Login

हिरव्या पानाची छत्री

हिरव्या पानाच्या छत्रीवरील कविता
हिरव्या पानाची छत्री

हिरव्या पानाची छत्री
पावसात धरली
रूपसुंदरी तरीही
पावसात चिंब भिजली

सोबतीला तिच्या
गोड कोकरू
बिलगून धरलं त्यास
जसं तिचं लेकरू

हिरवाई दाटली
भूवरी चोहीकडे
अद्भूत नजारा
दिसे सगळीकडे

पाहूनी ते हिरवाई
गाली हसे युवती
सडा पासवाचा
पडतो तिच्या भोवती