........रिया ला जाग आलेले पाहून विद्या तिला म्हणाली.....,

"रिया अग लक्ष्मी आली आहे बघ....अगदी तुझ्यासारखीच आहे किती सुंदर आणि गोड आहे बघ......"


असं म्हणून विद्या ने बाळाला तिच्या कुशीत दिला आणि स्वतः रियाच्या रियाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवू लागली..... दमलेल्या रियाला त्या प्रेमाच्या स्पर्शाने खूप बरं वाटलं होतं...... तेवढ्यात घर मालक तिथे आले आणि म्हणाले.....


"रिया बेटा..... कस वाटतंय......? "


रियाने फक्त मान हलवली आणि thank you म्हणाली.....त्यावर ते म्हणाले..


"अग thank you कश्याला.....? मी काही नाही केल..... पण एक सांगतो ते ही आवर्जून जेव्हा मी तुला इकडे घेऊन आलो तेव्हाच माझी बायको तुझ्या आई-वडिलांना निरोप देऊन आली होती की तुला इकडे आई नर्सिंग होम मध्ये ऍडमिट केलं आहे.....तुम्ही लगेच पोहचा पण अजून त्यापैकी कोणीच आलेले नाहीये पण तुझ्या सासू-सासर्‍यांनी मात्र आपल कर्तव्य चोख बजावलं.... तेही न सांगता......नशीबवान आहेस हा तू...चल काळजी घे.... मी निघतो..... "


ते निघाले तसे विद्या ताईंनी परत त्यांना हात जोडले आणि थांबल्या बद्दल आभार मानले......


*********************************


सायंकाळ उलटून गेली होती विद्या ताईंनी सकाळपासून जेवणही केलं नव्हतं तेवढंच काय अजून तर तिला चहा प्यायचे सुचलं नव्हतं..... तर रिया ला आज काहीच खायचं नव्हतं..... तिला सलाईन चालू होती औषधांची......रिया फक्त पाहत होती पण शांत होती......

विद्या ताई तिच्या जवळच बसून होत्या..... बाळा ची शी सु काढत होत्या आणि भूक लागली तर स्वतः दूध जाऊन आणत होत्या.......


रिया चे रात्री कदाचित पाय दुखत असावे कारण की अस्पष्ट कण्हत होती....ते समजून विद्या हलक्या हाताने तिचे पाय दाबायला सुरुवात केली तस जरा आराम भेटून रिया ला मस्त झोप लागली.....


दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र रिया मस्त फ्रेश होती.... सलाईन काढून झालं होतं..... तर श्रीधर राव थर्मास मध्ये चहा बिस्कीट घेऊन आले होते.....विद्याने प्रथम स्वतः चहा घेतला आणि मग रिया ला ही पाजला....

तसे श्रीधरराव विद्या ला म्हणाले......,


"तू आता घरी जाऊन थोडी विश्रांती घे.....मी थांबतो इथे आज मी रजा घेतली आहे......तू कालपासून जेवली देखील नाहीयेस..... तेव्हा आता घरी जाऊन थोडं खा, थोडी झोप घे आणि येताना रिया साठी पातळ, गरम खिचडी घेऊन ये..... "


त्यावर श्रीधर रावांना होकार देऊन ती जायला निघाली पण जाताना तिने बऱ्याचशा सूचना दिल्या श्रीधर रावाना आणि बाळाचे लाड करून व रियाच्या गालावर हात फिरवून विद्या घरी गेली......


तसे श्रीधरराव म्हणाले.......,


"रिया बेटा मी बाहेरच आहे काही लागलं तर हाक मार..."



असे म्हणून ते बाहेर जाऊन बेंचवर पेपर वाचू लागले....


त्या खोलीत अजूनही एक तिच्यासारखीच बाळंतीन होती... तिच्या बरोबर तिची आई होती..,..श्रीधर बाहेर गेल्यावर ती रियाला म्हणाली......,


" तुझे आई बाबा खूपच चांगले आणि सुसंस्कृत आहेत........तुझी आई तर रात्री कितीतरी वेळ तुझ्या पाय दाबत होती...... रात्रभर ती झोपलीच नाही....... किती काळजी करतात तुझी......."


हे ऐकून रियाला काय बोलावे ते सुचेना...


रिया आपल्या सासू शी चांगली वागेल का?

तिला तिच्या चुकीची जाणीव होईल का?
क्रमश

🎭 Series Post

View all