Login

तुझा तू वाढवी राजा

संत रामदास स्वामी यांचे समाजकार्य
संत रामदास स्वामी यांचे समाजातील असलेले योगदान

संत रामदास स्वामी यांनी बारा वर्षे तपश्चर्या करून राम कृपा संपादन केली... शारीरिक सामर्थ्य आणि तप: सामर्थ्य मिळवल्यानंतर त्यांनी बारा वर्षे भारत भ्रमण करून देशात असलेली स्थिती आणि धर्माच्या स्थितीबद्दल अवलोकन केले...

हे सगळं करत असताना त्यांच्या लक्षात आले की गेले कित्येक वर्ष पारतंत्र्यात राहून आणि लोकांची जुनून सहन करून आपला हा समाज किती दिन झाला आहे... आपल्या भारत देशात असलेले शूर वीरहित परकी यांनी दिलेले अत्याचार सहन करत आहे...

या सगळ्या परिस्थितीला कलात्मक देण्यासाठी समर्थांनी कृष्णा तीर हे कार्यक्षेत्र निवडले..... त्यांनी ठीक ठिकाणी हनुमान मंदिराची स्थापना करून रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात सुरुवात केली... लोकांना उपासना करण्याचे महत्त्व सांगितले... जेव्हा त्यांचा आशिष्य परिवार वाढू लागला तेव्हा त्यांनी आपल्या शिष्यांना हाताशी घेऊन चाफळ या ठिकाणी भव्य राम मंदिर उभारून समर्थ संप्रदायाचा पहिला मठ उभारला.....

या मठामध्ये त्यांनी आपल्या सगळ्या शिष्यांना विवेक बुद्धी विचार आणि शक्ती याबद्दल प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.... संत समर्थ रामदास स्वामी यांनी मनोबोध आणि दासबोध यासारखे ग्रंथ रचले आणि आचारसंहिता तयार केली.... त्यांनी हळूहळू महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही जमेल त्या ठिकाणी मठ स्थापन करण्यात सुरुवात केली... आपल्या अधिकारी शिष्यांना वेगवेगळ्या मठांमध्ये पाठवून देशातील इतर लोकांच्या मनात रामोपासना रुजवायला मदत केली....

" तुझा तू वाढवी राजा l शीघ्र आमची देखता ll "

अशाप्रकारे संत रामदास स्वामी यांनी भवानी माते जवळ प्रार्थना करून कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करण्यास सुरुवात केली.... समर्थांच्या तेजस्वी वाणीमुळे महाराष्ट्रामध्ये नवनिर्माण होण्यास सुरुवात झाली..... सगळ्या शिष्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले..... संत समर्थ रामदास स्वामी यांनी मनाचे श्लोक हा ग्रंथ ही रचला.... रामदास स्वामी यांनी आपल्या सगळ्या शिष्यांमध्ये देशभक्तीचा प्रसार केला..... आपल्या सगळ्या शिष्यांना ज्ञान देऊन त्यांच्याकडून धर्म स्थापनेचे कामही करून घेतले.....

शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि या शिव समर्थ युतीमुळे वैदिक धर्माची ही पुन: स्थापना झाली.... समर्थ त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षापासून अखेरपर्यंत एकही क्षण माया न घालवता बहुजनांच्या हितासाठी झटले..... आजही देशातली लोकं संत रामदास स्वामी समर्थ यांनी लिहिलेल्या वाड्मय श्लोकांचा आणि ग्रंथांचा अभ्यास करून कृतार्थ होत आहे... समर्थांचा आशीर्वाद अजूनही त्यांच्या ग्रंथांच्या रूपाने आपल्या सगळ्यांना लाभत आहे..... अशा समर्थांना माझे हीच शत: प्रणाम..