Login

भावेश्वरी परिवार व्हाटसअप् ग्रुप : विचारांना दिशा देणारे हक्काचे व्यासपीठ

सामाजिक कामासाठी सोशल मीडीयाचा वापर गरजेचा आहे.
गावाकडच्या गोष्टी

भावेश्वरी परिवार व्हाटसअप् ग्रुप :विचारांना दिशा देणारे हक्काचे व्यासपीठ ...!!

शब्दांनाही कोड पडाव
अशी काही माणस असतात
किती आपल भाग्य असत
जेंव्हा ती आपली असतात

जेंव्हा चांगल्या विचारांचे सिंचन व्यक्तिमत्त्वावर पडते तेंव्हा त्याचा परिणाम व्यक्तिंच्या जडणघडणीमध्ये होवुन जीवन अधिक सफल व आनंदमय होते.
मनुष्य भौतिक सुखात अगदी गुरफुटुन गेला आहे , त्यामुळे त्याला नाती - गोती , सण - समारंभ , प्रेम , जिव्हाळा , संस्कृती याचे हेतुपुरस्कर विस्मरण होत आहे परिणामी आपआपसातील दुजाभावाने दुरावा वाढत आहे , यासाठी सर्वानी दिलदारपणाने एकत्र येऊन सकारात्मक विचारांची देवाणघेवाण केल्यास प्रत्येकाच्या आयुष्याचे नंदनवन झाल्याशिवाय रहाणार नाही .
हीच भुमिका नव्या जमान्यात " भावेश्वरी परिवारातील "सदस्याकडून अभिप्रेत आहे. तब्बल ८५ वैभवशाली रथीमहारथी सदस्यांनी गुंफलेले हे कुटुंब एक अलौकिक आनंदपर्व आहे . प्रत्येकाची वेगवेगळी खासियत म्हणजे कोंदणात बसविलेला हिरा आहे. रंग, ढंगही सारखाच, सारे कांही एकाच गर्द विचारांच्या छताखाली सामावलेलं...! शिक्षण, व्यवसाय , नोकरीच्या निमित्ताने बरेच सदस्य विखुरलेले असले तरी मनाने मात्र दररोज भेटतात अगदी शुद्ध विचाराने...! इथले विचार चिंतनिय असतात .उपयोगी माहितीचा खजिना अष्टोप्रहर इथे मिळत असतो .
इथे अंधश्रद्धेला , गलिच्छ विचारांना थारा नाही .इथे फक्त चांगल्या विचारधारेचा परिपाक होत असतो .सामाजिक ,शैक्षणिक , राजकिय ,अशा विविध क्षेत्रांचा प्रबोधनाचा सतत जागर सुरु असतो. कोणत्याही क्षेत्रातील मुलांचे अथवा मोठ्या व्यक्तिंचे यश असो आदरपुर्वक प्रोत्साहनपर अभिनंदनाने , प्रत्यक्ष भेटून गौरव केला जातो. परिवारातील सदस्यांचा वाढदिवस त्यांच्या विविध क्षेत्रातील कामगिरींचा आढावा घेऊन पुष्पगुच्छ देउन सन्मान केला जातो. या सगळ्यांचे सविस्तर वर्णन लेखणीतून सोशल मीडियावरुन प्रसिद्ध केले जाते.ग्रुपमधील जेष्ठ व्यक्तिंचा आदरपुर्वक मान राखला जातो.गावातिल सार्वत्रिक कार्यक्रमांचे सचित्र वर्णन , समाजप्रबोधन विषयी माहिती प्रत्येकाला येथे त्वरीत मिळते.अशा या ग्रुपचे विचारांचे आदानप्रदान कार्य नंदादीपाप्रमाणे अव्याहत चालु आहे. करारी मुद्रा, स्पष्टवक्तेपणा व सामाजिक जाण असलेले ॲडमिन श्री .आण्णासो देसाईसर व सर्व सहकार्यांच्या प्रेरणेने साकारलेला हा ग्रुप दिवसेंदिवस अधिक बाळसेदार होत आहे.
१७/११/२०१४ ला स्थापन झालेल्या ग्रुपला आज बघता - बघता ११ वर्ष होत आहेत. सरोळी गावाने सामाजिक जाण म्हणून नेत्रदान चळवळीत भाग घेतला.नेत्रदान चळवळीचे कार्य आजही जोमाने चालु आहे. पण चळवळीचा मुख्य गाभा म्हणजे दरवर्षी वर्धापनदिन मोठ्या दिमाखात साजरा केला जातो तेही वेगवेगळ्या निष्णात विचारवंताच्या हजेरीत..! त्याचीच लकेर मनात दाटून आली आणि आपल्याही ग्रुपचा मोठ्याने नसेना पण शब्दांनी तरी गौरव करावा या दृष्टीने केलेला हा शब्दप्रपंच ..!!

आपण तर मौल्यवान आहातच पण तुमचे विचार आम्हा सर्वासाठी अतीमौल्यवान आहेत त्याचा वापर जीवनासाठी ज्ञानेश्वरांच्या पसायदानाप्रमाणे व्हावा अधिकाधिक व्यक्त होत रहावे कारण त्याच्यासारखा दुर्मिळ आनंद नाही...!

किती छान मिळतो तुमचा प्रतीसाद
अंतःकरणातून ऐकू येते प्रेमळ साद
व्हावा दररोज तुमच्याशी गोड संवाद

भावेश्वरी परिवार : विचारातून समृद्धीकडे