Login

आंधळे प्रेम - संघर्ष प्रेमाचा भाग ३

प्रेमामध्ये झालेला विश्वासघात
सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर वाणीला सिद्धार्थच्या रूममध्ये पाठवण्यात येते.....  वाणी सिद्धार्थच्या रूमचा दरवाजा उघडून आत आल्यावर सगळीकडे  आश्चर्याने पाहू लागते..... सिद्धार्थ ची पूर्ण रूम फुलांनी सजवलेली असते.... काही काही अंतरावर सुवासिक कॅन्डल्स लावलेले असतात... एखाद्या रोमांटिक मूवी मध्ये पहिल्याप्रमाणेच तिला तिच्या समोरचे दृश्य वाटू लागते....

" काश माझं लग्न राजीव सोबत झाले असते आणि हा समोरचा नजारा आमच्यासाठी असता तर किती बरं झालं असतं.... " वाणी मनामध्येच विचार करत उदास होऊन जाते.... इतक्या तिला  दरवाजा उघडण्याचा आवाज येतो..... वाणी वळून बघते तर सिद्धार्थ तिच्यासमोर येऊन उभा राहिलेला असतो..... दोघेही एकमेकांकडे एकटक पाहू लागतात....  बोलण्याची सुरुवात कशी आणि कुठून करावी हाच प्रश्न दोघांच्याही मनात निर्माण झालेला असतो......

" तू अशी उभी का आहेस , बस ना.... " काहीतरी बोलावे म्हणून सिद्धार्थ बोलून जातो...

" तुम्ही पण बसा.... " सिद्धार्थला उभ पाहून वाणी त्यालाही बसायला सांगते...

आता ते दोघेही बेडवर एकमेकांच्या बाजूला काही अंतर ठेवून बसलेले असतात..... मधला काही वेळ पुन्हा शांततेमध्ये जातो.....

" वाणी थँक्यू सो मच... " सिद्धार्थ तिच्याकडे प्रेमाने बघून बोलतो....

" थँक्यू आणि ते कशाबद्दल ? " वाणी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत त्याला विचारते.....

" माझ्यासोबत लग्न करायला होकार देण्याबद्दल... " सिद्धार्थ त्याच्या मनातली भावना  तिला सांगतो..... तशी वाणी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागते....

" खरंच, खरं तर तुला कधी सांगण्याची हिंमत झाली नाही पण कॉलेजमध्ये असल्यापासूनच माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं.... पण माझ्यासारख्या मुलाला तू होकार देशील अशी कधी अपेक्षा नव्हती म्हणून हे प्रेम मी माझ्या मनातच लपवून ठेवले होते.... जेव्हा घरच्यांनी माझ्या लग्नाचा विचार केला तेव्हा मी त्यांना तुझ्याबद्दल सांगितले आणि त्यांनीही तुझ्या घरच्यांसमोर लग्नाची बोलणी केली..... खरंतर मला तेव्हा मनातून थोडी भीतीच वाटत होती की,  तू लग्नाला नकार देशील म्हणून पण जसा तुझा होकार मिळाला  त्या दिवसापासून मात्र मी खूपच आनंदात आहे...... " सिद्धार्थ आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी वाणी सोबत शेअर करू लागतो......  आता तर त्याला शेअर करायचे होते कारण ती त्याची अर्धांगिनी जी झाली होती.....

वाणीला मात्र त्याच्या मनातल्या भावना समजल्यावर खूपच गलबलून आले.... एका चांगल्या निर्मळ मनाच्या माणसाला मी फसवले अशी भावना तिच्या मनात उफाळून येऊ लागली आणि नकळतपणे तिच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले.....

" अग वेडी,  तुला रडायला काय झालं ? तू रडावे म्हणून मी तुला हे सगळं सांगितलं नाही आणि आज काय रडण्याचा दिवस आहे का ? अस्तर आपल्या प्रेमाचा दिवस आहे ना...  " सिद्धार्थ तिला रडताना पाहून पटकन आपल्या हाताने तिच्या अश्रू पुसत तिला स्वतःच्या जवळ घेऊन प्रेमाने बोलू लागतो....

" सिद्धार्थ हे तू काय करत आहेस ? " तीला जवळ घेताच वाणी घाबरून त्याच्यापासून लांब जात त्याच्याकडे बघून बोलते....

" तुला असे घाबरायला काय झाले वाणी..... माझे असे जावयाने तुला आवडले नाही का ? " सिद्धार्थ जागेवरून उठून तिच्याकडे पाहून बोलू लागतो.... वाणीला त्याला काय उत्तर द्यावे तेच समजत नाही..... ती पूर्णपणे गडबडून गेलेली असते... राजीव ने सांगितल्याप्रमाणे तिने खूप प्रयत्न करून ते बोलायचे ठरवलेले असते परंतु सिद्धार्थने जसे तिच्या समोर मन मोकळे केले तिला स्वतःच्याच वागण्याची लाज वाटू लागते.....

" वाणी प्लीज बोल ना,  तू अशी शांत का आहेस ? अगं आजची रात्र ही आपल्या मधुचंद्राची रात्र आहे त्यामुळे मनामध्ये काहीही ठेवू नकोस.... नवरा बायकोचे नाते हे विश्वासाचे असते त्यामुळे आपल्या नात्यामध्ये सगळ्यात आधी विश्वास असायला हवा मगच हे नाते आनंदाने आणि प्रेमाने पुढे जाऊ शकते..... " सिद्धार्थ तिच्या जवळ जाऊन तिला धीर देत बोलतो.....

" सिद्धार्थ मला माफ कर..... मी तुझ्यासोबत खूप चुकीचे वागले आहे.....  मला खरं तर असे करायला नाही पाहिजे होते , पण काय करू मी पण मजबूर होते.... मी हे सगळं माझ्या प्रेमासाठी केले आहे...... " पाणी भावनेच्या भरात त्याच्याकडे बघून बोलुन जाते....

" वाणी तू हे काय बोलत आहेस ?  तू काय चुकीची वागली आहेस ?  माझ्यासोबत असे काय केले आहेस ? आणि प्रेमासाठी म्हणजे कोणाच्या प्रेमासाठी,  मला समजेल असे बोल ..... " सिद्धार्थ ला तिच्या बोलण्याचा काहीही अर्थ समजत नाही म्हणून तो पण गोंधळलेल्या नजरेने तिच्याकडे पाहून तिला विचारू लागतो......

" सिद्धार्थ मी तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी होकार तर दिला होता पण तो मनापासून नाही .... " वाणी एकटक त्याच्याकडे पाहून शांत स्वरात बोलते.... तिच ते बोलणं ऐकून सिद्धार्थ मात्र आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतो.......

To be continued

🎭 Series Post

View all