लग्न एक प्रेम प्रवास भाग ७

I like to read.
लग्न एक प्रेम प्रवास भाग ७ सर्वजण लग्न कुठे,कधी करायचं ठरवत होते. त्याने त्याच मत सांगितलं. आणि जरा थांबला. "जरा थांबा." "काय रे,काय झालं." "तिला जरा बोलवता का.म्हणजे तीच ही मत घेता येईल". संजेश ने आजूबाजूला नजर फिरवली. "सोनी,अग जरा बाहेर ये". तिच्या आईने तिला आवाज दिला . ती हळूच येवून आईच्या शेजारी उभी राहिली. तीने साधी अशी सिल्क ची गुलाबी साडी नेसली होती. साडीवर निळी पिवळी फुले होती. चेहऱ्यावर कुठलाही मेकअप नव्हता. वेणी पुढे आली होती. मगाशी कॉफी देताना नेमका तो फोनवर बोलत असल्याने त्याला नीट पाहता आले नव्हते. थोडावेळ संजेश तिला बघतच होता.की मध्येच रितेश ने तिला आवाज दिला. "वहिनी , इकडे ये ना." तसे संजेश साहेब भानावर आले . "हा ,आले."तीने पटकन रितेश कडे बघितल. तिला जरा अवघडल्यासारखं झालं होत. "सोनी, अग ये बस . "त्याच्या आईने तिला स्वतः जवळ बसवलं. "गुरुजी,या ना. " इनामदार यांचे गुरुजी लग्नाचे मुहूर्त घेवून आले होते. गुरुजी येऊन बसले.तशी सोनी लगेच उठून त्यांना पाणी दिले. गुरुजी तिच्याकडे बघून हसले. गुरुजींनी त्यांची वही काढली. "मुहूर्त दहा दिवसानंतरचा आहे. शुक्रवार आहे.नाहीतर नंतर रितेशच्या लग्नाचा आहेच." "दहा दिवस थोडी घाई होतेय." "मग त्यानंतर सहा महिने कुठलाच मुहूर्त नाही." "ठीक आहे.दहा दिवसांनंतर चा बघुया. कोणाला काही " संजेश बोलतच होता की "पण दादा,तुला माझ्या बरोबर लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे." रितेश त्याच्यासमोर येऊन बसला. "तुझ्याबरोबर" संजेशने एक डोळा वर करून त्याच्याकडे बघितलं. "म्हणजे माझ्या लग्नाच्या दिवशी " "नको.तो तुमचा खास दिवस आहे.आधीच तुमचा साखरपुडा मध्ये आम्ही आलो." "दादा अस काही नाही आहे. उलट आम्हाला खूप आनंद झाला. मोनी पण पुढे आली. "मोनी ऐक ना. हे बरोबर बोलत आहेत. तुम्ही दोघांनी ऐका ना आमचं. लग्न होत आहे ना.मग हा हट्ट कशाला."सोनी ने हळूच मोनीचा हात धरला. "ठीक आहे. म्हणजे मी मुलीकडून मग मी तुम्हाला दादा ऐवजी जिजू बोलणार, चालेल." "मी तर आधीपासूनच मुलाकडून आहे. "दीदी तेरा देवर दिवाना हाय राम "मोनी त्याच्याकडे बघून बेसुर्या आवाजात गात होती. तसे सगळे हसायला लागले. सगळ्यांच्या मताने दहा दिवसांनी लग्ना चा दिवस ठरला. गुरुजींनी मुहूर्ताची सकाळी अकरा वाजता ची वेळ सांगितली. स्थळ मात्र सोनीशाने सुचवलं जे सर्वांना आवडल. दुसऱ्या दिवशी साडी आणि दागिने खरेदिसाठी वेळ ठरली. _______ क्रमशः मधुरा

🎭 Series Post

View all