Login

लग्न – एक छलावा भाग ८१

सात फेऱ्यांमध्ये लपलेले गुढ रहस्य
’ मिस्टर विश्वास हे माणूस म्हणून तर समजूतदार आहे पण त्यांचं प्रेमही तितकच निर्मळ आहे... कोणी कोणावर इतकं कसं काय प्रेम करू शकतो ? जे प्रेम मी माझ्यासाठी धर्मेश मध्ये नेहमी शोधण्याचा प्रयत्न केला तेच प्रेम मला आता विश्वास यांच्या डोळ्यात, त्यांच्या बोलण्यात , त्यांच्या प्रत्येक कृती मधून दिसून येत आहे.... ’ भार्गवी शांत बसलेली तर असते पण तिचे मन मात्र मिस्टर विश्वास यांचाच विचार करत असते....

आत्ता पुढें,

आजीने व्यवस्थित समजल्यामुळे भार्गवी अजून पुढचे काही दिवस मिस्टर विश्वास यांच्या घरात राहण्यासाठी तयार होते.... मागच्या काही महिन्यांपासून जे काही भार्गवीच्या आयुष्यामध्ये घडलं होतं,  ते सगळं विसरून पुढे जाण्यासाठी,  त्याच्यातून स्वतःला सावरण्यासाठी तिला फार गरजेचं होतं... मिस्टर विश्वास तिची मनस्थिती समजून तिला वेळ देण्याचा ठरवतात.... त्यांना कोणताही निर्णय तिच्यावर लाद्याचा नसतो... प्रत्येक गोष्टीचा तिने मनापासून विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा , अशी त्यांची इच्छा असते... तिने घेतलेल्या निर्णयाचा ते आदरच करणार होते......

या वेळात त्यांच्याकडेही काही महत्त्वाची कामे आली त्यामुळे त्यांना त्या कामासाठी सारखे घरातून बाहेर जावे लागत होते त्यामुळे ते जास्त भार्गवी च्या समोरही येत नव्हते... मेघा भार्गवीला भेटण्यासाठी अधून मधून मिस्टर विश्वास यांच्या घरात येत होती.... आजीने मेघालाही मिस्टर विश्वास यांच्या मनात असलेल्या भावना सांगितल्या... मेघाने आपल्या परीने भार्गवीला समजवण्याचा प्रयत्न केला.... तिची ही इच्छा होती की , आपली मैत्रिणीने तिच्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा...

भार्गवी मनापासून विचार करून काही दिवसानंतर मिस्टर विश्वास यांच्या सोबत लग्न करण्यासाठी उकार देते... तसे सगळेच खूप खुश होतात... मिस्टर विश्वास यांना देखील खूप आनंद होतो.... भार्गवीचा होकार मिळाल्यानंतर मिस्टर विश्वास आपल्या फॅमिलीला विश्वासात घेऊन या सगळ्या गोष्टीची कल्पना देतात ते त्यांना आधीच भार्गवीच्या भूतकाळाची पूर्वकल्पना देऊन त्यानंतर त्यांचे तिच्यावर असलेले प्रेम याबद्दलही समजवतात... त्यांची फॅमिली त्यांच्या लग्नासाठी तयार होते....

आधीच आपल्या मुलांच्या डोक्यावर इतके मोठे संकट आले होते त्यामुळे यावेळी कोणताही मोठा कार्यक्रम न ठेवता सरळ कोर्टामध्ये जाऊन लग्न करायचे आणि मग फॅमिली आणि जवळच्या फ्रेंड्स लोकांना पार्टी द्यायची असा निर्णय घेतला जातो..... भार्गवीची ही अशीच इच्छा असते...

सगळे एकत्र मिळून लग्नाची शॉपिंग करतात.... मिस्टर विश्वास भार्गवी सोबत शॉपिंग करत असल्यामुळे ते प्रत्येक वेळी तिच्या आवडीनिवडीचा व्यवस्थित विचार करूनच लग्नाची शॉपिंग करतात.....

फायनली त्यांच्या लग्नाचा दिवस उगवतो... कोर्टामध्ये लग्न असले तरीही भार्गवीने लाल रंगाची हलकी डिझाईन असलेली सिल्क साडी नेसलेली असते.... साडी अगदी परफेक्ट नसल्यामुळे त्याच्यातून तिची फिगर व्यवस्थित उठून दिसत असते.... तिने गोळ्यामध्ये लाल सून असलेल्या नेकलेस आणि त्यालाच मॅचिंग कानातलेही घातलेले असतात.... केसांची हेअर स्टाईल करून मागे मोकळे सोडलेले असतात.. चेहऱ्यावर हलकासा मेकअप आणि पोटांवर हलक्या लाल रंगाची लिपस्टिक लावून ती तयार झालेली असते...

मिस्टर विश्वास यांनी लग्नासाठी काळ्या रंगाचा थ्री पीस सूट घातलेला असतो.... एका हातात ब्रॅण्डेड वॉच तर दुसऱ्या हातामध्ये डायमंड ब्रेसलेट, केस व्यवस्थित जे लावून सेट केलेले असतात आणि दाढी ही व्यवस्थित ट्रिम केलेली असते.... आज आपले पहिले प्रेम कायमचे आपले बनून आपल्या आयुष्यात येणार आहे, या गोष्टीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकून येत असतो... त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्यांची पूर्ण फॅमिली खूप खुश असते....

त्या सगळ्यांच्या गाड्या कोर्टाच्या बाहेर येऊन थांबलेल्या असतात.... मुख्याधिकारी पण आपल्या मित्राच्या लग्नासाठी आलेले असतात.... कोर्टामध्ये जशी त्यांच्या नावाची अनाउन्समेंट होते... तसे भार्गवी मी सर्व विश्वास आणि त्यांचे फॅमिली आत जातात...

मंच उच्चारण करून , एकमेकांना हार घालून , कोर्टात असलेल्या मॅरेज सर्टिफिकेटवर ते दोघेपण सिग्नेचर करतात.... तिकडे सगळ्यांसमोर मिस्टर विश्वास तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतात..... सगळे तिकडेच त्यांना काँग्रॅच्युलेशन करतात.... मिस्टर विश्वास यांच्या आईने मिठाईचा बॉक्स आणलेला असतो ते सगळ्यांना तिकडे मिठाई देतात... मेघा त्या दोघांच्या हातात मेरे मिठाईचा तुकडा देऊन त्यांना एकमेकांना भरवायला सांगते... मिस्टर विश्वास हलकीच स्माईल करत तिच्या तोंडा जवळ तो तुकडा धरतात, तशी ती लाजून असते त्यांच्या हातातून मिठाई खाते....

भार्गवी पण लाजतच त्यांना मिठाईचा तुकडा भरवते तसे ते आनंदाने तिच्याकडे पाहून खातात... कोर्टातली प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर ते सगळे घरी येतात... दुसऱ्या दिवशी असलेल्या पार्टीसाठी ही तयारी करायची असते... त्या रात्री भार्गवीलाही तिच्या आजी सोबत आजीच्या रूममध्ये झोपायला सांगितले जाते.....

" अरे यार आता तर आमचं लग्नही झाला आहे तरीही तिला आजीकडे का पाठवल आहे ? " मिस्टर विश्वास वैतागूनच आपल्या मित्राला विचारतात...

" जिकडे इतकी वर्ष वाट पाहिली आहे , तिकडे अजून एक दिवस वाट पाहू शकतो ना.... उद्या सकाळी घरात सत्यनारायणाची पूजा आहे आणि संध्याकाळी तुमच्या लग्नाच्या रिसेप्शन ची पार्टी आहे..... हे दोन कार्यक्रम झाले की , पूर्ण आयुष्य तुमच्या दोघांचेच आहे.... " मुख्याधिकारी पण हसून त्याच्याकडे पाहून समजावण्या च्या स्वरात बोलतात.... ते दोघे पण असे मनमोकळेपणाने खूप दिवसानंतर रात्रीचे गप्पा मारत बाहेर बसलेले असतात...

" विश्वास, आज खूप दिवसानंतर तुझं हे ओरिजनल हसू तिच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे... जेव्हापासून तू भार्गवी च्या प्रेमात पडला होता आणि ती कॉलेजमधून निघून गेली होती तेव्हापासून इतक्या मोकळेपणाने तुला हसताना कधी पाहिलंच नव्हते रे... " मुख्याधिकारी त्याच्याकडे पाहून हळव्या स्वरात बोलतात....

" कसा असणार होतो... चेहऱ्यावर येणारे निखळ, निर्मळ हसू हे खरतर हृदयातून येत असते आणि ती जाताना माझं हृदय सोबत घेऊन गेली होती... आत्ता तिच्या परत आयुष्यात येण्याने माझे हृदय माझ्याजवळ परत आले आहे त्यामुळेच पहिल्यासारखे चेहऱ्यावर हसू ही आले आहे..... " मिस्टर विश्वास शांत चेहऱ्याने वर आकाशात असलेल्या चंद्राकडे पाहून बोलतात....

" तुझ प्रेम खरं होतं विश्वास म्हणून तर देवालाही तुझ प्रेम तुझ्या आयुष्यात परत आणावे लागले... यापूर्वी मी तुला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला, तिला विसरण्याचा सल्ला दिला, तरीही तू कधीही आमचं बोलणं ऐकलं नाही... सॉरी यार, आम्ही जे काही सांगत होतो ते तुझ्या भल्यासाठी सांगत होतो, तुझ्या प्रेमाच्या मध्ये येण्याचा आमचा कधीच विचार नव्हता..." मुख्याधिकारी शांतपणे त्याच्याकडे पाहून उदास चेहऱ्याने बोलतात...


" सोड ना यार त्या जुन्या गोष्टी... त्यावेळी तुम्ही तुमच्या मित्राचा विचार करून त्याला कसं सांगत होता, पण आत्ता ती माझ्या आयुष्यात आली आहे... तिने माझ्या आयुष्यात येऊन माझे प्रेम पूर्ण केले आहे..... आता माझी जबाबदारी आहे की, मी तिच्या भूतकाळात घडलेल्या सगळ्या घटना पुसून तिचा वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हा सुखाने , आनंदाने भरण्याचा प्रयत्न करेल... " मिस्टर विश्वास समाधानाने त्यांच्याकडे पाहून उत्तर देतात... काही वेळ एकमेकांसोबत गप्पा मारल्यानंतर ते आपापल्या रूम मध्ये जाऊन झोपतात...

दुसऱ्या दिवशी सकाळी सत्यनारायणाच्या पूजे ची सगळी तयारी झालेली असते.... गुरुजी मंत्र पडत असतात... भार्गवी आणि मिस्टर विश्वास दोघेही मनातून देवाकडे प्रार्थना करत असतात... ते दोघे पण आपल्या भविष्यासाठी देवाची मनोभावे पूजा करू लागतात..... पूजा झाल्यानंतर ते दोघे म्हणून सगळ्यांचा आशीर्वाद घेतात सगळे भरभरून त्यांना आशीर्वाद देतात... विश्वास यांचे फॅमिली मेंबर भार्गवीला आणले गिफ्टही देऊ लागतात.... आजी पण आपला खानदानी नेकलेस भार्गवीला देते...

सत्यनारायणाची पूजा अगदी निर्विघ्नपणे पार पडते... त्यानंतर सगळ्यांची जेवणही होतात.... दुपारच्या वेळी सगळे थोडावेळ आराम करतात..... संध्याकाळी मिस्टर विश्वास यांच्या घराच्या जवळच असलेल्या मोठ्या हॉलमध्ये त्यांचे रिसेप्शनची पार्टी ऑर्गनाइज केलेली असते.... पार्टी ऑर्गनायझरला सगळे काम दिल्यामुळे सगळे अगदी व्यवस्थित झालेली असते...

पार्टीमध्ये एक घालण्यासाठी मिस्टर विश्वास यांनी आपल्या आवडीने भार्गवीला चंदेरी रंगाचा घागरा घेतलेला असतो... तो घागरा त्यांनी स्पेशल तिच्यासाठी डिझाईन करून घेतलेला असतो..... त्याच्यावर मॅचिंग असे डायमंडचे नेकलेस आणि इयरिंग्स तिला घालायला दिलेले असतात.... नेकलेस सोबतच त्यांनी घातलेले मंगळसूत्र ही आता तिच्या गळ्यात असते.... मेकअप आर्टिस्ट तिचा मेकअप करण्यासाठी आलेले असतात...... मेकअप आर्टिस्ट तिला तो घागरा व्यवस्थितपणे घालून तिचा छान असा मेकअप करून देतात.... तिच्या केसांची हीच छान हेअर स्टाईल केलेली असते....

मिस्टर विश्वास यांनी तिच्याच कपड्यांना मॅचिंग अशी जोधपुरी घातलेली असते त्याच्यावर तेही अगदी उठून दिसत असतात.... मोठ्या गोलाकार रिंगच्या मधोमध त्या दोघांना बसायला जागा असते.... ती रिंग रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने गोल गोल फिरून हॉलच्या एन्ट्री गेट पासून समोर असलेले स्टेज पर्यंत जाऊ लागते..... त्या रिंगच्या पाचही बाजूंनी फायर होत असतात...

भार्गवी आणि मिस्टर विश्वास या दोघांची त्यांच्या रिसेप्शनच्या हॉलमध्ये होणारी धमाकेदार एन्ट्री पाहून सगळे आनंदाने टाळ्या वाजवू लागतात.... ती रिंग स्टेज च्या जवळ जाऊन थांबते.... मिस्टर विश्वास आधी खाली उतरतात आणि मागे फिरून तिच्यासमोर आपला हात धरतात... भार्गवी एक नजर त्यांच्याकडे पाहून गालात हसून त्यांच्या हातात हात देऊन खाली उतरते.... ते दोघे पण स्टेजवर येऊन उभे राहतात.... अजूनही तिकडे जमलेली सगळी पब्लिक जोर जोरात टाळ्या वाजवूनच त्यांचे स्वागत करत असते.....

.