लग्न एक प्रेम प्रवास भाग २

I like to read

लग्न एक प्रेम प्रवास भाग २

(कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)

   

      काल रात्रीपासून त्या विचार करत होत्या.तिला कस सांगायचं. शेवटी आज हॉल वर आल्यावर त्यांनी तिला सगळ सांगून टाकल.

आणि सोन्याच्या रागाचा भडका उडाला.

 "हे बघ सोनू,एकदा भेटून तर बघ. चांगल वाटल तर ठीक आहे .

आणि माणसं ओळखीची आहेत."

 शेवटी सर्वांनी समजावलं तशी ती भेटायला तयार झाली .

------------

"आई, मला एकदा त्या मुलीला भेटायचं आहे. अशा काही गोष्टी आहेत ज्या मला तिच्याशी बोलण गरजेचं आहे."

त्याच्या आईने त्याच्याकडे डोळे बारीक करून बघितलं.

आणि बाजूला त्याची काकी उभी होती,तीने डोळे मोठे केले.

"अश्या डोळ्यांनी मारू नका मी लग्नाला तयार आहे.फक्त मला एकदा.'

"हो ,ठीक आहे.आपण जात आहोत आता साखरपुड्याला त्या आधी तू भेट.ठीक आहे. चल आता आवर पटकन."

"ओके. " म्हणत तो त्याच्या रूममध्ये निघुन गेला.

"हुश्श ,वाचलो.नशीब तयार झाला. त्याच्या आईने एक लांब श्वास घेतला."

"वहिनी,नका काळजी करू.गुणी बाळ आहे आपला.तो एक अपघात नसता झाला.तर आज किती मुलींची लाईन लागली असती.पण "

"मालती, नको त्या आठवणी.आता सगळ छान होणार."

"नक्कीच.चला आपण खाली जाऊया."

तो म्हणजे संजेश इनामदार.वय २८ . आज त्याच्या चुलत भावाचा म्हणजे रितेश चा साखरपुडा आहे. गेले महिनाभर ह्या दिवसाची तयारी चालली होती.रितेश त्याच्या छोट्या काकांचा मुलगा पण मित्र जास्त . त्यानेच तर घरात पटवून दिलं होत,मोनीशा ची बहिण कशी दादा साठी योग्य आहे. सर्वांना ती आवडली होती.

  थोड्याच वेळात सगळेजण हॉलवर पोचले.

"सोनू, चल रितेशचा दादा त्याच्या रूम मध्ये बसला आहे. आपण जाऊया. सगळे बाहेर आहेत.तुला मोकळेपणाने बोलता येईल".मोनिशा तिच्या जवळ येत म्हणाली.

"तू कशाला जातेस. ती जाईल एकटी. तू थांब." तिच्या आईने तिला टोकले.

काकू,येऊ दे ना तिला.

"नको,तू जा एकटी. हवं तर मी येते."

"नको.मी जाते."

सोनू हळूहळू रुम पर्यंत आली. एक वेगळीच हुरहूर जाणवत होती.ती दरवाजात उभीच होती. तितक्यात रितेश दार उघडले.

"वहिनी,आत या ना."

"काय? काय बोललास. काल पर्यंत ताई बोलून डोकं खराब केलं."

"वहिनी होणार ना.आता तुम्ही ."

"रितेश,अजून काही नक्की नाहीये. बघू. होणार तेव्हा बोल.आता मी आत येऊ . ताई च ठीक आहे."

"ठीक आहे ". म्हणत त्याने तिला आत घेतले.

"वहिनी, सॉरी ताई."

ती आत आली.तर तो पाठमोरा उभा फोनवर बोलत होता.खूपच रागवल्यासारखा वाटत होता.

रितेशने त्याच्या कानाला असणारा फोन काढून कट केला.

"रितू,काय हे .मी महत्वाचं बोलतोय."

"सॉरी दादा.पण आता महत्वाचं बोलण इथे जरूर आहे ." आणि रितेश ने त्याला मागे वळवलं.

"काय आहे?" रागावलेला चेहऱ्याने त्याने पाहिले.

एक मुलगी त्याच्याकडे बघत उभी होती.

क्रमशः

मधुरा.