दोघांनीही एकमेकांवर असलेले प्रेम कबूल केले होते.... फायनल एक्झाम झाल्यानंतर लग्न करण्याचाही निर्णय घेतला.... फायनल एक्झाम झाल्यानंतर शोधणे आधी आपल्या घरी स्वयंम बद्दल सांगण्याचे ठरवले....
आता पुढे,
बघता बघता श्रद्धाचे फायनल एक्झाम झाले.... एक्झाम च्या वेळेला ते दोघेही भीती असल्यामुळे दोघांना एकमेकांना भेटता आले नाही.... भेटत नसले तरी फोनवर त्यांचे एकमेकांसोबत बोलणं चालू होते.... आज शेवटचा पेपर झाल्यामुळे श्रद्धा घरात आराम करू लागते.... दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा स्वयंमला भेटायला जाण्याचा प्रोग्राम असतो.....
एक्झाम झाल्यामुळे श्रद्धा सकाळी आरामशीरच झोपेतून उठलेली असते.... ती फ्रेश होऊन तयारी करून आपल्या रूममधून बाहेर जशी येते, तिच्या नजरेला एक ओळखीची व्यक्ती पडते....
" प्रतीक तू आणि इथे ? " श्रद्धा आश्चर्याने त्याच्याकडे पाहून बोलू लागते....
" हो तुलाच भेटायला आलो होतो.... " प्रतीक ही आनंदाने तिच्याजवळ येऊन तिला बोलू लागतो.... प्रतीक सोबत त्याचे आई-वडीलही घरी आलेले असतात....
" आज अचानक कशी काय माझी आठवण आली ? " श्रद्धा लटक्या रागातच प्रतीक कडे पाहून त्याला विचारते....
" श्रद्धा तुला नेहमीच त्यांची शिकायत असते ना, पण आज तो तुझी शिकायत कायमची दूर करण्यासाठी इकडे आला आहे..... " श्रद्धा चे वडील आनंदाने तिच्याजवळ येऊन बोलू लागतात....
" म्हणजे काय डॅड , मला समजले नाही.... " श्रद्धा प्रश्नार्थक नजरेने आपल्या वडिलांकडे पाहून बोलते....
" म्हणजे हेच की प्रतीक आपल्या आई-वडिलांना घेऊन इकडे तुझ्यासाठी आला आहे.... त्यांनी तुला लग्नाची मागणी घातलेली आहे..... " आपल्या वडिलांच्या बोलण्यावरून श्रद्धा मात्र आश्चर्याने त्या सगळ्यांकडे पाहू लागते....
" श्रद्धा आपण लहानपणापासूनच एकमेकांचे चांगले मित्र आहोत आणि मला तर आधीपासूनच तू खूप आवडते.... मलाही माहित आहे की, तुलाही मी खूप आवडतो म्हणूनच आता या मैत्रीला नात्याचे नाव देण्याचा विचार करून मी इकडे आलो आहे... " प्रतीक प्रेमाने तिच्या जवळ येऊन तिला सांगू लागतो.....
" नाही प्रतीक मी फक्त तुला माझा एक चांगला मित्र मानत होते आणि आयुष्यभर मानत राहील... मी तुझ्यासोबत लग्न करण्याचा कधीच विचार केला नव्हता..... " श्रद्धा त्याच्याकडे बघून त्याला समजावण्याच्या स्वरात बोलतो.....
" ठीक आहे ना.... तुझा तो चांगला मित्र आहे..... आता त्याच्याकडे एका चांगल्या नवऱ्याच्या रूपाने ही तू बघू शकतेस.... आतापर्यंत नव्हता विचार केलास यापुढे तर करू शकतेस ना..... " तिचे वडीलही तिच्याकडे बघून मस्करी करत बोलतात.....
" नाही! मी असे नाही करू शकत, कारण माझे दुसरा कोणावर प्रेम आहे आणि मी त्याच्यासोबतच लग्न करणार आहे..... " श्रद्धा आपला निर्णय सगळ्यांना सांगून मोकळी होते.... तसे सगळे शांत होऊन तिच्याकडे पाहू लागतात.....
" कोण आहे तो ? काय नाव आहे त्याचं ? तू या आधी कधी त्याच्याबद्दल आम्हाला काही सांगितले नाहीस.... " श्रद्धाचे वडील रागानेच हिलायकावर एक प्रश्न विचारू लागतात......
" अंकल प्लीज तुम्ही शांत व्हा , ही गोष्ट आता मला हँडल करू द्या..... " प्रतीक त्यांना शांत राहण्याचा इशारा करत श्रद्धाच्या जवळ जातो.....
" श्रद्धा मी तर असं समजत होतो की, तू माझी चांगली मैत्रीण आहे त्यामुळे तू माझ्याबरोबर तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी शेअर करते आणि तू माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली.... " प्रतीक तिच्या जवळ जाऊन बोलतो.....
" एक्झाम झाल्यानंतर मी सगळ्यांना ही गोष्ट सांगणारच होते, पण त्याआधी तुम्हीच मला हा आश्चर्याचा धक्का दिला..... " श्रद्धा त्याच्याकडे बघून बोलते....
" ठीक आहे.... मग आता तरी सांग की तो लकी माणूस कोण आहे ज्याच्या प्रेमात तू पडलीस......"प्रतीक स्वतःच्या मनातले दुःख मनामध्येच लपवून हसण्याचा प्रयत्न करा तिला विचारतो.....
" त्यांचे नाव स्वयंम आहे.... ते आमच्या कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत... खूप चांगले आहेत, त्यांचा स्वभावही खूप चांगला आहे...... तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडतील..... " श्रद्धा आनंदाने सांगू लागते.....
" त्याची फॅमिली काय करते ? तो कुठे राहतो ? आपल्यासारखा खानदानी तर आहे ना.... " श्रद्धा चे वडील लगेच तिच्याकडे पाहून तिला पुढचे प्रश्न विचारतात.....
"नाही डॅड , त्यांचे या जगात कोणीही नाही.... एका अनाथासारखे ते वाढले आहे.... स्वतःच्या बळावर स्वतःचे शिक्षण पूर्ण करून आमच्या कॉलेजमध्ये आता प्रोफेसर ची नोकरी करत आहे..... कॉलेज पासून अर्धा तासाच्या अंतरावर जी छोटी रो हाऊस आहेत ना , तिकडेच ते राहतात.... " श्रद्धा आपल्या वडिलांना सगळी माहिती सांगू लागते.....
" काय ! ज्या माणसाच्या खानदानीचा काही पत्ता नाही.... तो माणूस एका अनाथासारखा वाढला आहे... अशा एका गरीब माणसासोबत तू लग्न करण्याचा विचार करूच कशी शकते... " श्रद्धा चे वडील रागानेच तिच्यावर ओरडत तिला विचारतात....
" का नाही करू शकत.... पैसाच आयुष्यासाठी पुरेसा नसतो... माणसाचा स्वभाव आणि आपल्यावर असलेले प्रेमही महत्त्वाचे असते आणि मी त्यांच्या त्या स्वभावावरच प्रेम केले आहे..... " श्रद्धा रागाने बोलूनच घरातून बाहेर पडते.... ती डायरेक्ट स्वयंमच्या घरी जाते.....
स्वयंंम च्या घरी जाऊन ती आपल्या घरात घडलेली सगळी गोष्ट त्याला सांगू लागते... स्वयम तिचा ऐकून तिच्यासोबत येऊन श्रद्धाच्या वडिलांना भेटतो.... तिचे वडील रागाने त्यांच्या दोघांच्याही नात्याला नकार देतात... श्रद्धा आपल्या वडिलांच्या विरोधात जाऊन स्वयंम सोबत आपले घर सोडून निघून जाते.... तिचे वडीलही रागात असल्यामुळे तिला अडवत नाही.....
.
..
...
To be continued....
*******************************
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा