लग्न एक प्रेम प्रवास भाग ४

I like to read

लग्न एक प्रेम प्रवास भाग ४
कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.

"आज मला माझ्याबद्दल म्हणजे आमच्या बद्दल थोडस महत्वाचं  बोलायचं आहे. त्यानंतर तुम्ही ठरवा ."
"ठीक आहे.बोला. "


"माझ्या घरी माझी आई,बाबा आणि लहान बहीण असते. सिया सध्या ती फॅशन डिझायनिंग शिकायला पुण्याला गेलीय. पुढच्या महिन्यात येईल."


"माझे बाबा आणि काका म्हणजे  रीतेशचे बाबा आणि आत्या .आम्ही सगळे एकाच बिल्डिंग मध्ये राहतो. रोज एकमेकांकडे जाणं होत नसलं तरी आई ,काकू आत्या सगळ्या गोष्टी एकमेकींना सांगत असतात. खूप जास्त प्रेम आहे अस नाही म्हणणार पण प्रत्येक जण एकमेकांना धरून आहे .
तीन मजली बिल्डिंग आहे.पहिल्या मजल्यावर आत्या राहते.दुसरा मजला काकांचा आहे.आणि आम्ही तिसऱ्या मजल्यावर.वरती टेरेस आहे.तिथे बरच काही आहे."


"एव्हढच होत का.मला माहितेय हे."


"ओके.बर आता माझ्याबद्दल सांगू का?.बोलू पुढे."
"हो सांगा ना."


"म्हणजे ते साडी च दुकान माझ्या बाबांचं आहे. मी फक्त ते सांभाळण्याच काम करतो . चार वर्षांपूर्वी  माझा लॉ म्हणजे वकिलीचा निकाल लागला. मी फर्स्ट क्लास मध्ये पास झालो होतो. माझ्या मित्राच्या मीहिरच्या भावाची लॉ ची फर्म आहे.तिथे मी अधूनमधून वकिलीची प्रॅक्टिस म्हणून शिकण्यासाठी जात होतो. त्याने सांगितल होत.निकाल लागला की  तूझा रीतसर इंटरव्ह्यू घेईन मग ये."


"निकालाच्या दुसऱ्याच दिवशी त्याने मला जॉब ऑफर केली.
बाबा मझ्यासाठी खूप खुश होते. त्या दिवशी रात्री दुकानातून येताना त्याच्या स्कूटर चा मोठा अपघात झाला.समोरून येणाऱ्या ट्रक ने त्यांना उडवले. रस्त्यावरच्या लोकांनी त्यांना दवाखान्यात भरती केलं. घरी फोन करून कळवल. त्यांच्या वर इलाज सुरू केला.दोन महिने ते कोमात होते.  जेव्हा शुध्दीवर आले तेव्हा जाणवलं पायातली शक्ती हरवली आहे.ते दोन महिने खूप कठीण होते.मला दुकानाचा काही अनुभव नव्हता.आई बाबांना सोडून जात नव्हती.प्रिया लहान होती.   एक दिवस दुकानातले बाबांचे विश्वासू कामगार घरी आले. "


भूतकाळ


"मी काय करू शकतो काका?'
"तू ये आता सांभाळ हे सर्व.दहा माणसांचं घर चालत. किती दिवस आम्ही बघणार. तू येशील का.बाजूचे लोक वाट च बघत आहेत.कधी बंद होतय."


"मी येऊन काय करू ?"


"काही नको करुस.नुसता येऊन बसलास तरी चालेल.शेवटी मालक हा मालक असतो .त्याचा धाक असतो. तू फक्त येऊन बस.'


"ठीक आहे. दुसऱ्या दिवसापासून  मी दुकानात जायला सुरुवात केली.पाहिले थोड अवघड वाटल पण आता सगळच सोप्प झालय. समोरून कोणी काही बोलत नाही. पण मागून  टोमणे मारतात.साडी विकणारा वकील."


कधीतरी मिहिरच्या ऑफिस मध्ये बसून त्याला सल्ले देतो.  त्याने समोरच्या ग्लास मधून पाणी पिल.


"अजुन काही आहे का.?
"हो.म्हणजे.मिहीरच्या बहिणी बरोबर लग्न ठरल होत .पण मी दुकानात जाण्याच्या निर्णयामुळे त्यांनी नकार दिला. "
"मग अजून पण तुमच्या मनात ती आहे का"?
"नाही.तसही तिचं लग्न झालं."
"तुला काही विचारायचं आहे का.?"


नाही.तुम्हीच एवढं सगळ सांगितलं.आता मी काय बोलू.
"मला पण तुम्हाला काहीतरी सांगायच आहे. पण ते इतकं महत्त्वाचं नाहीये. फक्त माहित असायला हवं म्हणून."
"हा बोला ना.जे असेल ते."
ती बोलणारच होती की दारातून रितेश आत आला.

क्रमशः
मधुरा
कथा कशी आहे ते नक्की सांगा.

🎭 Series Post

View all