संरक्षण भाग चार

It's a Story Of One Lady Struggle
संरक्षण भाग चार :

काही दिवस असेच निघून गेले. अंकिता नंदिनी ला घेऊन शॉपिंग साठी गेली होती. खरतर नंदिनी ची इच्छा नव्हती कारण काही घेण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते आणि स्वतःच्या परिस्थिती ची शोभा तिला करून घ्यायची नव्हती. पण अंकिता ने तिचे काहीच ऐकले नव्हते त्यामुळे तिचा ही नाईलाज झाला होता. अंकिता ने मात्र खूप शॉपिंग केली होती आणि नंदिनी ला स्वतःच्या खर्चाने वस्तू घ्यायला सांगितले होते पण नंदिनी स्वाभिमानी होती. कोणाकडून ही अशी मदत घेणे तिच्या तत्वात बसत नव्हते. त्यामुळे अंकिता ने फार आग्रह केला नव्हता पण नंदिनी ला ती स्वतः काहीच घेऊ शकली नसल्याचे वाईट वाटले होते. दोघी सामान घेऊन परत आल्या तेंव्हाच तिच्याकडे पाहून निरजला तिचा मूड ऑफ असल्याचे लक्षात आले होते पण मागच्या वेळी नंदिनी ने चिडून काढलेला राग तो विसरला नव्हता. त्यामुळे तो गप्प राहिला आणि अंकिता रूम मध्ये गेल्यावर त्याने तिला विचारले, शॉपिंग ला गेल्यावर काय काय झाले. तेंव्हा अंकिता च्या बोलण्यावरून सगळा प्रकार निरज च्या लक्षात आला आणि त्याने अंकिता ला ही सगळे नीट समजावून सांगितले. तेंव्हा अंकिता म्हणाली, तिच्याकडे पैसे नाहीत हे माझ्या लक्षात आले नाही, खरतर ती अभिला सोडून आली होती आणि तेवढाच वेळ तिला रिकामा मिळत होता त्यामुळे पटकन मी तिला घेऊन गेले कारण शाळा सुटण्या आधी येणे भाग होते ना आम्हाला. त्यामुळे तिने पर्स किंवा पैसे घेतले नसतील असेच मला वाटले. पण तिच्याकडे पैसे नाहीत म्हणून तात्पुरते मी तिला देऊ केले होते पण तिने ते नाकारले. खरतर त्याच वेळी माझ्या लक्षात यायला हवे होते पण तेंव्हाही माझ्या लक्षात आले नाही आणि ती शॉपिंग साठी का नको म्हणत होती हे ही समजले नाही. नाहीतर कोणतीच स्त्री शॉपिंग साठी नको का म्हणेल ?? हा विचार मी करायला हवा होता. चुकलंच माज मी आता जाऊन तिला सॉरी म्हणुन येते असे म्हणत अंकिता उठली पण निरज ने तिचा हात पकडुन तिला थांबवले आणि सांगितले आता हे बोलून पुन्हा तिच्या परिस्थितीवर आणि जखमेवर मीठ चोळले असे होईल. त्यापेक्षा काहीच समजले नाही असे दाखव कारण तिलाही हेच अपेक्षित आहे. कारण कोणालाही आपली परिस्थिती बद्दल सहानुभूती पूर्वक बघणे आवडणार नाही ना ?? त्यावर अंकिता थांबली आणि तिने विचारले, तुला कसे माहीत पण तिच्या परिस्थिती बद्दल ?? त्यावर निरज म्हणाला, कुणाल माझ्या अंडर काम करत असल्याने त्याची सालारी मी पाहून सही करतो आणि आताच त्याने घर घेतले असल्याने काय होत असेल याची कल्पना करूच शकतो मी. पण मग तू काहीतरी कर ना नंदिनी साठी अंकिता म्हणाली, त्यावर निरज म्हणाला करणार तर आहेच आणि ते ही नंदिनी चा स्वाभिमान न दुखवता. पण जरा वेळ लागेल इतकेच.

इकडे नंदिनी मात्र शॉपिंगला घडलेला प्रसंग आठवून उदास होती. त्यात अंकिता ने देऊ केलेले पैसे तिला जास्तच त्रास देऊन जात होते. त्यात कुणाल जवळ काहीच बोलायची सोय नव्हती त्यामुळे मनातच कुढत होती बिचारी. नेहमी प्रमाणे रात्र बराच वेळ विचार करून घालवली आणि बऱ्याच वेळाने झोप लागली तिला. काही दिवस असेच उलटून गेले. कुणाल त्याच्या ऑफिस मध्ये जास्त वेळ काम करत होता कारण ओव्हर टाईम केल्याचे पैसे मिळत होते आणि त्याची त्याला गरजही होतीच. तर निरज सुधा ऑफिस काम करून पुन्हा त्याच्या व्यवसायात लक्ष घालत होता त्यामुळे त्याला कामासाठी दिवस कमी पडत होता. आयुष, अंजली आणि अभी शाळा आणि दंगा करण्यात मग्न होते तर अंकिता आणि नंदिनी मुलांना सांभाळण्यात शाळेच्या वेळा पाळण्यात गुंतून गेले होते. नंदिनी ला मात्र निरज ची नीट माफी मागता आली नव्हती आणि तशी संधी पण मिळत नव्हती त्यामुळे तिला जरा वाईट वाटत होते. तिने निरजला फोन करून माफी मागण्याचा विचार केला होता पण त्याला कामात व्यत्यय झालेला पटत नाही असे अंकिता कडून तिने ऐकले होते त्यामुळे तो विचार तिने झटकून टाकला होता.

