संरक्षण भाग सात

It's A Story Of Lady Struggle

संरक्षण भाग सात :

नंदिनी आता चांगलीच बरी झाली होती. अभी पण आई सोबत खेळून मागच्या काही दिवसांची कसर भरून काढत होता आणि त्या दोघांना खेळताना पाहून अंकिता आणि नीरज ला खूप बरे वाटत होते. अभी सोबत नीरज ला नंदू वेगळीच भासत होती. लहान, खेळकर, अल्लड, निष्पाप दिसत होती त्याची नंदू त्याला. पण कुणाल घरात आल्याबरोबर नंदिनी चा चेहरा मोहरा जो काही बदलत होता त्यावरून कुणाल आणि नंदिनी मधे काहीच नीट नाही हे मात्र त्याच्या केंव्हाच लक्षात आले होते. कुणाल परत येऊन दोन दिवस झाले होते, अभी ने बोबड्या बोलीत त्याच्या लाडक्या बाबांना आई आजारी पडल्याचे सांगितले होते त्यावर नेहमीप्रमाणे त्यात काय नवीन, अशी कुणाल ची बोचरी प्रतिक्रिया मिळाली होती बिचाऱ्या नंदिनी ला. पण याहून वेगळे कुणाल काहीच बोलणार नाही याची पूर्ण कल्पना असूनही ती मात्र प्रत्येक वेळी नव्याने दुखावली जात होती. कारण तिच्याही कळत नकळत तिचे मन वेगळ्या उत्तराची वाट पाहत होते आणि कोमेजून जात होते. आता तिच्याही मनाला हळू हळू सवय होत होती पण तरीही वाईट वाटत होते तिला. तुला काय झाले होते ते विचारणे तर कुणाल च्या डोक्यातच कधी येत नव्हते.

नीरज रात्री घरात काम करत बसला होता. कसलीतरी आकडेमोड चालू होती त्याची, आयुष आणि अंजली कधीची झोपली होती. अंकिता मात्र नीरज हातातील काम कधी ठेवतो याची वाट बघत होती पण नीरज चे काम काही संपत नव्हते. शेवटी अंकिता कंटाळून त्याच्या जवळ गेली, तो मात्र बेडला टेकून, एक पाय दुसऱ्या पायावर टाकून, मांडीवर ऊशी ठेवून त्यावर वह्या ठेवून हिशोबत मग्न होता. अंकिता ने त्याचा एक हात वर करत स्वतःच्या खंद्याभोवती ठेवला आणि हळूच त्याच्या कुशीत शिरून त्याला घट्ट बिलगली. निरज ने हसत तिच्या डोक्यावर स्वतःचे गाल ठेवले आणि तिचा खांदा थोपटत म्हणाला, काय झालं अंकिता झोप येत नाही का ?? त्यावर अंकिता मानेनेच नाही म्हणाली, आणि मिठी अजून घट्ट केली. मला फक्त दहा मिनिट दे ना किटी, ( प्रेमाने नीरज अंकिता ला किटी म्हणायचा ) मझ होतच आले आहे आता, नीरजच्या या बोलण्यावर अंकिता चांगलीच चिडली. तू नवा बिझनेस हातात घेतल्यापासून ना तुझ माझ्याकडे लक्षच नाही अजिबात. अजून बिझनेस सुरू व्हायचाय तोपर्यंत अशी अवस्था आहे, उद्या सुरू झाल्यावर काय करशील ?? अंकिता च्या या बोलण्यावर नीरज ने हसत तिच्या डोक्यावर डोके ठेवले आणि डायरी बाजूला ठेवली. त्यानेही दोन्ही हात तिच्या कमरे भोवती घट्ट केले आणि डोळे बंद करून दीर्घ श्वास घेतला.

त्याही क्षणी त्याच्या डोक्यात विचार आला की, कधीतरी नंदू कुणाल च्या कुशीत विश्वासाने विसावली असेल का ??

मुलांच्या परीक्षा जवळ आल्या होत्या त्यामुळे अंकिता आणि नंदिनी त्यांच्या अभ्यासात गुंतून पडल्या होत्या तर इकडे कुणाल आणि नीरज च्या कामाचा पण व्याप खूप वाढला होता. कुणाल चे ऑफिस मधील काम वाढले होते तर नीरज ऑफिस सांभाळून बिझनेस सांभाळत होता. एकंदरीत सगळेच गुंतून पडले होते. कुणाल बऱ्याच प्रमाणात कामात गुंतून पडला असला तरीही घरात आल्यावर कोणत्याही बारीक सारीक कारणाने उगाच नंदिनी वर चिडून रहात होता, अबोला धरत होता. त्यामुळे नंदिनी चा चेहरा खूप पडलेला असे, मुड खराब रहात असे. इतक्या कामाच्या व्यापातून सुधा निरजच्या नजरेतून मात्र नंदिनीची अवस्था निसटली नव्हती. पण तो योग्य क्षणा ची आणि वेळेची वाट पहात होता. शिवाय स्वतः नंदिनी ने त्याच्याशी येऊन बोलावे अशी त्याची इच्छा होती.

मुलांच्या परीक्षा झाल्या आणि मुले रिकामी झाली. नंदिनी ला हल्ली तिच्या आईची खूप आठवण येत होती त्यामुळे आईकडे जाण्याची तिची इच्छा परीक्षा संपल्यामुळे बळावली होती. पण कुणाल समोर आई बाबांचे नाव जरी काढले तरी कुणाल चा पारा चढत होता. त्यामुळे कसे बोलावे हा प्रश्नच होता तिच्या समोर. पण अभी पण एकाच ठिकाणी राहून कंटाळून गेला होता शिवाय अंकिता तर कधीच माहेरी गेली होती. अंकिता च्या आईची तब्येत बिघडली होती शिवाय अंकिता शिवाय बघणारे असे कोणी नव्हते त्यामुळे आता अंकिता तिच्या आईला घेऊन च इकडे येणार होती पण त्याआधी तिकडची सगळी कामे पार पडणार होती. त्यामुळे नीरज तिला सोडून आला होता आणि मिळत असलेला वेळ बिझनेस साठी घालवत होता. आता अंजली आणि आयुष खेळायला सोबत नसल्यामुळे अभी खूपच कंटाळून गेला होता आणि त्यात अभ्यास, शाळा नसल्याने पूर्ण दिवस त्याला खायला उठत होता. त्याचा सगळा त्रास तो नंदिनी वर काढत होता. एकतर तब्येतीची कुरबुर सुरूच असल्याने ती पण वैतागून गेली होती शेवटी काहीही केले आणि कोणत्याही पद्धतीने विचारले तरी कुणाल चिडणारच होता हे नक्की होते. म्हणून एकदा नंदिनी ने माहेरी जण्याविषयी कुणाल ला विचारले आणि व्हायचा तोच परिणाम झाला. कुणाल विनाकारण नंदिनी वर खेकसला, तो ही इतक्या जोरात की आवाज थेट नीरज च्या घरात जाऊन पोहचला. त्यामुळे नीरज धावत आला आणि आपला बॉस समोर आलेला पाहून कुणाल बिथरला आणि खोटे बोलून सारवासारव केली. पण नंदिनी कडे पाहून नीरज ला कळायचे ते सगळे कळले. काहीही कारण असेल तुमच्या ओरडण्याचे पण लहान मुलांसमोर बायकोसमोर वागण्याची ही कुठली पद्धत आहे मिस्टर कुणाल ?? नीरज ने तीक्ष्ण आणि करड्या आवाजात त्याला विचारले. मला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात अजिबात डोकावयचे नाही, माझी तशी इच्छा नाही पण तुमच्या आवाजाने घाबरून अभी त्याच्या आईला बिलागला आहे यावरून मी अंदाज करूच शकतो की तुमच्या बोलण्याची पद्धत काय आहे ते. तुम्ही एका चांगल्या अरियातील चांगल्या लोकांच्या मध्ये राहता. तिथे अशा प्रकारचे असभ्य वागणे कितपत शोभणारे आहे तुम्हाला ?? या वागण्याचा कदाचित तुमच्या कामावर पण परिणाम होईल सो बी careful next time. असे बोलून नीरज तर निघून गेला पण कुणाल चा राग आता काय प्रताप गजवेल या विचाराने नंदिनी चे मात्र पाणी पाणी झाले होते.

पण प्रश्न ऑफिस मधील प्रतिष्ठेचा असल्याने कुणाल रागाने लालबुंद झाला होता तरीही त्याने नंदिनी कडे डोळे फाडून त्याने पाहिले आणि काय करायचे ते कर म्हणून निघून गेला तो. ती रात्र नंदिनी ने कशीबशी काढली आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी ती आईकडे निघून गेली. नंदिनी आईकडे निघून गेली होती तरीही इकडे नीरज मात्र फारच अस्वस्थ झाला होता नंदिणीची अवस्था पाहून. काय करावे म्हणजे नक्की प्रॉब्लेम काय आहे ते समजेल याचाच विचार तो करत होता, नीरज खूप हुशार होता पण स्त्रीयांच्या बाबतीत झालेले अत्याचार पाहून त्याचे सगळे शहाणपण, हुशारी कुठल्या कुठे निघून जात असे. नंदिनी जिथे मला काही कळू देत नाही तिथे नक्कीच तिच्या आईला ही कशाचीच कल्पना नसेल हे त्याने चांगलेच ओळखले होते. जर आपण तिचे प्रॉब्लेम सोडवू शकत नसू तर काहीच उपयोग नाही पुन्हा तिच्या आयुष्यात असे येण्याचा, भेटण्याचा आणि तिच्या इतक्या जवळ राहण्याचा पण. त्यामुळे काहीही करून तिला मदत तर करायलाच हवी. बराच वेळ विचार करून नीरज च्या डोक्यात एक कल्पना सुचली आणि त्याचे डोळे आनंदाने चमकले.

जवळपास पंधरा वीस दिवसांनी नंदिनी अभिला घेऊन आली. आईकडे निवांत राहिल्याने तिचा चेहरा बराच टवटवीत झाला होता शिवाय तब्येत जरा चांगली झाली होती. तिला आनंदी पाहून नीरज ला पण बरे वाटले. अंकिता ला येऊन दोनच दिवस झाले होते शिवाय आता तिची आई काही महिन्यांसाठी इथेच राहणार होती त्यामुळे तिलाही सोबत झाली होती आणि नंदिनी ला पण आधाराला अजून एक व्यक्ती मिळाला होता. नंदिनी आणि अंकिता शिवाय बच्चा कंपनी बऱ्याच दिवसांनी भेटल्याने त्यांच्या गप्पांना उधाण आले होते आणि घरात कलकलाट सुरू झाला होता. कोणीही या किंवा कोणीही जा कुणाल ला मात्र काहीही फरक पडत नव्हता. त्याचे त्याचे वेगळेच विश्व होते. पण नंदिनी ला मात्र छान फॅमिली मिळाली होती अंकीताच्या रुपात. त्यामुळे तिचा दिवस एकदम मजेत आणि हसत खेळत जात असे. कोणत्या का कारणाने असेना पण नंदू ला खुश पाहून नीरज आनंदी होत होता. दरम्यान च्या काळात एक गोष्ट नंदिनी ने ओब सर्व केली होती ते म्हणजे रोज कुणाल आणि निरज चे बोलणे, एकत्रित राहणे वाढले होते. त्यांच्यात हळू हळू मैत्रीचे संबंध प्रस्थापित होत होते. कुणाल तसा फारसा कोणात मिसळत नव्हता पण हल्ली नीरज बरोबर त्याचे सुर चांगलेच जुळून आले होते. नंदिनी जितकी नीरज ला ओळखत होती तितका नीरज विनाकारण कोणतीच गोष्ट करत नव्हता. त्यामुळे नक्की नीरज च्या मनात काय सुरु आहे ते मात्र नंदिनीला समजत नव्हते. पण म्हणतात ना माणसाचा मुळ स्वभाव काही केल्या बदलत नाही कारण स्वभावाला औषध नसते. तसेच कुणाल च्या बाबतीत पण झाले. त्याला कारणही कुणाल च होता. नंदिनी अभी ला सोडायला शाळेत गेली असताना शाळेतून तिला समजले की अभी ची चार महिन्यांपासून फी बाकी आहे. त्या दिवशी नीरज मुलांना सोडून पुढे ऑफिस ला निघून गेला होता म्हणून बरे झाले असे नंदिनी ला वाटले खरे पण दुसऱ्याच क्षणी आयुष आणि अंजली सुधा त्याच्याच वर्गात आहेत. ते दोघे नीरज किंवा अंकिता ला काही बोलले तर ?? असा विचार तिच्या डोक्यात आला आणि कुणाल ने फी का भरली नसेल या विचारांनी डोक्यात पुन्हा थैमान घातले. कुणाल घरी आल्यावर तिने जाब विचारला पण कुणाल नेहमी प्रमाणे उडवा उडवी ची उत्तरे देऊन मोकळा झाला. त्यानंतर दोन दिवसांनी बँकेतील लोक घराचे हफ्ते तट ले आहेत हे सांगण्यासाठी आले. त्यावेळी मात्र कुणाल आणि नंदिनी मद्ये खूप वाद झाले आणि कुणाल नंदिनी च्या अंगावर धावला. नंदिनी ला हा अपमान सहन झाला नाही ती खूप रडली. घडला प्रकार अभी ने आयुष ला सांगितला आणि आयुष ने बाबांना म्हणजेच निरजला सगळे सांगितले.


🎭 Series Post

View all