रात्री मिट्ट काळोख होता, पण अंजलीच्या मनातले विचार टाळ्या वाजवत उठसूट जागे होत होते. झोप न लागून ती अंथरुणावर बसूनच उभी राहिली… पुन्हा खिडकीपाशी जाऊन उभी राहिली.“हे लग्न माझं का? … की कोणाचा डाव?”
सकाळ झाली तरी डोळ्यांखाली काळी वर्तुळं.तेवढ्यात दारासमोर पुन्हा तीच निळी SUV थांबली.
मामी आनंदाने दरवाजात गेली –“आले का परत पाहुणे होकार द्यायला?”
दार उघडताच अमर एकटाच उभा!
“तूच? आई नाही आले?” – मामीचा आवाज अचानक मंद झाला.
अमर शांतपणे घरात येत खुर्चीवर बसला.
अमर शांतपणे घरात येत खुर्चीवर बसला.
“मोगरेमावशी… मी ठरवलं आहे — या लग्नाला माझा होकार आहे.मी आई-वडिलांना स्पष्ट सांगितलं — मला अंजलीच हवी आहे.”
मामी खूश होऊन टाळ्याच वाजवते,“अरे वाह! मी म्हणतच होते माझा अंदाज चुकत नाही. माझ्यामुळे सगळं जुळून आलं.”
अमर खूप शांतपणे फक्त हसतो… एकदम न बोलता.
त्याला माहित आहे – हे सगळं मामीला तिचाच डाव यशस्वी झालाय असं वाटण्यासाठीच आहे.मुळात तर… ही खेळी त्याची होतीच! —अंजलीला त्याने आधीच मंदिरात पाहिलं होतं, हसताना… पावसात चिंब भिजताना, आणि आईला सांगून मग त्यानेच या पाहण्याचा प्लॅन आखला होता.
त्याला माहित आहे – हे सगळं मामीला तिचाच डाव यशस्वी झालाय असं वाटण्यासाठीच आहे.मुळात तर… ही खेळी त्याची होतीच! —अंजलीला त्याने आधीच मंदिरात पाहिलं होतं, हसताना… पावसात चिंब भिजताना, आणि आईला सांगून मग त्यानेच या पाहण्याचा प्लॅन आखला होता.
पण हे गुपित तो कोणालाच सांगणार नव्हता — अजून तरी नक्कीच नाही.
“म्हणजे तारिख ठरवायची का आता?”, मामी उत्साहानं विचारते.
अमर फक्त मान हलवतो —“ठरवा… जितक्या लवकर करता येईल तितकं बेस्ट.”
आता मामी लग्नाच्या जल्लोषात बुडाली.पुरणपोळ्या, वऱ्हाड, नावे, सोने–चांदी… सर्व तयारी सुरू झाली.
आता लग्नाच्या तारखा ठरू लागल्या, सोने–चांदी–साडीची यादी तयार व्हायची होती…
पण अमरच्या मनात आता पुढला डाव सुरू होता –“ह्या लग्नानंतर नवरीच नाही, हक्काने अंजलीचं आयुष्य मी बदलून दाखवणार..
मामीला होकार देऊन अमर गेला असला, तरी अंजलीच्या मनातला गुंता सुटलेला नव्हता.ती खिडकीतून त्याच्या गाडीचा पाठलाग करत पहात होती… हातात ओढणीची झालर घट्ट पकडून.
“तो इतका शांत… इतका ठाम… का?” – हा विचार पुन्हापुन्हा तिच्या मनात घोळत होता.
तिच्या नकळत ओठांवर एक हलकंसं स्मित आलं –कदाचित पहिल्यांदाच कुणीतरी माझ्यासाठी पाऊल टाकलंय… जबरदस्ती नाही, तर आदराने.”
पण तिला अजिबात माहित नव्हतं —अमरच्या डोक्यात अजून एक मोठा प्लॅन सुरू होता!हा होकार, ही लगबग…सगळंच त्याने आधीच ठरवून ठेवलेलं होतं —
“लग्नानंतर फक्त नाव नाही, तर अंजलीला आयुष्य नवं द्यायचं आहे मला…
आणि ते गुपित अजून कधीच कुणाला सांगायचं नाहीये,”
“लग्नानंतर फक्त नाव नाही, तर अंजलीला आयुष्य नवं द्यायचं आहे मला…
आणि ते गुपित अजून कधीच कुणाला सांगायचं नाहीये,”
असा निर्णय घेऊनच तो तिच्या आयुष्यात पाऊल टाकत होता.
हा लग्नाचा मंडप तिला फुलांमध्ये गुंडाळून ठेवणार होता, की जाळ्यात अडकवणार होता?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा