घड्याळाच्या काट्याने 4:30 चा टोला दिला. दुपार उलटून गेली होती. प्रचंड मानसिक ताण आणि दगदग यामुळे थकलेला यश अजुन गाढ झोपेतंच होता. तेवढयात किचनमधील भांड़यांच्या आवाजाने तो दचकून उठला. क्षणभर आपण कुठे आहोत, काय झालंय हे त्याला काहिच समजलं नाही. जेव्हा चित्रपटासारखं सगळं डोळ्यांसमोरुन सरकलं तेव्हा मात्र त्याला जीव नकोसा झाला. तसाच लोळत पडून तो फॅनकडे बघत बसला.
रुमालाला हात पुसत जुईली बाहेर आली. बघते तर यश जागा.
“अरे उठलास. आत्ताच भांडी घासून आणि कीचन आवरुन आले.”
“…”
“यश…यश…तुझ्याशी बोलतेय मी.”
“अं..हं.. बोल ना.. काय?”
“ऊठ आता. फ्रेश हो. चहा घेणार का तू? की कॉफी?”
“नकोय मला काही. मी फ्रेश होतो.”
“ठिक आहे. मी काही बनवत नाही. मलापण काही नकोय आत्ता.”
“हं.”, असं म्हणून यश फ्रेश व्हायला गेला आणि 5-10 मिनटांत परत आला आणि खिडकीच्या बाहेर पहात उभा राहिला.
“तुला सांगायचंच राहिलं बघ. मी वृषभला कॉल केलेला. तो येतोय 6 वाजता. बघू त्याची काही मदत होते का.”
“हं..”
“आणि संजीव पण येणार आहे.”
“कोण संजीव?”
“अरे.. तो private detective आहे. माझी friend आहे ना तिने नंबर दिला. बोलून तर बघू काही मदत होतेय का…”
“…”
“काय?...”
“हो ठिक आहे ना”
“तुझ्या contact मधे कोणी आहे का? ज्याची आपल्याला help होऊ शकेल?”
“सध्यातरी माझं डोकंच नाही चालत आहे. Sorry but I am helpless.”
“It’s ok.” असं म्हणून जुईली जायला वळली तर यशने तिला आवाज दिला.
“जुईली thanks and sorry. मला मदत करायला तू इतके efforts घेतेय म्हणून thanks आणि माझ्यामुळे होणा-या त्रासाबद्दल sorry.”
“यश, friends आहोत आपण. आणि जर तू खरंच innocent असशील ना तर मला नक्कीच आनंद होईल. तेव्हा तुझी ही औपचारिकता त्यावेळेस कामात येईल. तेव्हा आता वाया घालवू नकोस.” जुईली हसुन म्हणाली. यशनेही छोटंस smile दिलं.
Almost 6 वाजत होते. 6 वाजून 5 मिनटांनी दाराची बेल वाजली. जुईलीने दार उघडलं तर समोर संजीव होता. त्याने स्वत:ची ओळख सांगितली तशी जुईलीने त्याला घरात घेतले आणि पाणी दिले. बराच वेळ सगळे न बोलताच बसले होते. शांतता भंग करायला जुईली म्हणाली,
“चहा वृषभ आल्यावरंच करते. चालेल ना? तो येईलंच 6:30 पर्यंत. मी कॉल केलेला.”
“हो चालेल. काहिच problem नाही.”, संजीव उत्तरला.
थोड्याच वेळात वृषभ पण आला. जुईलीने सगळ्यांसाठी चहा आणि काही snacks आणले. वेळ न घालवता लगेचंच मुद्द्याला हात घातला गेला.
“मी फोनवर कल्पना दिलीच आहे तुम्हा दोघांना…काय करता येईल आपल्याला?”, जुईलीने प्रश्नार्थक नजरेने विचारलं.
“हं. तर यश.. कसं आहे ना,.. अशा केसेस खुपच sensitive असतात. आणि कायदा हा महिलांच्या बाजुने असतो. मला जुईलीने जेवढं सांगितलंय त्याव्यतिरीक्त तुला काही अजुन आठवत असेल तर सांग. काहीही लपवणं तुलाच महागात पडेल. आणि काय आहे ना एक गोष्ट स्पष्टच सांगतो. जर तू खरंच निर्दोष असेल तरच.. I am ready to help you. कुठ्ल्याही क्षणी तू दोषी आढळला तर मीच आधी तुला जेलमधे टाकेल. काय?”, वृषभ एका दमात बोलून गेला. त्याच्या आवाजात जरब होती. कमालीचा आत्मविश्वास होता. आणि पोलिसात असल्यामुळे एकदम रुबाब. कोणालाही भिती वाटेल.
वृषभचं बोलणं ऐकुन यशने जुईलीकडे बघितलं. तिच्या आश्वासक नजरेमुळे त्याला थोडा धीर आला.
“नाही वृषभ. माझा विश्वास आहे स्वत:वर. मी असं काहीही केलं नाहीये. आणि जुईलीने जे सांगितलंय तुला त्याव्यतिरीक्त काहीही नाहीये सांगायला माझ्याकडे. अजुन काही आठवलं तर मी नक्की सांगेन.”
“पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येत नाहीये.”, इतका वेळ गप्प असलेला संजीव मधेच बोलला तसं सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं.
“कोणती?”, जुईलीने विचारलं.
“जिने आरोप केलाय ती मुलगी, संध्या, तिचं statement काय आहे? खरंच तिच्यावर रेप झालाय का? तिने केलेला आरोप कितपत खरा आहे? तिने कोणत्या पोलिस स्टेशनला FIR केलेय. तिचा point of view काय आहे?”
“तू बरोबर बोलत आहेस संजीव. हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. मी FIR ची चौकशी करतो आणि कळवतो तुम्हां सगळ्यांना.”
“मीपण संध्या च्या फ्लॅटमधे जाऊन येतो. यश येशील का माझ्याबरोबर?”
“मी?... अं..म्हणजे…येतो.”
“पण तुम्ही आत कसे जाणार?”,जुईली मधेच म्हणाली.
“आधी बाहेरुन नजर ठेवतो. काही पुरावे मिळतात का बघू. जमलं तर आत जायला try करु.”, यश म्हणाला तसं संजीवने संमती दर्शवली. यशचं उत्तर ऐकुन जुईलीला जरा बरं वाटलं की तो मलूल न राहता स्वत:साठी लढतोय.
“ठिक तर मग. आपण numbers exchange करुन घेऊ. म्हणजे संपर्कात राहता येईल. लागुया मग कामाला.”, वृषभ बोलला तसं संजीव उठला. दोघं दरवाजाकडे निघाले.
“Thank you so much",यशने हात पुढे करत म्हटलं.
“It’s ok. Meet you soon.”, वृषभ हात मिळवत म्हणाला.
“उद्या फोन करतो. मग ठरवू फ्लॅटवर कधी जायचं ते.”, संजीव यशच्या खांद्यांवर हात ठेवत म्हणाला.
“ok.”
“Bye जुईली, Bye यश.”
“Bye and thanks for coming.”, असं म्हणून जुईली सोफ्यावर येऊन बसली.