लग्न एक प्रेम प्रवास भाग १

I like to read and now write.
लग्न एक प्रेम प्रवास भाग 1
(कथा मालिका)
(सादर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)


स्थळ --शहनाई हॉल , ठाणे.

नवरी मुलीच्या रूममध्ये .
नवरी मोनिशा आणि तीची आई एका बाजूला शांत बसले होते. नवरीचे बाबा दरवाजात उभे होते .
तर दुसरीकडे नवरीची काकू ,काका, चुलत बहिण बोलत होते.

" आई, प्लिज तू एकदा तरी ऐकून तर घे. बाबा समजवा ना आईला. अशी का बोलतेय ही . वय आहे का लग्न करायचं , ओन्ली 27."
"सोनू, हो, हेच योग्य वय आहे ".
"आई,"
"अग पण काय हरकत आहे . मोनू च होतंय ना, तिच्याबरोबर तुझं पण झालं तर चांगलच आहे की. "
"मग तीच होऊ दे. तिला करायचं तर करू दे. मला काहीच हरकत नाहीये. "

"सोनू, इतके दिवस मी काही बोलले नाही. पण आता इतकं चांगल स्थळ स्वतःहून आलय. ते पण मोनुच्या सासरहून.एकदा शांतपणे ऐकून तर घे. ये इकडे बस, अहो तुम्ही पण या, मोनु तू पण ये. बहिण कमी आणि मैत्रिणी जास्त आहात.आता तूच समजव. लहान आहेस पण तुझ ऐकते ती . नाहीतर नंतर तुम्ही सगळे एक व्हाल नेहमीसारखी मी बिचारी एकटीच."
"Ok. आई बोल.
" हा ,काकू बोल ."
सगळे गालात हसत होते .
"भाऊजी तुम्ही पण या. नीता ये ग.नंतर सगळे मलाच बोल लावाल. "
सगळे गोल करून बसले .
"सोनू दी,अग रितेश चा दादा खूप चांगला आहे.तुला आवडेल. एकदा भेटून तर घे.बोलून बघ नंतर ठरव.रितेश ची काकू पण चांगली आहे.तू फक्त एकदा माझ्यासाठी." मोनिशा ने सोनू छा हात हातात घेऊन तिला समजावयला सुरुवात केली
"मोनु ,अग पण माझा लग्न या गोष्टीबद्दल मत माहिती आहे तरी तू का फोर्स करतेस. उगाच माझ्यामुळे कोणाचं वाईट नको व्हायला."
"दि, अस काही होणार नाही एकदा माझ्यासाठी भेट बोल.नाही योग्य वाटल तर.ठीक आहे.आज माझा साखरपुडा आहे. माझ ऐक ना.प्लीज." मोनू ने चेहरा अगदीच केविलवाणा केला.

"ठीक आहे.भेटते. बोलते.पण शेवटचा निर्णय माझा असेल."
"Ok. दादा निघाला आहे.पोचेल इतक्यात. रितेश फोन करेल."
सोनू भेटायला तयार झाली.पाहून सगळ्यांनी मनातच हुश्श केलं.
--------

सोनू म्हणजे सोनिशा सांगळे.वय तर कळलेच असेल.27,
एका प्रायव्हेट कोचिंग क्लासेस मध्ये टीचर आहे. तिला लग्न या गोष्टीत अजिबात इंटरेस्ट नाही.तिच्या मते लग्न करून एखाद्याच आयुष्य का खराब करायचं.आपण आपल आनंदी राहायचं.तिच्या आजूबाजूला तुटलेल्या लग्नाची उदाहरण बघून तीने लग्न न करण्याचं ठरवलं होत.
सुरुवातीला सर्वांनी हसण्यावारी नेलं.आईला मात्र अजिबात पटल नव्हत.
पण मागच्या महिन्यात जेव्हा तिच्या पेक्षा एकच वर्षांनी लहान चुलत बहिणीच लग्न ठरल.आणि सोनिशाच्या आईच्या मनाची चलबिचल वाढली.
तीने पण तिच्यासाठी मुलं बघायला सुरुवात केली.
काल संध्याकाळी मोनिशाची सासू तिच्या मोठ्या जाऊबाई बरोबर त्यांच्या घरी आली होती.
त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलासाठी सोनिशाला मागणी घातली. त्यांच्या मुलाबद्दल सर्व माहिती दिली.
उद्या मोनु आणि रितेश बरोबर सोनू आणि त्यांच्या मुलाचाही साखरपुडा करून घेऊ. जाता जाता मोनिशाच्या सासूबाईंनी सुचवलं.
काल रात्रीपासून त्या विचार करत होत्या.तिला कस सांगायचं.
शेवटी आज हॉल वर आल्यावर त्यांनी तिला सगळ सांगून टाकल.

क्रमशः
मधुरा