लग्न एक प्रेम प्रवास भाग 9

I Like To Read

लग्न एक प्रेम प्रवास भाग ९




"आई ने सांगितल आहे .चल ते बघ समोरच जायचय.तुझी स्कूटी असू दे इथेच." म्हणत त्याने तिला बरोबर यायला सांगितल.
तो पुढे चालत होता. ही मागून सगळीकडे बघत बघत चालत होती. हॉटेलमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती.हॉटेलचे आतलं वातावरण बघून ते तिला थोडंसं महाग वाटल.

"चल,तिकडे बसू."तो एका बाजूला बघत बोलला.
"कोपऱ्यात का इथे बसू ना."

"जरा निवांतपणे बसून जेवू.मला जेवताना शांतता लागते."
त्याने त्याला हवं ते जेवण मागवलं.ती फक्त मेनू कार्ड बघत होती.
"काय झालं.एव्हढा काय विचार करते."
"अहो, ते काय मागवू कळत नाहीये . मी घरी जाते.तुम्ही जेवा".म्हणत ती उठली
"थांब,बस .मी आपल्या दोघांसाठी जेवण मागवलं आहे .थोड्या दिवसांनी आपल लग्न आहे. तेव्हढ आपल बोलण होईल. तू त्या दिवशी काही बोलली नाहीस.तुझ्याबद्दल सांग .मला आवडेल."
"माझ्याबद्दल विशेष काही नाही. मी कोचिंग क्लास मध्ये टीचर आहे.सकाळी ७ ते १ . नंतर मग उरलेला दिवस आईला मदत करते. संध्याकाळचा स्वयंपाक मीच बनवते. रात्री लवकर झोपतो.सकाळी लवकर उठायचं असत. "

तितक्यात जेवण आल.तशी गप्प बसली.जेवण बघूनच चेहऱ्यावर हसू आलं.
""तुम्हाला कस कळलं . माझ आवडत आहे हे." समोर आलेला पदार्थ बघत तीने त्याला विचारलं.
असच मला वाटलं .चल सुरू कर. तुझी बिर्याणी. "
नक्कीच . मोनु ने सांगितल असेल. ती विचार करत होती.
"दुसरं काही मागवू का.?''

"तुम्ही पण घ्या ना "
'नको माझ जेवण आल.तू सुरू कर."

तीने त्याच ताट बघितल. फक्त पोळी भाजी आणि कोशिंबीर.
अहो,तुम्ही हे खाणार."'
"मी रोज दुपारी हेच जेवतो".
"ठीक आहे. तुम्ही थोड घेता का.मला एवढी संपणार नाही."
"पण तुला तर आवडते ना."

"हो .पण "
"पण काय ? तुला अजून काही पाहिजे का.?"
"नाही नको.हेच खूप आहे " खरतर तिला लाज वाटत होती. तो साधं जेवणार.आणि त्याच्या समोर आपण बिर्याणी खाणार.
तीने थोडीशी त्याच्या ताटात बिर्याणी वाढली.
"अग.मला खरच नाही आवडत."
"प्लिज थोडीशी खा." तीने छोटासा चेहरा केला.

"ठीक आहे."
दोघांनी शांत पणे जेवण केलं. आणि एकमेकांचे फोन नंबर घेऊन निरोप घेतला.

____________
असेच लग्नाच्या तयारीत दिवस भराभर पुढे सरकत होते.
हळूहळू घरी पाहुणे जमायला लागले. हळदीच्या रंगाने.चेहरा उजळला होता.
सर्वजण दमले होते.

"सोनी,चल झोप आता.सकाळी लवकर उठून वेळेत पोचायला हवं. आई रागवेल चल उठ."
"बाबा, बसा ना थोडावेळ माझ्या बाजूला , आई तू पण ये." बोलताना तिचा स्वर हळवा झाला होता.


"बोल ना बाळा.काय झालं ."आई तिच्या बाजूला बसली.
कित्ती दिवसांनी मला बाळा म्हणालीस. नाहीतर सतत आपल सोने सोने. बोलत तीने आईच्या मांडीवर डोकं ठेवलं.

बाबांनी तिचे पाय त्यांच्या मांडीवर ठेवले.हळूहळू तिचे पाय चेपत होते.
"बाबा,आता मी मोठी झालेय. खेळून रात्री दुखणारे पाय नाहीत आता."
"असू दे. तू माझ्या घरची छोटी लक्ष्मी आहेस. उद्यापासून सगळच बदलेल." त्यांना भरून आल होत.
"पण मी कुठे लांब जाते का.एकच तर शहरात आहे."
थोड्याच वेळात झोपली तशी बाबांनी अलगद उचलून तिला बेडरूम मध्ये झोपवलं.

मुली एव्हढ्या लवकर मोठ्या का होतात?. हा सगळ्या बाबांना पडणारा प्रश्न आज त्यांना पण पडला होता.

क्रमशः

मधुरा Kijbile