Login

हट्ट-3

मराठी कथा
राधा विचारात पडते,

"त्यांना तसं वाटणं साहजिकच आहे, पण..."

"मी काय म्हणतो, तू चांगला मुलगा बघ आणि लग्न कर.."

"तेच करायचं असतं तर कधीच केलं असतं.."

असं म्हणत राधा तिथून तावतावात निघून जाते. दोन दिवस दोघांमध्ये काहीही बोलणं होत नाही.

तिसऱ्या दिवशी तिचा मेसेज येतो,

"मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, काहीतरी मार्ग काढ.."

रोहनचीही तीच परिस्थिती होती..आता त्यालाच यातून मार्ग काढावा लागणार होता. तो आईजवळ जातो आणि आईला राधाबद्दल सगळं खरं सांगतो..

"अजिबात चालणार नाही.."

आईला समजवण्यात अर्थ नव्हता. काही वेळाने राधाचा फोन आला,

"काय बोलणं झालं तुमचं? काय म्हणाल्या तुमच्या आई?"

राधाचं ते उतावीळ होणं रोहनला पहावलं गेलं नाही, तो घाईघाईने बोलून गेला..

"आईने मान्य केलं.."

राधा आनंदाने नाचू लागली, इकडे रोहनला आपण काय बोलून बसलो याचं भान आलं,पण ते वाक्य सुधारायचं म्हणजे राधाच्या सगळ्या आशा आकांक्षांना सुरुंग लावण्यासारखं होणार होतं.

रोहन गप बसला. आता जे होईल ते होईल !

दोघांचं थाटामाटात लग्न झालं, रोहनने काळजी घेतली की लग्नाआधी दोघींचं या विषयावर बोलणं होणार नाही म्हणून. लग्न करून राधा घरी आली. सुट्ट्या संपल्या आणि आठ दिवसांनी ती सकाळी 7 ला नोकरीवर निघून गेली.

सासूबाईंनी आवाज दिला पण राधा त्यांना दिसेना, त्यांनी रोहनला विचारलं..

"अरे राधा कुठेय?"

"जॉब असतो तिचा सकाळी.."

आई चा bp वाढला..तिचा प्रचंड संताप झाला..ती आदळआपट करू लागली..रोहनने आईला शांत केलं आणि म्हणाला,

"आई, ऐक.. तू लहान लेकराची फरफट होऊ नये म्हणून नोकरी नको म्हणत होतीस ना? मग त्याला अजून अवकाश आहे, मूल झालं की ती स्वतः नोकरी सोडेल.."
*****

0

🎭 Series Post

View all