स्वराने थोडासा उघडलेला दरवाजा जोरात बंद केला आणि हळूच मागच्या दरवाज्याने बाहेर पडली. अंगावरच्या ओढणीने चेहरा झाकून ती गल्लीतून वेगानं धावत होती. मागून काळ्या काचांची गाडी तिचा पाठलाग करत होती. गल्ल्या ओलांडत, पाय दुखत होते तरी ती थांबत नव्हती. जीवाचं रान करत, श्वास गतीत गती वाढवत ती एका जुन्या, मोडकळसलेल्या वाड्याजवळ आली.
तिने अवतीभोवती पाहिलं. समोरचं लोखंडी गेट अर्धवट उघडं होतं. ती गेट ढकलून आत शिरली. वाड्याच्या अंगणात गवत वाढलेलं, आणि कोपऱ्याला पडलेल्या जुन्या सामानामध्ये ती लपायचा प्रयत्न करत होती. पण
"स्वरा!" एक गडद पण ओळखीचा आवाज कानी आला.
ती दचकून मागे फिरली. समोर एक तरुण उभा होता अर्णव.
"तू?! अर्णव तू इथे काय करत आहेस?" ती धडधडत्या आवाजात विचारलं.
अर्णव जवळ आला. त्याच्या चेहऱ्यावर तिच्या प्रति काळजी स्पष्ट दिसत होती.
"मीच तुला कॉल केला होता," त्यानं हळुवार आवाजात सांगितलं.
"मीच तुला कॉल केला होता," त्यानं हळुवार आवाजात सांगितलं.
"पण का? काय चाललंय हे सगळं? माझा कोण पाठलाग करतंय आणि का?"
अर्णवने क्षणभर तिच्याकडे पाहिलं, मग शांतपणे म्हणाला,
"स्वरा, तुझ्या बाबांनी काही वर्षांपूर्वी एका महत्त्वाच्या गुन्हेगारी प्रकरणात साक्ष दिली होती. त्या प्रकरणात एक मोठा गुन्हेगार जेलमध्ये गेला होता. पण तो आता सुटला आहे. आणि तो तुझ्या कुटुंबावर सूड उगवायचा प्रयत्न करत आहे."

स्वराच्या डोळ्यात अश्रू चमकले. तिने ओठ आवळले.
"माझे बाबा त्यांनी मला काहीच सांगितलं नाही"
"माझे बाबा त्यांनी मला काहीच सांगितलं नाही"
"कारण ते तुला यात ओढू इच्छित नव्हते," अर्णव म्हणाला, आणि पुढे बोलू लागला
"पण मला हे सगळं माहिती पडलं, कारण मी सायबर क्राईम डिपार्टमेंटमध्ये काम करतो. त्या गुन्हेगाराचा डिजिटल ट्रॅकिंग करताना मला तुझ्या बाबांच्या केसशी संबंध असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे मीच तुला गुप्तपणे इशारा दिला."

स्वराचं डोकं फिरत होतं. या सर्व घडामोडी एवढ्या वेगानं घडत होत्या की तिला विचार करण्याचीही उसंत मिळत नव्हती.
तेवढ्यात बाहेरून टायर घासल्याचा आवाज आला. काळ्या काचांची गाडी पुन्हा त्या वाड्यासमोर आली होती.
"चल! लपायला हवं!" अर्णवने स्वराचा हात पकडला आणि तीला ओढत वाड्याच्या आतल्या अंधाऱ्या भागात घेऊन गेला. जुन्या लाकडी जिन्यांच्या खाली एक अरुंद जागा होती दोघंही तिथं श्वास रोखून लपले.
स्वराचं हृदय धडधडत होतं. पण अर्णवचा हात हातात असल्यामुळे तिला थोडंसं सुरक्षित वाटत होतं.
गाडीचे दरवाजे उघडले गेले. कोणीतरी आत येत आह टायची जाणीव त्या दोघाना झाली ...
(भाग ३ पुढे येईल)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा