Login

आंधळे प्रेम - संघर्ष प्रेमाचा भाग २

प्रेमात झालेला विश्वासघात
सिद्धार्थ च्या घरी तर लग्नाची जोरदार तयारी चालू होते.... वाणीकडून होकार मी आल्यापासून सिद्धार्थ खूपच आनंदात असतो.... त्याच्या मित्रांनी त्याला बॅचलर पार्टी मागितलेली असते त्यामुळे लग्नाच्या काही दिवस आधी ते सगळे मिळून एका क्लबमध्ये पार्टी करत असतात.....

" सिद्धार्थ आता तर तू खूपच खुश असशील ना , शेवटी तुझे प्रेम तुला मिळालेच.... " त्याचा एक मित्र त्याच्याकडे पाहून आनंदाने बोलू लागतो....

" हो यार , तुम्हाला खरं सांगू का मला तर अजूनही विश्वास होत नाही आहे की,  वाणीने माझ्यासोबत लग्न करण्यासाठी होकार दिला..... तुम्हाला तर माहित आहे कॉलेजमध्ये असल्यापासूनच माझे वाणीवर खूप प्रेम होते परंतु कधी समोर जाऊन तिला सांगण्याची हिंमत झाली नाही..... तसे पण कॉलेजमध्ये आम्ही एकमेकांसोबत जास्त बोलतही नव्हतो..... तिला  माझ्यासारखा मुलगा आवडेल असा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता..... " सिद्धार्थ आनंदानेच कोल्ड्रिंक चा ग्लास हातात घेऊन आपल्या मित्रांसोबत बोलू लागतो.....

" माझ्यासारखा मुलगा म्हणजे अरे सिद्धार्थ तू पण काही कमी नाहीस..... श्रीमंत आहेस,  तुमचा स्वतःचा फॅमिली बिझनेस आहे,  दिसायलाही चांगला आहेस.... " सिद्धार्थ चा दुसरा मित्र त्याच्याकडे पाहून बोलतो.....

" हो पण वाणी पुढे मी काही इतका खास दिसत नाही.....  माझे हे सावळे रूप तिला आवडेल असा मी कधी विचार केला नव्हता....  तुम्हाला तर माहित आहे ना,  कॉलेजमध्ये दरवर्षी ती ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये पहिला नंबर मिळवत होती.....  दिसायला इतकी सुंदर, नाजूक , अगदी स्वर्गातल्या अप्सरेप्रमाणे दिसणारी वाणी माझ्यासारख्या सावळ्या मुलाला पसंत करू शकेल असे मला वाटले नव्हते..... " सिद्धार्थ कॉलेजचे ते दिवस आठवत आपल्या मित्रांना सांगू लागतो.....

" सिद्धार्थ भले तू दिसायला रंगाने सावळा असलास तरी हाईट बॉडीने तर अगदी एखाद्या मॉडेल प्रमाणेच दिसतोस.... आता तर तू तुमचा फॅमिली बिजनेस ही जॉईन केला आहे त्यामुळे तुझ्याकडे पैशाची ही कमी नाही.... अशावेळी कोणती मूर्ख मुलगीच असेल जी तुझ्या सोबत लग्न करायला नकार देईल..... " सिद्धार्थ चा तिसरा मित्र त्याच्याकडे पाहून त्याचे कौतुक करत बोलतो....

" नाही गाईज मी दुसऱ्या कोणत्या मुलीबद्दल विचारी करू शकत नाही.  ..  या मनात पहिल्यापासून वाणीची जागा आहे आणि कायम तिची जागा राहणार..... " सिद्धार्थ आपल्या मित्रांकडे पाहून बोलतो.....

" आणि आता विचार करायची गरजही नाही कारण तुझे प्रेम आता तुला मिळाले आहे..... तुझे तिच्या सोबतच लग्न होणार आहे त्यामुळे आता तुझी वाणी कायमची तुझीच होणार आहे..... " त्याचे मित्र हसून त्याच्याकडे पाहून बोलू लागतात.....

" हो यार हेच तर माझं खरं नशीब .... देवाने बहुतेक माझ्या मनातल्या भावना ओळखल्या म्हणून तर आज वाणीने माझ्यासोबत लग्नासाठी होकार दिला आहे ना...... " सिद्धार्थ आपल्या मित्रांकडे पाहून आनंदाने बोलतो....  ते लोक बराच वेळ  क्लब मध्ये पार्टी करत असतात.... त्या क्लब मध्ये अजून खूप सारे मित्र ऑफिसचे कलिग ही आलेले असतात....  आज त्या पार्टी साठी पूर्ण क्लब सिद्धार्थने स्वतः बुक केलेला असतो......

बघता बघता वाणी आणि सिद्धार्थ चे धुमधडाक्यात लग्न होते.... दुसऱ्या दिवशी घरी पूजा असल्यामुळे आज वाणीला सिद्धार्थच्या चुलत बहिणी सोबत दुसऱ्या रूममध्ये झोपायला सांगितलेले असते त्यामुळे पहिला दिवस तर तिचा निवांत जातो..... दुसऱ्या दिवशी सिद्धार्थची आई वाणीला पूजेला घालण्यासाठी महागडी साडी आणि काही सोन्याचे दागिने घेऊन येते.....  ते दागिने पाहून वाणीचे डोळेच मोठे होतात...... सिद्धार्थ ची चुलत बहीण वाणीला तयारी करण्यास मदत करते....

" वहिनी तुम्ही थोडा वेळ बसा जेव्हा बाहेर गुरुजी बोलवतील तेव्हा मी तुम्हाला घ्यायला येईल..... " असे बोलून सिद्धार्थ ची बहीण बाहेर पूजेच्या ठिकाणी निघून जाते.... आता त्या रूम मध्ये वाणी शिवाय दुसरे कोणीही नसते.....  वाणी पटकन रूमचा दरवाजा लॉक करून राजीव ला फोन करते.....

" हॅलो वाणी अग मी कधीपासून तुझ्या फोनची वाट बघत होतो.......  लग्न झाल्यापासून एक फोन नाही,  त्या सिद्धार्थ चे घर बघून मला विसरून तर गेली नाहीस ना..... " राजीव थोड्या रागीट स्वरातच पाणी ला विचारतो.....

" तू वेडा झाला आहेस का ?  मी अशी कशी तुला विसरेन...  अरे कालपासून वेळच मिळाला नाही....  सगळे आजूबाजूने होते....  रात्री सिद्धार्थची चुलत बहीणही माझ्या रूममध्येच माझ्यासोबत होती त्यामुळे तुला फोन करायला वेळ मिळाला नाही.....  आता ती बाहेर गेल्यावर पटकन मी तुला फोन केला..... " वाणी त्याला एक्सप्लेन करू लागते.....

" राग आला का माझ्या राणीला , अगं मी मस्करी करत होतो..... " राजीव दाताखाली आपली जीभ चावत बोलतो....

" राजीव मला भीती वाटत आहे रे .... अरे,  आज घरात सत्यनारायणाची पूजा आहे आणि त्यानंतर मला सिद्धार्थच्या रूममध्ये राहायला जावे लागेल..... " वाणी भीतीच्या स्वरात बोलते.....

" अग त्यात काय एवढं , एक काम कर तू त्याला असे सांग की, घरच्यांसाठी तू लग्न करायला तयार तर झाली , पण अजून तू या नात्यासाठी पूर्णपणे तयार नाही .... मग बघ तो नक्कीच तुला थोडा वेळ देईल.... " राजीव स्वतःचे डोकं वापरत तिला आयडिया सांगू लागतो....

" ठीक आहे हेच बोलून बघते.... " वाणी पण शांतपणे विचार करत उत्तर देते....

" मग घरात नवीन सून आली आहे म्हटल्यावर घरच्यांनी सुनेला काही दिले तर असेल ना ? " राजीव तिला प्रश्न विचारतो....

" हो अरे,  सिद्धार्थच्या आईने आता सत्यनारायणाच्या पूजेसाठी घालायला म्हणून मला खूप सारे सोन्याचे दागिने दिले आहे.... " वाणी आपल्या अंगावरच्या दागिन्यांकडे पाहून राजीवला बोलू लागते....

" अरे वा,  हे तर भारीच झालं...  एक काम कर त्यातला एक दागिना कोणाच्याही नकळत तुझ्याकडे लपवून ठेव.... " राजीव तिला शांत स्वरा सांगू लागतो....

" अरे असं कसं मी लपवून ठेवू शकते...  त्याच्या आईला डाऊट आला तर.... " वाणीला त्याचे बोलणं ऐकून भीती वाटू लागते.....

" काही डाऊट येणार नाही... अगं एवढ श्रीमंत घराणं,  त्यांचं एखादा छोटासा दागिना कुठे हरवला तरी त्याचे त्यांना काहीही वाटणार नाही...  तू उगाचच टेन्शन घेऊ नको... जेवढ मी सांगत आहे तेवढ कर आणि जेव्हा मला भेटायला येशील तेव्हा तो दागिना घेऊन ये.... " राजीव तिला आपल्या बोलण्यात अडकवण्याचा प्रयत्न करू लागतो.... 

वाणी बोलतच असते की दरवाजावर न करण्याचा आवाज दिला येतो....

" राजीव मी तुझ्यासोबत नंतर बोलते , बाय... " वाणी पटकन बोलून फोन ठेवून देते आणि एकदा स्वतःचा चेहरा आरशात नीट पहात दरवाजा खोलण्यासाठी निघून जाते....