" राजीव सिद्धार्थच्या घरातून माझ्यासाठी लग्नाची मागणी आली आहे आणि माझ्या घरच्यांना मुलगा पसंत आहे, तू लवकर काहीतरी कर नाहीतर बघता बघता माझ्या घरचे माझं लग्न त्या सिद्धार्थ सोबत लावतील.... " वाणी नाराजीच्या स्वरात फोनवर बोलत असते.....
" वाणी माझं ऐकून तरी घे , अग मी प्रयत्न तर करत आहे ना पण काय करू कुठे यशस मिळत नाही.... " राजीव नकारात्मक भावनेने बोलू लागतो....
" राजीव अजून किती दिवस मी तुझा हे बोलणं ऐकून घेऊ... अरे, जेव्हापासून आपण एकमेकांवर प्रेम केले तेव्हापासून तू हेच बोलून सगळ्यांपासून आपले नाते लपवून ठेवायला सांगितले.... असे अजून किती दिवस लपवायचे आहे ? " वाणी थोड्या रागीट आवाजातच त्याला विचारते....
" हे बघ वाणी , मी जरी आता तुझ्या घरच्यांसमोर येऊन तुझ्यासाठी मागणी घातली तरी ते तुझा हात माझ्या हातात देतील का ? अग तो सिद्धार्थ खूप श्रीमंत माणूस आहे... त्याचा स्वतःचा बिजनेस आहे आणि त्याच्यासमोर मी तुझ्या घरच्यांना काय सांगू, मी एक मिडल क्लास मुलगा अजूनही नोकरीच्या शोधात आहे.... लग्न करून तर मी तुला कुठे नेऊन ठेव आणि आपल्या संसारासाठी कुठून पैसा गोळा करू ? " राजीव बोलताना थोड्या हळव्या स्वरात बोलतो....
" राजीव अरे मागे घरच्यांपासून लपवून मी जे पैसे तुला आणून दिले होते , ते पुरे होतील ना आपल्याला सध्यातरी आणि मग आपण दोघे मिळून कुठेतरी चांगला जॉब शोधूया..... " वाणी आपले प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करू पाहते....
" अग ते तू दिलेले पैसे ना मी एका ठिकाणी बिजनेस करण्यासाठी गुंतवण्याचा प्रयत्न केला परंतु त्या बिझनेस मध्ये माझा लॉस झाला आणि सगळे पैसे बुडाले..... पण तू काही काळजी करू नको, मी लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढून पैसे कमवण्याचा प्रयत्न करेल..... " राजीव तुला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत बोलतो....
" आणि तोपर्यंत मी काय करू ? " वाणी रागातच त्याला विचारते....
" वाणी माझ्याकडे एक आयडिया आहे , त्याने तुझा प्रॉब्लेम ही सोल होईल आणि आपल्याला पुरेसा वेळही मिळेल..... " राजीव काहीशा गंभीर स्वरात बोलतो...
" कोणती आयडिया ? " वाणी पण त्याला प्रश्नार्थक पणे विचारते....
" वाणी तू आधी माझं नीट ऐकून घे आणि मगच तुझा निर्णय सांग..... " राजीव शांत स्वरात बोलतो...
" ह्मम.. " माने त्याच्या बोलण्यावर फक्त हुंकार भरते....
" पाणी तुझ्यासाठी त्या सिद्धार्थ चे मागणार आहे ना , तू एक काम कर त्याच्यासोबत लग्न कर...... " राजीव
" काय ? राजीव तुला वेड लागला आहेस का ? अरे मी तुझ्यावर प्रेम करते आणि लग्न त्याच्यासोबत करू , तू स्वतः मला असं सांगत आहेस ? " वाणीला तर त्याच्या बोलण्याचा विश्वासच होत नाही....
" आधी माझा ऐकून तरी घे... तुला मी फक्त लग्न करायला सांगत आहे.... लग्न झाल्यानंतर काहीतरी नाटकं करून त्याच्यापासून लांबच रहा आणि हळूहळू गोड बोलून त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न कर.... ते पैसे तू गुपचूप मला आणून दे.... हे पैसे वापरून मी एखादा बिजनेस करून चांगला पैसा कमवतो आणि मग काय तरी कारण सांगून त्याला घटस्पोट देऊन तू माझ्याकडे निघून ये, त्यानंतर आपण दोघं एकमेकांसोबत आनंदाने राहू आणि आपलं पुढचं आयुष्य आनंदाने जगू.... " राजीव आपल्या डोक्यात चाललेला प्लॅन वाणीला सांगतो.....
" नाही राजीव मी असे नाही करू शकणार अरे ही सरळ सरळ फसवणूक झाली.... " वाणी त्याला नकार देते....
" वाणी अगं त्याच्याकडे एवढा पैसा आहे की, त्यातला तू थोडाफार पैसा काढून घेतला तरी त्याने त्याला काहीही फरक पडणार नाही.... उलट आपलं भविष्य सुधारेल.... हे बघ , तू विचार कर नाहीतर मग मला विसरून जा.... " राजीव रागानेच थोड्या मोठ्या आवाजात बोलतो.....
" राजीव अरे तू असं का बोलतोस , मी नाही तुला विसरू शकत.... मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत..... " वाणी कळवळून रडव्या स्वरात बोलू लागते....
" माझे पण तुझ्यावर खूप प्रेम आहे वाणी आणि आपल्या प्रेमासाठी तुला एवढा तरी करावेच लागेल.... मग करशील ना तू आपल्या प्रेमासाठी... " राजीव तिच्या उत्तराची वाट बघत तिला विचारतो...
" हो... " शेवटी नाईलाजाने वाणीही कसे करायला तयार होते....
वाणीच्या घरचे वाणीला सिद्धार्थ कडून आलेल्या लग्नाच्या मागणीबद्दल सांगतात..... तीही आपल्या घरच्यांना लग्नासाठी होकार देते त्यामुळे तिच्या घरचे आनंदाने लग्नाच्या तयारीला लागतात......
To be continued...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा