" वाणी नक्की तुला काय बोलायचं आहे ? " आता सिद्धार्थही तिचं बोलणं ऐकून गंभीर होऊन जातो..
" हो सिद्धार्थ मी तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी होकार तर दिला पण माझे तुझ्यावर प्रेम नाही.... माझे राजीव वर प्रेम आहे... " वाणीच्या तोंडातून राजीव हे नाव ऐकताच सिद्धार्थ चे हृदय पूर्णपणे तुटून जाते.....
" जर तुझे दुसरा कोणावर प्रेम होते तर तू माझ्यासोबत लग्न का केले ? " सिद्धार्थ ला आता वाणी आणि स्वतःचाही राग येऊं लागतो...
" सिद्धार्थ प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न कर .... अरे मला तुला दुखवायचं नव्हतं, पण काय करू.... मी पण माझ्या प्रेमासाठी मजबूर झाले होते.... " वाणी त्याच्या समोर खाली गुडघ्यावर बसून त्याला समजवण्याचा प्रयत्न करत बोलते...
" अशी काय मजबुरी होती तुझी वाणी यासाठी तू माझ्या भावनांचा फायदा उचललास ? " सिद्धार्थ रागीट नजरेने तिच्याकडे पाहून तिला विचारतो...
" मी तरी काय करू , माझा राजीव एक मिडल क्लास माणूस आहे..... त्याच्याकडे चांगली नोकरीही नाही.... जर अशावेळी तुझ्यासारख्या श्रीमंत मुलाकडून लग्नाची मागणी माझ्यासाठी आली तर मी माझ्या घरच्यांना कसे काय समजावू शकले असते... जर मी राजीवला घरी यायला सांगितले असले तरी माझ्या घरच्यांनी त्याच्यासोबत लग्नाला नकारच दिला असता म्हणून मग नाईलाजाने मला हे लग्न करावे लागले..... " वीणा तिची बाजू समजावण्याचा प्रयत्न करत बोलते...
" असे जर होते तर तुम्हाला ही गोष्ट लग्नाच्या आधीच सांगायची होती आपण तेव्हाच त्याच्यावर काहीतरी मार्ग काढला असता..... " सिद्धार्थ पण विचार करत तिच्याकडे बघून बोलतो....
" माझे चुकले सिद्धार्थ खरंच मला माफ कर पण मी राजीव शिवाय दुसरा कोणाचाच विचार करू शकत नाही.... " पाणी पण सिद्धार्थ कडे बघून त्याची माफी मागत बोलते....
" आणि माझे काय ? " सिद्धार्थ या प्रश्नावर वाणी चमकून त्याच्याकडे पाहू लागते.... तसा तो नकारार्थी मान हलवत जागेवरून उठून उभा राहतो आणि दरवाज्याच्या दिशेने चालू लागतो.....
" सिद्धार्थ आता यावेळी तू कुठे चालला आहेस ? तू बाहेर जाऊन हे सगळ्यांना सांगणार आहेस का ? " पाणी घाबरूनच जागेवरून उठत त्याच्याकडे बघून त्याला विचारते....
" नाही मी असे काहीही करणार नाही तू नको टेन्शन घेऊ.... " सिद्धार्थ बोलत दरवाजा उघडतो....
" एक मिनिट , तू आता यावेळी बाहेर नको जाऊ, उगाचच घरच्यांना गैरसमज होईल..... " वाणी तरीही त्याला अडवण्याचा प्रयत्न करते..... सिद्धार्थ चा तीच्यासोबत जास्त काही बोलण्याचा मूड नसतो.... तरीही तिच्या बोलण्याचा मान ठेवून तो उशी घेऊन त्याच्या बेडरूममध्ये असलेल्या सोफ्यावर जाऊन डोळे बंद करून झोपून जातो...... वाणी पण आपले कपडे चेंज करून बेडवर जाऊन त्याच्याकडे बघतच विचार करत झोपून जाते.....
पुढचे काही दिवस दोघेही शांतच असतात.... एकमेकांसोबत जास्त बोलत नसतात.... घरच्यांसमोर तेवढच हसून वागत असतात.... सिद्धार्थच्या घरचे त्याचा त्याच्या हनिमूनचा प्लॅन बनवतात परंतु ऑफिस मधल्या कामाचे कारण काढून सिद्धार्थ ते टाळतो.....
सकाळी सिद्धार्थ ऑफिसला जाण्यासाठी आवरत असतो.... वाणी त्याचा ब्रेकफास्ट त्याच्या रूममध्येच घेऊन येते... तिला येताना पाहून तो एक नजर तिच्याकडे बघून परत आपल काम करू लागतो....
" सिद्धार्थ मला माहित आहे , मी तुला खूप दुखावले आहे पण म्हणून तू माझ्यासोबत बोलणारही नाहीस का ? " वाणी त्याच्याजवळ येत उदास स्वरात विचारते....
" काय बोलायचे आहे ? " सिद्धार्थ आपले काम करतच बोलतो.....
" सिद्धार्थ मला बघून जर तुला दुःख होणार असेल, तर मी इकडून कायमची निघून जाते ... पाहिजे असेल तर तू घरच्यांना सगळं सांगू शकतोस.... " वाणी तिचा निर्णय सांगते....
" इकडून निघून कुठे जाणार आहेस ? " सिद्धार्थ एक्सरसाइज कटाक्ष त्याच्यावर टाकून बोलतो.....
" कुठेही जाईल, जिकडे तुला माझ्यामुळे त्रास होणार नसेल..... " वाणी ही पण आपल्या मनात असलेली गिल्ट ची फिलिंग सांगू लागते....
" असे काही करण्याची गरज नाही... काही दिवस तरी तुला तिकडेच थांबावे लागेल... माझ्या घरच्यांना अजून याबद्दल काही माहीत नाही... तोपर्यंत त्यांची चांगली सून बनुन त्यांची काळजी घे.... मी लवकरात लवकर माझ्या वतीलांसोबत बोलून आपल्या डिव्होर्स ची फाईल रजिस्टर करायला सांगतो..... " सिद्धार्थ शांतपणे तिच्याकडे बघून बोलतो.....
" आपलं हे एक नातं नाही निभवता आले तरी बाकीची सगळी नाते मी मनाने निभवण्याचा प्रयत्न करेल , जोपर्यंत या घरात आहे सगळ्यांसोबत मिळून मिसळून लागेल..... कोणालाही माझ्यामुळे वाईट वाटणार नाही याची काळजी घेईल.... " वीणा सिद्धार्थ कडे पाहून शांत स्वरात बोलतो....
" अजून एक कर , तुझ्या त्या राजीव ला फोन करून माझ्या ऑफिसमध्ये यायला सांग म्हणजे मी त्याला आज ऑफिसमध्ये एका चांगल्या पोस्टची नोकरी देईल... " हे बोलताना सिद्धार्थच्या मनाला खूप वेदना होत असतात तरीही तो बोलण्यामध्ये शांतपणा ठेवून बोलतो..... सिद्धार्थ बोलून तिकडून निघून जातो, पण त्याचं बोलणं ऐकून वीणा ला खूप आनंद होतो.... ती घाईतच राजीवला फोन करून सगळं सांगते......
" तू वेडी आहेस का ग ? तुला हे सगळं त्याला सांगायची गरज काय होती.... मी त्याला भेटायला जाणार नाही... " राजीव ना खुशीनेच फोनवर बोलू लागतो...
" अरे पण का ? त्याच्या ऑफिसमध्ये तो तुला चांगल्या पोस्टची नोकरी देणार आहे, त्याने आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतील.... तो पुढच्या काही दिवसात डिव्होर्स पण फाईल करणार आहे.... " बिना खुशीने सगळं सांगू लागते....
" तुझ्या सांगण्यावरून तो मला नोकरी देणार आहे म्हणजे तो माझ्यावर उपकार करणार आहे आणि मला कोणाचे उपकार नको..... मी तुला सांगितलं होतं ना , जमेल तसं एकेक दागिने बाजूला काढून ठेव, ते तू केलेस का ? " राजीव थोड्या रागीट आवाजातच तिला विचारतो....
" राजीव अरे तू हे काय बोलत आहेस, आधीच आपण सगळ्या लोकांना अंधारात ठेवून त्यांचा विश्वासघात केला आहे आणि आता तुम्हाला चोरी करायलाही सांगत आहेस.... नाही, मी असे काहीही करणार नाही.... उलट तो आपल्याला मदत करायला तयार आहे.... " दिनाच्या बोलण्यात एक प्रकारचा उदासपणा जाणून येऊ लागतो....
" विना तू खरच एक मूर्ख मुलगी आहे मला तुझ्या सोबत वाद घालून काहीही फायदा होणार नाही त्यांच्या तू फोन ठेव.... " असे बोलून राजीव रागानेच फोन ठेवून देतो... वीणा त्याला फोन करायचे ट्राय करते परंतु त्याचा फोनच लागत नाही.... विना खरंच आता मोठ्या पेचात अडकलेली असते...
To be continued......
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा