भार्गवी एक नजर त्या बाकड्याकडे पाहून त्यांना होकार देते..... मिस्टर विश्वास हातानेच तिला पुढे चालण्याचा इशारा करतात.... तशी भार्गवी पुढे जाऊन त्या बाकड्यावर एका बाजूला बसते.... मिस्टर विश्वासही मध्ये थोडा अंतर ठेवून बाकड्याच्या दुसऱ्या बाजूला बसतात.....
" विचारा तुमची प्रश्न ? " भार्गवी शांतपणे त्यांच्याकडे पाहून त्यांना विचारते....
आत्ता पुढें,
" भार्गवी तू आधी मला घाबरणं सोडून दे.... मी पोलीस नाही आणि त्यांच्या खात्यामध्ये कामही करत नाही.... मी पण एक तुझ्यासारखा कम्प्युटर टेक्नॉलॉजी मध्ये शिकलेला स्टुडन्ट आहे..... हो, कधी पोलिसांना याबाबतीत काही गरज पडली तर ते मला बोलतात आणि मी येऊन त्यांची मदत करतो , त्यामुळे तुम्हाला पोलीस अजिबात समजू नको आणि मी त्यांच्याप्रमाणे वाईट वागेल असाही विचार करू नको.... " मिस्टर विश्वास शांतपणे तिच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत बोलतात....
भार्गवी शांतपणे त्यांचं बोलणं ऐकू लागते.... त्यांच्या बोलण्याने काही प्रमाणात तिच्या चेहऱ्यावरची भीती कमी झालेली असते..... मिस्टर विश्वास यांनाही ते समजून येते...
" भार्गवी तुला फ्रेंड्स बनवायला खूप आवडतात..... असे मला समजले आहे त्यामुळे तू मला ही तुझा एक चांगला मित्र समजू शकते..... तसे पण आपण दोघेही एकाच फिल्डचे आहोत.... तुला माझ्यासोबत मैत्री करायला आवडेल का ? " मिस्टर विश्वास शांतपणे तिच्याकडे पाहून तिला विचारतात... भार्गवी होकारात मान हलवते....
" Ohhh that nice, हाय मिसेस भार्गवी... मी मिस्टर विश्वास..... मी सिक्युरिटी एक्सपर्ट म्हणून कार्यरत आहे.... आपल्या दुसऱ्या भाषेत व्हाईट हॅट हॅकर्स असेही बोलले जाते..... आपण दोघे पण एकाच फील्ड ची असल्यामुळे आपली मैत्री ही चांगलीच जमेल हो ना..... " मिस्टर विश्वास हलकेच हसून आपला हात मैत्री करण्यासाठी भार्गवीच्या समोर पकडतात.... भार्गवी त्यांचं बोलणं ऐकत शांतपणे एक नजर त्यांच्याकडे पाहून त्यांच्या हाताकडे पाहू लागते....
" एक गोष्ट लक्षात ठेव, एक मित्र आपल्या मित्राला प्रॉब्लेम मध्ये कधीच बघू शकणार नाही त्यामुळे जर तू माझ्यासोबत मैत्री केली तर मी तुला या प्रॉब्लेम मधून लवकरच बाहेर काढेल.... आता निर्णय तुझा आहे, माझ्यासोबत केलेली मैत्री तुला तुझ्या दुनियेत परत घेऊन जाऊ शकते.... " मिस्टर विश्वास शांतपणे बोलत तिच्या मनाचा अंदाज घेऊ लागतात.... भार्गवी त्यांचा बोलण्याचा विचार करू लागते... सध्या तिलाही एका आधाराची गरज वाटत असते आणि त्यांच्या शब्दातून का होईना पण तिला एक आधार मिळाल्यासारखा वाटतो..... भार्गवी हळूच आपला एक हात पुढे करून त्यांच्या हातात मैत्रीचा हात देते.....
" Good..... भार्गवी तुला माहित आहे का जेव्हा पासून तुला इकडे आणले आहे.... तेव्हापासून तुझा मोबाईल आणि लॅपटॉप माझ्याकडे देऊन त्याच्यामध्ये मला त्या पैशांच्या घोटाळा बद्दल शोधायला सांगितले होते..... मी ते तर बघत होतो , पण त्याच्याच बरोबर तुझ्या मोबाईल मध्ये काही अशा गोष्टीही मला दिसल्या की त्या पाहून मला एवढा तर विश्वास बसला आहे की , तू नक्कीच असे काही काम करू शकत नाही......
मी माझ्या एका मित्राला तुझ्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन ही काढायला सांगितली होती..... तू तुझ्या या नॉलेज चा याआधी कधी उपयोग केला आहे का , याबद्दल ही माहिती मिळवायला सांगितली होती आणि त्या सगळ्यातून मला असे समजले आहे की, तू आता ज्या कंपनीमध्ये काम करत आहे त्या कंपनी च्या ओनरला मागे दोन वर्षांपूर्वी त्यांचा सॉफ्टवेअर हॅक झाल्यामुळे खूप मोठ्या संकटाला फेस करावे लागणार होते, पण तेव्हा तू हे तुझे नॉलेज वापरून तुझ्या सरांची मदत केली आणि त्यांचा सॉफ्टवेअर मधली महत्त्वाची सगळी माहिती हॅक होण्यापासून वाचवली... तू त्यांची खूप मोठी मदत केली त्यामुळे ते तुझ्यावर खूप विश्वास ठेवतात.... बरोबर ना..... " मिस्टर विश्वास तिचा भरोसा जिंकण्याचा प्रयत्न करू लागतात....
" हो.... " भार्गवी पण त्यांच्या या बोलण्याला एका शब्दात उत्तर देते.....
" भार्गवी मी तुझ्याबद्दल तुला ओळखत असलेल्या ज्या ज्या लोकांना विचारले, त्या सगळ्या लोकांकडून मला तुझ्याबद्दल फक्त पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला.... सगळे तुझ्याबद्दल चांगलंच बोलत होते..... मला एकही व्यक्ती सापडली नाही , त्याने तुझ्याबद्दल काही वाईट बोलले असेल..... याचा अर्थ तू एक चांगली मुलगी आहे..... तू कधी कोणाचे वाईट करू शकत नाही आणि कोणती वाईट गोष्ट करण्याचा विचारही करू शकत नाही..... " मिस्टर विश्वास तिला बोलता करण्याचा प्रयत्न करू लागतात....
" हो सर , मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात कधीच कोणती चुकीची गोष्ट केली नाही किंवा कोणत्या चुकीची गोष्ट करण्याचा विचारही केला नाही..... मला जशी जमेल तशी चांगल्या मार्गाने लोकांची मदत करण्याचा प्रयत्न केला पण.... " भार्गवी बोलता बोलता मध्येच शांत होते.....
" पण काय भार्गवी , हे बघ मी आता तुझा एक चांगला मित्र झालो आहे ना..... मग तू माझ्यासोबत स्वतःच्या मनातली गोष्ट शेअर करू शकतेस ना..... " मिस्टर विश्वास तिला आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यासाठी प्रयत्न करू लागतात.....
" सर , गोष्ट जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जीवावरची असते.... जर का आपल्या जवळच्या व्यक्तीचा जीव धोक्यात असेल तर आपण काहीही विचार न करता कुठल्याही संकटाचा सामना करण्यासाठी तयार असतो..... मग ती गोष्ट चुकीची आहे की बरोबर याचा देखील विचार करत नाही..... " भार्गवी उदास चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहून बोलू लागते.... तिच्या शब्दांपेक्षा तिचा चेहरा खूप काही सांगून जातो....
" भार्गवी माणसांचा जीव वाचवण्यासाठी जरी केला , तरी गुन्हा हा शेवटी गुन्हाच असतो.... हे आपण नाकारू शकत नाही , पण जर आपण योग्य वेळी विचार करून त्याच्यावर काही मार्ग काढला तर मात्र त्या गुन्ह्यासाठी मिळणाऱ्या शिक्षेपासून काही प्रमाणात वाचता जरूर येते......" मिस्टर विश्वास तिला बोलता करण्याचा प्रयत्न करू लागतात जेणेकरून तिने हे सगळं कशासाठी केले आहे हे ती त्यांना सांगेल......
" तुम्ही बरोबर बोलत आहात..... माझ्या जवळच्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी मी नाईलाजाने असे काही केले की , ती गोष्ट चुकीची आहे हे माहित असून देखील मला तसे करावे लागले..... " भार्गवी ला आपल्याच वागण्याची लाज वाटू लागते.... खरंच आपली खूप मोठी चूक झाली आणि आता ही चूक कबूल करून आपण त्याची भरपाई करूया , असे तिच्या मनात विचार येऊ लागतात..... मिस्टर विश्वास यांच्या बोलण्याचा तिच्या मनावर खूपच खोलवर असर पडलेला असतो आणि त्यांच्या बोलण्यातून एक समंजस मित्र आपल्या सोबत आहे, तो या सगळ्यातून आपल्याला नक्की वाचवेल , अशी ही आशा तिच्या मनात निर्माण झालेली असते.....
" म्हणूनच मी तुला सांगत आहे ना भार्गवी..... तुझ्या मनात जे काय असेल ते मला सांग मी तुला वचन देतो की, मी तुला वाचवण्याचा प्रयत्न करेल... तुला वाचवण्यासाठी मला कायद्यामध्ये राहून जे काय करावे लागेल ते मी नक्कीच करेन.... " मिस्टर विश्वास आपल्या बोलण्यातून तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागतात.... ते आपल्या या प्रयत्नात काही प्रमाणात यशस्वी ही झालेले असतात.....
" मी तुम्हाला सगळं काही व्यवस्थित सांगते..... " भार्गवी मिस्टर विश्वास यांच्याकडे पाहून बोलायला सुरुवात करते....
" भार्गवी sssss भार्गवी... " अचानक त्या दोघांच्या कानावर आवाज ऐकू येतो.... भार्गवी तो आवाज ओळखून आतुरतेने आपल्या जागेवरून उठून पळतच जेलच्या दरवाजा जवळ येऊन उभी राहते....
तो आवाज मिस्टर विश्वास हे देखील चांगलेच ओळखतात आणि त्या आवाजामुळे त्यांची पाण्यात गेलेल्या मेहनतीचा विचार करून नाराजीनेच आपले डोळे घट्ट बंद करत उघडतात... त्यांच्या दोन्ही हाताची मूठ ही घट्ट आवळली जाते....
" मला माझ्या बायकोला भेटायचं आहे... कुठे आहे ती.... तुम्ही मला माझ्या बायकोला भेटण्यापासून अडवू शकत नाही...... " धर्मेश बाहेर पोलिस स्टेशन मध्ये करू लागतो....
" धर्मेश.... धर्मेश... मी इकडे आहे..... प्लीज धर्मेश तुम्ही लवकर या..... मला इकडे नाही राहायचे आहे.... धर्मेश.... " भार्गवी दरवाजा मधूनच जेलच्या सगळ्यांना जोरात पकडून मोठ्या आवाजात धर्मेश ला आवाज देण्याचा प्रयत्न करू लागते....
" हवालदार पकडा त्यांना..... " त्याचा आरडाओरडा ऐकून मुख्य अधिकारी आपल्या केबिन मधून बाहेर येऊन त्यांच्या सहकाऱ्यांना आदेश देतात.....
" हे बघा तुम्ही मला माझ्या बायकोला भेटू द्या.... तुम्ही मला तिला भेटण्यापासून अडवू शकत नाही.... माझ्याकडे तसे परमिशन लेटर ही आहे.... " धर्मेश त्या मुख्य अधिकाऱ्याला आपल्या हातात असलेले लेटर दाखवत बोलू लागतो.....
मुख्य अधिकारी पुढे येऊन त्याच्या हातात असलेले लेटर घेऊन उकडून ते वाचू लागतात..... तोपर्यंत दोन हवालदारांनी धर्मेशला पकडून ठेवलेले असते.....
" याला थोडा वेळ याच्या बायकोला आत जाऊन भेटू द्या आणि हो फक्त थोड्या वेळासाठी तुझ्या बायकोला भेटणार आहे.... तोपर्यंत इकडे पोलीस स्टेशनमध्ये कोणताही आरडाओरडा करायचा नाही...... " मुख्याधिकारी धर्मेश कडे पाहून त्याला वॉर्निंग देतात आणि आपल्या हवालदारांकडे पाहून त्यांना इशारा करतात..... तसे ते दोन हवालदार धर्मेशला भार्गवी जिकडे असते तिकडे घेऊन जातात.....
.
..
...
To be continued.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा