अगं कुठून शोधतेस,
हे असले रहस्यपट?
काय टाईमपास करशील काही नेम नाही!!!
असं म्हणून खांदे उडवत निघून जाणारा नवरा
आई प्लिज, तू कधी पासून टी व्ही सिरिअल बघायला लागलीस? काय बघतेस,
बरी आहेस ना.....
असं म्हणत खिदळणारा मुलगा
बरी आहेस ना.....
असं म्हणत खिदळणारा मुलगा
पण मी म्हणते, काय हो,
मी काय माणूस नाही?
शिक्षिका असले म्हणून काय
सारखं सारखं गंभीर राहू?
गंभीर विचार करत गंभीर
गंभीर पुस्तकंच वाचू??
मी काय माणूस नाही?
शिक्षिका असले म्हणून काय
सारखं सारखं गंभीर राहू?
गंभीर विचार करत गंभीर
गंभीर पुस्तकंच वाचू??
फेसबुक व्हाट्सएप इंस्टाचा
आलाय नुसता वीट
हे असं करा तसं करू नका
असं वागा तसं वागू नका
हे खा ते खाऊ नका
फुकट सल्ला गावभर
काय नुसती किटकीट..
आलाय नुसता वीट
हे असं करा तसं करू नका
असं वागा तसं वागू नका
हे खा ते खाऊ नका
फुकट सल्ला गावभर
काय नुसती किटकीट..
गप्पांनाही विषय नाही
सगळ्यांचीच आयुष्य उघड्यावर
कोणी काय केलं
कसे अनुभव घेतले
याचं काय नि त्याचं काय
सsssगळं
फेसबुकच्या कट्ट्यावर....
सगळ्यांचीच आयुष्य उघड्यावर
कोणी काय केलं
कसे अनुभव घेतले
याचं काय नि त्याचं काय
सsssगळं
फेसबुकच्या कट्ट्यावर....
अति बौध्दिकाचा मारा
वर्षभर वर्गात
चढता पारा
वाटतं किमान
सुट्टीत तरी
या कशालाच नको थारा
वर्षभर वर्गात
चढता पारा
वाटतं किमान
सुट्टीत तरी
या कशालाच नको थारा
म्हणून फार काही नाही
पण रोज मी सकाळी
मलाच प्रश्न विचारते
कसा घालवायचा दिवस तुला?
स्वतःलाच उत्तरं देते!
पण रोज मी सकाळी
मलाच प्रश्न विचारते
कसा घालवायचा दिवस तुला?
स्वतःलाच उत्तरं देते!
कधी मन म्हणतं झोप अजून
बघतील दोघे बापलेक
तेवढाच जरा आपल्याला
सकाळच्या कामातून ब्रेक!
बघतील दोघे बापलेक
तेवढाच जरा आपल्याला
सकाळच्या कामातून ब्रेक!
कधी म्हणते बघावा पिक्चर
कधी जाते फिरायला
आईस्क्रीम खात मजेत बसते
कार्टून फिल्म बघत हसते
जोरात गाणी लावून नाचते
रात्र रात्र वाचत बसते..
कधी जाते फिरायला
आईस्क्रीम खात मजेत बसते
कार्टून फिल्म बघत हसते
जोरात गाणी लावून नाचते
रात्र रात्र वाचत बसते..
सुट्टी म्हणजे हेच ना
हवं तसं वागावं
हवं ते करावं
खरं खुरं अगदी
मनःपूर्वक जगावं!
तेच तर करत असते तरी
लोकांना भारी होतो त्रास
'शिक्षकांना कशा निवांत सुट्ट्या'
असं म्हणत जळण्याचा येतो वास
हवं तसं वागावं
हवं ते करावं
खरं खुरं अगदी
मनःपूर्वक जगावं!
तेच तर करत असते तरी
लोकांना भारी होतो त्रास
'शिक्षकांना कशा निवांत सुट्ट्या'
असं म्हणत जळण्याचा येतो वास
पण ज्यांना ज्यांना असं वाटतं
त्यांनी शिक्षक होऊन पहावं
स्वतःच्या मनातलं दुसऱ्याच्या
गळी उतरवून पहावं
चार मुलं एकत्र जमवून
त्यांना शिस्त लावून पहावं
उद्या काय शिकवायचं
त्याची तयारी करून पहावं
एक तरी पेपर स्वतः काढून
चाळीस पेपर तपासून पहावं
गल्लीतली चार मुलं जमवून
किमान नाटक बसवून पहावं
एकदा तरी गल्लीतल्या गल्लीत
पालकसभा घेऊन पहावं
मग म्हणावं वाटलं तर
यांना सुट्टी मिळते फार....
आमची मात्र तक्रार नसते
आम्ही सहज पेलतो भार...
सुट्टीनन्तर मुलांना भेटण्यास
तरीही असतो आतुर फार!!!
त्यांनी शिक्षक होऊन पहावं
स्वतःच्या मनातलं दुसऱ्याच्या
गळी उतरवून पहावं
चार मुलं एकत्र जमवून
त्यांना शिस्त लावून पहावं
उद्या काय शिकवायचं
त्याची तयारी करून पहावं
एक तरी पेपर स्वतः काढून
चाळीस पेपर तपासून पहावं
गल्लीतली चार मुलं जमवून
किमान नाटक बसवून पहावं
एकदा तरी गल्लीतल्या गल्लीत
पालकसभा घेऊन पहावं
मग म्हणावं वाटलं तर
यांना सुट्टी मिळते फार....
आमची मात्र तक्रार नसते
आम्ही सहज पेलतो भार...
सुट्टीनन्तर मुलांना भेटण्यास
तरीही असतो आतुर फार!!!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा