हिमानी भाग 2
(सादर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)
हिमानी आणि तिचे बाबा बसमधून उतरले तर समोरच काका उभे होते. काकांनी पटकन पुढे येऊन बाबांच्या हातातली बॅग घेतली. "दादा कसा झाला प्रवास .कसा आहेस."
"मी मजेत,तू कसा आहेस .आणि प्रवास ठीकच होता."
"दादा , इकडून ये . रिक्षा उभी आहे ना तिकडे मनू ये बाळा."
मथुरा सोसायटीच्या गेटमधून रिक्षा आत आली.हिमानी त्या बिल्डिंग बघण्यात मग्न होती.
"मनू इकडून ये. ती बघ 3 नंबरची बिल्डिंग" .काका
तिघेही जण भास्कर काकांच्या घरी आले. काकूने जरा जास्तच आनंदाने घरात स्वागत केले.
हिमानी आणि बाबा नुकतेच घरात येऊन बसले होते.
"मनू ताई,अभिनंदन"अनन्या
"मनु मस्त मार्क्स मिळाले ग. So proud of u congratulsions" अश्विन दादा
दादा चल फ्रेश हो ,मनू तू अनु च्या रूममध्ये जा आणि मग जेवायला बसू . "भास्कर काका
हो, चालेल .परत उद्या सकाळी निघायचं आहे." बाबा
सगळ्यांची जेवण झाली तशी मनु काकूला मदत करायला गेली.
"अग राहू दे. प्रवासाने दमली असशील.जाऊन झोप."
"ठीक आहे काकू." हिमानी निघून गेली.
"आजचा दिवस नंतर तुलाच करायचं आहे.त्यासाठीच तर तुला इथे राहून देतेय." काकुनी मनातच विचार केला. तिला काकांच आणि तीच रात्रीच बोलणं आठवलं.
'उषा,जरा शांतपणे विचार कर.मनू इथे राहिली तर तुलाच फायदा होईल.तुला घरातल्या कामात तिची मदत होईल, ती अनु चा अभ्यासात मदत करेल. तुला तुझ्या पार्लरकडे जास्त लक्ष देता येईल. तिच्याशी जरा चांगली वाग बघ तू बोलशील ते ऐकेल ."
"काका, अजून झोपला नाहीत. कुठल्या विचारात आहेत ." हॉल मध्ये बसलेल्या काकांना हिमानीने आवाज दिला.
"जातोच आहे.मनु तुझ्या लक्षात आहे ना .मी काय सांगितलं ते, अभ्यास जास्त महत्वाचा आहे .काकी शी जमेल तेव्हढं छान बोल. ठीक आहे.काही वाटलं तर मी आहेच."
"काका पण उगाच टेंशन घेतात. मला खूप शिकायचंय.
बाबांना माझा अभिमान वाटायला हवा. आईला आनंद होईल असं. "
-------
दुसऱ्या दिवशी सकाळीच बाबा परत निघून गेले.
पुढच्या आठवड्यात हिमानीच कॉलेज सुरू होणार होत.
काकांनी तिच्यासाठी ट्युशन पण शोधलं होत . तिने नाराजी व्यक्त केली. पुन्हा काकांनी तिला समजावले , घरी किती अभ्यास होणार आहे त्यांना माहीत होते. समोरच्या बिल्डिंगमधली रेवती ताई कडे तिला ट्युशन सुरू झाले.
सकाळी 8 वाजताच ट्युशन होत, तर कॉलेज दुपारचं होत.
कॉलेजच्या दोन दिवस आधीच तीच ट्युशन सुरू झालं.
________________________________
आज तिचा कॉलेजचा पहिला दिवस होता.
तिची सर्व तयारी झाली होती.नवीन पुस्तक तिने नीट बॅगमध्ये भरली. टिफिन आणि बॉटल घेतली. कॉलेजचा युनिफॉर्म घातला.आणि तयार झाली.तीच मन बैचेन झालं होतं. नवीन जागा ,नवीन टीचर थोडीशी नर्व्हस झाली होती.
"मनू ताई,चल नाहीतर उशीर होईल.बर झालं तू आमच्या स्कुल मध्ये ऍडमिशन घेतलं.आता आपण एकत्र जाऊ. फक्त आपली बिल्डिंग वेगळी आहे."
"हो, तू आहेस म्हणून जरा बरं वाटतंय.येताना पण एकत्रच येऊ.मी कुठे उभी राहू सांग."
"हो सांगेन,चल तुला रस्ता पण दाखवते.घाबरू नकोस."अनुने तिचा हात पकडून रास्ता क्रॉस केला.
दोघीही त्यांच्या इच्छित ठीकाणी आल्या
"आलो पण लगेच" हिमानी
"हो,मग तुला काय वाटलं खूप लांब असेल.20 मिनिटं लागतात घरून यायला. ह्या दरवाजातून आत जा. हे तुझं कॉलेज आहे. आणि माझं स्कुल इकडे आहे.ok तुझं कॉलेज आधी सुटेल तर तू ना तिथे थांब.
ठीक आहे. Bye ऑल द बेस्ट " बोलून अनु तिच्या वर्गात गेली.
"चला हिमानी नवीन आयुष्य तुमची वाट पाहत आहे. बी कॉन्फिडन्ट.हिमु "हिमानी मनातच बोलत तिच्या क्लास रूममध्ये पोचली.
वर्ग अर्धा भरला होता.तिने पाहिलं तीसरा बेंच रिकामा होता.ती पटकन जाऊन बसली. थोड्यावेळाने बेल वाजली तशी सर्व मूल वर्गात आली. एक चष्मीश मुलगी तिच्या बाजूला बसली.
Hi, मायसेल्फ मोहिनी जोशी.
Hi, मी हिमानी कदम.
ओह,नाईस नेम,वेगळंच आहे.मिनींग काय त्याच
"हिमानी हे देवी पार्वतीच नाव आहे. आणि हिम म्हणजे बर्फ."हिमानी
"ओह, फ्रेंड्स."मोहिनी
"Ok friends " हिमानी
तेव्हाच टीचर येतात.सर्व स्टुडंट ची ओळख होते. आणि शिकवायला सुरुवात करतात.
______________
हिमानीच कॉलेज आणि ट्युशन नीट चालू असत. ती व्यवस्थित सगळं मॅनेज करत असते.काकूंला मदतपण करत असते. अनु बरोबर तर तीच खूप चांगलं जमलेल असते.दोघींमध्ये एक वर्षाचंच तर अंतर असत. मधूनच ती बेस्टी आजीशी फोनवर बोलत असते.
11वि च वर्ष पूर्ण होत. मोहिनी बरोबरची मैत्री पण छान झाली असते.
12 वि चा अभ्यास सुरू होतो.तिने तीच टाईमटेबल सेट केलेलं असतं. सकळी लवकर 5 वाजता अभ्यास कारायला उठत असते. सकाळी थोडीशी किचन मध्ये मदत करणे. ट्युशनची वेळ बदलली होती.9 ते 11
तिकडून आल्यावर ति पटापट आवरून लगेच कॉलेजमध्ये जायची. कॉलेज मधून आल्यावर पण संध्याकाळी काकू तिला किचनमध्ये बोलवायची.
"मनू, नुसता अभ्यास करून काही होत नाही,घरातली कामही यायला हवीत. म्हणून मी तुझ्या मागे लागते.नाहीतर तुला वाटेल मी तुला कामाला लावते. तुला माझा राग आलं का" काकू
"काकू, मला असं काही वाटलं नाहीये, आणि राग तर बिल्कुल नाही आला. मला सातवी असल्यापासून आईने घरातील काम शिकवली आहेत
मी जेव्हा दहावीला होते ना,तेव्हाच जेवण बनवायला शिकले. "
ती सगळं खूप मनापासून करत होती.
___________________________
आज हिमानीचा कॉलेजचा सेंड ऑफ (निरोप समारंभ )असतो.
हिमानी ने छान शी आंबा कलरची पैठणी नेसली असते. तिच्या बेस्टी आजींनी निघताना दिलेली असते.
तिला थोडी बेचैनी वाटत असते. तिने इकडे आल्यावर पहिल्यांदाच साडी नेसली असते.
ती कॉलेज मध्ये येते. कार्यक्रम खूप छान पूर्ण होतो. ती घरी जायला बाहेर येते, तितक्यात एक कार तिच्या बाजूला येऊन थांबते.आतून आवाज येतो
"आत येऊन बस, उशीर होतोय.कोणालातरी तुला बघायचंय".
"कोण आहे,ती कशीतरी साडी सावरत बोलते.
"आतमध्ये ये म्हणजे कळेल."
"मी का येऊ." म्हणत ती पुढे होते
तोच मागून आवाज येतो.
"माकडीण, आवाजपन विसरली का"
तिने मागे वळून पाहिले हळूच पुटपुटली ताड माड च झाड .
"काय, त्याने डोळे बारीक केले
"रुरू रुक्ष सॉरी रुद्राक्ष इथे कसा आलास."
"आज तुझा सेंड ऑफ आहे. तू छान साडी घालून सुंदर मेकअप केलास तर आजीला तुला पहायचं होत.तिनेच मला इथे पाठवलंय. तू गाडीत बस मी आजीला व्हिडीओ कॉल करतो "रुद्राक्ष
"Ok बेस्टी आजीला पहायचं आहे ठीक आहे "म्हणत ती लगेच गाडीत जाऊन बसली.
त्याने गाडी चालू केली.
"अरे,तू कॉल करतोयस ना मग गाडी का स्टार्ट केलीस. कुठे नेतोयस मला."
"अग हो थांब जरा. गाडी जरा साईडला घेत होतो.तुला कशाला मी कुठे नेऊ"
त्याने आजीला विडिओ कॉल लावला.
"हॅलो बेस्टी काशी आहेस"?
"मी मस्तच तू कशी आहेस. बघू तरी दे कशी दिसतेस.
"वाह,मनू कित्ती सुंदर दिसतेस"
खुपसाऱ्या गप्पा झाल्या.
"रुद्रा जरा तिचे 2-3फोटो काढशील का तुझ्या फोनमध्ये. नंतर मला सेंड कर. "
"ठीक आहे."
त्याने तिचे 4-5 फोटो क्लिक केले.
"निघते मी आता बराच वेळ झाला"
"मी सोडतो तुला"
"नको, इथून जवळच आहे. तसही तुला उशिर होत असेल.
Bye आणि थँक्यु आज खूप दिवसांनी आजीशी बोलली तिला बघितलं मला खूप मस्त वाटतंय.थेंक्यू."
"युवर वेलकम.आजीच्या आनंदासाठी मी काहीही करु शकतो."
"हे,घे त्याने एक कॅडबरी डेरि मिल्क तिच्या हातावर ठेवली.
"ही कशाला.मी लहान नाहिये."
'आजी ने दिलीय."
"ठीक आहे" म्हणत तिने गपचूप कॅडबरी घेतली आणि गाडीतून उतरली.
घरी आल्यावर ति पटकन फ्रेश झाली. आणि काकूंला किचनमध्ये मदत करायला गेली. तिला दोन वर्षात काकूचा स्वभाव कळला होता. ती तिच्या कलेने घेत होती.
आजच तिचा 12 विचा लास्ट पेपर होता. तिला सुट्टीत गावी जायचं नव्हतं.म्हणून तिने सुट्टीत बेसिक कॉम्पुटर चा क्लास लावला. ती खूपच लक्षपूर्वक एक एक गोष्ट शिकत होती.तिचा कॉम्पुटर क्लास पूर्ण झाला .आता सगळे तिच्या 12वीच्या रिझल्टची वाट बघत होते.
तिच्या अपेक्षेप्रमाणे तिला 12वीला पण फर्स्टकलास आला होता.
काकांना खूप आनंद झाला. त्यांनी काकूला हिमानीची आवडती खीर पुरी बनवायला संगीतली.
काकी आतून नाराज झाली होती.हिमनीचा रिझल्ट काकूला आवडला नव्हता.तिला जर कमी मार्क्स मिळाले असते तर पार्लर चा कोर्स लावून दिला असता आणि स्वतःच्या हाताखाली पार्लर मध्ये ठेवलं असतं.पण नेमकी ती फर्स्टकलास मध्ये पास झाली.त्यात तिला शिकण्याची आवड होती. म्हणजे आता ती मोठया कॉलेज मध्ये जाणार.आता घरात काम कोण करणार. काकू विचार करत होती.
"काकू, पेढा घे."हिमानी ने काकूला पेढा भरवला.
______________________
क्रमशः
कथेचा हा भाग कसा वाटला नक्की सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा