संरक्षण भाग सहा

Story Of Lady Struggle

संरक्षण भाग सहा.

निरजला नंदिनीचा राग कसा घालवावा याचे टेन्शन आले होते तर नंदिनी अंथरुणावर पडून निरजच्या वागण्याचा विचार करत होती. आज नीरजच्या अशा वागण्याने नंदीनीचा संसार तर मोडला असताच पण अंकिता सारखी छान मैत्रीण ही तिने गमावली असती. त्यामुळे नंदिनी खूप चिडली होती काय करावे म्हणजे या निरजला समजेल याचाच ती विचार करत होती. नेहमीप्रमाणे नंदिनी ने विचार करण्यात रात्र घालवली होती, त्यामुळे सकाळपासूनच तिचे डोकं खूपच जड पडले होते. पण अभिची शाळा आणि कुनालचा डबा करायचा असल्याने कसेबसे तिने डबा करून दिला कुणाल ला आणि अंकिता सोबतच अभिला शाळेत पाठवले. अंकिताने खूप आग्रह केला होता नंदिनीला दवाखान्यात घेऊन जाण्याचा पण तेवढ्यात कुणालचा ऑफिस मधून फोन आला आणि त्याने नंदिनी ला बॅग पॅक करून ठेवायला सांगितले कारण ऑफिस ने काही कामा निमित्त कुणाल ला दोन दिवसांसाठी बाहेर पाठवले होते म्हणून तो लगेच बॅग घेऊन निघणार होता. नंदिनी ची तब्येत बरी नव्हतीच त्यामुळे अंकिताने तिला बॅग पॅक करण्यासाठी खूप मदत केली आणि कुणाल लगेच आऊट ऑफ पुणे निघून गेला. अभीला शाळेतून आणण्याची वेळ झाली होती पण अंकिताच त्याला घेऊन येते म्हणाली मग आपण निवांत दवाखान्यात जाऊ. मी निराजला बोलावून घेते मग तो मुलांना सांभाळेल आणि आपण हॉस्पिटल मध्ये जाऊ शकू. नंदिनिला हे अजिबात मान्य नव्हते पण अंकिता ने काहीच ऐकून न घेता लगेच फोन करून बोलायला सुरुवात पण केली होती. त्यात नंदिनी आजारी आहे असे समजल्यावर धावून येणार नाही तो नीरज कसला. तो पटकन सोसायटी मध्ये आला आणि लगेच नंदिनीच्या घराची बेल त्याने वाजवली. पण नंदिनी इतकी आजारी होती की उठून दार उघडण्याचे त्राण तिच्यात नव्हते. त्यात अभी दिवसभर आयुष आणि अंजली सोबत खेळण्यात च मग्न होता. त्याचे खाणे, पिणे अभ्यास सगळे काही अंकिताने च केले होते. नीरज केंव्हाचा नंडीनीला बघण्यासाठी तरफडत होता पण नंदिनी उठू शकत नसल्याने तिला वेळ लागत होता.

एकतर भयानक डोके दुखी त्यात जेवायची इच्छा नसल्याने ती जेवलीच नव्हती त्यामुळे अशक्त पणात भर पडली होती आणि दार उघडल्यावर अचानक तिच्या अंगात त्राण नसल्यासारखे झाले आणि ती चक्कर येऊन पडणार इतक्यात नीरज ने तिला आधार दिला आणि दोन्ही हातांवर उचलून बेडवर नेऊन झोपवले. लगेच अंकितला आणि डॉक्टरला बोलावून घेतले आणि तपासणी करून घेतली. आपल्या आईची अशी अवस्था पाहून अभी खूप घाबारला होता. अंकिता ने कसेतरी अभीची समजूत काढली आणि मुलांसोबत खेळायला घेऊन गेली. आता फक्त नीरज एकटाच थांबला होता नंदिनी जवळ. नंदिनी ची अशी अवस्था पाहून त्याला खूपच कासावीस होत होते. खरतर त्याने अंकीताला नंदिनी जवळ थांबवून स्वतः मुलांना त्याने घेऊन जायला पाहिजे होते. पण अभिला त्याच्यापेक्षा अंकिता जास्त चांगल्या प्रकारे सांभाळू शकेल म्हणून त्याने अंकितलाच खाली पाठवले होते. बिचाऱ्या अंकिताला ही यात काहीच वावगे वाटले नव्हते कारण तिचा पूर्ण विश्वास होता नंदिनी आणि नीरज वर. आजवर नीरज ने ही तिच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ दिला नव्हता आणि तसा विचारही त्याच्या मनात कधी आला नव्हता. पण त्यादिवशी त्याच्याकडून जे काही घडले होते ते त्याच्या दृष्टीने चुकीचे च होते असे नव्हते कारण नंदिनी शी एकदा मनमोकळे बोलणे अत्यंत गरजेचे होते, कारण मनात होणारी घुसमट काही केल्या नीरज थांबवू शकत नव्हता.

खरतर आता या सगळ्या गोष्टी डोक्यात येण्याचे काहीच कारण नव्हते कारण आता सगळ्यात महत्वाचे होते नंदिनीचे शुद्धीवर येणे आणि तिची तब्येत नीट असणे. त्यामुळे नीरज एकसारखी नंदीनीच्या शुद्धीवर येण्याची वाट बघत होता. नीरज ची प्रतीक्षा संपली आणि नंदिनी शुद्धीवर आली. नीरज लगेच तिच्या जवळ जाऊन बसला आणि किलकिल्या डोळ्यांनी तिने त्याच्याकडे पाहताच तिने अभिची चौकशी केली आणि त्याला बोलवायला सांगितले. तेवढ्यात अंकिता मुलांना घेऊन वर आली. नंदीनीच्या अंगात उठून बसण्याचा त्राण नव्हता तरीही अभिला कधी एकदा जवळ घेते असे झाल्याने तिने कसेबसे उठून पटकन अभिला कुशीत घेतले. अभी आजपर्यंत आईला सोडून इतका वेळ राहिलाच नव्हता त्यामुळे तो ही नंदिनीला खूप घट्ट बिलगला होता. त्याला घेऊन नंदिणीच्या डोळ्यातून अश्रू च्या धारा वाहू लागल्या आणि ते पाहून नीरज आणि अंकिताच्या पोटात कासावीस झाले. अभी नेच त्याच्या लाडक्या आईला खाऊ घातले आणि आईने तिच्या लाडक्या लेकाला खाऊ घातले.

या दोन दिवसात अंकिता आणि नीरज ने खूप मदत केली होती नंदिनी ची. त्यामुळे उपकरांचे ओझे तिच्या डोक्यावर होतेच. त्यात नीरज ने झाल्या प्रकाराबद्दल तिची अगदी मनापासून माफी मागितली होती आणि त्याच्या मर्यादा ओलांडल्या नव्हत्या. अभी शाळेत गेला असताना नंदिणीला तो पेसंग आठवला जेंव्हा ती निरज सोबत एकटीच होती. अंकिता मुलांना सांभाळत घरातील कामात खूप व्यस्त होऊन गेली होती. त्यामुळे निरजवरच नंदिनी वर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पडली होती. कुणाल चा कामाचा व्याप वाढल्याने त्याचे मुक्काम पण वाढले होते. हे एका अर्थी बरेच झाले असे नंदिनीला वाटत होते कारण ती आजारी आहे म्हटले की, कुणाल तिची विचारपूस, चौकशी, काळजी करणे तर लांब च शिवाय दवाखान्यात पण कधी घेऊन गेला नव्हता. आहे त्या परिस्थितीत उठून घरातील कामे, अभी ची काळजी शिवाय स्वतःच हॉस्पिटल मध्ये जाऊन यावे लागत होते तिला. पण नीरज जवळच राहायला आल्यापासून अंकिता सारखी मैत्रिणी आणि काळजी घेणारे छान फॅमिली मेंबर जोडले गेले होते. नाहीतर ती आजारी असल्यामुळे अभी कडे होणारे दुर्लक्ष, त्याची उपासमार आठवून नंदिनी च्या डोळ्यात पाणी आले. नेमका त्याच वेळी नीरज तिच्यासाठी नाश्ता घेऊन आला होता. खरतर आज तिला बरेच बरे वाटत होते पण अशक्त पणामुळे अंकिताने तिला किचन मद्ये पाऊल पण ठेवू दिले नव्हते. फक्त अभी ला आवरण्याची जबाबदारी दिली होती ती ही नंडीनीच्या हट्टापुढे हात टेकून. नंदिनी च्या डोळ्यात पाणी बघून नीरज ने काय झालं ते विचारले, पण सहजासहजी व्यक्त होईल ती नंदिनी कसली.

तिने फक्त नकारार्थी मान हलवली आणि त्याने समोर केलेली नाश्त्याची प्लेट हातात घेत विचारले, अंकिता कुठे आहे?? बोलावं ना तिला मिळूनच खाऊन घेऊया. निरजने अंकीतला बोलावले, तसा सगळ्यांनी मिळून गप्पा मारत नाश्ता केला आणि बाकी कामे आटोपण्यासाठी ती लगेच निघून गेली. नीरज मात्र नंदी नी साठी घरी बसून च काम करत होता ते ही तिच्याच रूम मधे बसून.

नंदिनी ला आठवले की गेल्या दोन दिवसांपासून नीरज आपली खूपच काळजी घेत आहे, ती आजारी पडली त्याच दिवशी तिला भेटण्यासाठी नीरज सरळ तिच्या कडे आला होता आणि दार उघडत क्षणी आपण बेशुद्ध पडलो होतो, त्यानंतर तीन तास कसलीच शुद्ध नसताना नीरज आणि अंकिताने मिळून घेतलेली तिची आणि अभी ची काळजी तसेच परवा आराम करत असताना नीरज आणि मी दोघेच रूम मधे होतो. त्यावेळी पाणी हवे होते मला पण उठून पिण्याची ताकद नव्हती त्यावेळी नीरज ने माने खाली हात घालून कसे उठवले आणि आधार देत बसवले होते. त्याने स्वतःच्या हातांनी पाणी पाजले आणि पुन्हा झोपवले होते. पण मला काही झोप येत नव्हती, मी काहीच बोलले नव्हते पण त्याला माझी घालमेल समजली होती, म्हणून लहानपणी करत होता तसेच आताही तो माझ्या उशाशी बसून राहिला होता आणि झोप लागेपर्यंत डोक्यावरून कधी हात फिरवत होता तर कधी थोपटत होता. त्याच्या हातातील प्रेमाची ऊब लहानपणी जाणवत होती अगदी तशीच परवा ही जाणवली. हीच ऊब कुणाल च्या प्रेमात शोधण्याचा गेली सात हजार प्रयत्न केला मी पण त्याचा वासने ने भरलेला स्पर्श किळस आणत राहिला फक्त. पण आज कित्येक वर्षानी नीरज च्या प्रेमळ स्पर्शाची ऊब अनुभवत होते आणि त्यामुळेच डोळे बंद असूनही अश्रू अनावर होऊन कानाजवळ आले होते. त्यावेळी नीरज म्हणाला होता, रडू नको नंदू, विसरून जा कटू आठवणी आणि झोप. मी आहे तुझ्यासोबत आणि नेहमीच असेन. त्याने डोळे पुसले आणि रडू थांबले. त्या दिवशीचा प्रसंग नंदिनी आठवत होती आणि समोरच काम करत असलेल्या नीराजला हळूच न्याहाळत होती. काम करताना किती गोड दिसत होता नीरज. काय बगतेस नंदू ?? खालची मान वरही न करता त्याने विचारले तशी नंदिनी ने पुन्हा पुस्तकात मान घातली आणि वाचायला लागली. नीरज गालातल्या गालात हसून लॅपटॉप बंद करून उठला आणि तिच्याजवळ बसत विचारू लागला, नंदू खरंच तुला आता बरे वाटत आहे ना ?? त्याच्या प्रेमळ नजरे त त्याची काळजी स्पष्ट दिसून येत होती. ते पाहून नंदू चे डोळे पाणावले तसेच नीरज च्या डोळ्यात ही पाणी दाटून आले. त्याने हळूच तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, नंदू मी खरंच असा विचार केला नव्हता की तू पुन्हा माझ्या आयुष्यात अशी अचानक येऊन भेटशील. पण तसे झाले हे चांगले की वाईट हे मात्र समजत नाही अजून. नंदी तुझ्या डोळ्यात सतत येणारे पाणी, कुणाल बद्दलची तुझ्या मनात असलेली भीती, अभी साठी अफाट प्रेम आणि तुझा मानसिक ताण तशीच तुझी होणारी घुसमट हे सुधा पाहायला मिळतंय ग मला. माझी लहानपणीची नंदू अशी नव्हतीच, रागात वाट्टेल तसे बोलणारी, वाटणारी, स्वतःला हवं तेच करणारी भांडकुदळ नंदू कुठेतरी हरवली आहे. माझ्या नंदू चे असे अनपेक्षित नकारात्मक बदलेले रूप मला बघवत नाही. अजून तू मला तुझ्या आयुष्याबद्दल काहीच सांगितलेले नाही पण तरीही ते लपून राहील असे नाही ना नंदू. काहीही झालं तरी मी तुझ्या मनाविरुद्ध ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार नाही पण तू स्वतः सांगण्याची वाट मात्र आयुष्यभर पाहीन. मला तुझ्यासाठी जे आणि जितकं करता येईल ते ते मी करेन पण तुझी मर्जी असेल तेंव्हाच. पण एक कायम लक्षात ठेव तुझी अशी अवस्था पाहून मनाचे लाखो तुकडे होतात माझ्या, तुझ्याही पेक्षा जास्त त्रास होतो मला आणि त्याही पेक्षा वाईट या गोष्टीचं वाटत की मनात असूनही मी ही परिस्थिती बदलण्यासाठी काहीच करू शकत नाही कारण तू तशी परवानगी मला दिलेली नाही. म्हणूनच मध्यंतरी मंदिरात माझा स्वतः वरचा ताबा सुटला आणि मी जबरदस्तीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर तुझा राग इतका त्रास देऊन गेला की चुकूनही अशी चूक करायची नाही ही शिकवण मिळाली मला. असो लवकरात लवकर पूर्ण बरी हो, तुझ्या अभी साठी आणि पुन्हा उभी रहा. आयुष्याच्या कोणत्याही वळणावर मी तुझ्या सोबत कायम असेन हे विसरू नको.

नीरज चे हे बोलणे ऐकून नंदू च्या डोळ्यातील अश्रू निरज च्या हातावर बरसत राहिले आणि नीरज च्या डोळ्यातील पाण्यानी ही त्याला सोबत दिली.


🎭 Series Post

View all