तिचा आवाज ऐकून सासरे बाहेर आले,त्यांना बघताच सासूबाई शांत झाल्या. सासूबाई फक्त त्यांच्या नवऱ्याला घाबरत, कारण रोहनने वडील म्हणजे अगदी ज्वालामुखी. प्रचंड तापट स्वभाव, रोहनच्या आईने इतकी वर्षे त्यांना कसं सहन केलं हाच प्रश्न सर्वांना पडायचा.
"आवाज खाली जरा.. काय सुरुये तुम्हा लोकांचं?"
हे ऐकून दोघेही शांत झाले..खरं तर वडिलांना पुढे करून रोहनला आईला आवरता आलं असतं पण त्याने तसं केलं नाही, आयुष्यभर आई त्यांच्या धाकात आणि आता सासू होण्याची वेळ आली तरी तिला निर्णय घ्यायची मुभा नाहीं असं झालं असतं. वडिलांना यातलं काहीही माहीत नव्हतं. माहीत असतं तरी तुम्हा बायकांच्यात मला पाडू नका म्हणत ते सरळ बाजूला झाले असते.
रोहनचं ऐकून आई शांत राहिली. आई सुनेला मात्र खूप जपायची, नोकरी हा एक विषय सोडला तर राधाचं त्यांना सगळं आवडायचं. मनापासून त्या राधाला मदत करत असायच्या.
दीड वर्ष झालं, आता बाळासाठी प्रयत्न करा असं आईने सांगितलं. रोहनलाही ईच्छा होतीच, पण राधाने त्याच काळात एक फ्लॅट बुक केला होता, त्यामुळे आर्थिक नियोजन बघता लगेचच तिला हे शक्य नव्हतं.
एके दिवशी सासूबाईंनी राधाकडे विषय काढलाच..
"राधा, बेटा आता एखादं मूल होऊन जाऊ दे.."
"आई अहो मला नोकरीत अजून पुढे जायचं आहे, किमान पुढील काही महिने तरी माझ्यासाठी फार महत्वाचे आहेत.."
"बाळ झाल्यावर सोडणारच ना तू नोकरी? मग आत्ताच सोड.."
"नाहीं आई, मी नोकरी कधीच सोडणार नाही.."
"असं काय म्हणतेस? रोहनने तर मला म्हटलं होतं की.."
त्याक्षणी सर्व गैरसमज दूर झाला आणि दोघींमध्ये पहिल्यांदाच चांगली जुंपली..रोहनने हे पाहिलं, आणि त्याला ज्याची भीती होती तेच झालं होतं..आता पुढे काय होणार हे तयार देवाच्या हातात सोडलं..
राधा तावतावात म्हणाली,
"आई नोकरी ही केवळ गम्मत किंवा हौस म्हणून करत नसते बाई, त्यातून ती कुणावर अवलंबून राहत नाही, कुणापुढे तिला हात पसरवावे लागत नाही, ती लाचार होत नाही.."
"आजवर मी कुठे कमावले पैसे? पण ऐटीत आहेच ना उभी या बंगल्यात.. मला नाही गरज वाटली कधी कुटुंबाला सोडून हे नसते स्त्रीवादी विचार पाजळायची.."
रोहनने दोघींना कसंबसं शांत केलं..पुढचे काही दिवस दोघींमध्ये अबोलाच होता.
*****
*****
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा