लग्न एक प्रेम प्रवास भाग ६

I like to read

लग्न एक प्रेम प्रवास भाग ६
 

    "अरे, पण तू मोठा आहेस.पाहिले तुझा मान." संजेश ची आत्या रागिणी त्यांच्या जवळ आली.
"आत्या,अस काही नसतं. आमचं आत्ताच तर ठरल. हा त्यांचा खास दिवस आहे.'
"रितु,चल हो पुढे." त्याने रितेशला मोनिसमोर उभे केले .
"दादा,अरे पण ."
"आता पण बिण बाजूला ठेव.  ती वाट पाहतेय."
रितेश ने संजेशला मिठी मारली. संजेशने  त्याच्या पाठीवर हलकेच थोपटले.

साखरपुड्याचे सगळे विधी झाले 
दोघानाही एकमेकांसमोर उभे केले.बाजूलाच त्यांचे ताई आणि दादाही होते.


रितेश  एक पाय दुमडून एक पाय जमिनीला टेकवून उभा राहिला . आणि तिचा हात पकडुन हळूच बोटात अंगठी घातली.
तीने लाजून मान खाली घातली.


"चला मोनि बाई लाजून झाल असेल तर तुम्ही ही अंगठी घालून घ्या."मागून तिच्या आईने आवाज दिला.


सगळ्यांसाठी तीच अस लाजणं नवीनच होत.


मोनि ने त्याला उठून उभ राहण्याचा इशारा केला.
तीने रीतेशच्या बोटात अंगठी घातली.त्याने पुढे येऊन तिच्या डोळ्यातून ओघळणारा तो एक थेंब पुसला.आणि तिला घेऊन बाजूला गेला.


"खुश आहेस ना." रितेश हळूच तिच्या कानात पुटपुटला.
थँक्यू' .म्हणत तीने  हो मध्ये मान हलवली.
दोघांनी एकमेकांना पेढा भरवला.
"चला आता दादा आणि ताई पुढे या."

संजेश आणि सोनीशा  पुढे आले. 
दोघांनी एकमेकांकडे  बघत  अंगठी घातली.
दोन्ही घरातली लहान भावंड आनंदाने नाचत होते. मोठ्यांच्या  चेहऱ्यावर समाधानच हसू  तरळल होत. स्टेजवर धुमाकूळ रंगला होता.
खूपच उत्साहात कार्यक्रम पार पडला.


सगळेजण आनंदाने घरी परतले.
------------

"सोनू,अग आवर लवकर .ते लोक येतच असतील. दुपारीच संध्या ताईंचा फोन आला होता.संध्याकाळी पाच पर्यंत आम्ही बोलणी करायला  येऊ."
"कोण संध्या ताई ,त्या येणार तर मी का आवरू."
"अग संध्या ताई.तुझ्या सासूबाई संजेश रावांच्या आई.तुमच्या लग्नाची बोलणी करायला कळलं.आत आवर पटकन. पाच मिनट आहेत."


"इतकी काय घाई आहे. कालच तर साखरपुडा झाला. "तीने आत जाता जाता आईकडे बघितल.
"सोनुबई घाई फक्त त्यांना नाही मला पण आहे. "
"झालं आवरून.बघ कशी छान दिसतेस".ती बाहेर आली तशी काकूंनी तिच्याकडे पाहत बोलल्या.
"तू कधी आलीस."


"आताच. बघितल का वहिनी कोणाचा तरी चेहरा कसा उजळला आहे.काय ते हा ग्लो आलाय.कोणीतरी येणार आहे का'. काकू तिला छेडत होती.
"काकू काय तू पण."ती पटकन किचन मध्ये पळाली.
तितक्यात बेल वाजली.
काकूंनी जाऊन दार उघडल.आई पाणी आणायला किचनमध्ये गेली.
संध्याताई आणि जयेश म्हणजे संजेश चे आई वडील आत आले.त्याच्याबरोबर रीमाताई आणि सुरेशराव  रितेश चे आई वडीलपण आले होते.
सगळे जण आत येऊन सोफ्यावर बसले.

सोनी आतून कोण आलंय याचा अंदाज घेत होती.

"संजेश राव नाही का आले." सोनिच्या बाबांनी  निलेशरावांनी   विचारले.  
सर्वांना पाणी दिल्यानंतर  सोनीची आई शारदा तिथेच उभी राहिली.
"आला आहे.गाडी पार्क करतोय.  तुम्ही बसा ना.तो येईल.

"आलोच".म्हणत रितेश आणि संजेश आत आले.
शारदा ने हसत च दोघांचं स्वागत केलं. आणि निलेश रावांच्या बाजूला बसली.

सोनी सर्वासाठी  चहा घेऊन येत होती.
संजेश तिच्याकडे बघत खुर्चीत बसला. रितेश पण त्याच्या बाजूला बसला.


तीने  सर्वांना चहा दिला. 
दादा चहा नाही पित. त्याला त्रास होतो.
हो. का.?मग काय घेणार तुम्ही?.  कॉफी घेणार का.?शारदा लगेच उभी राहिली.


काकू, मला काही नकोय. तुम्ही उभ्या का आहात बसा.


सोनी  मात्र आपल्या आईच्या विचित्र वागण्याला कंटाळली होती.
काल पासून जरा जास्तच आनंदी झाली होती. जसं काय तिच्याच मुलीचं लग्न होतंय.
आई, त्यांना नकोय काही.
अग पण अस कसं.ते पहिल्यांदा आलेत.आणि
बर काकू.मला कॉफी चालेल.
मी आणते.म्हणत त्या उठतच होत्या.की निलेश रावांनी त्यांना थांबवलं.आणि सोनी ला कॉफी बनवून आणायला सांगितली.
तीने त्याला कॉफी दिली आणि आत निघून गेली.

सर्वजण लग्न कुठे,कधी करायचं ठरवत होते.
त्याने त्याच मत सांगितलं.आणि जरा थांबला.

क्रमशः
मधुरा












 

क्रमशः
मधुरा.

🎭 Series Post

View all