शोध प्रेमाचा भाग 1
मधु :- तूम्ही?
शेखर :- हो... मीच ????.... का कोणी दुसरं येणार होत का?
मधु :- नाही.... म्हणजे तस नाही....
शेखर :- मग....
मधु :- .....
शेखर :- काहीतरी विचारलं तुला.... उत्तर दे ना... मधु तुला विचारलं मी..... अग लक्ष कुठे आहे तुझं..... मधु.... ए......
शेखरने मधुला विचारलं तेव्हा कुठे ती भानावर आली.
खरतर त्या दोघांना एकत्र काम करायला वर्ष होत आलेलं. पण का कुणास ठाऊक मधु शेखरपासून थोडं लांबच असायची. तिचा स्वभाव खूपच बोलका असल्यामुळे ऑफिसमध्ये सर्वांना आपलस करायला तिला वेळ लागला नाही. पण शेखर.... त्याच्यासमोर मात्र ती गप्पच असायची.
आजही तिला तिच्या ऑफिसचा पहिला दिवस आठवला. खूप गडबडीत असल्यामुळे शेखरसमोर येऊन धडकणार तेव्हा त्यानेच दोन पाऊल मागे जाऊन तिला "सांभाळून" असं सांगितलं. त्या क्षणी खरंतर मधुची तारांबळ उडाली. कारण ऑफिसचा पहिला दिवस आणि अनोखळी व्यक्तीसमोर अशी धडक.....ती त्याला काही बोलणार तोपर्यंत तो तिथून गेलासुद्धा....नंतर मात्र तिची नजर त्यालाच शोधत होती. का कुणास ठाऊक पण एक वेगळीच अस्वस्थता तिला वाटत होती. आजपर्यंत कधी कोणाकडे न बघणारी मधु एका क्षणात त्याच्यासाठी अस्वस्थ झाली. त्याच कारण तिलाही समजतं नव्हतं.
ह्यामुळेच की काय पण वर्ष होऊनही ती त्याच्याशी कामाशिवाय काही बोलू शकली नाही. एकाच विभागात असल्यामुळे कामासाठी मात्र वारंवार भेट होत. त्याचा अनुभव, काम करायची पद्धत, कामात झोकून देण याव्यतिरिक्त त्याच हसून काम करणं, समोरच्याला समजून घेण्याची पद्धत हे सगळं ती जवळून अनुभव घेत होती. तिच्याही नकळत ती त्याच्याकडे आकर्षित होत होती.
शेखर: - मधु अग कुठे हरवलीस.....
मधु :- अ.... ते मी..... मला.....
शेखर :- अग हो इतकं दचकायला काय झालं?
मधु :- काही नाही.... पण तुम्ही गेला नाहीत अजून???
शेखर :- नाही... थोडं काम बाकी होत.... आणि तुझं काय?
मधु :- हे काय निघतेच आहे आता.... इतका मेल पाठवला की झालं.
शेखर :- ओके.... चल निघूयात मग.. माझंही झालंच आहे.
मधु :- नको..... म्हणजे तुम्ही चला..... मी निघते मागाहून...
शेखर :- मधु सोबतच निघूयात. उशीर झालाय. असंही आपण एकाच दिशेला जाणार आहे ना....
मधु :- अ...हो
आता मात्र मधुचा नाईलाज झाला. तिला शेखरसोबतच जावं लागलं.
शेखर :- तू कशी जातेस रोज??
मधु :- मी स्कूटीने. पण आज ऑटो घ्यावी लागणार. सकाळी निघताना पाहिलं तर स्कूटी पंक्चर.
शेखर :- ओह.... मी सोडू तुला.... जर तुला काही प्रॉब्लेम नसेल तर. कारण उशीर झालाय. आणि तू एकटी आहेस.
खरतर मधुला प्रश्नच पडला होता. कारण ऑटोची तशीही सवय नव्हती. आणि अंधार पडत होता. पण शेखर सोबत जायचं की नाही असाही विचार येत होता. तिला काही सुचतच नव्हतं, तेव्हढ्यात शेखर त्याची बाईक घेऊन आला सुद्धा.
शेखर :- चल निघुयात.
मधु :- .....
शेखर :- कसला विचार करतेस. तुला एकटीला ऑटोने तर मी जाऊ देणार नाही. आणि जर तुला माझ्याबरोबर यायचं नसेल तर घरून कोणी येणार असेल तर तोपर्यंत मी थांबतो. बघ काय करायच.
आता मात्र ती काही न बोलता त्याच्यामागे बसली. रस्त्याने जाताना तिला सारखं वाटत होत की हा रस्ता कधी संपूच नये, असंच त्याच्यासोबत लांबवर प्रवास करावा. ती काही बोलत नाही बघून त्यानेच सुरवात केली.
शेखर :- तूला बोलता येत नाही की फक्त विशिष्ट माणसांशीच बोलत नाहीस.
मधु :- नाही तस नाही. पण....
तिला परत शांत झालेलं बघून
शेखर :- हो ... कारण ऑफिसमध्ये खूप वेळा छान गप्पा मारताना बघितलंय तुला.
मधु :- हो... आवडतं मला... बोलायला...
शेखर :- अजून काय काय आवडतं?
मधु :- अजून.... काही विशेष नाही.... घरी असेल तर वेगवेगळे पदार्थ करून बघायला.... आणि पुस्तकं वाचायला खूप आवडत.
शेखर :- अरे वा.... तुला तर चांगलंच बोलता येत की... मला तर माहितच नव्हतं. कारण तू नेहमी इतकी शांत असतेस. निदान माझ्या समोर तरी....
मधु :- हो मला सुरवातीला थोडा वेळ लागतो.... एखाद्या व्यक्तीशी जुळवून घेताना...पण ती व्यक्ती जर परिचयाची झाली की मग मात्र कोणत्याही विषयावर कितीही वेळ बोलू शकते तिच्याशी....
शेखर :- मग आता माझ्याशी झालाय का परिचय??
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा