लग्न एक प्रेम प्रवास भाग ५

I like to read.

लग्न एक प्रेम प्रवास भाग ५
कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.

 
  ती बोलणारच होती की दारातून रितेश आत आला.

"झालं का बोलून.विसरु नका, आज माझी एंगेजमेंट  आहे."
दोघांनी पटकन नजर वळवली.

त्याच्या पाठोपाठ घरातली मोठी माणसं पण आत आली.
"सोनू,तिच्या आईने तिला जवळ बोलावले .

तो सुध्दा त्याच्या काकू आणि आईच्या मध्ये जाऊन उभा राहिला.
त्याच्या आईने हळूच विचारले. "पसंत आहे ना."

"हो."त्याने गालात हसत होकार दिला.
तीने पटकन मान वर करून त्याच्याकडे बघितल.
"अशी काय बघतेस.त्यानं त्याच सांगितल.आता तू बोल."
तीने मानेनेच होकार दिला.
"आता जर तुमचा होकार असेल तर तुमचा पण साखरपुडा आजच  करून घेवूया ."
"काय?"दोघं ही एकदम ओरडले.

"आई,अग इत्तकी काय घाई आहे".सोनी तिच्या आईच्या कानात बोलली.
"घाई त्यांना नाही आम्हाला आहे ".संजेशचे बाबा तिच्या जवळ येत म्हणाले .

"हो.आम्हाला लवकरात लवकर आमची मोठी सून घरी यायला हवी. चालेल ना आज साखरपुडा केला तर". त्याच्या आईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
"ठीक आहे.पण त्यांनाही विचारा ना आधी".तीने मान खाली घालून होकार दिला.
तसे सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले.तिच्या आईचे तर डोळेच मोठे झाले
"चला ठरलं तर मग."
"रितेश च्या आधी तुमचा कार्यक्रम करून घेऊ. रितेश तुला चालेल ना.काही प्रोब्लेम"

"हो.काकू. चालेल.उलट धावेल. माझ्या आधी दादाचं मस्तच. तो आनंदाने उड्या मारायला लागला."
"तुला चालेल.तुझ्या तिला विचार.हा खास तुमचा दिवस. नंतर वाद नको." त्याच्या आईने त्याचा कान ओढला. आणि मागे इशारा केला .
"आई,मला पण धावेल.आधी लगीन नाही साखरपुडा ताईचा." मोनिशा  पटकन सोनीच्या बाजूला जाऊन उभी राहिली.
"दादाचा" .रितेश ने तीच बोलण मध्येच तोडल. दोघं पण एकमेकांकडे बघत होते.
"रितेश   पुरे आता".संजेश चा एकच आवाज आला.
चला तर मग तयारी करूया.
_____________
रितेश च्या चेहऱ्यावर चा आनंद बघून मोनी पण खुश होती.तीन वर्षाच नात आज पुढे जात होत. 
दोन्ही घरच्यांचा होकार मिळवायला वर्ष लागल. आणि ह्या होकरात ज्या दोन लोकांनी त्यांना  वेळोवेळी साथ दिली.
ते म्हणजे संजेश आणी सोनिशा.
गुरुजी सांगतील त्या प्रमाणे चौघेही  करत होते.
"चला आता दोन्ही जोडप्यांनी एकमेकांना अंगठी घाला."
"दादा,आधी तू."

"नाही आधी तुम्ही दोघं."सोनी ने  मोनीला पुढे केले.

"आज खरा तुमचा दिवस. अहो,चालेल ना."

"बरोबर बोलतेय ती.चला अंगठी घाला.ह्या दिवसाची कित्ती दिवस वाट बघत होतात. "
"अरे पण तू मोठा आहेस.पाहिले तुझा मान." संजेश ची आत्या रागिणी  त्यांच्या जवळ आली.

क्रमशः


मधुरा






 

🎭 Series Post

View all