सावित्री

समाजप्रबोधन

"सावित्री"
सगळे खूप छान चालले होते.
पैसे फार नव्हते, पण एकमेकांवर खुप प्रेम होते. आपुलकी होती, जिव्हाळा होता.
एक दिवस अचानक गणपतला ताप भरला. जवळच्या डॉक्टर कडे नेले पण आराम पडत नव्हता.
वर्षा आपल्या लेकाला म्हणाली, सुरेश चल आपण बाबांच्या शेठजी कडे जाऊ या. तुझ्या बाबांना तालुक्याच्या गावी न्यावे लागेल. त्यासाठी पैस्याची तजवीज करावी लागेल. नवरा नाही नाही म्हणत असताना वर्षा आपल्या मुलाला घेऊन शेठजी कडे गेली.
सेठजी ह्यांना बर नाही तुम्हाला माहीत आहेच. सारखा ताप येतो.
तालुक्याच्या डॉक्टरकडे न्यावे म्हणते.
थोडे पैसे मिळतील का?
वर्षा सेठजींना विनंती करत होती.
पैसे काय मागते?
त्यांच्या अश्या बोलण्याने वर्षा पार गोंधळून गेले.
सेठजी खूप निकड आहे हो!
वर्षा म्हणाली.
अग मी समजू शकतो. म्हणून तर म्हणतो पैसे काय मागते?
म्हणजे?
म्हणजे पैसे आणि आपला सखा ड्रायव्हर आहे ना त्यालाही घेऊन जा!
वर्षाला आधी वाटले शेठजी
पैसे द्यायला आढेवेढे घेतील.
पण त्यांच्या या बोलण्याने वर्षाच्या जीवात जीव आला.
सेठजी खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद वगैरे नंतर.
चल जा लवकर !
उशिर होतो ना!
हो !
हे घे पैसे !
दहा हजार आहेत.
लागले तर परत सांग.
हो !
येते मी !
सखा दादा चला!
नुसते सखाला नाही, गाडी पण घेऊन जा!
काय?
हो!
शेठजी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही.
उपकार, आभार हा सोहळा नंतर करू या!
निघ तू आता!
हो !
शेठजी खरच लय उपकार केले बघा!
निघ आता!
उशिर होतो!
वर्षाने खांद्यावरून पदर सावरत परत शेठजीना नमस्कार केला.
गाडीत बसलो, सखा दादा गाडी जरा जोरात पळवा.
हो ताई!
ताई काही काळजी करू नका !
काही होणार नाही गणपत दादांना.
आपण लवकरच पोहचू तालुक्याच्या ठिकाणी.
दारात गाडी येताच पट्कन खाली उतरून , सखाचा आधार घेऊन नवऱ्याला गाडीत बसवले. निघाली आपल्या सत्यवानाचे प्राण वाचवायला तालुक्याच्या ठिकाणी.
आज ही टेस्ट, उद्या ती. आज एक्सरे, उद्या सोनोग्राफी. पण आजाराचे निदान होत नव्हते. गोळ्या घेतल्या तेंव्हढ्या पुरता ताप उतरायचा पावर संपली पुन्हा ताप.
एक दिवस ताप १०५ पर्यंत गेला. कपाळ थडथड उडत होत. पूर्ण अंग थरथर कापत होते.
खूप धावाधाव केली डॉक्टरांनी ,पण नाही वाचवू शकले.
वर्षा तर पार कोलमडून गेले. सगळे नातेवाईक आले.
प्रत्येक जण तिची समजूत काढत होते.
पण ती आतून तुटून गेली होती?
आता पुढे काय?
हा मोठा प्रश्न तिच्या पुढे होता.
गणपत होता तोवर ती कधीच घरा बाहेर पडली नाही.
ती म्हणायची अहो मी नोकरी करते. चार पैसे मिळतील.तेव्हढाच घराला हातभार लागेल.
तो म्हणायचा नाही, तु नोकरी करायची नाही. शिकलेली आहेस, हुशार आहे . तु सुरेश चा अभ्यास घे. प्रत्येक स्पर्धेत त्याला भाग घ्यायला लाव. बक्षीस नाही मिळाले तरी चालेल. पण त्याच्यात डेअरिंग आले पाहिजे.
बाहेरच्या जगात वावरताना हे खूप उपयोगी पडते.
वर्षाने सुरेशचा पूर्ण ताबा घेतला. प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायचा. कोणते ना कोणते बक्षीस मिळायचे.
गणपतला आपल्या लेकाचा खूप अभिमान वाटायचा.
आणि आता हे काय होऊन बसले?
कसं वाढवू मी आपल्या मुलाला?
असे विचार करत , सतत रडत असायची.
गणपतच्या अंत्यदर्शनाला संपूर्ण गाव उलटला होता.
होताच तसा तो मनमिळावू. प्रत्येकाच्या मदतीला धाऊन जाणारा.
शेठजी पण आले होते.
तसे शेठजी रोज येऊन जात होते. काय हव नको ते विचारत होते .
तेरा दिवस झाले, तेराव करून सगळे आपापल्या गावी जायला निघाले.
वर्षाचा भाऊ आणि गणपतचे भाऊ दोघेही म्हणाले आमच्या बरोबर चल.
पण सुरेश ची शाळा होती.
थोडे दिवस इथेच राहते. एखादे काम बघते. हे वर्ष संपले की येते कोणाच्या तरी आधाराने वर्षा म्हणाली.
सेठजी म्हणाले, गणपत माझा अगदी विश्वासू मूनिमजी होता. लाखोंचा हिशोब पण कधी इकडचा रुपया तिकडे केला नाही.
वर्षा शिकलेली आहे, हुशार आहे. मला वाटते गणपतच्या जागी तिने माझा सगळा हिशोब पाहावा.
मी मुद्दाम आज सगळ्यां समोर सांगायला आलो.
यांचे भाऊ म्हणाले, अजून तरी मूनीमजी पदावर एखादी स्त्री जवळ पास तरी ऐकवीत नाही.
बरोबर आहे, पण इकडे तिकडे गेल्यापेक्षा काय वाईट आहे ?
तसेही तिला काहीतरी काम करावे लागेलच. लगेच मिळेल याची खात्री काय?
देऊन देऊन तुम्ही तरी किती देणार?
शेवटी सगळ्यांना आपला संसार असतोच.
मुख्य म्हणजे माझी पत्नी सावित्री नेहमी तिच्या आजूबाजूला असेल त्यामुळे तिला एकटेपणा जाणवणार नाही.
सुरेशची आई, विचार करा आणि सांगा. तुमच्या साठी ही जागा कधीही उपलब्ध असेल.
त्या निमित्याने गणपत कायम आमच्या सोबत आहे असेच आम्हाला वाटेल.
काय वेळ आली माझ्यावर ?
वर्षा मनातच म्हणाली.
आता घराबाहेर पडून काहीतरी काम करणे गरजेचे आहेच. पोटाची खळगी भरण्यासाठी, आणि यांनी पाहिलेल्या सुरेश च्या उज्ज्वल भिविष्यासाठी.
शेवटी निर्णय घेतला. सर्वांसमोर म्हणाली ,सेठजी येते मी तुमच्याकडे कामाला.
दुसऱ्याच दिवशी पासून ती कामावर हजर झाली.
सेठजी हळुहळू तिला सगळे समजावून सांगत होते.
सेठजीची बायको सावित्री ताई कधीही दिवाणखान्यात यायच्या नाही. परंतु आता वर्षाला सोबत म्हणून ते त्यांच्या बायकोला मुद्दाम दिवाण खाण्यात येऊन बसायला सांगत.
हळूहळू वर्षा त्या घरात खूप रुळली.
सावित्री आणि सेठजी वर्षाचा डबा सुध्दा शेअर करत होते. एक दिवस वर्षाने तांदळाच्या भाकरी डब्यात आणल्या होत्या.
पांढरी शुभ्र लुसलुशीत अर्धी भाकरी शेठजीना वाढली.
त्यांना भाकरी खूपच आवडली. वर्षाच्या डब्यातली संपूर्ण भाकरी खाऊन म्हणाले , सावित्री ही अर्धी तुला ठेवतो. तू पण बघ चव.
वर्षाला आपल्या कडील चपात्या दे.
त्या घरात आता वर्षा घरातीलच एक मेंबर झाली. तिच्या डब्यातले साधेच पदार्थ दोघे आवडीने खात होते.
त्यांचा मुलगा सतीश तिला मावशी म्हणून हाक मारत होता.
सतीश आणि सुरेश पण चांगले मित्र झाले होते.
ती सुध्दा सावित्रीला बाईसाहेब म्हणता म्हणता ताई कधी म्हणायला लागली तिचे तिलाच कळले नाही.
एक दिवस जेवत असताना शेठजीना जोरात ठसका लागला.
अहो वर बघा!
सावित्री ताई म्हणाल्या.
पाण्याचा ग्लास त्याच्या हातात दिला.
वर्षाच्या तोंडून जीजू वर बघा आणि कोरड्या भाकरीचा तुकडा खा!
हे घ्या!
सावित्री , वर्षा जीजू म्हणाली तसे तिच्या कडे पाहायला लागली.
वर्षाच्या लक्षात आले.
चुकले आपले!
सॉरी ताई!
सेठजी सॉरी!
काल माझी मोठी बहीण आणि जीजू आलेले. असाच त्यांना ठसका लागला. कालची घटना जशीच्या तशी घडली म्हणून चुकून जीजू निघाले तोंडातून.
खरच सॉरी!
वर्षा अग सॉरी काय?
बाईसाहेब म्हणता म्हणता मी ताई झाले. माझा मुलगा तुला मावशी म्हणतो. मग माझा नवरा जीजू नाही का?
जीजूच म्हण.
वर पाहिले,कोरडी भाकरी खाल्ली सेठजीचा ठसका कमी झाला.
ते सुध्दा म्हणाले वर्षा खरच जीजू बोल.
हीचे वडील एकटे . त्यांची ही एकुलती एक लेक. मेहुणी मेहुणा कुणीच नाही. त्यामुळे अशी हाक मारणारी तू
पाहिलीच.
जीजूच म्हण!
चला ठसका लागला बरच झालं. माझं जीजू नावाने बारस झालं.
चला नविन नात्याची सुरूवात आईस क्रीम खाऊन करू या .
सावित्री सुरेश साठी पण आणतो .फ्रीज मध्ये ठेवशील. माझा भाचा का सोडायचा?
हास्याचे कारंजे फुलले.खेळी मेळीच्या वातावरणात आईसक्रीम खाऊन कामाला लागले.
सावित्री मनात म्हणाली, किती लाघवी आहे ?
देवाने खरच तिच्या बाबतीत क्रूर थट्टाच केली.
गणपत पण किती चांगला आणि ईमानदार होता. देव चांगल्याच माणसाला नेतो वाटते नेहमी.
म्हण आहेच ती," जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला."
बिचारा सुरेश!
बापा विना पोरका झाला.
किती स्वप्न होते त्याचे आपल्या लेका बद्दल?
वर्षा नक्की करेल त्याचे स्वप्न पूर्ण. तिला आता फक्त आधाराची गरज आहे.
आपण देऊ तिला तो आधार. मानसिक आणि आर्थिक सुध्दा.
सावित्री वर्षाला काय काय आणि कशी मदत करायचे विचार करत होती.
सुरेशला क्लास लावू या. अशी कितीशी फी आहे?
भरू आपण.
त्याला जे शिकायचे ते शिकवू. गणपत सारख्या प्रामाणिक माणसाचे ऋण फेडण्यासाठी हेच योग्य आहे.
दुपारी काम आटोपून नवऱ्या सोबत गप्पा मारता मारता म्हणाली ,अहो ! आपण सुरेशला पण क्लास लावुया का?
सतीश सोबत तो सुध्दा जाईल . दोघे मिळून वर्षा चे काम होई पर्यंत इथेच मागच्या रूम मध्ये अभ्यास करतील.
हुशार आहे तो. त्याच्या नादाने आपला लेक पण अभ्यास करायला लागेल. तसा अभ्यासात थोडा कच्चाच आहे तो.
खरच ग!
माझ्या हे लक्षात आलेच नाही. बरं झाल तू सुचवलं.
वर्षा माझा विचार आहे सुरेशला पण क्लास लावू या.
सतीश सोबत तो सुध्दा जाईल आणि मग घरी येऊन दोघे थोडावेळ खेळून अभ्यास करतील.
ताई तुम्ही माझ्यासाठी खूप करता. आजकाल सख्खे सुध्दा इतके करणार नाही.
ताई खरच त्याला क्लास ची गरज नाही. मी गेल्यावर घेते त्याचा अभ्यास.
तो पण करतो. आता तर खूप जबाबदारीने करतो.
सगळ खर वर्षा. पण सतीश बरोबर गेला तर अजून चांगले मार्क मिळतील. चांगल्या कॉलेज मध्ये अडमिशिन होईल. चांगल्या पगाराची नोकरी लागेल. मुख्य म्हणजे सतीश सुध्दा त्याच्या बरोबर जरा अभ्यास करायला लागेल. नापास होत नाही पण साठ च्या वर टक्के नसतात.
असे असेल तर ठीक आहे ताई, लावूया क्लास. पण फी भरेन मी.
वर्षा ह्यावर आता तू काही बोलणार नाही समजले!
नाहीतर मी बोलणार नाही तुझ्याशी!
ताई तुला जे योग्य वाटेल ते कर!
पण अबोला धरू नको!
तुझ्या सारखी बहिण मिळायला भाग्य लागत.
बस ! बस!
किती ते ताईचे कौतुक? सुरेश क्लासला जायला लागला.
सतीश पाचवीत आणि सुरेश चौथीत एक वर्षाने मागे पुढे.
शाळा एक, आता क्लास आणि अभ्यास करायचे ठिकाण एक. दोघांची चांगलीच प्रगती होत होती.
आज ताईला थोडी कणकण जाणवत होती. Crocin खाल्ली वाटले पडेल आराम. पण दोन दिवस काही आराम पडला नाही. आज ताई एकदम गळून गेली. बसली तरी जागेवर पडायची. उभे राहणे दूरच.
डॉक्टर कडे घेऊन गेले.
डॉक्टर म्हणाले बहुतेक शरीरातील सोडियम चे प्रमाण कमी झाले असावे. त्यांच्या प्रकृती वरून तरी असेच वाटते. त्यांना आधीपासून थोडे थकल्या सारखे वाटत असणार. पण त्यांनी दुर्लक्ष केले.
टेस्ट केल्या, डॉक्टरचां अंदाज खरा ठरला. सोडियम चे प्रमाण अतिशय कमी झाले होते.
लगेच ट्रीटमेंट चालू केली. डॉक्टरांच्या लक्षात आले, त्यांच्या किडन्या निकामी होत चालल्या. Medicine चालूच होते. दोन दिवसात काहीच फरक पडला नाही.
आज दुपारी, वर्षा समोर त्यांच्या छातीत कळ आली. सावित्री छाती चोळत होती.
वर्षा माझे काही खरे नाही. मला तुझ्याशी बोलायचे आहे.
ताई नंतर बोलू.
खूप बोलूया, आधी तू बरी हो!
वर्षा मला खूप महत्वाचे बोलायचे आहे.
हो ताई!
घरी गेल्यावर !
तितका वेळ नाही!
ताई असे अभद्र बोलू नको !
पुन्हा तिने छातीला हात लावला एक जोराची कळ आली असावी तिच्या चेहर्या वरून दिसत होते.
वर्षा, सतीशची आई होशील?
माझ्या जयला सांभाळशील ?
माझे काही खरे नाही.
तिच्या बोलण्याकडे वर्षाचे लक्षच नव्हते.
सिस्टर, डॉक्टर म्हणून वर्षाने जोरात आवाज दिला. ताबडतोब सगळे धावत आले.
डॉक्टरांची धावपळ सुरू झाली बघता बघता सावित्रीने प्राण सोडला.
डॉक्टरांनी नाडी पाहिली. म्हणाले ,
"she is no more."
वर्षाने जोरात ताई म्हणून हंबरडा फोडला.
जीजू!
जीजू!
ताई बघा!
जीजू तुम्ही उठवा ताईला. झोपली ती!
डॉक्टर खोटे बोलतात.
सेठजी शून्यात हरवून आपल्या पत्नीची डेड बॉडी पाहत होते.
बघता बघता ते बेशुद्ध झाले.
वर्षा ने डोळे पुसले. त्यांच्या सर्व नातेवाईकांना फोन लावला. तिच्या नातेवाईकांना पण फोन केला .
शेठजी शुध्दीवर आले. सतीशला धरून खूप रडायला लागले . वर्षा दोघांची समजूत काढत होती.
खरतर आतुन तीच तुटून गेली होती. पण परिस्थिती अशी होती की ती अश्रू ढाळू शकत नव्हती. तिला त्या दोघा बाप लेकांना धीर द्यायचा होता.
सेठजी म्हणत होते, वर्षा सगळ संपल!
तुझी ताई गेली आपल्याला सोडून !
सतीश आई गेली बाळा आपल्याला सोडून!
दोघे बापलेक एकमेकांच्या गळ्यात गळे टाकून हमसून हमसून रडत होते.
सगळे नातेवाईक आले. सावित्रीचा अंतिम संस्कार झाला.
सतीश वर्षाला बिलगून बसला होता.
दुसऱ्या कुणाकडेच तो जात नव्हता.
वर्षा समजून चुकली ही वेळ घरी जायची नाही. सतीशला आईच्या मायेची गरज आहे.
वर्षा सतीश आणि सुरेश दोघांना घेऊन झोपली.
सतीश झोपेत आई ! आई ! करून दचकून उठत होता. वर्षा त्याला आपल्या पोटाशी घेऊन थोपटवत होती.
वर्षा घरातल्या सारखी सगळ करत होती. सतीश जाता येता मावशी मावशी करून वर्षाला बिलगायचा आणि रडायचा.
सतीशचे आजोबा आणि काका बाहेर बोलत होते. मला वाटते जयचे लग्न करून द्यावे. तुला काय वाटते सुजय.
मला ही तसेच वाटते. आई असती तर काही प्रोब्लेम नव्हता. सगळ्या कामाला बाई ठेवल्यावर तिने सतीश आणि दादाकडे लक्ष ठेवले असते.
काही झालं तरी घरात बाई माणूस हवेच. खरय तुझ.
सुजय, मला काय वाटते सांगु का?
आपण वर्षाला याबद्दल विचारावे.
बाबा माझ्या मनात देखील हाच विचार आला. पण तुम्हाला माझे म्हणणे पटेल का ?
याची भीती वाटत होती.
अरे आपल्या मुलाचे आणि नातवाचे सुख पाहायचे मला. आल्या पासून बघतो. छान रुळली घरात. सतीश मावशी म्हणून आईच्या मायेनं तिच्या जवळ जातो. ती तितक्याच मायेनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. त्याचे अश्रू पुसते.
काल रात्री तो पुन्हा आईची आठवण काढून रडत होता. तर ती त्याला म्हणाली, चल तुला आई दाखवते .
मग ती त्याला टेरेस वर घेऊन गेली सोबत सुरेश पण होता. दोन मोठे तारे जवळ जवळ चमकत होते.
हे बघ सतीश, ही टपोरी चांदणी आहे ना ती तुझी आई. आकाशातून तुला पाहते.
तू रडत असला की ती दुःखी होते. मग तिचा प्रकाश आपोआप कमी होतो. तू आनंदात असेल तर ती अशीच चमकत राहते .
सतीश ने डोळे पुसले. आई मी नाही रडणार आता. तू अशीच माझ्याकडे बघत राहा.
सुरेश म्हणाला आई, ती दुसरी चांदणी माझे बाबा असावे हो ना !
मी आता त्यांची आठवण काढतो पण रडत नाही. म्हणून ती कायम चमकत असते.
हो ना!
हो!
सतीश !
तु पण रडू नको !
मग तुझी आई पण अशीच चमकत आपल्याला पाहत राहील.
मावशी माझी आई आणि सुरेशचे बाबा दोघे फ्रेन्ड झाले असतील का ग?
तू नाही का आईची बेस्ट फ्रेंड झाली होती.
हो आता ते दोघे फ्रेंड झाले. आणि तुम्हा दोघांना सारखे बघत असतात.
मावशी मी आज पासून नाही रडणार.
शहाणे माझे बाळ!
चला आता झोपू या!
चला आता मी गोष्ट सांगणार दोन पिल्लांना!
दोघे वर्षाला धरून खाली आले.
मी सगळ बोलण ऐकत होतो.
नकळत माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
योग्य वेळेची वाट पाहून हा विषय काढू.
सावित्री गेल्यापासून ही पोरं घरी सुध्दा गेली नाही. एकदा जाऊन कपडे घेऊन आली तेव्हढेच.
खरय बाबा, मी पण बघतो.
बघू त्या वरच्याची काय मर्जी आहे ते.
मी मुलांना पण बोलतांना ऐकल. एक दिवस सतीश सुरेशला सांगत होता. घरात मोठे लोक बोलतात आता जय चे दुसरे लग्न करून द्यायला पाहिजे.
सुरेश खरच माझे बाबा दुसरे लग्न करतील का रे?
आणि केले तर ती आई माझ्या आई सारखी माझ्यावर प्रेम करेल का?
सुरेश मला नको सावत्र आई!
अरे सतीश पण मग तुमचे सगळे कोण करणार.
माझे बाबा गेले, पण आईने नोकरी करून घर आणि मला सांभाळले. कारण ती एक स्त्री होती.
तुझे बाबा नाही करू शकणार हे सगळे. तुला आई आणावीच लागेल.
ये सुरेश आपण असे करूया का, तुझ्या आईचे आणि माझ्या बाबांचे लग्न करून देऊ.
बघ तुला बाबा मिळतील आणि मला आई.
कल्पना चांगली आहे, पण मोठे तयार होतील का?
आम्ही किती गरीब आहोत?
सगळा खर्च तुझे बाबाच करतात.
अरे म्हणूनच तर !
तेच सगळ करतात!
मग लग्नच का नाही?
हे मी नाही सांगू शकत.
पण मला आवडेल वर्षा मावशी माझी आई झाली तर!
सुरेश तुला चालेल का?
माझे बाबा तुझे बाबा होणार हे.
आपण खूप ठरवू रे!
पण तुझे बाबा आणि माझी आई तयार व्हायला पाहिजे ना!
मी बोलतो माझ्या बाबांना लग्नच करायचे असेल तर वर्षा मावशी सोबत.
आई म्हणून मला फक्त वर्षा मावशीच हवी. दुसरी कोणी नको.
तू पण बोल , मला बाबा पाहिजे. जय काका मला बाबा म्हणून चालतील.
अरे पण माझी आई नाही करणार लग्न. आणि मी डायरेक्ट असे कसे बोलणार जय काका मला बाबा म्हणून चालतील.
मग आपण असे करू, जेव्हा मोठे लोक लग्नाचा विषय काढतील तेव्हा मी म्हणेल वर्षा मावशी मला आई म्हणून पाहिजे दुसरी कोणी नको.
मग तू बोल जय काका मला बाबा म्हणून खूप आवडतील. आम्हाला दुसरे आईबाबा नकोत.
हो चालेल !
आपण असेच करू!
दहावे, तेरावे झाले.
गोड घास करून झाला.
सगळ्यांची जायची तयारी झाली.
वर्षा जयच्या वडिलांना म्हणाली, काका आता मला घरी जायला पाहिजे. इथे तुम्ही येऊन राहा. सगळ्या वरच्या कामाला बाई लावायला सांगा. सकाळी मी लवकर येऊन दोघांचा स्वयंपाक करून देते. आणि रात्री जातांना रात्रीचा. मला काहीच प्रोब्लेम नाही.
सुरेश बरोबर सतीशचा अभ्यास पण घेते. काही काळजी करू नका.
शक्य असेल तर तुम्ही थोडे दिवस थांबा. शेठजी खूप एकटे पडले. ताई शिवाय राहण त्यांना खूप जड जाणार. त्या दोघांचे खूप प्रेम होते एकमेकांवर.
वर्षा मी विचार करतो, जय चे दुसरे लग्न करून द्यावे.
तुला काय वाटते?
काका असे झाले तर उत्तमच. पण शेठजी तयार होतील याची खात्री नाही.
माझे मिस्टर गेल्यापासून पाहते मी त्या दोघांना. फार प्रेम एकमेकांवर. सहजासहजी तयार होणार नाही ते.
पण हा, सतीशचा विचार केला तर ते कदाचित हो म्हणतील. तसा लहानच आहे तो. आईच्या मायेची खरच गरज आहे.
आईच्या इतक्या जवळ होता तो, की रात्री बेरात्री उठून रडत बसतो.
सगळे आपापल्या घरी गेल्यावर शेठजी ना खूप जड जाणार हे.
ठिक आहे, बघू काय ते. त्याला लग्नाला तयार करतो.
ठिक आहे काका!
तुझी आई आलेली, गेली का ?
नाही !
उद्या जाणार आहे.
उद्या जायच्या आधी भेटून जायला सांग !
हो काका!
ऑफिसला येताना घेऊनच येते.
आज सगळेच पाहुणे गेले.
काका, रात्री सतीश कडे लक्ष ठेवा. रोज माझ्या कुशीत झोपत होता. रडत उठतो तो, आई, आई करून.
किती काळजी करते ग?
काका ! माझे मिस्टर गेल्यावर माझे काय झाले असते ?
आज मी कुठे तरी लाचारा सारखी कोणाच्या तरी आश्रयाने उभी असती. ताई आणि शेठजी यांनी मला लगेच यांच्या जागी कामावर ठेऊन घेतले.
आता माझ्या मुलाचे शिक्षण याची पूर्ण जबाबदारी घेतली .अशी ही देव मानस. . त्यांच्या वाट्याला हे दुःख यावं.
देव खरच खूप निष्ठुर आहे.
अग देवाचा काय दोष! त्याचं आयुष्यच तेव्हढ होत.
तुझ्या बाबतीत पण तेच झाले.
नशिबाचे भोग आमच्या!
बरं जेवण बनवून ठेवले जेवून घ्याल. मी सकाळी येते आईला घेवून.
ओके!
जय चे वडील विचार करत राहिले. वर्षाच्या आई सोबत बोलतांना उद्या कशी सुरुवात करायची.
मग विचार केला तूर्तास इथे राहायला सांगु. पुढचे पुढे बघू.
पहाटे पहाटे डोळा लागला. सतीशच्या आई ! आई ! करून दचकून उठल्यामुळे सगळे जागे झालो.
बाई येऊन वरचे काम करून गेली. चहा करून दिला. साडे नऊ वाजले. वर्षा आईला घेऊन दारात.
आई तू बस, मी काकांना सांगून येते. आणि यांच्या नाष्टा आणि जेवणाचे बघते.
इकडे वर्षाच्या आई मनात विचार करत होत्या का बोलावले असेल मला?
वर्षा ला मागणी तर घालायची नसेल ना?
तेवढ्यात शेठजी चे वडील आले.
नमस्कार वर्षाच्या आई!
वर्षाची आई उभी राहून नमस्कार शेठजी!
अहो बसा!
काही काम होते का?
हो!
थोडे दिवस तुम्ही इथे राहू शकाल का?
इथे म्हणजे माझ्या मुलाकडे.
काय आहे ना वर्षा इथे काम करते. सावित्री होती तर काही प्रोब्लेम नव्हता.
पण आता ती नाही.
वर्षा विधवा !
लोक काहीबाही बोलायचे.
जे मला सहन होणार नाही.
तुम्ही इथे राहणार म्हणजे लोकांची तोंड आपोआप बंद होणार. वर्षा तिचे काम करून निघून जाणार.
थोडे दिवस मी आहे इथे. सगळ मार्गी लावून मगच जातो.
ठिक आहे राहते मी.
वर्षाची आई तिथे राहायला आल्या. जेवण, नाष्टा आणि सतीशला सांभाळायची मोठी जबाबदारी त्या लीलया पार पाडत होत्या.
सतीश बऱ्या पैकी सावरला. पण जय अजूनही सावरत नव्हता .
थोडा वेळ काम बघायचा आणि जाऊन झोपून जायचा.
जय चे बाबा जाऊन येऊन होते.
जय ला पुन्हा माणसात आणणे ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती.
असेच दिवस जात होते.
पुढच्या महिन्यात सावित्रीचे वर्ष श्राद्ध होते.
आता तिकडचा सगळा व्याप सुजय कडे सोपवून कायमचे जय कडे राहायचे असे ठरवून टाकले.
त्यानुसार एक एक जबाबदारीतून स्वतःला मुक्त केले.
आठ दिवसांवर श्राद्ध आले .
जयची तब्येत अधिकच खलावत चालली होती.
आता त्यांनी ठरवले काही झाले तरी आता वर्षा सोबत लग्नासाठी बोलायचे.
खात्री आहे ती होकार देणार नाही. कारण गणपत तिच्या आयुष्यातून गेला नव्हताच. तिच्या साठी तो आठवणीत अजुनही तिच्या सोबत होता. तिच्या वागण्या बोलण्यातून जाणवत होतं.
पण आता तिला तयार करावेच लागेल. तिच्या मोठ्या बहिणीच्या मुलासाठी. तिच्या भाच्यासाठी.
श्राद्धची सगळी तयारी झाली. जयला कशात काही रस नव्हता. आता आताशी थोडा वेडसर असल्यासारखा वाटत होता.
मुलाकडे सुध्दा त्याचे लक्ष नव्हते.
अश्याने कसे होणार?
माझा मुलगा उध्वस्त होणार?
नाही नाही !
त्याला यातून बाहेर काढायलाच पाहिजे!
हे फक्त वर्षाचं करू शकते .
उद्या श्राद्ध झाल्यावर सगळ्यांसमोर हा विषय काढायचा .
रात्र झाली, पहाटे पहाटे जयच्या बाबांना स्वप्न पडले. स्वप्नात सावित्री म्हणाली, बाबा जय आणि सतीश ची काळजी वाटते ना!
हो ग!
सतीश सावरला थोडा ते पण वर्षा आणि तिच्या आई मुळे.
पण जय !
त्याच्याकडे बघून जीव तुटतो माझा.
माझा सुध्दा !
सावित्री असा अर्धा डाव सोडून का गेली तू?
किती प्रेम होते तुमचे एकमेकांवर.
दोन्ही घरचा विरोध पत्करून लग्न केले.
आम्ही खूप दिवस बोलत नव्हतो. पण तुझ्या प्रेमळ स्वभावा पुढे आम्हाला झुकावे लागले.
किती सहज आपलेसे केले तू आम्हाला?
का गेलीस सगळ अर्ध्यावर सोडून?
का?
बाबा त्याचं बोलावणे आले की सगळ्यांना जावचं लागते !
गणपत नाही का अर्धा डाव सोडून गेला.
अग पण तो आजारी तरी होता.
तू तर चालती फिरती होती ना!
मला तरी वाटते तू स्वतःकडे दुर्लक्ष केले. अग दोन दिवस admit होती.
काय तर म्हणे सोडियम चे प्रमाण कमी झाले.
दोन दिवसात सगळ संपल. एकाएकी किडन्या फेल, मग हृदय विकाराचा झटका. विचारच करवत नाही.
बाबा माझे आयुष्य तितकेच होते. तितकीच आमची दोघांची सोबत होती.
सगळ खर बेटा !
पण जयला आता कसे सांभाळू ?
हा म्हातारा बाप आपल्या मुलाचे हाल नाही बघू शकणार.
बाबा, तुमच्या मनात विचार चालू आहेत ते अमलात आणा ना !
म्हणजे ?
बाबा आता हेही मीच सांगु!
काय म्हणायचे आहे तुला?
जे तुम्हाला म्हणायचे आहे तेच !
जय आणि वर्षाचे लग्न?
होय!
बाबा जयला बर करायचे असेल तर हेच करावे लागेल.
उद्या श्राद्ध करणार ना!
हो !
सगळी तयारी झाली ?
हो!
गुरूजी येतील नऊ वाजता.
पण कावळा पिंडाला शिवणार नाही ?
का?
कारण मला वर्षा आणि माझ्या जयला ऐकत्र आलेले पाहायचे आहे.
वर्षा माझ्या सतीश ची आई झालेली पाहायचे आहे.
सावित्री मी प्रयत्न करतो. पण असा हट्ट करू नको.
बाबा माझ्या जयला यातून बाहेर काढायचे असेल तर हे व्हायलाच पाहिजे.
बाबा , माझ्या छातीत जोराची कळ आली तेव्हा मला समजले होते.
मी काही क्षणाची सोबतीन आहे.
मी वर्षाला वर्षा ! वर्षा! करून हाक मारत होते.
तिला सांगत होते. वर्षा ! माझ्या सतीशची काळजी घे !तुला त्याची आई व्हायचे आहे! जय माझी अमानत आता तुला सांभाळायची आहे.
तिच्या कानापर्यंत ते शब्द गेले. पण हृदया पर्यंत नाही.
कारण मला बघून ती खूप घाबरुन गेली होती.
डॉक्टरांना, सिस्टरला आणि जीजू !
जीजू !
करून जय ला हाका मारत होती.
म्हणजे तू तिला हे बोलली.
हो बाबा!
पण तिच्या विस्मरणात गेले. उद्या तुम्ही पिंडाला कावळा शिवत नाही बघून तिला विचारा, वर्षा तुला हॉस्पिटल मध्ये शेवटच्या घटकेला सावित्री काही बोलली होती का ?
आठवेल तिला!
नाही आठवले तर, आजच्या स्वप्नाची आठवण करून द्या.
बाबा झोपा आता .
मी करते सगळ नीट.
आता वर्षा बाईला आठवण करून द्यायला जाते.
बाय !
वर्षा कशी आहेस?
ताई तू?
हो !
मीच !
ताई कशी आहेस?
फार दुःखी आहे.
का काय झाले?
माझा सतीश आई विना पोरका झाला आणि जय त्यांची अवस्था तर मला बघवत पण नाही.
ताई का गेली तू आम्हाला सोडून?
खूप खचून गेले ग जीजू .
बाबा, आई, मी आम्ही खूप प्रयत्न करतो त्यांना यातून बाहेर काढायला. पण काही उपयोग होत नाही. डॉक्टरची ट्रीटमेंट पण चालू आहे .
त्याने काही होणार नाही.
का?
अग त्यांना मानसिक आधाराची गरज आहे.
तोच द्यायचा प्रयत्न करतो. पण हाती काही यश येत नाही.
येणार पण नाही!
तू अस का बोलते ताई?
जीजू ला यातून बाहेर काढावे लागेल.
वर्षा, जय बरे होत नाही याला तू जबाबदार आहे.
ताई काय बोलते?
मी काय केले?
तू काहीच केले नाही ना म्हणून!
ताई!
माझ्या परीने मी सगळे प्रयत्न करते ग!
तुझी शपथ!
खोटं बोलते!
ताई तुझी शपथ !
वर्षा तुला आठवते , माझ्या छातीत जोराची कळ आली तेव्हा मी तुला काय बोलली?
नाही ताई !
तुझी अवस्था बघून मी इतकी घाबरले होते की माझ्या पर्यंत तुझे शब्द पोहचले नाही.
वर्षा तुझ्या कानापर्यंत पोहचले पण हृदया पर्यंत नाही.
म्हणजे ?
सांगते!
मी तुला सांगत होते, सतीश ची आई हो !
माझ्या जय सोबत लग्न कर!
जयला सांभाळ!
तुझ्या कडून हे वचन घ्यायचे होते. पण तू इतकी घाबरली होती. नुसती आरडाओरडा करत बसली.
राहिले ना सगळे .
तेच सांगायला आले मी आज.
ताई ! काय बोलते तू हे?
अगदी बरोबर बोलते.
झाली का सगळी तयारी श्राद्ध ची?
हो ताई!
मी लवकर आवरून निघते.
काही उपयोग नाही .
म्हणजे?
तू केलेल्या जेवणाला कावळा शिवणार नाही.
का ?
कारण मेलेल्या माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या तरच पिंडाला कावळा शिवतो.
माझी कुठे पूर्ण झाली?
काय आहे तुझी इच्छा?
मला तुझे आणि जयचे लग्न झालेले बघायचे आहे. सतीश ची मावशी त्याची आई झालेली बघायचे आहे.
हे जेव्हा पूर्ण होणार तेव्हाच माझा आत्मा शांत होणार.
ताई काय बोलते तू हे!
बाबांच्या मनात पण हेच आहे.
आणि मुलांच्या मनात पण.
उद्या बोहल्यावर चढायला तयार राहा.
ताई अग काय बोलते तू?
खरच मला काहीच समजत नाही!
समजून पण घेऊ नको.
फक्त बोहल्यावर चढायला तयार राहा!
येते मी !
अग जयला पण लग्नासाठी तयार करावे लागेल ना!
त्याला पटवणे जरा अवघड वाटते.
बाय.....!
ताई !
ताई!
करून वर्षा झोपेतून खडबडून जागी झाली.
तिला आठवले ताई आपल्याला काहीतरी बोलत होती. लग्न, आई असे कानावर येत होते. हेच तिला सांगायचे असेल का?
असे असेल तर ताई ने खूप मोठ्या धर्म संकटात टाकले.
माझ्या डोक्यात चुकूनही कधी असे विचार आले नाही आणि येणार पण नाही.
आता पुढे काय वाढून ठेवले त्या वरच्यालाच माहिती.
उठा वर्षा, जायचे आहे लवकर. ताईच्या आवडीचा बेत करायचा आहे ना!
पुढचे पुढे बघू. काही निर्णय त्याच्यावर सोडायचे.
सावित्री निघाली, सुरेश
आणि सतीश दोघांना एकाच वेळी म्हणाली, काय रे पोरांनो कसे आहात?
सावित्री सतिशच्या डोक्यावरून हात फिरवत होती. हलकेच आपले ओठ त्याच्या कपाळावर टेकवले.
सतीश काय रे ?
आई हवी ना तुला ?
हो!
पण तू कुठे असतेस?
अरे मी तारा बनून तुला रोज पाहते.
हो वर्षा मावशी ने सांगितले ते !
मी रोज टेरेसवर येतो तुला बघायला.
काय रे वर्षा मावशी आवडते तुला?
आई तू गेल्यानंतर तीच माझी आई झाली.
तिच्या कुशीत शिरलो की तुझ्या जवळ असल्यासारखे वाटते.
खूप चांगली आहे ना वर्षा मावशी!
हो आई!
तुला चालेल का ती तुझी आई झालेली?
काय?
तुला चालेल का वर्षा मावशी तुझी आई झालेली?
आई तू तर माझ्या मनातले बोललीस ग!
आई बाबा दुसरे लग्न करणार असेल तर मला आई म्हणून फक्त वर्षा मावशीच हवी. दुसरी कोणी नको. दुसरी कुणी आली तर मी तिला आई सुध्दा म्हणणार नाही.
माझे आणि सुरेश चे ठरले आहे. जेव्हा मोठे लोक बाबांच्या लग्नाचा विषय काढतील तेव्हा आम्ही दोघेही सांगणार आहोत मला आई म्हणून वर्षा मावशी आणि सुरेश ला बाबा म्हणून जय काकाच हवे.
अच्छा म्हणजे तुमचे आधीच ठरले तर.
काय रे सुरेश ?
तुला पण जय बाबा म्हणून चालणार आहे का?
येस!
उद्या काय आहे माहित आहे का?
हो वर्ष श्राद्ध आहे ना तुझे.
अरे वा !
तुला माहित आहे तर!
घरात सगळी तयारी चालू होती. सगळे बोलतात म्हणून समजले.
कालच वर्षा मावशी ने तुझा फोटो चकाचक पुसून काढला.
शेवटी तिच्या पदराने फ्रेम पुसत रडत होती.
फोटो बघून मला पण कसेतरी वाटले. मी तिला बिलगून रडत होतो.
आता पुन्हा नाही रडायचे. मग माझा म्हणजे आकाशातला तारा त्याचा प्रकाश कमी होतो
माहित आहे ना तुला?
आई !
दिवसभर काही वाटत नाही, पण रात्री तुझी खूप खूप आठवण येते. मी तर रोज टेरेस वर जाऊन तुला बघून येतो.
कधी कधी रडायला येत. पण नाही रडत. तू दुःखी होणार, मग तुझी चमक कमी होणार म्हणून.
शहाणे माझे बाळ !
एक लक्षात ठेव, तू आणि सुरेश जे ठरवले आहे ते नक्की होणार.
फक्त माझ्या फोटो समोर तुम्ही दोघे उभे राहून म्हणायचे आपले मिशन.
"मला आई, तुला बाबा"
चला बाबांना भेटायला जायचे आहे
जय उठा!
अहो आज श्राद्ध आहे माझे. बघता बघता ११ महिने झालेत.
अग बाई बघता बघता काय बोलते?
खूप मोठा काळ लोटला असे वाटते.
खूप वाईट दिवस गेलेत माझे.
का?
तुझ्या शिवाय जगणं ही कल्पनाच करवत नाही मला.
जिथे तिथे तू दिसतेस. कशात मन लागत नाही. कधी कधी वाटते वर्षाच्या हाती सतीशला सोपवून आत्महत्या करावी. मग विचार येतो आई नाही निदान बाप तरी असावा. मग बसतो गुपचूप.
वर्षा सतीशला नीट सांभाळेल याची खात्री आहे का हो तुम्हाला?
हो!
वर्षा त्याला तिच्या सुरेश सारखं सांभाळेल. उलट काकणभर जास्तच प्रेम करेल
हो ना!
मग मी काय म्हणते, तुम्ही वर्षाशी लग्न करा. ती सतीश सोबत तुम्हालाही सांभाळेल.
अग वेड लागल तुला?
नाही हो!
तुम्हाला यातून बाहेर काढायला मदत करते .
म्हणजे तुला काय म्हणायचे मला वेड लागले. लागले नाही पण लागेल.
आता मी काहीही ऐकून घेणार नाही. तुम्हाला वर्षा सोबत लग्न करावेच लागेल. जोवर तुम्ही मला असे वचन देणार नाही तोवर पिंडाला कावळा शिवणार नाही. कावळा शिवला नाही म्हणजे माझ्या आत्म्याला शांती नाही.
सावित्री प्लीज असे काही करू नको. मी तुझ्या शिवाय कोणाचा पत्नी म्हणून विचार करूच शकत नाही.
सगळे खरे !
पण मग माझा आत्मा भटकत राहील.
चालेल का तुम्हाला?
मला तर वाटते ही देवाचीच लीला आहे. बघा ना चार दिवसाच्या तापाने गणपत जातो.
आणि मी, मी तर अगदी चालती फिरती.
कदाचित त्यासाठीच देवाने तिला आपल्या घरी पाठवले.
तुला जे समजायचे ते समज पण मी हे लग्न करणार नाही.
तुम्हाला जे करायचे ते करा, पण मी हे लग्न लावून देणार.
माझ्या लेकाला आईच्या प्रेमाला वंचित करणार नाही.
घास ठेवला की मी वर्षा सोबत लग्न करायला तयार आहे हे पाठच करून ठेवा.
यातून सुटका नाही.
बरं बाई!करतो.
पाठ पण आणि लग्न पण.
आता तरी पिंडाला कावळा शिवणार का ?
अहो हे काय विचारणे झाले ?
पिंडाला कावळा शिवणार!
माझ्या आत्म्याला शांती मिळणार.
हलकेच तिने जयच्या ओठावर आपले ओठ टेकवले.
चला येते मी.
वर्षाच्या आईला पण सांगायचे आहे ना!
लेकीच्या लग्नाची तयारी करायला.
जय खडबडून जागा झाला.
काय वचन दिले आपण सावित्रीला स्वप्नात?
काही बाही बोलून गेलो.
सावित्री , सावित्री करून हाका मारत राहिला.
सावित्री निघाली वर्षाच्या आईला भेटायला.
आई कशा आहात, सावित्री ताई तुम्ही?
हो आई!
आई तुम्हाला नाही वाटत का हो वर्षाने लग्न करावे?
तिचा संसार करावा?
सुरेशला बाबा मिळावे?
वाटते ना!
पण ती तयार होणार नाही.
तिचे तिच्या नवर्यावर खूप प्रेम होते.
आई आता गणपत नाही. इतका मोठा पुढचा प्रवास वर्षाला एकटीला करावा लागेल.
काय हरकत आहे वर्षा जय ची बायको म्हणून या घरात आली तर!
काय?
हो आई!
बाबा, म्हणजे माझे सासरे त्यांची पण तीच इच्छा आहे.
काय?
हो आई!
आणि माझ्या सतीश ची पण!
सावित्री ताई पण बाबा
आज पर्यंत कधी बोलले नाही.
खरतर जेव्हा मला बोलवले तेव्हा मला असेच वाटले होते.
पण मला इथे राहायला सांगितले. मग मी सुद्धा तो विचार डोक्यातून काढून टाकला.
आई आता आपले सगळ्यांचे हे एकच मिशन.
आई, अहो बाबांच्या मनात तर मी गेल्यावर दोन चार दिवसात हा विचार आलेला. फक्त अमलात आणायला उशीर केला.
आई, तुम्ही वर्षा ला समजवा. माझ्या जय आणि सतीश ला खूप गरज आहे तिची.
सावित्री ताई तुमची हीच इच्छा असेल तर मी बोलते तिला. मला सुद्धा वाटते हो माझी लेक सुखात राहावी.
ठरले तर मग.
आई उद्या सकाळी पिंडाला कावळा शिवणार नाही. तेव्हा प्रत्येकाने म्हणजे, तुम्ही, बाबा आणि मुले तिघांनी आजचे स्वप्न सांगायचे.
मग वर्षाला विचारायचे तुला काही बोलली असेल तर सांग. पिंडाला कावळा अजूनही शिवत नाही. मग ती बोलेल.
तरीही कावळा शिवत नाही. मग तुम्ही सगळे जय ला विचारा तुम्हाला सावित्री काही बोलली का?
मग जय म्हणेल हो मी वर्षा सोबत लग्न करायला तयार आहे.
ताबडतोब कुंकू आणून तिच्या भांगात भरायला सांगा !
इकडे जय ने भांगात कुंकू भरले की लगेच पिंडाला कावळा शिवेल.
ठरल्या प्रमाणे सगळे करा.
सकाळी वर्षा लवकर आली. भरभर सगळे जेवण बनवले.
पान वाढले.
कावळा पिंडाला शिवेना.
सर्वात आधी बाबा बोलून गेले. जय आणि वर्षा चे लग्न करून देतो. सतीशची आई म्हणून वर्षाला या घरात स्थान देतो.
पिंडाला कावळा शिवेना.
मग सतीश आणि सुरेश आले, आपले मिशन मला आई, तुला बाबा.
पिंडाला कावळा शिवेना.
मग वर्षाच्या आई, त्याही बोलून गेल्या. पिंडाला कावळा शिवेना.
मग बाबा वर्षा जवळ गेले. वर्षा पिंडाला कावळा शिवत नाही. तुला सावित्री काही बोलली होती का?
तिच्या शेवटच्या क्षणी तूच तिच्या सोबत होती.
वर्षा गोंधळून गेली, काय आणि कसे सांगावे तिला सुचत नव्हते.
वर्षा निसंकोचपने सांग, सावित्री तुला काही बोलली का?
आज सकाळी ताई माझ्या स्वप्नात आली होती. मला जय सोबत लग्न करायचे वचन मागितले .
बहुतेक हॉस्पिटल मध्ये पण तिला हेच सांगायचे होते. सारखी म्हणत होती खूप महत्वाचे बोलायचे आहे.
बाळा मग विचार कसला करते. ये इथे आणि कर तिची इच्छा पूर्ण.
त्या विधात्याची ही लीला आहे ग!
ये आणि बोल!
पण बाबा!
आता पण नाही आणि बिन नाही. तुला वाटतं नाही का सावित्रीच्या आत्म्याला शांती मिळावी .
चल ये !
वर्षा पुढे आली
ताई मी आपल्या सतीश चां सांभाळ करेन. ताई मी जीजू सोबत लग्न करायला तयार आहे .
प्लिज!
आता तरी खा ना!
पिंडाला कावळा शिवेना.
मग बाबा जय जवळ गेले.
जय पिंडाला कावळा शिवत नाही. तुला सावित्री काही बोलली का?
नाही !
जय खोटं बोलू नको !
सावित्री माझ्या स्वप्नात आलेली.
माझ्याच नाही ती प्रत्येकाच्या स्वप्नात आलेली.
मला बोलली ती !
खर सांग काय बोलली ती ?
बाबा, जे शक्य नाही ते मी कसे बोलणार.
अरे का शक्य नाही?
तुझे सावित्री वर खूप प्रेम होते ना !
होते नाही बाबा !
आजही आहे!
त्याच प्रेमाखातर तू वर्षा सोबत लग्न कर!
तुला चालेल का सावित्री चां आत्मा भटकत राहिलेला.
अरे वर्षा कडून तिने हॉस्पिटल मध्ये शेवटच्या घडीलाच हे वचन मागितले होते.
आता कसला विचार करतो.बघ अजूनही पिंडाला कावळा शिवत नाही.
ठिक आहे बाबा !
मी या नात्याला किती न्याय देऊ शकेल सांगता येत नाही
पण सावित्रीची अंतिम इच्छा म्हणून मी वर्षा सोबत लग्न करायला तयार आहे.
जय असे बोलताच पिंडाला कावळा शिवला.
कावळा शिवला तसे वर्षाच्या आईने हळदी कुंकू चे करंडे आणले.
शेठजी वर्षाचा भांग भरा. ही सुध्दा सावित्रीचीच इच्छा आहे.
सेठजी ने वर्षाच्या भांगत कुंकू भरले.
वर्षा थरथर कापत होती. आपण करतो ते किती बरोबर ?
किती चूक ?
याचे उत्तर आता तिच्याकडे नव्हते.
सावित्री ताई ने काही पर्याय समोर ठेवलाच नव्हता.
सतीश वर्षाला आई !!!आई!!! करून बिलगून बसला.
तसाच सुरेश जय जवळ गेला त्याला बाबा म्हणत मिठी मारली.
जयचे बाबा वर्षा, जय, सुरेश आणि सतीशला जवळ घेऊन म्हणाले. आता हा म्हातारा निवांत डोळे मिटायला मोकळा झाला.
वर्षा खरच खूप खूप आभारी आहे मी तुझा .
बाबा ! आभारी तर मी तुमची आणि सावित्री ताईची आहे.
खूप विश्वासाने तुम्ही माझ्यावर हि जबाबदारी सोपवली.
मी ही जबाबदारी कितपत पेलू शकेल माहित नाही.
तेवढयात आकाशवाणी झाली.
वर्षा तू ही जबाबदारी खूप चांगल्या रीतीने पार पाडशिल खात्री आहे. म्हणूनच माझे दोन अनमोल रत्न तुझ्या हाती सुपूर्त केले.
वर्षा, ही ताई कायम तुझ्या ऋणात राहील.
आकाशवाणी बंद झाली
क्षणभर सगळे स्तब्ध होते.
सावित्री स्वतःशीच म्हणाली चला, या सावित्रीचे मिशन पूर्ण झाले.
आता पुन्हा इथे डोकवायचे नाही.
माझा मार्ग वेगळा.
"नांदा सौख्यभरे"
"सुखाचा संसार करा..."
©️®️
सौ.प्रभा कृष्णा निपाणे
कल्याण.

कृपया लेख नावानिशी शेअर करावा. परवानगी शिवाय वाचन,अभिवाचन करू नये.