लग्न एक प्रेम प्रवास भाग ८

I like to read

लग्न एक प्रेम प्रवास भाग ८

  सकाळचे साडे दहा वाजले होते .
आज दोन्ही घरातल्या बायका नवीन नवरिसाठी साड्या घ्यायला त्यांच्या दुकानात जमल्या होत्या.
संजेशची आई, काकू ,आत्या,आणि सोनिशाची आई ,काकू,आणि मोनिशा .
पण नवरी अजून आली नव्हती .

"मोनी,काय म्हणाली ग सोनी कधीपर्यंत येतेय."
"अग काकू, तिला नाही जमणार.मला म्हणाली ,तुम्हीच साड्या पसंत करा. रितेश च्या काकू नी तिला फोन केला होता .त्यांनी तिला ज्वेलरी शॉप मध्ये यायला सांगितल आहे."

"अच्छा आता तिच्या सासूबाईंनी सांगितल आहे तर ठीक आहे ."
"शारदा ताई,कसला विचार करताय."
"अहो संध्या ताई ते सोनी अजून आली नाही."

"अहो,मी आताच तिच्याशी बोलले. तिला उशीर होणार म्हणाली. तीने सांगितल तुमच्या पसंतिच्या साड्या घ्या. पण मला काही समजतच नाहिये.मोनीशा  तू जरा मदत करतेस का."

"हो,काकू, करते."

सगळ्या साड्या खरेदी करून झाल्या होत्या फक्त शालू तेव्हढा बाकी होता. बारा वाजले होते.
"मी काय म्हणते. संजेश आम्ही निघतो.शालू तू तुझ्या पसंतीने तिला विचारून घे. "आईने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
गेले अर्धा तास तो प्रत्येक साडी उलगडून बघत होता.साडी हातात घेऊन डोळे बंद करून  परत साडी जागेवर ठेवत होता.
"तुझ्या डोळे उघड बंद मध्ये माझ डोकं दुखायला लागलं".आत्याने बोलतच जूस छा ग्लास तोंडाला लावला.

"ठीक आहे."
"तुझ्याकडे तिचा नंबर आहे.तिला विचार निघाली का."?
"ती डायरेक्ट ज्वेलरी शॉप मध्येच येणार आहे. बाकी सगळे दागिने घेतले आहेत  फक्त मंगळसूत्र तेव्हढ तुझ्या  बायकोच्या पसंतीच हवं म्हणून ते ठेवलं होत."
"कधी घेतलेस.?"

"कधीच  गेले वर्षभर चालू आहे . ते राहू दे.तू  निघ आता .आणि बाहेरच जेवण करा."
आई  आणि काकू एकामागून एक सूचना देत होत्या.

आणि संजेश नेहमीप्रमाणे मान हलवत होता
सगळ्याजणी निघून गेल्या.
त्याने फोन करायला म्हणून फोन हातात घेतला.तर तिचा मेसेज होता .

"अहो, मी आत्ता निघाले आहे.मला विस मिनिट लागतील.तिथे पोचले की तुम्हाला मिस्ड कॉल करते ."

अहो,मेसेज वाचून त्याच्या अंगावर एक शहारा आला.
तो पण लगेच निघाला.जाताना त्याने केबिन मधून एक साडी ची पिशवी  घेतली .त्याने सकाळीच ती साडी बाजूला काढून ठेवली होती.

"मोनार्क ज्वेलर्स ,बरोबर आलेय. वेळेत आले". सोनी  तीची स्कूटी शॉप जवळ उभी करत स्वतःशीच बोलत होती. आत जाऊ की  कॉल करू की इथेच वाट बघू थोडावेळ विचार करत होती.

"हॅलो, खूप वेळ झाला का." बाजूला संजेश कधी आला तिला कळलेच नाही.
"नाही .आताच आले."
मग चला आत जाऊया. तसाही वेळ कमी आहे.
तो पुढे गेला.तशी तिही त्याच्या मागे दुकानात शिरली.
सेल्सगर्ल ने वेगवेगळ्या डीझाईनचे मंगळसूत्र तिच्या समोर ठेवले.
ती पूर्णपणे गोंधळून गेली.घासा सुकला होता. तिला काही सुचतच नव्हत. ती नुसती बघत होती.
पहिल्यांदाच एव्हढ्या मोठ्या दुकानात आली होती.
सेल्स गर्ल एक एक डिझाईन ची खासियत सांगत होती . पण तीच लक्षच नव्हत .
सोनीशा,त्याने तिच्या खांद्यावर अलगद हात ठेवला .
हा,काय झालं.निघायचं का.
कुठे ?.अजून आपण जे घ्यायला आलोय ते घेतलंच नाही .
हे बघ कस वाटतयं.त्याने एक मंगळसूत्र तिच्या हातात दिलं.
मॅम,तुम्ही घालून बघा ना. इकडे ह्यात बघ म्हणजे तुम्हा कळेल. सेल्स गर्ल ने समोर आरसा ठेवला .
तीने त्याच्याकडे बघितलं. त्याने मानेने घाल असा इशारा केला.
असेच तीन चार डिझाईन तीने घालून बघीतले.
तीच होईपर्यंत तो थोडा बाजूला फोन घेऊन बसला.
ह्या दोन मधून कुठलं घेऊ सांगा ना  तीने  दोन मंगळसूत्र त्याचासमोर पकडुन विचारलं.
दोन्ही छान आहेत.तूच ठरव.तुलाच घालायचं आहे. त्याने  जरा वर मान करून बघितल.
"मग काय दोन्ही घेऊ का."
"घे . दोन्ही घे." फोनामध्ये बघतच बोलला.
तीने नकरार्थी मान हलवली.
" मेन विल बी मेन."तोंडात पुटपुटली. आणि काउंटर कडे वळली.
नेमक त्याने ऐकल.  पटकन फोन खिशात ठेवला. आणि तिच्या जवळ जाऊन दोन्ही मंगळसूत्र हातात घेतली.
"हे  कसं वाटतंय.तुला छान दिसेल."
"नक्की.मग घेऊ हे."
सेल्स गर्ल मात्र गालात हसत होती. मगाशी सोनीला पण तेच जास्त आवडल होत.त्याला पण तेच आवडल होत.
दोघंही दुकानातून बाहेर आले. दुपारचे दोन वाजले होते.
ती स्कूटी कडे जायला लागली.
अच्छा,निघते आता.
कुठे?
घरी.झालं काम
"जेवायचं नाही का."
"घरी जाऊन जेवेन की."
"नाही.घरी नाही.माझ्याबरोबर चल.आई ने सांगितल आहे.बाहेर जेवायला.तुला घरी जायला वेळ होईल."
"नको मी जाते घरी.तुम्ही जेवा."
"आई ने सांगितल आहे .चल ते बघ समोरच जायचय.तुझी स्कूटी असू दे इथेच."म्हणत त्याने तिला बरोबर यायला सांगितल.
 

क्रमशः
मधुरा

 






 

क्रमशः
मधुरा

🎭 Series Post

View all