" श्रद्धा अगं अजून किती वेळ अशी बसून राहणार आहेस चल तिकडं आपल्या लेक्चर सुरू झाले आहे.... " प्रिया आपल्या जागेवरून उठत तिच्याकडे बघून बोलते...
" हो चल जाऊया.... " असे बोलून श्रद्धाही उठून उभी राहते... दोघी थोड्या स्पीड मध्ये चालतच कॉलेज च्या आत त्यांच्या क्लासरूमच्या दिशेने जाऊ लागतात.... श्रद्धा गडबडीत चालत असल्यामुळे अचानक समोरून येणाऱ्या माणसाला तिचा धक्का लागतो....
" सॉरी सॉरी... " श्रद्धा घाबरून त्यांच्याकडे बघून बोलतच असते की त्यांच्या नजरेमध्ये पुरती अडकून जाते.... ती व्यक्ती ही श्रद्धा कडे एकटक पाहू लागते... दोघे काही क्षण एकमेकांच्या नजरेतच हरवलेले असतात...
" श्रद्धा... " तेवढ्यात तिच्या मैत्रिणीचा म्हणजे प्रिया चा आवाज त्यांच्या कानावर पडतो आणि दोघेही भानावर येत एकमेकांकडे पाहू लागतात.... तिची मैत्रीण तिला आवडतच पुढे घेऊन जाऊ लागते.... श्रद्धा मात्र अजूनही वळून मागच्या व्यक्तीला पाहत असते... ती व्यक्ती ही तिकडेच उभी राहून श्रद्धा कडे पाहत असते...
श्रद्धा आणि प्रिया त्यांच्या क्लास रूम मध्ये पोहोचतात.... त्या आत गेल्यानंतर लगेच त्यांचे प्रोफेसर येतात आणि शिकवायला सुरुवात करतात..... श्रद्धा चे मन मात्र अभ्यासात लागतच नसते.... थोड्या वेळापूर्वी दिसलेली ती व्यक्ती तिच्या नजरेसमोर येऊ लागते..... असेच एकावर एक लेक्चर होतात आणि मग कॉलेज सुटण्याची वेळ होते.... श्रद्धा आपल्या क्लासरूम मधून बाहेर पडत असतानाही इकडे तिकडे नजर फिरवत त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करत असते....
" श्वेता काय झालं आहे , आज तुझं कशातच मन लागत नाही.... " प्रिया शेवटी न राहून तिला विचारते....
" प्रिया तुला आठवत आहे का, आपण जेव्हा क्लासरूमच्या दिशेने धावत होतो.... तेव्हा माझी एका व्यक्तीसोबत टक्कर झाली... त्या व्यक्तीला आपण याआधी कधीच कॉलेजमध्ये पाहिले नव्हते... " श्रद्धा विचार करत प्रियाला बोलते.....
" अग ते प्रोफेसर आहेत नवीनच कॉलेजमध्ये जॉईन झाले आहेत..... " प्रिया तिला उत्तर देते....
" काय ते प्रोफेसर आहेत ! त्यांच्याकडे बघून अजिबात वाटत नव्हते.... मला तर ते कॉलेजमधला मुलगा असल्यासारखाच वाटले..... " श्रद्धा आश्चर्याने प्रियाकडे पाहून तिला विचारते....
" हो ते समजलेच, तू कशी बघत होती त्यांच्याकडे त्यांना काय वाटलं असेल ? " प्रिया पण सकाळचा सीन विचार करत तिला बोलते...
" एक मिनिट , तुला कसे माहित की ते प्रोफेसर आहेत ? " श्रद्धा प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहून तिला विचारते...
" अग दोन दिवसांपूर्वी जेव्हा तू कॉलेजला आली नव्हतीस तेव्हाच आपल्या प्रिन्सिपल सरांनी त्यांचं इंट्रोडक्शन करून दिले होते... त्यांचा तो कॉलेजमधला पहिला दिवस होता.... ते आपल्याला केमिस्ट्री शिकवण्यासाठी येणार आहेत.... " प्रिया तिच्याकडे बघून उत्तर देते.... बोलता बोलता त्या दोघी घरी पण पोहोचतात.... रात्री बेडवर झोपल्यानंतर ही श्रद्धाला त्या प्रोफेसर ची आठवण येऊ लागते..... त्यांचा तो चुकून लागलेला धक्का, त्यांचं ते एकटक तिच्याकडे पाहणे, हे सगळेच आठवून तिच्या शरीरावर शहरा उमलू लागतो.......
दुसऱ्या दिवशी श्रद्धा लवकरच उठून कॉलेज साठी तयारही झालेली असते.....
" आज दिवस नक्की कुठे उगवला आहे..... ज्या मॅडम अर्धा अर्धा तास वाट बघायला लावतात ते चक्क आज लवकर तयारी करून कॉलेजला जाण्यासाठी बाहेर उभे आहेत..... " प्रिया स्वतःची तयारी करून श्रद्धाला बोलवण्यासाठी तिच्या घराच्या दिशेने येत असतानाच तिला श्रद्धा बाहेर येताना दिसते.... श्रद्धाला वेळेच्या आधीच असे तयार झालेले पाहून प्रिया आश्चर्याने बघत बोलू लागते.....
" तुझं बोलून झाला असेल तर लवकर येऊन गाडीत बस आपल्याला कॉलेजला जायचं आहे ना..... " श्रद्धा तिच्याकडे बघून नकारार्थी मान हलवत बोलते.... तसे त्या दोघी पण गाडीमध्ये बसतात..... त्यांची गाडी कॉलेजच्या दिशेने धावू लागते....
.
..
...
To be continued.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा