संरक्षित दुनियेतून जावे दूर कधीतरी.........

मनातून निघलेल्या भावनेतले शब्द...
संरक्षित दुनियेच्या जगातूनी
वाटते जावे खूप दूर दूरवर
सगे सोयरे राहती ढाल बनूनी
जगण्याच्या वाटेत रोज आपल्या
वाटते आता त्यांची ढाल तोडावी
स्वतः च्या असण्याला आव्हान देवूनी

कोणी सोबत येण्याची वाट पाहताना
राहून जातो कधी कधी प्रवास अर्ध्यात
म्हणून वाटते स्वतः लाच बनवावा सोबती
कधी न सोडण्या वाट अर्धवट प्रतिक्षेत

कधी दूर होतो अनमोल क्षण येण्याआधीच
क्षमतेवर जेव्हा उठवला जातो प्रश्न
वाट भरकटण्याची भिती दाखवता समाज
वाटते असावी सवय वाट शोधण्याची
समाजातल्या भयानतेची जाणीव करती जव सोयरे
तेव्हा वाटते लढणे यावे आपल्यालाही
स्वतः च्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यासाठी
मुलगी म्हणून स्वतंत्रतेने जगायला शिकण्यासाठी

©️®️ प्राजक्ता कल्पना रघुनाथ पानारी

🎭 Series Post

View all