Login

शील - भाग 15

I am new writer works in IT. I love to write and Express my feelings. Ira gives best platform to explore your talent. Thank you Ira. Please do like, share and comment. So that I can improve my writing.

शील  -  भाग 15

“तुला काय म्हणायचंय परेश? तुम्ही केलेल्या चुकिच्या गोष्टीचं समर्थन करतोय का तू?”, वृषभने परेशकडे रोखून बघत म्हटलं.
“मान्य आहे की पद्धत चुकिची होती… हेतू चुकीचा नव्हता.. यशला धडा शिकवायचा..”
“तुला काय म्हणायचंय नेमकं ते स्पष्ट सांग.”,वृषभ न कळून म्हणाला.
“सांगतो.”, असं म्हणून परेश ने ग्लास मधील उरलेले पाणी पिऊन ग्लास खाली ठेवला.
“ कसं आहे ना सर…   शील फक्त शरीराचं नसतं. ते मनाचंही असतं. एखाद्याचं नुकसान करुन, मानसिक खच्चीकरण करुन स्वत:चा स्वार्थ साधणे ही कोणती पद्धत झाली.”, परेश बोलत होता.
“साधारण 4 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मला आणि त्रिशाला नुकतेच 2 वर्ष complete झाले होते. आणि आमच्या सोबत एक नविन मुलगी join झाली होती. पूजा तिचं नाव. ती हुशार होती. आणि लगेच मैत्री होईल अशी बोलघेवडी. Collegue म्हणून आमची लगेचंच मैत्री झाली. तिचं joining आणि आमचं 2 वर्षे complete होणं आम्ही एकत्रंच celebrate केलं.”
“पूजा जरी नविन होती तरी तिने खुप लवकर सगळे बारकावे शिकुन घेतले. Project preparation, designing आणि presentation यात तिचा हात कोणीच धरु शकणार नाही. खुप कमी वेळात ती खुप जास्त मेहनत करुन उत्तम काम करत होती. तिच्या कामावर सगळेच खुश होते कारण output चांगलं असायचं.”
“पूजाच्या घरची परिस्थिती साधारण होती. अगदी गरीब नव्हते पण खाऊन पिऊन सुखी असं ते कुटुंब. वडील ज्या कंपनीत होते तिकडे त्यांच्या हाताचा accident झाला. हात कापावा नाही लागला हे नशीब. पण त्या हाताने काम होईना. मग काय कंपनीने घरी बसवलं. पूजा एकटीच कमावती. आई वडील आणि एक लहान भाऊ. सगळे खुप साधे. कामाशी काम ठेवणारे. मेहनती. तर या सगळ्या पार्श्वभूमीमुळे पूजा खुप जबाबदार झाली होती. ”
“अशातंच company ला एक मोठा प्रोजेक्ट मिळाला. कमी वेळात खुप जास्त काम करायचं होतं. Team काम करतंच होती. पण जेव्हा पूजाला team leader म्हणून select केलं गेलं तेव्हा काम अधिक जलद आणि perfect होऊ लागलं. “
“ती खुप मेहनती होती. आणि तितकीच प्रामाणिक. कामात हलगर्जीपणा चालायचा नाही तिला.  शेवटी यशस्वीरित्या तिने तो project complete केला. सगळ्यांनी तिचं कौतुक केलं. मी तर प्रेमातंच पडलो होतो तिच्या.”
“आम्ही तिचं success celebrate केलं. खुप खुश होती ती. तिची खुप सारी स्वप्न होती. तिला तिच्या घरच्यांसाठी, स्वत:साठी बरंच काही करायचं होतं. नेहमी हसतमुख राहून सगळ्यांना आपलंसं करणारी अशी होती माझी पूजा. मी ठरवलंच होतं आता हिला propose करायचं आणि तसं तिला विचारलं सुद्धा. पण तिला तिचं career खुप important वाटत होतं. निदान त्या घरच्या जबाबदा-या कमी होईपर्यंत तरी. तिने प्रेमळ नकार दिला. मी तिला म्हटलं होतं की मी थांबेन तुझ्यासाठी…”
इतकं सगळं बोलून परेशला गहिवरून आलं. त्याला पुढे बोलताच येईना. एव्हाना संध्या ब-यापैकी normal झाली होती. तिने पुढे बोलायला सुरवात केली.
“पूजा माझी cousin. आम्ही साधारण मागेपुढेच एकाच company मधे लागलो. मग training period नंतर आम्हाला वेगवेगळे location देण्यात आले. असं असलं तरी आम्ही नेहमी संपर्कात रहायचो. तिच्या suceess पार्टीमध्ये आमची तिघांची भेट झाली. तेव्हापासून आम्ही सगळे चांगले friends झालो. अगदीच नेहमी नाही पण आम्ही भेटत रहायचो. सगळं नीट चाललं होतं. पण म्हणतात ना सुख बघवत नाही.. तसंच पूजाच्या सुखी स्वप्नांना नजर लागली. पूजाची प्रगती काही लोकांच्या डोळ्यात खुपू लागली…याचदरम्यान यश ऑफिसला join झाला.  ”
“पूजाला एक वर्ष complete होत होतं तेव्हा अजून एक प्रोजेक्ट आला. जर या प्रोजेक्ट मधे चांगलं काम केलं तर promotion पक्कं होतं. तिने पुन्हा मेहनत घ्यायला सुरवात केली. खुप मेहनत घेऊन प्रोजेक्ट पुर्ण केला. जी deadline होती तिच्या आधीच तिने तिचं काम पुर्ण केलं होतं.”
“याच project मधे यश तिच्या हाताखाली काम करत होता.”, मध्येच त्रिशा म्हणाली. “तो सिनीयर होता पूजा पेक्षा. कारण 2 वर्ष तो दुस-या branch मध्ये काम करत होता. असं असलं तरी त्याला म्हणावं तसं काम जमत नव्हतं. आणि पूजाची प्रगती देखील बघवत नव्हती.”
“जेव्हा पासून join झाला तेव्हापासून यश पूजाची प्रगती बघत होता. त्याने हळूहळू पूजाशी बोलायला सुरवात केली. प्रत्येक गोष्टीत जमेल तसं तिच्यासोबत रहायला सुरवात केली. दरम्यान परेश एका project साठी बाहेर गेला होता. संध्याशी कधितरीच बोलणं व्हायचं. त्यामुळे मी आणि पूजाच असायचो नेहमी. यश तिच्याशी जवळीक करत होता. हळूहळू ते दोघं friends झाले आणि यशने तिला propose केलं. ती नाहीच म्हणत होती पण स्वत:च्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात त्याने तिला फसवलंच. असंच चालू असताना जेव्हा पूजाला तो project  मिळाला तेव्हा यशला पूजाच्या हाताखाली काम करावं लागत होतं. जे त्याला सहन होत नव्हतं. जसं संध्या म्हणाली तसं पूजाने तिचं काम deadline च्या आधीच पुर्ण केलं. ते सगळं एका pendrive मध्ये होतं.”
“delivery च्या आधी काही दिवस.. आम्ही दोघी coffee shop मध्ये गेलेलो. आमचं बोलणं चालूच होतं की अचानक यश तिकडे आला. त्याने जुईलीला सोबत येण्याविषयी सांगितले. आणि ते दोघे तिकडून निघून गेले. नंतर रात्री मी पूजाला कॉल केला. तेव्हा तिने सांगितले की ती तिच्या गावी जात आहे. तिला गावाला जायला 2-3 दिवस लागायचे. तिच्या बाबांचं accident झालंय. यश तिला हेच सांगायला आला होता की तिचा फोन लागत नव्हता. म्हणून घरच्यांनी यशला call केला. मध्यंतरी तिचे घरचे गावाला गेले होते. पूजा कामामुळे जाऊ शकली नव्हती. तिने मला सांगितले की ती delivery च्या आधी येईन.”
“या दरम्यान तिने तिचा प्रोजेक्ट सांभाळायला यशला दिला. जेणेकरून काही काम आलं तर अडायला नको. आणि ती गावाला निघून गेली.”
“Delivery चा दिवस उजाडला तरी पूजा आली नाही. मी तिला सतत कॉल करत होते. पण no reply. इकडे client पण  wait करत नव्हता. मग manager ने project deliver करायचा असं ठरवलं. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा यशने प्रोजेक्ट client ला दिला पण स्वत:च्या नावाने. पूजाच्या नावाचा तिकडे उल्लेखदेखील नव्हता.”

0

🎭 Series Post

View all