श्शू ! आवाज कोणाचा? भाग ६
मागच्या भागात आपण बघीतलं की संध्याकाळी प्रतिकने नयनासाठी डाॅक्टरांची वेळ घेतली आहे.आता ते डाॅक्टरकडे गेल्यावर डाॅक्टर काय म्हणतात बघू.
दुपारचं जेवण झाल्यावर नयना झोपली ती अजून उठली नव्हती.डाॅक्टरांची वेळ घेतल्याने क्षणिक नयनाला उठवायला गेला.
" नयना उठतेस का? आपण जायचयं डाॅक्टरांकडे."
नयनाने अर्धवट डोळे उघडून म्हटलं,
" प्रतिक मी आजारी थोडीच आहे डाॅक्टरांकडे जायला? तुला सकाळीच म्हटलं होतं."
नयनाचा सूर तक्रारवजा होता पण त्याकडे दुर्लक्ष करून प्रतिक म्हणाला,
" तू आजारी नाहीस हे मलाही कळतंय.पण तुझी झोप न झाल्याने तुला हा त्रास होतोय. तुझा आवाज बघ किती थकल्यासारखा येतोय."
" अरे त्या कानात येणा-या आवाजाने मला थकवलय.कळत कसं नाही तुला? तुला पण सांगून थकले.काय करू देवा !"
नयनाने डोळे मिटून घेतले.
प्रतिक तिच्याजवळ पलंगावर बसला आणि तिचा हात हातात घेऊन हळुवारपणे म्हणाला,
" नयना मला कळतंय त्या आवाजाने तू थकली आहेस.तो कसला आवाज आहे हे तर आपल्याला शोधायला हवं नं! त्यासाठी आपल्याला डाॅक्टरांकडे जायला हवं.आपण नाही गेलो तर हा त्रास वाढेल. तो वाढू नये म्हणून चल."

प्रतिकच्या या बोलण्यावर नयनाने काहीच उत्तर दिलं नाही.प्रतिक तिच्या उत्तराची वाट बघत होता. नयनाचं न बोलता डोळे मिटून घेणं त्याला गोंधळात टाकत होतं.
तरी एकदा पुन्हा प्रयत्न करत प्रतिक म्हणाला,
" नयना प्लीज एक माझं. जाऊ या आपण डाॅक्टरकडे. ते काय म्हणतात ते बघू.त्यांच्या औषधाने तुला बरं वाटलं तर चांगलंच आहे.प्लीज ऊठ.जाऊन येऊ आपण."
" माझ्या कानात येणारे आवाज बंद करणार आहेत का ते?"
नयनाच्या या प्रश्नाचा प्रतिकला राग आला कारण तो तिच्या कानात आवाज येतात हे मानायला तयार नव्हता. थकल्यामुळे तिला असे भास होतात आहे यावर तो ठाम होता.नयना मात्र माझ्या कानात कोणीतरी बोलणं, आवाज येतात यावर ठाम होती.
शेवटी थोडं नमतं घेऊन प्रतिक म्हणाला,
" डाॅक्टरांना आपण सांगू की तुझ्या कानात आवाज येतात. तू हे सांगायला डाॅक्टरांकडे यायला हवी नं?"

" हो. येते मी डाॅक्टरकडे."
नयना हो म्हणाली म्हणून प्रतिकला आनंद झाला. प्रत्यक्षात प्रतिक डाॅक्टरांना नयनाच्या कानात आवाज येतात असं सांगणारी नव्हता.हे नयनासमोर त्यानं उघड केलं नाही.
नयना उठली आणि तयारीला लागली.
नयना हो म्हणाली म्हणून प्रतिकला आनंद झाला. प्रत्यक्षात प्रतिक डाॅक्टरांना नयनाच्या कानात आवाज येतात असं सांगणारी नव्हता.हे नयनासमोर त्यानं उघड केलं नाही.
नयना उठली आणि तयारीला लागली.
***
प्रतिक आणि नयना डाॅक्टर पांगारकर यांच्या दवाखान्यात आलेले आहेत. नंबर यायला वेळ होता. प्रतिक नयना कडे बघत होता तेव्हा त्याच्या लक्षात आलं की नयना आत्ता पण आपल्याच विचारात हरवलेली आहे. नयना हातांची अस्वस्थ हालचाल करत दर सेकंदाला तिच्या बसण्याची पोझिशन बदलते आहे. हे असं नयना का करतेय ते प्रतिकच्या लक्षात येत नव्हतं.
प्रतिक नयनाचं निरीक्षण करत होता तेव्हाच त्याचा फोन वाजला.
" हॅलो."
" मी नयनाचा बाबा बोलतोय."
" बोला नं."
" तुम्ही घरी नाही का?"
" मी आणि नयना दवाखान्यात आलो आहे."
" अरे आम्ही तुमच्या घरी पोचलो. बराच वेळ झाला बेल वाजवूनही कोणी दार ऊघडेना म्हणून तुला फोन लावला."
नयनाच्या बाबांचं बोलणं ऐकून काय बोलावं हेच प्रतिकला कळेना. असे अचानक कसे आले! सकाळी व्हिडिओ काॅल केला तेव्हा पण काही बोलले नाही.
" हॅलो प्रतिक ऐकतोय ना? फोन कटला का?"
नयनाच्या बाबांच्या आवाजाने प्रतिक भानावर आला.
नयनाच्या बाबांच्या आवाजाने प्रतिक भानावर आला.
" नाही फोन कटला नाही. मी ऐकतोय. बाबा आमचा अजून नंबर आलेला नाही. तुम्ही इतक्या वेळ कुठे थांबणार?"
"अरे, खाली सिक्युरिटी गार्ड बसतो तिकडच्या बाकावर बसतो. तुमचं काम झालं की या."
" बाबा निघायच्या आधी कळवलं असतं तर शेजारी घराची किल्ली देऊन ठेवली असती."
बोलताना प्रतिक शांतपणे बोलत असला तरी मनातून चिडला होता.
" ठेवतो रे फोन आम्ही खाली उतरतो." नयनाचे बाबा म्हणाले.
" हं." म्हणत प्रतीकने फोन ठेवला.
नयनाचे आईबाबा आले म्हणजे नयनाच्या तब्येतीवर गहन चर्चा होणार. नयनाच्या आईचं सविस्तर बोलणं ऐकताना कान बंद ठेवता येत नाही म्हणून ऐकावं लागणार.
" चला प्रतिकराव नव्या दिव्याला सामोरं जा." या विचारांनी मान प्रतिक हलवत स्वतः नीच हसला.
नयनाला हे काहीसुद्धा लक्षात आलं नाही.ती तिच्याच विचारांत गुंतली होती.
"नयना प्रतिक नेने"
रिसेप्शनीस्टने नाव पुकारताच प्रतिकने नयनाला हलवत म्हटलं,
" नयना चल आपला नंबर आला "
नयना ने प्रतिककडे बघीतलं तिला प्रतिक काय म्हणतोय हे लक्षात आलं नाही हे प्रतिकच्या लक्षात आलं. तो पुन्हा म्हणाला,
" अगं नंबर आला आहे आपला. आपण दवाखान्यात आलो आहोत."
आता जरा नयनाच्या लक्षात आलं आणि ती उठली.
दोघंही केबीनमध्ये शिरले.
दोघंही केबीनमध्ये शिरले.
" बसा." डाॅक्टर म्हणाले.
प्रतिकने नयनाला काय त्रास होतोय ते सांगितलं पण तिच्या कानात कोणीतरी बोलतं हे मुद्दाम सांगीतलं नाही.
" मनावर खूप ताण आला आणि झोप व्यवस्थित झाली नाही तर असं होतं."
डाॅक्टर खुर्चीवर अस्वस्थ चुळबूळ करत बसलेल्या नयना कडे बघत म्हणाले.
" हो"
प्रतिक हे बोलला तेव्हा लगेच नयना म्हणाली,
" डाॅक्टर माझ्या मनावर कसलाही ताण नाही. माझ्या कानात सतत कोणीतरी बोलतं. त्या आवाजाचा मला ताण आला आहे."
वर न बघताच नयना डाॅक्टरांना म्हणाली. नयना हे बोलेल असं प्रतिकला वाटलच नव्हतं. तो आश्चर्याने नयना कडे बघायला लागला.
" मॅडम तुमच्या कानात कोण बोलणार?"
" माहित नाही.पण कोणीतरी बोलतं."
" कोण?"
डाॅक्टरांनी खोदून विचारल्यावर नयना म्हणाली,
" एक स्त्री बोलते. तिचा आवाज येतो माझ्या कानात."
" काय?"
डाॅक्टरांनी आश्चर्याने विचारलं.
" नाही हो डाॅक्टर असं काही नाही. तिची झोप न झाल्याने असे भास तिला होतात आहे यावर औषधं द्या." प्रतिक सारवासारव करत म्हणाला.
" तू का खोटं सांगतोय? मला होणारा त्रास तुला दिसत नाही का?" नयना जवळपास ओरडून बोलली.
" नयना एक मिनीट "
प्रतिकने तिच्या हातावर थोपटलं तसा नयनाने प्रतिकचा हात झटकला.
" तू मला कबूल केलं होतस की ही गोष्ट तू डाॅक्टरांना सांगशील. का आता लपवतोय. ?"
प्रतिकला नयनाच्या डोळ्यात राग भरलेला दिसला. तो गप्प राहिला.
" डाॅक्टर मला काहीही शारीरिक आजार झालेला नाही. मी स्वस्थ आहे. मला सर्दीपडसं,खोकला,ताप यातील काहीही झालं नाही. मग मला कसलं औषधं देणार? बघा बघा माझं ब्लडप्रेशर घेऊन बघा ते पण नाॅर्मल येईल. मग माझा प्रश्न तुम्ही कसा सोडवाल?"
नयना एवढं बोलून थकली. तिचा श्वासोच्छ्वास जोराने चालू होता. चेहरा रागाने लालबुंद झाला होता. प्रतिक आश्चर्याने नयना कडे बघायला लागला.
डाॅक्टरांना अश्या पेशंटची पण सवय असते.ते शांतपणे म्हणाले,
" मॅडम एकदा आपण सगळं चेक करू. चालेल नं? मग तुमचा प्राॅब्लेम काय आहे त्यावर उपचार घेऊ. ठीक आहे. तुमची परवानगी असेल तर मी तुम्हाला तपासतो."
एवढं बोलून डाॅक्टर नयनाच्या उत्तराच्या अपेक्षेने नयना कडे बघायला लागले.
नयना अजूनही कसल्यातरी तंद्रीत होती.
"नयना डाॅक्टर काय म्हणाले ते ऐकले का?"
प्रतिकने हळूच नयनाला हलवत विचारलं.
नयना प्रतिकने हलवल्यामुळे भानावर आली.
" अं ."
" डाॅक्टर विचारतात आहे की तुझी परवानगी असेल तर तुला ते तपासातील.तुझी परवानगी आहे का?"
प्रतिकने तिला डाॅक्टर काय विचारतात आहे ते पुन्हा सांगीतलं.
" अं हो. माझी परवानगी आहे." नयनाने पाठ केल्यासारखं उत्तर दिलं.
" ठीक आहे.त्या टेबलवर झोपा."
डाॅक्टर नयनाला म्हणाले.
नयना उठली तशी तेही स्टेथस्कोप गळ्यात अडकवून उठले.
नयना टेबलवर झोपली. डाॅक्टरांनी तिला सगळ्या प्रकारे तपासलं. सगळंच नाॅर्मल होतं. मग नेमका कसला त्रास होतोय हिला हा विचार डाॅक्टरांच्या मनात घुमू लागला.
नयनाला तपासल्यावर डाॅक्टर आपल्या खुर्चीत येऊन बसले आणि प्रतिककडे बघून म्हणाले,
नयनाला तपासल्यावर डाॅक्टर आपल्या खुर्चीत येऊन बसले आणि प्रतिककडे बघून म्हणाले,
" मला असं शारीरिक आजार काही वाटत नाही. सगळं ओके आहे. तरीपण त्यांना बघीतलं की जाणवतं यांना काहीतरी त्रास आहे. यांचे डोळे,चेहरा पूर्ण शरीर थकल्या सारखं वाटतंय. कदाचित झोप पुरेशी न मिळाल्याने त्या थकलेल्या वाटत असाव्यात. मी औषधं लिहून देतो. ते घ्या."
डाॅक्टर प्रिस्क्रीप्शन लिहीत असताना नयना टेबलावरून उतरून खुर्चीवर यंत्रवत येऊन बसली. प्रतिक नयना कडे बघत होता तर ती पुन्हा तंद्रीत गेलेली दिसली. प्रतिकची मती आता खरोखरच कुंठीत झाली. नेमकं नयनाला काय झालं असेल हेच त्याला कळत नव्हतं.
" हे घ्या. एक चार दिवसांचा कोर्स दिला आहे. तो घेऊन त्यांना बरं वाटलं तर छानच आहे पण जर काहीच फरक पडला नाही तर बघू पुढे काय करायचं ते."
डाॅक्टरांच्या हातातील प्रिस्क्रीप्शन घेत प्रतिकने हो म्हणून मान डोलावली.
नयनाला उठवत प्रतिक तिला घेऊन केबीनबाहेर पडला.
***
दवाखान्यातून बाहेर पडताना प्रतिकने नयनाला विचारलं,
" तू गाडीवर मागे नीट बसशील नं? की रिक्षाने येतेस?"
" बसते."
हा नयनाचा आवाज प्रतिकला एखाद्या गुहेतून लांबून आल्यासारखा वाटला. यावर प्रतिकने काही न बोलता गाडी सुरू केली.
घरी गेल्यावर आणखी एक अंक वाट बघतोय.त्याला कसं झेलायचं हा विचार प्रतिकच्या मनात आला.
________________________________
घरी गेल्यावर कोणता अंक प्रतिकची वाट बघतोय.बघू पुढील भागात.
________________________________
घरी गेल्यावर कोणता अंक प्रतिकची वाट बघतोय.बघू पुढील भागात.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा