सिद्धार्थ त्यादिवशी पूर्ण दिवस ऑफिसमध्ये राजीव ची वाट पाहत असतो परंतु राजीव काही येत नाही.... तो पण त्याची काम संपल्यानंतर ऑफिसमधून घरी येतो... आज त्याला वीणा चा चेहरा उदास वाटत असतो परंतु काही विचारण्याची त्याची इच्छा होत नाही.... तो स्वतःहून पण राजीव चा विषय काढत नाही....
पुढचे काही दिवस असेच निघून जातात, पण वीणा दिवसान दिवस जास्तच उदास आणि शांत राहू लागते.... तिच्या चेहऱ्यावरची नाराजी पाहून सिद्धार्थ च्या मनाला त्रास होऊ लागतो.... सिद्धार्थ त्याच्या वकिलांना फोन करून डिव्होर्स पेपर बद्दल विचारतो..... त्याच्या वकिलांकडून कळते की, पेपर रेडी झाले आहेत... दुसऱ्याविषयी ते सिद्धार्थ च्या ऑफिसमध्ये पाठवून देणार आहे..... असं काय पासूनच सिद्धार्थ ला खूप वाईट वाटत असते.... आज त्याच्या हातात त्याच्या नात्याला संपवणारे पेपर्स येणार असतात परंतु त्याच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नसतो.... तो तयारी करण्यासाठी ड्रेसिंग टेबल च्या समोर उभा राहिलेला असताना तिकडे ठेवलेले वीणा चे एक पुस्तक त्याचा हात लागून खाली पडतो आणि त्याच्यातून एक फोटो बाहेर पडतो.... सिद्धार्थ फोटो उचलत असताना त्याची नजर त्या फोटोवर जाते, तो फोटो पाहून सिद्धार्थला मोठा शॉक लागतो... इतक्यात वीणा पण रुमच्या आत आलेली असते.... सिद्धार्थच्या हातात फोटो पाहून ती पण गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागते......
" हा फोटो... " सिद्धार्थ एक नजर त्या फोटोकडे पाहून समोर उभा असलेल्या वीणा ला विचारतो....
" हाच आहे राजीव... " वीणा हळव्या स्वरात उत्तरं देते.... सिद्धार्थ पुढे काहीही विचारत नाही..... तसाच तो फोटो बाजूला ठेवून तिकडून बाहेर निघून जातो.....
' राजीव तुला काय झाले आहे ? तू असा का वागत आहेस ? तू माझा फोन का उचलत नाही आहे ? त्या दिवसापासून तू माझा एकही फोन उचलला नाही की , माझ्या मेसेजला रिप्लाय दिला नाहीस आणि आता तर तुझा फोनही लागत नाही.... तू असं का करत आहेस ? मी काय करू , कुठे जाऊ , मला आता काहीच मार्ग दिसत नाही आहे.... ' सिद्धार्थ गेल्यानंतर वीणा राजीव चा फोटो घेऊन इकडे बेडवर रडत बसते.....
सिद्धार्थ ऑफिसमध्ये येतो तर खरा पण त्याचे कशातही मन लागत नाही.... तो रागानेच इकडून तिकडे येरझाऱ्या मारत असतो... त्याचा राग जास्तच वाढू लागतो.... सिद्धार्थला आता त्याचा रागही सहन होत नाही त्यामुळे तो जोरातच खुर्चीला लाथ मारतो.... ती खुर्ची जोरात जाऊन समोरच्या काचेला आढळते आणि मोठा आवाज होतो..... तसे बाहेर काम करत असलेले एम्प्लॉईज पळतच केबिनच्या आत येऊन पाहू लागतात....
" तुम्हाला आज कोणी बोलावले होते का निघा इथून.... " सिद्धार्थ सगळ्यांकडे बघून जोरात ओरडतो... सगळे तिकडून पटकन बाहेर निघून जातात..... पण सिद्धार्थ चा मित्र म्हणजे त्याचा मॅनेजर तिकडे शांतपणे उभा राहून त्याच्याकडे पाहू लागतो.....
" काय झालं सिद्धार्थ तू एवढा रागात का आहेस ? " तो मॅनेजर शांतपणे त्याच्याकडे पाहून त्याला विचारतो..... सिद्धार्थ त्याच्यासोबत काहीतरी बोलतो तसं तो तिकडून निघून जातो.... तो मॅनेजर सिद्धार्थच्या घरी येतो आणि वीणा ला भेटतो...
" मॅडम तुम्हाला सरांनी बोलावले आहे ... तुम्हाला आता माझ्यासोबत यावे लागेल.... " मॅनेजरच बोलणं ऐकून सिद्धार्थच्या घरातले ही वीणाला त्याच्यासोबत जायला सांगतात.... वीणा तयारी करून त्याच्यासोबत निघून येते....
" तुम्ही मला इकडे कुठे घेऊन आला आहात ? " वीणा घाबरूनच आजूबाजूला बघत त्याला विचारते...
" घाबरू नका मॅडम, सर इकडेच येणार आहे तुम्ही तिकडे बसून वाट पाहू शकता.... " मॅनेजर बोलून थोड्या अंतरावर थांबतो... वीणा तिकडे वाट बघत बसलेली असते की, तिला काचेतून समोरच्या ठिकाणी सिद्धार्थ येताना दिसतो, सिद्धार्थ सोबत राजीव ही असतो... त्या दोघांना एकत्र पाहून इकडे तिची डोळ्यात मोठे होतात.... तो मॅनेजर तिकडे लावला कॅमेरा आणि त्याचे व्हॉइस रेकॉर्डर ऑन करतो....
" मॅडम तुम्ही तिकडे चाललेल सगळ बोलणं इकडे बसून ऐकू शकता... " तू मॅनेजर तिच्याकडे बघून बोलतो.... आता तिला सिद्धार्थ आणि राजीव मध्ये चालू असलेले सगळे बोलणं ऐकायला येते.....
" तू रोहितच आहेस ना,.. माझ्या फ्रेंड मेहताच्या कंपनीमध्ये ज्युनिअर स्टाफ चे काम करतोस ना.... " सिद्धार्थ त्याच्याकडे बघून त्याला विचारतो...
" होss हो सर... तुम्हाला माझ्याकडे काय काम होते का नाही म्हणजे मला सरांनी तुम्हाला भेटायसाठी इथे पाठवले म्हणून विचारलं... " रोहित नर्मिने विचारतो...
" हो अक्च्युली मला माझ्या ऑफिसमध्ये एका चांगल्या एम्प्लॉयीची गरज होती... माझी ऑफिसमध्ये मॅनेजर ची जागा रिकामी आहे, तर त्या जागेसाठी मी तुझा विचार करत होतो.... " सिद्धार्थ त्याच्याकडे बघून बोलतो...
" थँक्यू सर थँक्यू सो मच तुम्ही माझा एवढा विचार केला मी हा जॉब करण्यासाठी तयार आहे.... " रोहित लगेच आनंदाने खुश होऊन बोलू लागतो....
" बरं रोहित मला सांग तुझ्या घरी कोण कोण असतं ? " सिद्धार्थ नॉर्मली त्याला प्रश्न विचारतो....
" सर माझ्या घरात मी माझी बायको आणि माझे दोन मुलं आहेत..... " रोहित सिद्धार्थला आपली माहिती सांगू लागतो, पण ही माहिती ऐकून मात्र वीणा ला खूप मोठा धक्का बसतो...
" तुझे लग्नाला किती वर्षे झाली ? " सिद्धार्थ त्याच्याकडे बघून त्याला तिसरा प्रश्न विचारतो....
" सर माझ्या लग्नाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत.... " रोहित बोलतच असतो की, त्याला बिना समोरून रागाने त्याच्या दिशेने येताना दिसते... तिला तिकडे पाहून खरंतर त्यालाही मोठा शॉक लागतो....
" राजीव तू काय बोलत आहेस , तुझं लग्न झालं आहे आणि हे तुला रोहित म्हणून का हाक मारत आहेत ? " वीणा रागाने त्याच्या शर्टाची कॉलर पकडून त्याला विचारू लागते....
" एक्सक्यूज मी तुम्ही कोण आहात आणि तुम्ही माझ्यासोबत असे का बोलत आहात ... मी तर तुम्हाला ओळखतही नाही.... " रोहित तीचे हात झटकून तिला दूर लोटण्याचा प्रयत्न करत बोलतो....
" राजीव अरे मी तुझ्या प्रेमासाठी तुझे बोलत होता ते सगळं करत गेले आणि तू मला असं धोका दिलास..... " वीणा अजूनही शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहून रागातच बोलत असते....
" हे कोण आहेस तू आणि माझ्यापासून लांब हो... सर सर ही मुलगी काही पण बोलत आहे... मी तरी ला ओळखतही नाही आणि ही काहीतरी खोटे नाव घेऊन मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे.... " रोहित सिद्धार्थ कडे बघून बोलत असतो की, सिद्धार्थ त्याच्या जोरदार कानाखाली मारतो.... त्याचा हात इतक्या जोरात लागतो की, रोहितच्या नाकातून तोंडातून रक्त येऊ लागते.....
" आता खरं बोलणार आहेस का मला अजून काही करावे लागेल..... " सिद्धार्थ शांतपणे बोलतो....
" नाही ss नाही मी सांगतो , सगळं खरं सांगतो..... मीच राजीव म्हणून हिला भेटलो होतो खरंतर हिच्या या सुंदर रूपामुळे मी भाळलो... तिला स्वतःच्या प्रेमात अडकवण्याचा प्रयत्न केला... पण मी तिच्यासोबत लग्न करू शकत नव्हतो कारण माझं ऑलरेडी लग्न झाले होते, पण ही माझ्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की , तिच्या घरातले तिचे सगळे पैसे , हिचे दागिने हीने माझ्या स्वाधीन केले होते.... त्याचाच मी फायदा उचलत होतो.... हे लग्न करायला ही मीच तिला सांगितले कारण तिच्याकडून मला अजून पैसा उकळवायला भेटला असता परंतु हिने तुम्हाला खरं सांगून माझ्या प्लॅनचा बट्ट्याबोळ केला.... " रोहित सगळं खरं खरं बोलू लागतो...
" सिद्धार्थ याने मला फसवले आहे... याला असंच सोडून देऊ नका.... याला पोलिसांच्या हवाले करा .... याला चांगली शिक्षा मिळाली पाहिजे की, जेणेकरून पुढे कोणाला फसवण्याचा विचारही याच्या डोक्यात आला नाही पाहिजे.... " वीणा रागीट आवाजात त्याच्याकडे बघून बोलत तिकडून निघून जाते...
" याला अशी शिक्षा दे की याला आयुष्यभर ती लक्षात राहिली पाहिजे.... "सिद्धार्थ आपल्या मॅनेजरला सांगतो आणि विनाच्या पाठीमागे निघून जातो.... वीणा तिकडून बाहेर येऊन एका झाडाच्या जवळ जाऊन जोरजोरात रडू लागते..... सिद्धार्थही तिच्या मागे तिकडे आलेला असतो....
" वीणा मला माहित आहे तुला तुझ्या प्रेमाने धोका दिला पण सगळेच असे नसतात.... एकदा माझ्या खऱ्या प्रेमावर विश्वास करून तर बघ, मी आयुष्यभर तुझी साथ देईल.... " सिद्धार्थ तिचे अश्रू पुसत समजण्याच्या स्वरात बोलतो... तशी वीणा हि पटकन त्याच्या मिठीत शिरते.....
.
..
...
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा