संरक्षण भाग आठ

It's Story Of Lady Struggle

संरक्षण भाग आठ :

कुणाल चे वागणे वरचेवर विचित्र होत चालले होते. अंकिता आणि तिच्या आईशी नंदिनी चे असलेले बोलणे सुधा त्याला खट कायला लागले होते. त्यावरून तो नंदिनी शी हल्ली नेहमीच वाद घालत होता. नंदिनी ला काहीच समजत नव्हते. एकतर कुणाल ची नीरज सोबत चांगलीच मैत्री आहे पण मी मात्र अंकिता शी बोलले तर याला प्रॉब्लेम का आहे ?? इतक्या दिवसांनी अंकिता आणि नंदिनी ची मैत्री कसे काय मोडणार होती ती ?? हल्ली अंकिता ला नंदिनी कडे पाहिले की तिच्या मनाची अवस्था कळत होती. काही वेळा नंदिनी ने सांगण्याचे टाळले होते पण मनाची घुसमट तिलाही सहन होत नसल्याने घरात वाद झाल्याचे सांगून ती मोकळी होत असे. म्हणजे मग अंकिता चे प्रश्न थांबत असत आणि नंदिनील पण शांतता मिळत असे. पण नेहमीच हा त्रास तिला असह्य होत होता. एकदा नंदिनी अभिला शाळेत सोडून सरळ टेकडीवरच्या निवांत जागी जाऊन बसली होती. टेकडी चा परिसर खूप निसर्गरम्य आणि सुंदर होता. दाट वनराई, एक महादेवाचे छान मंदिर आणि खूप निरव शांतता. आधीपासूनच या वातावरणाच्या प्रेमात असल्याने तिला इथे येऊन वेगळीच प्रसन्नता मिळत होती. अशीच शांत बसलेली असताना अचानक तिला मागून आवाज दिला, एकटीच का बसली आहेस नंदू ?? त्याबरोबर तिने मागे चमकून पहिले तर नीरज होता. तू इथे ?? हाच प्रश्न मी तुला विचारला आहे नंदू इथे एकटी का अशी बसली आहेस ?? नीरज म्हणाला. मी सहज आले होते मंदिरात म्हणून बसले, सारवासारव करत नंदिनी म्हणाली. पण तू इथे? नवीन बिझनेस साठी जागेच्या शोधत होतो म्हणून आलो होतो, जाताना तू दिसलीस म्हणून थांबलो. तू ठीक आहेस ना ?? नाई म्हणजे, सहसा तुला मानसिक ताण असल्या शिवाय एकांत शोधत नाहीस तू म्हणून विचारले. मी छान आहे असे म्हणत नंदिनी जायला निघाली आणि नीरज ने तिचा हात पकडुन स्वतःकडे ओढून घेतले, तशी ती त्याच्या अंगावर आदळली दोघेही काही क्षण एकमेकांच्या डोळ्यात हरवले. नंदिनी त्याच्या तावडीतून स्वतःला सोडवून घेण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती पण नीरज ने स्वतःचे हात आता तिच्या कमरेभोवती घट्ट गुंफून ठेवले होते त्यामुळे सुटण्याचा प्रश्नच येत नव्हता. काय चालू आहे तुझे नीरज ?? सोड मला, मागे याच कारणासाठी मी तुझ्यावर चिडले होते तेंव्हा तु माफी मागितली होतीस आणि शब्द दिला होता तुझ्या इच्छेविरुद्ध मी काहीही करणार नाही, असे वागणार नाही. विसरलास का ?? अजिबातच नाही नंदू, मी कधीच कोणाला दिलेला शब्द विसरत नाही त्यातल्या त्यात तुला दिलेला शब्द तर विसरणार च नाही. पण खर सांगू हे असं वागायला तूच मला भाग पाडते आहेस. अग जरा बघ स्वतःकडे काय अवस्था करून घेतली आहेस तू स्वतःची. मला तुझी मदत करायची आहे, त्यासाठी तू काहीतरी स्वतःहून सांगशील या अपेक्षेने प्रत्येक दिवस उगवतो तसा मावळतो आहे नंदू, तुझी अवस्था मला तू सांगत नाही म्हणून कळणार नाही असे जर तुला वाटतं असेल तर तो तुझा भ्रम आहे उलट मला समजायला नको अशही गोष्टी मला कळतात पण मी तुझ्या बोल न्याची वाट बघत थांबलो आहे हे कसे समजत नाही तुला ?? काय उपयोग तुझ्या आयुष्यात पुन्हा येण्याचा नंदू ?? सांग मला.

तुझा निरज तुझ्या समोर आहे, हाकेच्या अंतरावर आहे तरीही तू काहीच कशी बोलत नाहीस ?? तुझ्यात आणि कुणाल मद्ये काहीच नीट नाही, तू तडजोड करत राहायचं म्हणून रहात आहेस, फक्त तुझ्या अभी साठी जगत आहेस, कुणाल तुझ्यावर ओरडतो, अंगावर मारायला येतो, मुलाची फी भरलेली नाही, बँकेचे हफ्ते तटले आहेत सगळं माहित आहे मला तरीही का लपविण्याचा अट्टाहास नंदू ?? इतका परका झालो का मी की तुझ्यावर माझा कसलाच हक्क नाही, साधं स्पर्श करताना मला इतका विचार करावा लागावा का ??

नीरज चे बोलणे ऐकून नंदिनी चा बांध फुटला आणि त्याच्या खांद्यावर डोके ठेवून नंदिनी खूप रडली. नीरज ने मिठी अजुनच घट्ट केली आणि तिला मनसोक्त रडू दिले.

बऱ्याच वेळाने नंदिनी शांत झाली आणि आपण नीरज च्या मिठीत आहोत हे लक्षात येताच पटकन वेगळी झाली. त्याची नजर चुकवत म्हणाली, आय एम सॉरी, त्यावर नीरज म्हणाला, बट आय एम glad नंदू. खरंच मला खूप आनंद झाला. नंदिनी ने कसेबसे त्याच्याकडे पाहिले, तर त्याच्या डोळ्यात आनंद आणि चेहऱ्यावर हसू पाहून ती ही हसली. नीरज तिच्यासाठी पाणी घेऊन आला आणि तिला पाणी देत विचारले, काय झाले आहे ते आता तरी सविस्तर सांगशील का नंदू ?? नीरज ला सगळेच समजले होते त्यामुळे त्याच्या पासून लपवण्यात काहीच अर्थ नव्हता. त्यामुळे लग्न झालेल्या दिवसापासून ते आता पर्यंत सगळेच नंदिनी ने सांगून टाकले. कधी तिच्या डोळ्यात राग, कधी पाणी तर कधी भीती जाणवली होती नीरज ला कुणाल बद्दल. पण समाधान होते की आज त्याची प्रतीक्षा संपली होती आणि त्याच्या नंदू ने त्याला सगळे काही सांगितले होते. खरंच खूप काही सहन केले होते नंदिनी ने आणि कुणाल चा माज उतरवण्याची वेळ आली होती. नंदिनी चे बोलणे ऐकून नीरज शांत होता, त्याला तसे पाहून नंदिनी म्हणाली, काय झालं नीरज ?? एवढा का शांत आहेस ?? नीरज हसून म्हणाला, नंदू आल्या दिवसापासून मला तुमच्यातील ताण जाणवत होता पण तू सांगायला खूप उशीर केलास, एव्हाना मी तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करून दिली असती. म्हणजे ?? प्रश्नार्थक नजरेने नंदिनी ने विचारले तसा नीरज नकारार्थी मान हलवत हसू लागला. चल मला निघटला हवं, अभिची शाळा सुटण्याची वेळ झाली म्हणत उठायला निघाली पण नीरज ने तिचा हात पकडुन तिथेच बसवले आणि दोन्ही हात पसरत मिठीत येण्यास सुचवले. नीरज कडे नंदिनी ने रागाने पाहिले, तेंव्हा नीरज म्हणाला, आज मी काहीही ऐकणार नाही नंदू, पाच मिनिट कुशीत ये माझ्या, तुला गरज आहे त्याची, प्लीज ये. तरीही नंदिनी चा धीर होईना, नकारार्थी मान हलवत ती म्हणाली, पण नीरज आता परिस्थिती, तिला थांबवत नीरज म्हणाला, माझ्या कुशीत येण्यासाठी कोणतीच परिस्थिती कधीच आड येणार नाही, मी ती येऊ देणार नाही. सगळ्या जगाचा विचार सोडून पाच मिनिट कुशीत ये माझ्या, तुला खूप शांत वाटेल. आठव जरा, हेच तर करत होतीस तू, माझ्या कुशीत खूप सेफ आणि शांत वाटत म्हणत, घट्ट बिलगून जात होतीस तू नंदू, आता ही काहीही बदललेल नाही आणि यात काहीच चुकीचे नाही. तुझा विश्वास नाही का तुझ्या नीरज वर ?? साशृत नयनांनी होकारार्थी मान हलवत, नंदू मनापासून, जगाचा विचार सोडून तिच्या नीरज च्या कुशीत शिरली. दोन्ही हातांनी त्याचा शर्ट घट्ट पकडून, त्याच्या छातीवर डोके ठेवून नंदू विसावली होती पण नीरज ने ही तिच्या डोक्यावर, केसांवर, पाठीवर हात फिरवत तिला शांत केले होते. जणू त्याचा प्रत्येक स्पर्श सांगत होता, आता तुझे रडण्याचे दिवस संपले नंदू, मी आहे आणि कायम असेन तुझ्यासाठी.


🎭 Series Post

View all