Login

लग्न – एक छलावा भाग ३२

सात फेऱ्यांमध्ये लपलेले गुढ रहस्य
" जो लॅपटॉप तू आता युज करत आहेस ना त्याचा IP ऍड्रेस, VPN,  MAC and Proxy हे सगळे डिटेल्स तुझ्या स्वतःच्या लॅपटॉप मधले भरलेले आहेत..... त्यामुळे जो कोणी माणूस या लॅपटॉपची डिटेल काढेल ना.... त्याच्यासमोर तुझ्या या सगळ्या डिटेल्स येतील आणि त्यावरून हा सगळा घोटाळा तू केला आहे हे सिद्ध होईल..... " ती व्यक्ती जोरजोरात हसत भार्गवीला सांगू लागते.....

आत्ता पुढें,

" हे कसे शक्य आहे ? माझा लॅपटॉप तर या वेळी पोलिसांच्या ताब्यात असेल मी पोलीस स्टेशनला गेल्यापासून माझा फोन आणि लॅपटॉप त्यांच्याकडेच आहे आणि तेच त्या लॅपटॉप मध्ये सगळे काही डिटेल चेक करत होते त्यामुळे आताही माझा लॅपटॉप पोलीस स्टेशनमध्ये असेल..... " भार्गवी आश्चर्याने त्याच्याकडे पाहून त्याला बोलते.....

" जोपर्यंत तू तिकडे पोलीस स्टेशनला त्यांच्या ताब्यात होती तोपर्यंत तुझ्या वस्तू त्यांनी त्यांच्याजवळ , त्यांच्या कस्टडीमध्ये ठेवल्या होत्या... जेव्हा तुझ्या वरचा गुन्हा सिद्ध झाला , तू स्वतः त्याची मंजुरी दिली आणि तुला न्यायाधीशाने शिक्षा सुनावली, तेव्हाच पोलिसांनी तुझा लॅपटॉप आणि फोन त्यांनी सील करून फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवले होते आणि त्या फॉरेन्सिक लॅब मध्ये असणाऱ्या माणसाला काही पैसे देऊन ते पुरावे आपल्यापर्यंत घेऊन येण्यासाठी मला जास्त मेहनत करण्याची गरज लागली नाही.....

आता सध्या तुझा लॅपटॉप हा माझ्याकडे आहे आणि तू माझ्या सांगण्यावरून जे काही पैशाचे घोटाळे करत आहे ना ते सगळे तुझ्या लॅपटॉप मधून होत आहेत असे सगळ्यांना वाटणार आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर जेव्हा कायदेशीर रित्या कारवाई केली जाईल तेव्हा पुन्हा एकदा ते तूच केले आहे असे सिद्ध होईल.... " ती व्यक्ती मोठमोठ्याने हसतच भार्गवीला सांगू लागते....

भार्गवी मात्र नाराजीनेच आपल्या डोकं गच्च पकडून बसते.... पोलिसांची कामे कशी असतात हे तिला आधीपासूनच माहीत होते म्हणून तर ती कधी याआधी पोलिसांच्या नादी लागायला गेली नव्हती..... आता जेव्हा तिच्यासोबत हे सगळं होत असताना सगळ्याच गोष्टी आपल्या विरोधात गेल्यासारखे तिला वाटू लागतात.... आता फक्त ती स्वतःसाठी आणि स्वतःच्या आजीसाठी जे काही करत आहे , ते व्यवस्थित मार्गी लागू दे आणि त्या दोघींचा ही या सगळ्यांपासून बचाव होऊ दे....  एवढीच ती मनामध्ये देवाकडे प्रार्थना करत असते.....

या सगळ्या गोष्टीचा विचार करून तिचे डोकं अगदी जड होऊ लागते म्हणून ती तो लॅपटॉप तसाच बाजूला ठेवून शांतपणे बेडवर पडून डोळे बंद करते.... या सगळ्यात तिला कधी झोप लागते तिच्या तिलाही समजत नाही..... ती शांत झोपलेली आहे हे कॅमेरा मध्ये पाहून समोरची व्यक्ती पण आपले दुसरे काम करण्यासाठी त्या ठिकाणाहून बाहेर निघून जाते....

काही वेळानंतर तिच्या बाजूला असलेल्या लॅपटॉप मधून आवाज येऊ लागतो म्हणून ती हळूच आपले डोळे उघडून त्या लॅपटॉप कडे पाहू लागते तेव्हा तिला व्हिडिओ कॉल येत असल्याचे समजते..... भार्गवी पटकन जागेवरून उठते आणि लॅपटॉप हातात घेते.... समोर दिसत असलेला व्हिडिओ कॉल ती एक्सेप्ट करते... तेव्हा तिची आजी समोर उभी तिला दिसते....

" भार्गवी बाळा हे बघ मी आत्ताच आपल्या गावच्या घरी पोहोचले आहे.... तुला टेन्शन आले असेल म्हणून सगळ्यात आधी तुलाच फोन करून कळवले.... " आजी भार्गवी कडे पाहून शांतपणे बोलते....

" आजी तू घरी व्यवस्थित पोचली आहे ना, बस आता जास्त काही विचार करू नको आणि आपल्या घरात आरामशीर राहा..... " भार्गवी कॅमेरा मधून दिसणारे आपल्या घराकडे प्रेमाने पाहून बोलू लागते.....

" भार्गवी बाळा तू कधी इकडे येशील,  मला तुझी खुप आठवण येत आहे..... तू ठीक आहेस ना ? ते लोक तुला काही त्रास तर देत नाही आहे ना.... " आजी पुढे अजून काही विचारणार इतक्यात तिच्या बाजूला असलेला तो माणूस त्यांच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतो.....

" ए म्हातारे, तुझ्या मुलीला तिकडे काहीही त्रास नाही,  उलट तिकडे आरामशीरच राहत आहे.... जोपर्यंत ती आमच्या बॉसच काम व्यवस्थितपणे करेल,  तोपर्यंत तिला काही त्रास होणार नाही  त्यामुळे ही फालतूची बडबड करण्यापेक्षा तुझ्या मुलीला समजावून सांग की , व्यवस्थित काम कर म्हणून तरच आमचा बॉस तिच्यावर दया करून तिला सोडून देईल.... " तो माणूस तिरकसपणे हसत आजी कडे पाहून बोलतो....

" आजी... तू नको टेन्शन घेऊस... मी इकडे ठीक आहे , मला काहीही त्रास नाही... तू फक्त आता स्वतःची काळजी घे... " त्या माणसाचं बोलणं ऐकून भार्गवीला खूपच वाईट वाटू लागते त्यामुळे ती विषय तिकडेच थांबवते.....

" ए तू सांगितल्याप्रमाणे तुझ्या आजीला इकडे व्यवस्थित सोडलेले आहे त्यामुळे आता तुला आमच्या बॉसने काम दिले आहे ते लवकरात लवकर पूर्ण कर... " तो माणूस भार्गवी कडे पाहून तिला सूचना देत फोन कट करतो....

" तुम्ही हे जे काही डिटेल्स दिलेले आहेत ते पैसे एक साथ ट्रान्सफर करायला थोडा प्रॉब्लेम येईल कारण समोरच्या व्यक्तीचे अकाउंट हे VIP आहे त्यामुळे जर आपण त्याच्या अकाउंट मध्ये मोठा फेरबदल करण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्या मोबाईलवर ताबडतोब मेसेज जाऊ शकतो म्हणून आपण जर ते अमाऊंट चे तुकडे करून हळूहळू ट्रान्सफर केले, तर दोन दिवसात आपल्या अकाउंट वर पूर्ण अमाऊंट हि ट्रान्सफर होईल आणि त्या माणसाला समजणारही नाही..... या दोन दिवसात बँकेला सुट्टी असल्यामुळे बँकही काही लीगल ॲक्शन घेईपर्यंत तो सगळा पैसा आपल्या अकाउंट वर ट्रान्सफर झाला असेल..... " भार्गवी त्या कॅमेरा कडे पाहून बोलते परंतु बराच वेळ होतो पण समोरून काही रिप्लाय येत नाही.....

" हॅलो तुम्ही आहात का ? मला काहीतरी सांगा म्हणजे मी तसे माझे काम करायला सुरुवात करेल.... " भार्गवी पुन्हा एकदा थोड्या मोठ्या आवाजात विचारते पण तरीही समोरून काही रिप्लाय येत नाही.....

' समोरून काही रिप्लाय येत नाही म्हणजे आता सध्या तरी माझ्यावर कोणाची नजर नसेल.... कदाचित ती व्यक्ती आता या ठिकाणी नसेल... हीच योग्य वेळ आहे... ' असा विचार करून भार्गवी आपल्यासमोर असलेल्या लॅपटॉपवर भराभर बोट चालवू लागते....

भार्गवी ने काल कोडींग लँग्वेज मध्ये जो मेसेज पाठवलेला असतो,  त्या मेसेजच्या खाली तिला पाहिजे असलेला रिप्लाय ही आलेला असतो..... भार्गवी पटकन समोर दिसत असलेला मोबाईल नंबर त्या लॅपटॉप मधून डायल तर करते परंतु दोन सेकंदात कट ही करते.....

' नाही नको तिकडून कोणाला कॉल करणं खूप रिस्की असू शकते.... जशी कॅमेरा ने माझ्यावर नजर ठेवलेली आहे, तसेच माझं बोलणंही रेकॉर्ड करत असतील तर.... ' भार्गवी मनामध्येच विचार करते आणि समोर असलेल्या मोबाईल नंबर वर काही मेसेज पटापट सेंड करू लागते.... तिने मेसेज तर सेंड केलेले असतात परंतु तरीही समोरून काही रिप्लाय येत नाही,  आता फक्त समोरच्याने ते मेसेज पाहून काहीतरी रिप्लाय करावे हा विचार करतच ती अधीर मनाने लॅपटॉप मध्ये पाहत असते...

काही वेळातच समोरच्या व्यक्तीचा रिप्लाय येतो....  तशी भार्गवी मनामध्येच देवाचे आभार मानते आणि आता इकडून बाहेर कसे पडायचे याचा विचार करू लागते..... आता सध्या या ठिकाणी कोणीही नाही या गोष्टीचा फायदा उचलून भार्गवी तिकडचे सगळे सिस्टम हॅक करते आणि काही माहिती मिळते का त्याचा प्रयत्न करू लागते....

भार्गवी वेळ पाहते तर दुपारचे दोन वाजलेले असतात... पुढच्या पंधरा ते वीस मिनिटात एक माणूस काल सारखेच तिच्यासाठी जेवण घेऊन तिच्या खोलीमध्ये येणार ही गोष्ट तिला माहीत असते.... ती इकडे आल्यापासून सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण शिवाय तिला लागणाऱ्या वस्तू हा तो एकच माणूस तिच्यासाठी तिच्या रूममध्ये घेऊन येत होता ही गोष्ट त्यामुळे पुढच्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तो माणूस आपल्यासाठी जेवण घेऊन येणार ,तेव्हा त्याच्या फिंगरप्रिंटने आपल्या रूमचा दरवाजा उघडणार याबद्दल ते विचार करू लागते.....

' भार्गवी आपली आजी त्यांच्या ताब्यातून सुटून व्यवस्थित तिच्या घरी पोहोचली आहे आणि तिकडून पुढे तिला एका सुरक्षित ठिकाणी पोहोचण्या ची जबाबदारी पण तू पार पाडली आहेस... आज तुझ्यावर लक्षात ठेवून असलेली ती व्यक्ती या ठिकाणावर नाही.... ती व्यक्ती परत कधी येणार आहे त्याबद्दल आपल्याला काहीही माहित नाही त्यामुळे आपल्यासाठी जो माणूस जेवण घेऊन येणार त्या माणसाला चकवा देऊन आपल्याला कसेही करून या रूमच्या बाहेर पडायचे आहे..... ' भार्गवी मनामध्येच या सगळ्या गोष्टीचा विचार करू लागते....

ती पटकन आपल्या जागेवरून उठते आणि वॉशरूम मध्ये जाते..... वॉशरूम मधून व्यवस्थित फ्रेश होऊन आपले कपडे चेंज करून बाहेर येते.... तिकडे असलेल्या कपाटातच तिचे कपडे ठेवलेली एक बॅग असते.... त्या बॅग मध्ये आपले दोन कपडे भरून , ती बॅग ती तशीच बाहेर घेऊन येते..... तिच्याजवळ असलेला तो लॅपटॉप पण त्या बॅगमध्ये भरून ती बॅग दरवाजाच्या बाजूला असलेल्या भिंतीच्या आड ठेवून भार्गवी पुन्हा बेडवर येऊन शांतपणे बसते.... आता ती त्या जेवण घेऊन येणाऱ्या माणसाची वाट पाहू लागते........