Login

लग्न – एक छलावा भाग २७

सात फेऱ्यांमध्ये लपलेले गुढ रहस्य
भार्गवीला शुद्ध तर आलेली असते परंतु ती काहीही हालचाल न करता तशी शांत पडून राहते.....  ते माणसं नक्की कोण आहेत आणि आपल्याला कुठे घेऊन जात आहे ? ही गोष्ट तर तिलाही माहित करून घ्यायची असते.....

आत्ता पुढें,

काही वेळानंतर तिला त्यांची गाडी थांबल्याचा अंदाज येतो तशी ती शांत पडून राहते....

" बॉसने तिला इकडून आत घेऊन जाण्यासाठी आधी बेशुद्ध करायला सांगितले होते ना... त्याचे ते इंजेक्शन घेऊन आले आहात ना ? " त्यांच्यापैकी एक माणूस दुसऱ्या माणसाला विचारू लागतो....

" हो घेऊन तर आलो आहे पण तुझ्या एका फटक्याने तिची शुद्ध हरपलेली होती, ती अजून काही शुद्धीवर आली नाही.... मला वाटत नाही आपल्याला या इंजेक्शनची काही गरज पडणार आहे.... " दुसरा माणूस जो मागे बसलेला असतो तो एक नजर भार्गवी कडे पाहून पहिल्या माणसाला बोलतो.....

" मला वाटते तरीही आपण रिस्क घ्यायला नको..... गाडीतून खाली उतरण्या आधी तिला ते इंजेक्शन द्यायला पाहिजे.... " पहिला माणूस तरी स्वतःच्या मनात आलेली शंका व्यक्त करू लागतो.... तोपर्यंत बाकीच्या दोन गाड्या मधली माणसंही उतरून त्यांच्या गाडीपाशी येऊन थांबलेली असतात....

" मला तरी गरज वाटत नाही तरी पण तिला ते इंजेक्शन द्यायचं असेल तर द्या..... " दुसरा माणूस आपल्या मनातली गोष्ट सांगून मोकळा होतो....

" तशी तर गरज मला पण वाटत नाही..... तिची अजून शुद्ध हरपलेली आहे..... शिवाय आपण तिच्या चेहऱ्यावर हा काळा कपडा ही घातलेला आहे त्यामुळे जरी रस्त्यात मध्ये कुठे तिला शुद्ध आली , तरी तिला ती कुठे आहे हे समजणार नाही..... " तेवढ्यात तिसरा माणूस तिच्याकडे एक नजर पाहून आपलं मत व्यक्त करतो....

" ठीक आहे, आता तुम्ही सगळे बोलत आहात तर नको द्यायला तिला इंजेक्शन.... एक काम करा तिला तसे उचला आणि चला.... बॉस ने ज्या ठिकाणी तिला ठेवायला सांगितले आहे तिथ व्यवस्थित ठेवूया..... " तो माणूस पण शेवटी सगळ्यांचं बोलणं ऐकून आपली तयारी दाखवतो....

त्यांच्यामध्ये असलेला एक माणूस पुढे येऊन दोन्ही हातावर भार्गवीला उचलतो..... भार्गवी काहीही हालचाल न करता गप्पपणे त्याच्या हातावर पडून राहते.... जर का तिने जराही आपल्या शरीराची हालचाल केली आणि त्यांना शक झाला तर ते तिला बेशुद्ध होण्याची इंजेक्शन देतील आणि मग आपल्याला आजूबाजूच्या ठिकाणाचा अंदाजा घेता येणार नाही, त्याचा विचार करूनच ती शांत राहते..... तिचं तोंड कळ्या कपड्याने झाकलेले असल्यामुळे तिला आजूबाजूचा परिसर तर दिसत नाही परंतु त्या लोकांच्या बोलण्यातून काही अंदाज लावण्यासाठी प्रयत्न करते.....

ती सगळी माणसं गाडीतून उतरून आठ ते दहा पावलं पुढे चालल्यानंतर अचानक हलकाच कोणत्यातरी बटन दाबण्याचा आवाज तिच्या कानावर पडतो आणि मग काहीतरी उघडण्याचा आवाज तिच्या कानावर येतो..... तसे ते लोक तिकडून आत जातात म्हणजे हा नक्कीच कोणता तरी मोठा असा दरवाजा होता , असा ती अंदाज लावते.....

" बॉस ने तिला त्या कोपऱ्यातल्या रूम मध्ये ठेवायला सांगितले होते...... त्या रूममध्ये चारी बाजूने कॅमेरे लावलेले आहे त्यामुळे तिच्यावर पूर्णपणे नजर ठेवता येईल...... " त्यांच्यातला एक माणूस एका दिशेला हात करत बोलू लागतो... तसे ते दोघं त्या दिशेने पुढे वळतात.....

" तुम्ही दोघे मिळून तिला व्यवस्थितपणे त्या रूममध्ये ठेवा, तोपर्यंत मी बॉसला भेटून येतो आणि त्यांचं काम पूर्ण झालं आहे हे सांगतो...... " असे बोलून तिकडे असलेली दोन माणसं त्यांच्याविरुद्ध दिशेला चालत जात असल्याचा अंदाज भार्गवी आपल्या कानाने लावते..... अजूनही ती शांतपणेच पडून असते..... तिकडे ते लोक जेव्हा एकमेकांशी बोलत असतात तेव्हा त्याचा इको साउंड येत असल्यासारखा तिला जाणवतो म्हणजे ही जागा पूर्णपणे मोकळी आणि सगळी कडून बंद अशी आहे....

म्हणजे हे लोक आपल्याला कोणत्या बिल्डिंगमध्ये किंवा कोणत्या मोठ्या घराकडे घेऊन आलेले नाही..... ही जागा काहीतरी वेगळीच आहे... याचा अंदाज भार्गवीला येऊ लागतो..... ते लोक चालत असताना त्यांच्या बुटांचा होणाऱ्या आवाजावरूनही ती थोडाफार अंदाज घेऊ लागते......

परत एकदा तिकडे तिला कोणत तरी बटन दाबल्यासारखे वाटते आणि पुन्हा एकदा काहीतरी उघडण्याचा आवाज तिच्या कानावर पडतो , पण हा आवाज मात्र मगाशी आलेल्या आवाजापेक्षा थोडा कमी असतो.....

" या पूर्ण रूममध्ये फिरून एकदा व्यवस्थित सगळीकडून चेक करून घे.... " भार्गवी ला ज्या माणसाने उचललेले असते तो माणूस आपल्या सोबत असलेल्या दुसऱ्या माणसाला इन्स्ट्रक्शन देतो.... तसा तो माणूस चालत पुढे जाऊन त्या रूममध्ये सगळीकडे चेक करू लागतो.... यावरून भार्गवीला ती रूम किती मोठी असेल याचा अंदाज येऊ लागतो.....

" सगळं अगदी व्यवस्थित आहे... " तो माणूस परत त्यांच्या दिशेने येऊन त्यांना सांगतो.... तसा इतका वेळ ज्या माणसाने भार्गवीला आपल्या हातात उचलून घेतलेले असते , तो थोडा पुढे जातो आणि एका गादीवर तिला ठेवतो...... भार्गवीच्या शरीराला मऊ मऊ गादीचा स्पर्श होतो म्हणजे यांनी नक्कीच आपल्याला बेडवर ठेवलेले आहे असा ती मनातून अंदाजा बांधते......

" चल आता आपले काम झाले..... आता हिचं काय करायचं आहे ते बॉस बघून घेतील..... " असे बोलून ते दोघे पण तिकडून बाहेर निघून जातात..... जाताना मात्र पुन्हा एकदा तो दरवाजा बंद झाल्याचा आवाज तिच्या कानावर येतो..... आता लगेच जर आपण चेहऱ्यावरचा काळा कपडा हटवून आजूबाजूला पाहिलं तर त्यांना आपल्या वर शक येईल म्हणून भार्गवी थोडा वेळासाठी तशीच पडून राहते...... शिवाय त्यांच्या बोलण्यावरून या रूममध्ये कॅमेरे लावलेले आहेत हेही तिला समजलेले असते.....

भार्गवी त्या बेडवर शांत झोपलेली असते..... आजूबाजूला तिला थंड एसी ची हवा चालू असल्यासारखा फील येतो.... मागच्या दोन-तीन दिवसापासून त्या जेलच्या अंधार कोथडी मध्ये गर्मीमध्ये मच्छरांसोबत त्या छोट्याशा बाकड्यावर रात्र घालवल्यामुळे तिची झोपही व्यवस्थित पूर्ण झालेली नसते.....

आज मात्र तिला छान अशा मऊसुत गादीवर झोपवलेले असते आणि आजूबाजूला असलेल्या थंड हवेमुळे तिला छान झोप हि लागते.... झोपेच सोंग घेतलेली भार्गवी आता खरंच झोपेच्या आधीन गेलेली असते.....

थोड्या वेळाने अचानक तिला जाग येते.... तशी ती डोळे उघडून आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्याच्या लक्षात येते की, आपल्याला काही माणसांनी इकडे आणले आहे आणि तिच्या चेहऱ्यावर अजूनही तो काळा कपडा आहे.... भार्गवी तो कपडा आपल्या चेहऱ्यावरून बाजूला काढते आणि आजूबाजूला पाहू लागते.....

चारी बाजूने भिंत असलेल्या त्या रूममध्ये भार्गवी एकटीच असते...... रूम मध्ये एका बाजूला मोठा बेड ठेवलेला असतो त्याच्यावरच ती झोपलेली असते..... तिच्या बेडच्या समोरच एक मोठी स्क्रीन असते, सध्या ती स्क्रीन बंद असते...... बेडच्या उजव्या बाजूला एका टेबलवर लॅपटॉप ठेवलेला असतो..... तिकडेच थोडा पुढे एक दरवाजा असतो.... नक्की या दरवाजा मधून आपल्याला आत घेऊन आले असतील याचा तिला अंदाज येतो..... दुसऱ्या बाजूच्या भिंतीवर एक छोटी खिडकी असते, पण ती खिडकी सध्या पूर्ण पॅक असते.....

भार्गवी पटकन बेड वरून खाली उतरते आणि त्या दरवाज्याच्या दिशेने जाते... तो दरवाजा खोलायचा प्रयत्न करू लागते परंतु त्या दरवाजाला कुठेही तिला कोणत्याही प्रकारचा लॉक किंवा कडी दिसत नाही.... याचा अर्थ त्याला खोलण्यासाठी बाहेरूनच काहीतरी सुविधा आहे ही गोष्ट तिच्या लक्षात येते.... ती पटकन त्या खिडकी जवळ जाते पण ती खिडकी ही तशीच.... त्या
खिडकीला असलेल्या काचेमध्ये तिला आपला चेहरा दिसून येतो बाहेरचे काहीच दिसत नाही..... त्या खिडकीच्या वरच असलेल्या भिंतीवर एसी लावलेला असतो सध्या तो चालू असतो म्हणून पूर्ण रूम थंड झालेली असते......

भार्गवी सगळीकडे आपली नजर फिरवत असताना तिला बेडच्या डाव्या बाजूला पण एक दरवाजा दिसतो..... भार्गवी पटकन त्या दरवाज्याच्या दिशेने पुढे जाते..... त्या दरवाजाला हँडल असतो..... तो हँडल पकडून दरवाजा उघडून भार्गवी आत पाहू लागते आत एक वॉशरूम असते..... भार्गवी त्या वॉशरूमच्या आत जाते तिकडे एका बाजूला छोटे कपाटही असते.... भार्गवी ते कपाट उघडून पाहते तर त्याच्या मध्ये तिचे चार-पाच ड्रेस असतात....

' माझ्या घरातले माझे स्वतःचे ड्रेस इकडे या कपाटामध्ये कसे काय आले ? ' भार्गवीच्या मनाला प्रश्न पडतो... समोर असलेल्या वॉशरूम मध्ये ती युज करत असलेले शाम्पू आणि सोप असतात..... हे सगळं बघून भार्गवी गोंधळून जाते... वॉशरूम मधून बाहेर पडण्यासाठी एखादी खिडकी किंवा काही साधन आहे का ती पाहू लागते परंतु ते सगळीकडून पूर्ण पॅक असते..... शेवटी वैतागून भार्गवी परत बाहेर येऊन त्या बेडवर जाऊन बसते.....

" Welcome to your New home..... आज पासून तुला इकडेच राहायचे आहे..... " भार्गवी शांतपणे बेडवर बसून विचार करत असताना अचानक त्या रूममध्ये एक आवाज घुमतो... तशी ती सगळीकडे पाहू लागते..... त्या रूममध्ये तिच्याशिवाय दुसरे कोणीही नसते, मग आवाज नक्की कुठून आला याचा अंदाज लावण्यासाठी प्रत्येक भिंतीचे निरीक्षण करू लागते......

" आय एम सो सॉरी भार्गवी.... तुला किती ही इच्छा असली तरी तू मला पाहू शकणार नाही, पण मी मात्र तुला अगदी व्यवस्थित पाहू शकतोस..... " पुन्हा एकदा तिच्या कानावर तो आवाज पडतो.....