हिमानी भाग 1
(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे .)
"मनु, हे घे भर बॅगमध्ये पकड "आई ने एक पिशवी आणून तिच्या हातात ठेवली. "Ok, काय आहे असं" म्हणत अगदी उत्साहाने तिने बघितले आणि हसायला लागली.
"काय ग काय झालं हसतेस का? बरी आहेस ना की मुंबई ला शिकायला जातेस तर वेडी झालीस."
" आई स्वेटर थंडी आहे का आणि मुंबई मध्ये कुठे थंडी असते ."
"हो, ठेव गपचूप. तुला जरा पण थंड गार वार सहन होत नाही, माहितीय ना असू दे ." ठीक आहे."
मनु इकडे ये बस जरा माझ्याजवळ नीट ऐक". आईने मनूला हात पकडत तिला बसवलं "हं बोल काय झालं"
"हे बघ तू तिथे शिकायला जात आहेस.जरी काका आपला असला तरी काकु माहितीय न कशी आहे. तिच्याशी चांगली वाग. उलट उत्तर दयायची नाहीत,हणजे तिला तक्रार करायला कारणच देऊ नकोस. जमेल तेव्हडीच कामात मदत कर.अभ्यास महत्वाचा.ठीक आहे बाकी तू हुशार आहेस. उगाच का 10 विला शाळेत पहिला नंबर काढलयेस."
मनू ने आईच्या हातावर हळूच दुसरा हात ठेवला. "Ok आई नको काळजी करू.मी नीट राहीन, अभ्यास पण करेन,आणि काकू ला घरात मदत पण करेन. ठीक आहे.
आई मी जरा माझ्या बेस्टी ला बाय करू येते.अजून 1 तास आहे ना ."
"आत्ता कशाला, कालच भेटालीस ना आणि काय ती पाणीपुरी पार्टी ती पण झाली ना."
"हो,पण आत्ता जाताना एक बाय बोलते ना, प्लिज आणि लांब कुठे ग हे बाजूच तर घर आहे तीच.पटकन येते "म्हणत मनु बाहेर पळाली. मनूच्या बेस्टी च घर नाही तर मोठासा बंगला असतो.
पाटील हाऊस.
तिने अंगणातील तुळशीला नमस्कार केला. आणि आत गेली.
"मनू ताई अजून गेल्या नाहीत का".तिथे काम करणाऱ्या गंगा मावशी विचारल
"हो मावशी आता निघतच आहे,म्हंटल एकदा बेस्टी ला बाय बोलते.कुठे आहे ती."
"तुमची बेस्टी वरती टेरेस वर बसलेय . हो तुमीच सांगितलंना सकाळी उन्हात बसायला अर्धा तास झाला" "Ok मी वर जाते,"
"मनू ताई हे जाताना तुमच्या बेस्टीचा नाश्ता घेऊन जाल का." "हो द्या ना मावशी त्यात काय एव्हढ म्हणत" तिने नाश्त्याची प्लेट हातात घेतली आणि टेरेस वर गेली.
तिची बेस्टी मिन्स (हेमा पाटील) 70 वयअसलेली आजी टेरेस च्या झोपाळ्यावर बसून कानांत हेडफोन्स लावून मस्त मोबाईलवर गाणी ऐकत होती. मनूने प्लेट तिथल्या एक टेबलवर ठेवली. आणि तिच्या हातातून पटकन फोन काढून घेतला.
"ए कोण आहे? तू अजून गेली नाही ."
"तुला भेटल्याशीवाय मी कधी कुठे गेलीय का" "हे घे धर नाश्ता कर आधी मग तूझी सकाळची गोळी घ्यायची असेल ना तुला कितीवेळ सांगितलं आहे वेळेवर नाश्ता करत जा .ऐकत का नाही"
"सॉरी , काय करू गाणी ऐकत बसली लक्षातच नाही राहील." It's ok चल आज मी तुला माझ्या हाताने भरवते.
मनु तुझी खूप आठवण येईल बघ' म्हणूनच बोलत होते इथेच पुढचं शिकते तर तू आणि आई दोघी मला हाकलून देत आहात तुझ्या भल्यासाठीच तर चाललं आहे सगळं तुला आता नाही कळणार. बर सगळं नीट घेतलंस ना.तिकडे जास्त कोणाशी मैत्री करायची गरज नाही, इथे तुझी बेस्टी आहे.हेमलता पाटील नाम याद रहेगा ना"
"हो ग कित्तीवेळा तेच सांगतेस." "धर पाणी पी."
"आई ,चल खाली आता बराच वेळ झाला. मनू तुला पण निघायला हवं नाहीतर उशीर होईल."सुरेंद्र पाटील
"हो, काका निघतेच आहे, बेस्टी आय मिन आजी येते मी" म्हणत तिने वाकून नमस्कार केला. तिचे डोळे भरून आले
"काका येते मी " म्हणत ती पळतच खाली उतरली .
तिला सवयच होती. धावतपळत चालायची. वरच्या दुसऱ्या पायरीवरून तिचा पाय थोडासा घसरला ती जोरात ओरडली आई ग, पण पटकन कोणीतरी तिचा हात पकडून तिला बाजूला नीट उभं केलं
"एव्हढ्या उड्या मारत कुठे जात होतीस. माकड आहेस का हळू चालायला काय होत. आता पडली असतीस"
तोपर्यंत सगळे घरातले तिथे आले होते.
'पडली असती तर लागलं असतं अजून काय "बोलत तिने समोर बघतील तर तिला चेहरा दिसला नाही तिने मान करून बघितलं "ओह तु , ताड माड च झाड सॉरी रु रु रु द्राक्ष "ती जायला वळली
"माझा हात सोड, मला जायचं आहे."
" नीट जा,आणि तिकडे फक्त अभ्यासच करायचा आहे. हे घे म्हणत त्याने तिला एक पेन दिल .आणि तिचा हात सोडला. विसरलीस का तू पैज जिंकली आहेस. फर्स्ट क्लास मध्ये पास झालीस तर माझं हे पेन तुला देणार आहे का लक्षात ,धर पटकन ."रुद्राक्ष
"नको मला, तसही मी पैज लावलीच नव्हती. तुलाच वाटत होतं., मला कमी मार्क मिळणार पण माझ्या बेस्टीला माझ्यावर पूर्ण विश्वास होता."
"मनू ,लागलं का बाळा "तिची बेस्टी हळूहळू चालत तिच्याजवळ आली.
"आजी,तू कशाला तिची काळजी करतेस तिला सवयच आहे माकडसारख्या उड्या मारायची."रुद्राक्ष
"नाही लागलं मी येते. बाबा वाट पाहत असतील."हिमानी "थांब, हे पेन घेऊन जा. मला काम आहेत."रुद्राक्ष
"हिमु अग घे की, आपण पैज जिंकलो आहोत."आजी "बरं ठीक आहे." म्हणत तिने गपचूप पेन घेतला. पण एक डोळ्यांचा बाण मारला जो त्यालाच दिसला. आणि मनातच रुक्ष राक्षस बोलून मोकळी झाली.
"काही बोललीस का"
"कुठे काय ,बाय बोलली फक्त." तिला आता जाताना भांडण नव्हतं करायचं.
तिने सर्वांचा हसून निरोप घेतला.
"रुद्रा,ओरडला का तिला घाबरते ती तुला. "आजी
"कुठे ग आजी मी नाही ओरडलो.अग ती पडली असती तर जरा बोललो.तुला तर तीच जवळची वाटते.चल तूला रूम मध्ये सोडतो."रुद्राक्ष
"बर तू कधी निघतोयस"
"उद्या जातो आहे." "आता राहा की इथेच आपला एवढा बिसनेस असताना कशाला बिझनेस शिकायला जायचं. तुझे बाबा काका आजोबा सर्वजणआहेत की, कशाला ते एम बी ए हवंय. "
"आजी नको ना पुन्हा तेच कुठेही गेलो तरी परत इथेच येणार,तुझ्याकडे.कसंबसं बाबांना मनवल आहे .फक्त हे दोन वर्षे . चल तुझी रुम आली.आराम कर ."
----------------
"हिमानी आलीस झाली का गळाभेट तुझ्या बेस्टी शी चल आता निघायचं ,मला उद्या परत यायचं आहे."बाबांनी तिला येताना पाहिलं
"हो बाबा, बेस्टी पण भेटली आणि सर्वच .चला निघुया" "आई काळजी घे. "हिमानी
सोहन आणि रीमा ला बाय केलं.
-----------
हिमानी कदम रत्नागिरी जिल्ह्यातील जवळच्या गावात राहत होती. आजोबा सुरेश कदम तिचे वडील रमेश कदम आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. आई रोहिणी गृहिणी आहे एक लहान बहीण रीमा आणि लहान भाऊ सोहन . काका भास्कर मुंबई दादर मधल्या शाळेत शिक्षक आहेत.काकू उषा घरातच पार्लर च काम करते . काकांची मुलगी अनन्या आता दहावीला आहे, आणि मुलगा अश्विन बारावी मध्ये आहे. हिमानी आताच दहावी पास झाली आहे. तीच्या काकांनी पुढे शिकायला त्यांच्या शाळेत 11वि साठी ऍडमिशन केली. ती बाबांबरोबर पहिल्यांदाच बाहेर जात होती. खरतर तिच्या बाबांना तीच असं मुंबई जाऊन शिक्षण आवडलं नव्हतं. इकडेच राहिली असती तर तिच्यावर लक्ष ठेवता आलं असत. आणि पुढच्या 2 वर्षात तीच लग्न लावून त्यांना तिच्या जबाबदारीतून मुक्त व्हायचं होत. पण नेमकी ती 10वीला शाळेत पहिली आली.सगळ्यांनी तीच खूपच कौतुक केलं. आणि तेव्हाच भास्कर काकांनी तिला पुढे शिकायला तिकडे येणार का विचारलं. तिने पण उत्सहात हो म्हंटल सुरवातीला त्यांनी विरोधच केला.नंतर सर्वांनी समजावल तेव्हा हो बोलले.सर्वात जास्त तर बेस्टी आजी ला बोलावं लागलं होतं. ती त्यांच्या आईची मैत्रीण होती. चार वर्षांपूर्वी त्यांच्या आईच म्हणजे हिमानीची आजी हार्ट अटॅक नि गेली . तेव्हा बेस्टी आजींनी त्यांना खूप आधार दिला होता.तशी ती आधीपासूनच सर्वांची आवडती मावशी होती. तिने सर्वाना आधार दिला पण हिमानीने तिच्याशी मैत्री करून तिला सावरलं होत. पाटील आणि कदम यांच्यातला घरोबा अख्ख्या गावाला माहीत होता. त्याच्या मुलांमध्ये सुद्धा मैत्री होती. फक्त अपवाद होता तो हिमानी आणि रुद्राक्ष.
कारण तस खास नव्हतं. दिवाळीची सुट्टी पडली होती. हिमानी आणि दिव्या(रुद्रा ची लहान बहीण) बरोबर त्यांच्या तीन मैत्रिणी मिळून अंगणात पकडा पकडी खेळत होत्या. सगळ्याजणी खूप आनंदाने मज्जा करत खेळत होत्या. अचानक खेळताना मस्तीमध्ये हिमानीने तिला हाताने पकडताना ती मागे सरकली आणि जोरात खाली पडली. सगळताजणि हसायला लागल्या. दिव्यापण हसत होती.नेमकं तेव्हाच अंगणात येताना दिव्याला पडताना रुद्राने बघितलं. काय चाललंय, तुमची मैत्रीण पडली आहे,आणि तुम्ही हसत आहत. त्याचा भारदस्त आवाज ऐकून बाकीच्या तिघी ज्या थोड्या लांब उभ्या होतय पटकन पळून गेल्या. हिमानी दिव्याच्या बाजूलाच होती, आयती सापडली खूपच ओरडला होता. मग बरेच दिवस ती त्यांच्याकडे जातच नव्हती. शेवटी दिव्या आणि आजींनी दोघांना समोर बसवून झालेली गोष्ट विसरून मैत्री करायला लावली होती. पण ते फक्त वरवरचं होत. सगळ्यांसमोर खूपच शांत असायचे,पण जेव्हा बाजूला कोणी नसलं की शाब्दिक चकमक ,डोळ्यांचे बाण ठरलेले असायचे.
---------
"मनु,चल बस आली .14 नंबरची सीट आहे.आणि मी तुझ्या मागच्या सीटवर आहे. ठीक आहे." बाबा "हो बाबा."हिमानी हिमानी तिच्या जागेवर जाऊन बसली.बस सुरु झाली तशी तिने खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले. ती हा रस्ता डोळ्यात साठवून घेत होती.तिला माहीत होते.आता इथे लवकर येणे नाही.एक मन उदास होते तर दुसरे उत्साही. तिने उदास मनाला सावरले. आणि डोळे बंद केले.
_________
क्रमशः
Thank you
कथेचा हा भाग कसा आहे, नक्की सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा