Login

सुनबाई माहेरी मदत करते

सुनबाई माहेरी मदत करते
सूनबाईने माहेरी मदत करते

आजच येणार होत्या लेकीच्या सासूबाई तर इकडे सगळे जण त्यांची आतुरतेने वाट बघत होते ,घरात आवरा आवर सुरू होती ,सगळे त्यांना आवडेल तसेच जेवण होते...सगळे सात्विक होते...सगळे घाई करत होते आणि जेवणासाठी थांबून होते ,आजीची जेवणाची वेळ टळून गेली होती ,वडील ही bp च्या गोळ्या घेत असतात पण आज ते ही उशीर करत होते...

"जेवून घ्या हो बाबा आणि आजी तुम्ही अशी वेळ असते का कुठे यायची ,ते ही अचानक.." संजय म्हणाला

संजय लहान मुलगा लेकीच्या पाठचा....आई वडील ह्यांची ताई गेल्यावर काळजी घेणारा ,तालुक्यात बदली करून आलेला...म्हणजे आई वडील आणि नौकरी ह्यांच्यातील तोल सांभाळून घेत जाणारा..

"संजय त्या आपल्याला सांगू येत आहेत म्हणजे नक्कीच खास काही असेल रे...ताई ही येणार आहे..तर बघू काय खास कारण आहे.." बाबा

"ताई कशी येईल बाबा ?? आज परीक्षा आहे ना तिची शाळेत...तिचा पसारा बघेल की इकडे येईल..? "

संजय लगेच आजीला कडे ताट वाढून आणत म्हणाला आणि त्याने बाबाला ही ताट आणून ठेवले होते..

"ताई येते तर म्हणाली !! पण बघू काय वेळीच ठरते ते.."

"अहो ह्या सासूबाई म्हणजे कटकट आहे असे ऐकले मी ,शालीन ही वैतागतो त्यांच्या वागणुकीला ,नुसत्या संशय घेतात...सुनांवर कधी लेकावर कधी तरी जावयाला ही सोडत नाहीत, नुसती पैश्याची हाव हाव करते..."

"संजय असे बोलू नये बाबा ,आपल्याला तर कधी काही बोलल्या नाही त्या ,मग उगाच कश्याला नको ती दुखणे मागे लावून घ्यायची...आली ये ,जाते जा..पाहुणचार करा..साडी घेऊन हसत पाठवून देऊ..हे आपण आपल्या लेकीसाठी करत आहेत.."

संजयला बाबा कळत होते कसे आहेत ,साधेपणा ओतप्रोत भरला आहे म्हणून लोक नको तितका फायदा घेतात ,पण दुसरा जावई गुणी ,त्यांची आई वडील साधे आणि चांगले ,त्यांनी कधी त्रास दिला नाही की त्यांचे नको ते प्रकार ऐकू आले नाहीत..

तितक्यात सासूबाई येतात ,त्यांना गाडीतून घरात येईपर्यंत बाबा आणि आई घ्यायला जातात ,सोबत स्कुटीवर ताई येतेच...ती गडबडून गाडी लावते आणि सासूबाईची बॅग घेते...तिने सोबत खाऊ फळ आणलेले असतात ते घरात हळूच ठेवते...सासूबाई लगेच तिच्या त्या फळांच्या पिशव्या बघतात ,तिरकी नजर तिकडेच असते...

"आले जरा उशिराच पण अगदी वेळ साधिली मी..तुमची ताई आणि मी यायला एकच वेळ...पण ताईला फळ अनायला तुम्ही नसते सांगितले तर माझ्या आधी आली असती..."

वडील आणि संजय बघत होते ह्या असे का म्हणत आहेत ,फळ आणण्याचा आणि ताई लवकर किंवा सोबत येण्याचा काय प्रकार म्हणावा..?

"तुम्हाला त्रास तर नाही झाला ना कसला येतांना ,मुलं खेळत असतात तिथे..मग थोडावेळ गाडी थांबवावी लागली नाही ना.?" बाबा

"हम्म ,नाही तसा तुमचे घर अडचणीत आहेच ..पण यायचं हे ठरवलं होतच मग काय यावं लागलं..बाकी मी फक्त ताईने आणलेले फळ घेईल ,मी जेवण करून निघाले म्हणून उशीर झाला..."

बाबा आणि आई लगेच एकमेकांना बघू लागले ,चार वाजून गेले आपण ह्यांच्या साठी थांबलो ,आजी जेवत नव्हती आत्ता जेवली ,तर ह्यांनी आधीच कळवायचे तरी की जेवण करून घ्या म्हणून ,हे काय वागणे आहे.?

"आम्ही तुमची वाट बघत होतो ,जेवण कराल म्हणून सांगितले होते तुम्ही मग .."

"मग काय जेवण आले ना मी ,तुम्ही जेवण घ्याल वाटले होते..कश्याला तसदी घेतली ..मला हल्ली काय सांगितले ते ही लक्षात रहात नाही .."

झालं सगळे गप्प होते ,त्यांचे वागणे खटकले होते संजय तर रागात होता ,त्याला माहित होते तेच झाले.

"बरं घर तर भारी आहे..हे कपाट छान आहे ,सूनबाईने घेतलं होतं असंच... कुठे आता माहीत नाही..हे तेच तर नाही ना ?? ते शोकेस ही सून बाईने कुठे तरी बुक केले होते ,पण नेमके कुठे गेले कळले नाही ?? ती फ्रेम ही बघितली आहे वाटत सूनबाईच्या हॉल मध्ये एकदा ही ती तर नाही ना ??? "

सासूबाई हळूहळू एक एक वस्तू अश्या बघत होत्या जणू तिच्या माहेरी त्यांच्या नकळत ती आई वडिलांना वस्तू देत असते की काय...ताईला ही त्यांचा हा स्वभाव माहीत होता ,त्या मोठ्या जावेच्या माहेरी जाऊन ही अश्याच बोलल्या होत्या ,पण तेव्हा जावेने खरंच वस्तू दिल्या होत्याच पण आता मी वस्तू न देता ही सासूबाई असे बोलत होत्या की मी ह्या वस्तू घेऊन देत असते ,तेव्हा जाऊ बाईने स्वतःच्या पैश्यातून वस्तू घेऊन दिल्या होत्या आणि त्यांच्या आई वडिलांच्या घरी येऊन जो अपमान केला त्याच्या बदल्यात जाऊ बाईने तेव्हा सासूबाईंना जे केले ते योग्यच होते..

"आई हे फळ ह्या वस्तू मी तर त्यांना दिल्या नाहीत ,पण तुम्हाला त्याबद्दल बोलायचा कोणता ही हक्क नाही...आणि मी दिल्या जरी तरी त्या माझ्या हक्काच्या कमाईतून तुमच्या लेकाच्या कमाईतून नाही...मला तोंड उघडणे आणि जाऊ बाईसारखे आल्या पाऊली माघारी पाठवणे चांगलेच जमते...पण मान राखून आणि सन्मानाने मी तुम्हाला हेच सांगेन की हे तुमचे घर नाही की तुम्ही इथे माझी चौकशी कराल आणि मी करून देईल...तिथे मी ऐकते कारण तुमचा मुलगा तुमची इज्जत ठेवणार नाही...तुमचा मान माझ्या घरी फक्त माझ्या मुळे आहे ,तुमची तुमच्या घरी समाजात काय प्रतिष्ठा आहे त्याची ओळख ह्यांना आणि मला चांगलीच आहे...तुम्ही स्वतः तुमच्या माहेरी किती दिले आहेत हे बेहिशोब आहे..त्याची गिणती मला करण्यात रस नाही...माझे जर विनाकारण उकरून काढले तर तुमचे ही निघेल.."

ताईने न राहून नवऱ्याला फोन केला ,तेव्हा तो म्हणाला मी म्हणत होता कश्याला घेऊन जायचे आईला..? तिने उरली सुरली इज्जत ही ठेवली नाही..ती तुझ्या घरी तरी कशी शांत बसेल ?? तू आता आईला घरी पाठवून दे ,किंवा मी सांगतो तिला..

सासूबाई आता तोंड पाडत निघाल्या होत्या ,पण जे लोक आज इज्जत करत होते त्यांच्या मनातून कायमचा मान घालवून बसल्या होत्या... सुनेचा सन्मान न ठेवणाऱ्या स्त्रीला सुनेंच्या घरी ही मान मिळत नसतो...इथे फक्त सासूची इज्जत कमी होत नसते तर संपूर्ण घराची इज्जत कमी झालेली असते...आणि जर सुनेने माहेरी काही दिलेले सहन होत नसेल तर तेच आपण ही करू नये...नाहीतर तुम्ही ही दिले होते तर तिला ही देऊ द्या...
©®अनुराधा आंधळे पालवे
****** माहेरून मागव — कथा
" तुपात छान परतव ते काजू बदाम. आणि लाडू बनवताना अखडता हात घेऊ नकोस. " आशाबाई आपल्या सुनेला रश्मीला सांगत होत्या." हो आई परतते. " असं म्हणत रश्मीने काजू बदाम तुपावर परतून घेतले. आणि ती अक्रोड तुपात टाकणार तोच आशाबाई म्हणाल्या, " अगं थांब. अक्रोड कशाला टाकतेस ? "" आई मला लाडुमध्ये अक्रोड आवडतात. म्हणून थोडे टाकतेय. " रश्मी म्हणाली." हे बघ, भ्रमात राहू नकोस. हे लाडू स्वातीसाठी बनवायला लावतेय मी. एवढं तूप आणि काजू बदाम तुझ्यावर का उधळू मी ? तुला हवं असेल तर तुझ्या माहेरून मागव. मी कशी देतेय माझ्या लेकीला ? " आशाबाईचं बोलणं ऐकून रश्मी उडालीच.रश्मी - प्रकाशच लग्न होऊन दोन वर्ष झाले होते. नोकरीनिमित्त रश्मी प्रकाश सोबत दुसऱ्या शहरात राहत होती. रश्मीला पाचवा महिना सुरू झाला आणि प्रकाशला कामानिमित्त बाहेर गावी दोन महिने जावं लागलं. रश्मीच्या माहेरी तिची आई नव्हती म्हणून बाळंतपण सासरी करायचं असं प्रकाशाने ठरवलं. त्यामुळे बाहेरगावी जाण्यापूर्वी त्याने आपल्या आई वडिलांकडे रश्मीला सोपवलं. प्रकाशचे वडील सुद्धा कामामुळे जास्त वेळी बाहेरच असायचे.घरी आल्यापासून आशाबाईंनी तिला कामाला लावलं होत. म्हणाल्या की, " काम करत राहिलीस की डिलिव्हरी नीट होईल. " रश्मी ऐकत गेली. आज मात्र सासूचा नवीन चेहरा समोर आला. तिला लक्षात येऊ लागलं की घरात फळ आली तरी परत दिसायची नाहीत. विचारलं तर म्हणायच्या " खराब होती, तर कधी बाजूची मुले आलेली त्यांना दिली. "जेवणात तूप पण नसायचं. तिच्या त्यावेळी सगळंच एकदम लक्षात आलं. तिला आता रडू आवरत नव्हतं. ती रूम मध्ये जाऊन रडली. तिच्या मनात कधी विचार सुद्धा आला नाही की सासूबाई असं वागतील. तिला प्रकाशला सर्व सांगावं वाटत होत पण कुठेतरी तो लांब आहे. त्याला टेन्शन नको म्हणून ती गप्प होती.त्यानंतर ती जेवढ्यास तेवढं वागू लागली. जेवणात तिला मन मारावं लागत होत. तिला कधी स्वतःच्या घरी परत जाते असं झालं होत. तिला सातवा महिना लागला तसं सर्वजण डोहाळे जेवण विषयी विचारू लागले. तेव्हा आशाबाई म्हणाल्या, " आमच्याकडे सुनेचं डोहाळे जेवण तिच्या माहेरी होत. सासरी नाही. "एक दिवस प्रकाश अचानक घरी आला. सर्वाना आनंद झाला पण प्रकाशच्या नजरेतून तिची रोडवलेली शरीरायष्टी सुटली नव्हती. प्रकाशला भेटायला गावातले काही लोकं, तसेच नातेवाईक सुद्धा आले होते. तेवढ्यात घराबाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला.सर्वजण बाहेर बघत होते. रश्मीचे बाबा, भाऊ आणि आत्या आत आल्या. त्यांना पाहून रश्मी आणि प्रकाशला आनंद झाला. प्रकाशाने त्यांना बसायला सांगितलं." अचानक कसं येणं केलं बाबा ? नाही म्हणजे फोन वगैरे नाही केलात म्हणून विचारलं." प्रकाशने विचारलं" रश्मीला न्यायला आलोय. " रश्मीचे बाबा म्हणाले." अहो बाबा पण डोहाळे जेवण झालं की नेणारच आहात ना ? मग आता कशाला ? " प्रकाश आणि सासरे एकदम म्हणाले." पण तुमच्यात तर सुनेचे डोहाळे जेवण करत नाहीत ना ? म्हणून म्हणल, मुलीचं पहिलं बाळांतपण आहे. काही हौस नको राहायला म्हणून तर तिकडे सर्व तयारी करायला सांगूनच आलोय. " रश्मीचे वडील." कोण म्हणाल तुम्हांला ? की आमच्याकडे सुनेचे डोहाळे जेवण होत नाही म्हणून ? आधी पासूनच अशी प्रथा आहे ना ? की सुनेचे डोहाळे जेवण सासरी होत आणि मग सून तिच्या माहेरी बाळांतपणासाठी जाते. " प्रकाशचे वडील म्हणाले." अहो, माझ्या नणंदबाई तुमच्या नात्यातच लागतात. पंधरा दिवसांपूर्वी इकडे येणं झालं त्यांचं, तेव्हा त्यांनी आशाबाईंना डोहाळे जेवणाचं विचारलं तेव्हा त्याचं म्हणाल्या. 'आमच्याकडे सुनेचं डोहाळे जेवण नाही होत म्हणून.' माझी वहिनी नसली तरी माझ्या भाचीच डोहाळे जेवण करायचं म्हणून मी माझी शेतातली कामे सोडून आलीये. " यावेळी रश्मीची आत्या म्हणाली." काय ओ ? हे काय ऐकतोय आम्ही ? सुनेचं डोहाळे जेवण आपल्याकडे होत नाही ? हे कधीपासून सुरू झालं ? " प्रकाशच्या वडिलांच्या आवाजात कडकपणा होता." नाही तसं नाही... ते तिला जास्त लोकं आले तर त्रास होईल म्हणून म्हणाले मी. " आशाबाई सारवासराव करत होत्या.एवढ्या वेळी गप्प बसलेली रश्मी शेवटी बोललीच, " बाबा, आत्या मला तुमच्यासोबत यायचं आहे. मला घेऊन चला. "रश्मीच बोलणं ऐकून सर्वजण तिच्याकडे बघू लागले. पूर्ण वाचा लिंकवर https://irablogging.com/blog/maherun-magav_44746
0