Login

शील - भाग 10

I am new writer works in IT. I love to write and Express my feelings. Ira gives best platform to explore your talent. Thank you Ira. Please like, share and comment. So that I can improve my writing.

शील - भाग 10

दोघं पोलिस स्टेशनवर पोचले तेव्हा ACP  अय्यर मीटिंग मधे होते. Constable  ने त्यांना wait करायला सांगितलं. अर्ध्या-एक तासानंतर बाहेर येऊन वृषभला अय्यर साहेबांनी बोलावलंय असं सांगितलं. दोघं आत गेले. थोडंसं जुजबी बोलणं झाल्यावर वृषभने थोडक्यात यशच्या परिस्थीतीची कल्पना अय्यर साहेबांना दिली.
“सर तर असं आहे सगळं. मी यशला ब-यापैकी ओळखतो. त्याचा स्वभाव माहीत आहे मला. तो असं काही करणार नाही. मी असं नाही म्हणत की तुम्ही त्याला सोडून द्या. पण त्याचा निरपराधपणा सिद्ध करण्याची एक संधी द्या त्याला. हवं तर मी हमी देतो. तो कुठेही पळून जाणार नाही. आणि खरंच तो गुन्हेगार असेल तर मी स्वत: त्याला पकडून देईन.”
इतका वेळ ACP रामकृष्णा अय्यर शांतपणाने सगळं ऐकत होते. त्यांना वृषभवर आणि त्याच्या कामावर विश्वास होता. पण म्हणून यशवर इतकी मेहेरबानी का करावी असंही त्यांना वाटत होतं. 
“वृषभ तू कितीही म्हणत असला तरी यश एक संशयित आहे. शिवाय पळून गेला होता तो. मी का विश्वास ठेवू त्याच्यावर? कशावरून तो पुन्हा चुकीचं वागणार नाही. उलट त्याला proper arrest व्हायला हवी.”
“सर पण काही होऊ शकत नाही का?”, वृषभने एक last try केला.
“I don’t think so.”,अय्यर साहेब म्हणाले तसं यश आणि वृषभ एकमेकांकडे बघू लागले. मग लगेचंच यश म्हणाला, “ सर तुम्ही म्हणता ते मी नाकारत नाही. परंतु तुम्हीदेखिल हे नाकारु शकत नाहीत की मी स्वत:हून surrender झालोय. जर मला पळूनंच जायचं असतं तर मी परत इकडे का आलो असतो. मान्य आहे मला की आधी मी पळून गेलो होतो. पण तेव्हा मी खरंच खुप घाबरलो होतो. काय चूक आणि काय बरोबर हे कळत नव्हतं मला. पण आता असं काहीही होणार नाही. सर मला खात्री आहे की मी काहीही चुकीचं वागलेलो नाही. मला फक्त माझा निर्दोषपणा सिद्ध करायला वेळ हवाय. आणि तुम्हीच शपथ घेता ना की निरपराध लोकांना शिक्षा होणार नाही म्हणून तुम्ही नेहमी प्रयत्नशील असाल. Please sir.”
“Well, I am impressed by your speech. But life is different from what we think. मी तुम्हाला 15 दिवस देतो. या 15 दिवसांत काय करता येईल ते करा. आणि पोलिसांची काही मदत लागली तर सांगा. पण फक्त 15 दिवस. Ok?”
“हो sir, Thank you. फक्त मला ऑफिस rejoin करता येईल यासाठी help लागेल तुमची.”
“I think Vrushabh can help you in that. What say Vrushabh?”
“Yes definitely sir. And extremely thank you.”
दोघं बाहेर आले आणि बाईकवर बसणार एवढयात यश म्हणाला,” वृषभ मला माझ्या flat वर जायचंय आधी.”
“Ok.”, असं म्हणून वृषभने गाडी यशच्या flat च्या दिशेने वळवली. Society मधे पोहचले तर एक पोलिस constable यशच्या घरावर पाळत ठेवत असलेला दिसला. यशने नजरेनेच याबद्दल वृषभला विचारले. वृषभ म्हणाला,”बघतो.” यश मग त्याची वाट बघत गाडीजवळ उभा राहीला.
वृशब आला आणि त्याने यशला सांगितले की,” तुझा शोध लागावा म्हणून गेल्या काही दिवसांपासून तो constable इकडे आहे. मी माझी ओळख करुन देत तुझ्याबद्दल सांगितलं आणि ACP अय्यर साहेबांच्या pernission बद्दल पण सांगितलं. तेव्हा तो म्हणाला की त्याला आपलं इकडे असण्याविषयी काहीच problem नाही. पण इकडे राहणं ही त्याची duty आहे. ती करणं त्याला भाग आहे.”
“हंम्म्….”,यश म्हणाला आणि मग दोघं flat वर गेले. 
“if you have any work then you can go.”, यश flat च door open करत म्हणाला.
“No. I will w8.”
“Ok".
यशने रूममधल्या कपाटातून कपडे घेतले आणि washroom मधे गेला. वृषभ त्याच्या काही फोन कॉल्समध्ये busy होता. यश change करुन बाहेर आला आणि किचनमधे जाऊन त्याने डबे बघितले. त्यात बिस्किटे होती.  बरेच दिवस flat बंद असल्याने सगळीकडे थोडीशी धुळ होती. ती त्याने साफ केली. चहाचं पातेलं स्वच्छ केलं आणि चहा ठेवला. 
वृषभचे calls झाल्यावर तो फ्रेश होऊन आला. तेवढयात यशदेखिल चहा आणि बिस्किटं घेऊन आला. 
“मी इथेच राहतो आता?”,वृषभला चहा  देत यश म्हणाला.
“Okay. No Issues. Inform Juili. She may be get worried.”, वृषभने उत्तर दिले. 
“Yup.”
वृषभ निघाला. जाताना म्हणाला, “See , you are now my responsibility.  So do not go anywhere without my knowledge.  I think you will understand.”
“Yes. Trust me. I won’t break my promise.”
वृषभ गेला तसं यशने जुईलीला एक message केला. Evening ला बोलू असंही म्हटलं. उगीच कामात disturb नको म्हणून कॉल करणं त्याला बरोबर वाटलं नाही.
तो शांतपणे येऊन सोफ्यावर बसला. थोडावेळ विचार करुन त्याने office चा शिपाई पाठक ला फोन केला. जेणेकरून office मधे काय चालू आहे ते कळेल.
“Hello, पाठक मी यश बोलतोय.”
“Hello हा बोला साहेब.”,पलिकडून उत्तर आलं.
“काय मग कसं चाललंय?..office मधे”
“ठिक चाललंय.”
“खरंच ठिक चाललंय का? काही खबरबात?”, यशने उगीचंच अंदाज घेतला की याला काही माहीती आहे का असं.
 “हा म्हणजे… तुम्ही का येत नाहियेत ऑफिसला?”
“होतं काहितरी कारण. येणार आहे मी थोड्या दिवसांत. तू काय म्हणत होता मघाशी?”
“काय म्हणत होतो मी?”
“हे बघ उगीच आता बदलू नकोस. सांग काय झालंय?”
“काही विशेष नाही साहेब. ते आजकाल तुमची टीम सतत मीटिंगमध्ये असते. अचानक सगळे खुपच सीरियस झालेत. बॉसने तुमचा project संध्या madam ला दिलाय. तर सगळे बोलत होते तेव्हा ऐकलं मी.”
“काय? संध्या madam येतात office  ला?”
“हो येतात.”
“बरं.. कोण कोण असतं या meeting मधे?”
“त्रिशा madam ,कुमार sir ,  नयना madam , परेश sir  , स्वीटी madam आणि संध्या madam.”  
 “वाटलंच होतं मला.”
“अं.. काय?”
“काही नाही रे. तू सांग अजुन काही चालू आहे का?”
“नाही साहेब. अजुन काही नाही.”
“ठिक तर मग. काळजी घे. काही असलं तर सांग.”
“हो. ठेवतो.”
पाठक हा यशच्या विश्वासातला होता. म्हणून तो काय बोलला याचा यश विचार करु लागला. काहितरी वेगळं घडतंय असं त्याला वाटायला लागलं. एक गोष्ट तर पक्की होती की office मधे सगळ्यांना झाला प्रकार माहीत नव्हता. यशने लगोलग HR ला फोन करुन personal reasons मुळे येऊ शकलो नाही आणि दोन दिवसात join करतो असं सांगितलं. Evening ला जुईलीशी casual बोलणं झालं. 
असेच दोन दिवस गेले. आणि यश ऑफिस साठी ready होत असताना संजीवचा कॉल आला.
“Hello, यश मी संजीव बोलतोय.”
“हा बोल संजीव काय झालं?”
“अरे संध्याचा medical report मिळवलाय मी.?”
“कसं?”
“I am private detective you know.”
“हो पण पुढे सांगशील का?”
“samples तुझ्याशी match होत आहेत.”
“Impossible.”
“पण काहितरी गडबड वाटतेय.”
“काय?”
“ते मी फोनवर नाही सांगू शकत. आपल्याला भेटावं लागेल.”
“ठिक आहे. मी office ला चाललोय आता. Evening ला ये माझ्या घरी.”
“Ok. Meet you soon.”
यशला आता धक्के पचवण्याची जणू सवयंच झाली होती. त्याने लगेच जुईली आणि वृषभला evening ला घरी बोलावून घेतले आणि स्वत: office ला निघाला.
जेव्हा यश office ला पोचला तेव्हा सगळं त्याला ब‐यापैकी नॉर्मल वाटलं. पण त्याचा हा भ्रम थोडा वेळंच टिकला. 
यश स्वत:च्या केबिन मधे बसला असता समोरुन येणा-या संध्या आणि त्रिशाने त्याला पाहिले तसे त्यांच्या कपाळावर आठ्या आल्या. काही वेळाने manager ने यशला बोलावलंय असा त्याला निरोप आला.
यश manager च्या केबिन मधे शिरला तसं manager ने एकदम firing च सुरु केली. 
“ Mr. Yash, एकतर तुम्ही न सांगता इतके दिवस  leave वर होता. वरुन आल्यावर inform करणं तुम्हांला महत्वाचं वाटलं नाही.”
“Extremely sorry sir.”
“Don't give me any excuses. You may go now.”
यश जायला वळला तसं manager म्हणाला,”By the way, तुम्ही जे miss संध्या सोबत केलंय ते खुपंच लज्जास्पद आहे. I don’t expect this from you.”
हे शब्द कानावर पडले तसे यशने मान खाली घातली.
“उपकार समजा तुम्ही की ही गोष्ट अजुन सगळ्या office मधे माहीती नाही. नाहितर काय ईज्जत राहील तुमची. फक्त miss संध्याची बदनामी होऊ नये, company च नाव खराब होऊ नये म्हणून आत्तापर्यंत कोणाला ही गोष्ट माहीत नाहिये. आणि sub inspector वृषभ देसाईं च्या फोनमुळे तुम्हाला ऑफिस मधे येऊ देतोय. नाहितर कधीच बाहेरचा रस्ता दाखवला असता. ब-याच ओळखी दिसतात तुमच्या!! ”
“…”
“तुमचं एक प्रोजेक्ट miss त्रिशाला आणि दुसरा मिस संध्याला दिलाय. So you work on daily office work. GO.”
“Sir but it was my dream project. How can you give it to them?”
“Do not teach me. Go and do your job.”
यश केबिनमधे आला. त्यातल्या त्यात एकच गोष्ट चांगली होती की वृषभने  स्वत:चा शब्द पाळला होता. यश नाराज होता. त्यात भर म्हणून की काय office मधे कोणी त्याच्याशी बोलत नव्हते. एकतर प्रत्येकजण आपापल्या projects मधे busy होते. दुस-या team मधले होते. त्याच्या team मधले लोक त्याच्याशी बोलायला येत नव्हते. कारण त्यांनाच फक्त झाला प्रकार माहीत होता.
आता तर यशकडे project देखिल नव्हता. काय करायचं त्याला कळत नव्हतं. खुपंच depress वाटू लागलं तसं त्याने जुईलीला phone करुन झाला प्रकार सांगितला. तसं जुईलीने Be positive  असा सल्ला देऊन evening ला सविस्तर बोलू असं सुचवलं. 

0

🎭 Series Post

View all