Login

संशयवाद –प्रेमाची वाट भाग २

लग्नासारख्या नात्यात विश्वास महत्त्वाचा
" तुझं बोलून झाला असेल तर लवकर येऊन गाडीत बस आपल्याला कॉलेजला जायचं आहे ना..... " श्रद्धा तिच्याकडे बघून नकारार्थी मान हलवत बोलते.... तसे त्या दोघी पण गाडीमध्ये बसतात..... त्यांची गाडी कॉलेजच्या दिशेने धावू लागते....

आता पुढे,
श्रद्धा गाडीतून उतरल्याबरोबर प्रियाची वाटही न बघता घाईतच कॉलेजच्या दिशेने चालू लागते.... प्रियाला तिच्या वागण्यामध्ये असलेला हा वेगळा पणा लगेच जाणवतो..... त्या दोघींनी कॉलेजमध्ये प्रवेश केलेला असतो की,  समोरून त्या प्रोफेसर ला येताना पाहून श्रद्धा मध्येच थांबते..... त्या प्रोफेसरची ही नजर श्रद्धा वर जाते.... ते तिच्याच दिशेने पुढे चालत येतात...

" तुमचे नाव काय आहे ? " ते प्रोफेसर श्रद्धा कडे पाहून तिला विचारतात....

" श्रद्धा... " श्रद्धा हळू स्वरात उत्तर देते....

" नाईस नेम मिस श्रद्धा.... मी तुमचा नवीन केमिस्ट्री प्रोफेसर स्वयम.... " ते पण हलकच गालात हसून आपली ओळख सांगतात......

" स्वयम... " श्रद्धा हळूच आपल्या ओठांमध्ये पुटपुटते तरीदेखील त्यांच्या कानाला ऐकू जाते..... ते मंदस्मित करत तिकडून निघून जातात..... हळूहळू त्या दोघांचे बोलणं चालू होते.... जेव्हापण स्वयम क्लासमध्ये शिकवायला येत होता,  श्रद्धा आवर्जून त्याचे लेक्चर अटेंड करत होती...  तिचं सारं लक्ष त्याच्याकडेच असायचे..... त्याने शिकवलेल्या गोष्टी तिच्या डोक्याच्या 36 फूट वरून जायच्या , ती फक्त त्याच्याकडे त्याच्या बॉडी लांग्वेज कडे,  त्याच्या हालचालीकडे , बघण्यामध्ये आपला वेळ घालत होती.....

" स्वयम् सर... " एक दिवस स्वयम् कॉलेजच्या गेटमधून त्याच्या बाईकने बाहेर जात असतानाच गेटच्या बाहेर उभी राहिलेली श्रद्धा त्याला आवाज देते..... तिचा आवाज ऐकून त्याचेही तिच्याकडे लक्ष जाते आणि तो पुढे जाऊन बाईक थांबवतो....

" काय झालं मिस श्रद्धा,   तुमचे लेक्चर तर कधी संपले आहे तरी तुम्ही अजून इकडे काय करत आहात ? " स्वयं प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे बघून त्यांना विचारतो....

" सर ऍक्च्युली ते मला तुमची थोडी मदत पाहिजे होती... " श्रद्धा थोडी बिचकतच त्याला विचारते...

" कसली मदत ? " स्वयं मला अजूनही तिचे बोलणे नीट समजत नाही....

" सर मी केमिस्ट्री मध्ये खूपच विक आहे.... तुम्ही प्लीज माझे केमिस्ट्री चे एक्स्ट्रा लेक्चर घ्याल का म्हणजे मला केमिस्ट्री च्या पेपर मध्ये पास होण्याचे काहीतरी चान्सेस वाटतील.... " श्रद्धा त्याच्याकडे बघून विनवणीच्या स्वरात बोलते.... तिचं बोलणं ऐकून स्वयंम बराच वेळ शांत राहून तिच्याकडे बघू लागतो...

" काय झालं सर , सॉरी तुम्हाला राग आला का ? खरंच माझा केमिस्ट्री सब्जेक्ट खूप वीक आहे... तुम्ही अगदी व्यवस्थित समजावून सांगतात.....  जर तुम्ही  माझं एक्स्ट्रा लेक्चर घेतले तर कदाचित फायनल एक्झाम मध्ये पास होईल..... " श्रद्धा हळू आवाजात त्यांना सांगू लागते....

" ठीक आहे पण मला असे इतरांच्या घरात जाऊन शिकवायला अजिबात आवडत नाही आणि कॉलेजमध्ये फक्त एका स्टूडेंट साठी परमिशन भेटणार नाही त्यामुळे जर तुमची खरंच शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही माझ्या घरी येऊ शकता.... " स्वयंम शांत स्वरात त्याच्याकडे बघून बोलतो....

" खरंच सर! " श्रद्धा अगदी उत्साहाने त्याच्याकडे बघून त्याला विचारते... तिच्या चेहऱ्यावरचा तो उत्साह पाहून स्वयंम च्‍या भुवया उंचावतात....

" म्हणजे सर ते मी अभ्यासासाठी इतक्या आनंदाने विचारले... " तुला आपली चूक लक्षात येते आणि ती पटकन जीभ चावत बोलते...

" Yes... खूप उशीर झाला आहे,  चला मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो.... " स्वयं इकडे तिकडे पहात तिच्याकडे बघून बोलतो.... या संधीचा फायदा घेऊन श्रद्धा स्वयं चा नंबर आणि ऍड्रेस घेते.....

यानंतर श्रद्धा रोज सकाळी लवकर उठून स्वयंच्‍या घरी केमिस्ट्री शिकण्यासाठी जाऊ लागते.... स्वयंम घरी एकटाच राहत असल्यामुळे तो स्वतःसाठी चहा,  नाश्ता बनवत होता... श्रद्धा ने येणं सुरू केल्यापासून तो तिच्यासाठी ही बनवू लागला.... दोघेही मिळून आधी चहा नाश्ता करून मग त्यांचा अभ्यास करत होते....

हळूहळू दोघांमध्ये मैत्री वाढत गेली.... श्रद्धा आता त्याच्यावर पूर्ण हक्क दाखवू लागली... सकाळी थोडी लवकरच जाऊन  कधीकधी ती स्वतः नाश्ता बनवत होती... स्वयंम ने नकार दिला तरी ती जबरदस्ती करत होती त्यामुळे स्वयंम ही काही बोलत नव्हता... त्यांच्या मैत्रीचे रूपांतर आता प्रेमामध्ये होऊ लागले.... पहिल्या नजरेतच त्या दोघांना एकमेकांचे आकर्षण वाटले होते... आता सतत एकमेकांच्या सहवासात राहून त्यांना एकमेकांबद्दल प्रेम ही जाणवू लागले....

स्वयंम चे स्वतःचे असे कोणीही नव्हते.... तो अनाथ असल्यामुळे त्याला एकटेच राहण्याची सवय होती..... त्याच्या घराच्या बाजूलाच त्याच्या एका मित्राचे घर होते... त्या दोघांची घनिष्ठ मैत्री होती....

श्वेता मात्र एका मोठ्या फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये राहिलेली मुलगी होती... तिचे वडील चांगले बिझनेस मॅन होते... घरात आई आणि एक लहान बहीण होती.... श्रद्धा मोठी मुलगी असल्यामुळे ती सगळ्यांचीच लाडकी होती....

दोघांनीही एकमेकांवर असलेले प्रेम कबूल केले होते.... फायनल एक्झाम झाल्यानंतर लग्न करण्याचाही निर्णय घेतला.... फायनल एक्झाम झाल्यानंतर शोधणे आधी आपल्या घरी स्वयंम बद्दल सांगण्याचे ठरवले....