अशातच मुलांनी संडे दिवशी बाहेर जाण्याचा हट्ट केला. कुणाल आणि निरज नकोच म्हणत होते कारण त्यांना आराम करायचा होता पण मुले ऐकायला तयार नव्हती त्यामुळे जवळच कुठेतरी जाऊन येण्याचा विचार झाला आणि सगळे निघाले. निरज ने त्याची कार घेतल्याने सगळेच एका कार मध्ये निघाले. तसेही पावसाळ्याचे दिवस होते त्यामुळे कार ने जाणेच सुरक्षित होते. नंदिनी नीराजच्या विरुध्द दिशेला बसली होती. त्यामुळे निरज ला ती सहज दिसत होती. गाडी चालवताना निरज अधून मधून तिच्याकडेच बघत होता. तर नंदिनी मात्र बाहेरचे निसर्ग सौंदर्य बघण्यात हरवून गेली होती. त्यात तिचे तोंडावर येणारे केस तिचे सौंदर्य खुलवत होते तर त्यामुळे तिचा केस मागे घेताना वैतागलेला चेहरा पाहून मिरज ला खूप गम्मत वाटत होती. अंकिता आणि नंदिनी मस्त गप्पा मारत होत्या, जणू काही बाल मैत्रिणी होत्या त्या एकमेकींच्या.

बघता बघता पिकनिक स्पॉट आला आणि सगळे खाली उतरले. मुले तर धावतच सुटली आणि अर्थातच त्यांच्या मागे अंकिता आणि नंदिनी पण. ते एक निसर्ग रम्य ठिकाण होते, शिवाय तिथे मुलांसाठी खूप adventure आणि गार्डन होते. हे सगळे बघून तर मुले आनंदाने नाचत सुटली होती. तिथेच श्री स्वामी समर्थांचे एक सुंदर मंदिर होते. हे मंदिर जरा गार्डन पासून दूर होते. तेथील वातावरण एकदम शांत आणि मन प्रसन्न करणारे होते. त्यात स्वामी समर्थ हे नंदिनी चे श्रद्धा स्थान त्यामुळे त्या मंदिराकडे बघताच तिचे डोळे आनंदाने चमकले आणि चेहऱ्यावर प्रसन्न हसू उमलले. तिच्या हसण्या कडे पाहून निरज मनोमन सुखावला. आज कित्येक दिवसांनी त्याने नंदिनी ला असे मनापासून हसताना पाहिले होते. नाहीतर आजवर नंदिनी त्याला कसल्यातरी दडपणा खाली वावरताना दिसली होती. कुणाल आणि अंकिता मुलांना घेऊन पुढे गेले होते. नंदिनी मात्र अजूनही मंदिराकडे आणि आसपासच्या परिसराकडे बघत होती. निरज तिच्या मागे कधीचा येऊन उभा आहे हे ही तिच्या लक्षात आले नव्हते.

आवडली का जागा ?? निरज ने हा प्रश्न तिच्या काना जवळ येऊन विचारला होता त्यामुळे ती दचकली आणि पटकन मागे वळली तसा तिचा तोल गेला आणि ती पडणार तेवढ्यात निरज ने कमरेत हात घालून तिला सावरले. नंदिनी निरज च्या अंगावर आदळली. तिचे दोन्ही हात निरज च्या छातीवर होती. निरज तिच्याकडे बघून हसत होता, त्यात वाऱ्याने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस बघून त्याने एका हाताने ते केस बाजूला करून कानामागे घेतले तशी नंदिनी शहारली आणि पटकन बाजूला झाली. तिने इकडे तिकडे पाहिले तर कुणाल अभी सोबत खेळण्यात मग्न होता त्यामुळे त्याचे लक्ष नव्हते हे पाहून, नंदिनी ने डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला आणि तिच्याकडे पाहून निरज जास्तच हसायला लागला आणि म्हणाला, नंदू का घाबरते स तू इतकी तुझ्या नवऱ्याला ?? त्याच्या या प्रश्नावर काहीच न बोलता ती सरळ मुलांकडे जाऊ लागली आणि निरज तिच्या मागे जाऊ लागला.

क्रमशः

🎭 Series Post

View all