Login

❤️अजब प्रेमाची ❤️गजब गोष्ट ❤️...३

Total Siyappa...



पाच तासानंतर.....


वेळ: १०:२५ pm




" अरे यार....जस्सी कितनी देर लगायगी.....चल भी.... " रॉकी जरा रागताच बोलला. कारणही तसच होतं. गेला एक तास जस्सी तयारी करण्यासाठी रूम मध्ये गेली होती. पण अजुन तिचा पत्ता नाही.


रॉकी च फोन दणाणला. " हॅलो...."



" काय रोक्या आज येणार की.. आम्ही जायचं पार्टीला...?" समोरून अम्या बोलला.


" अबे यार....थोदी देर रुक. जस्सी अभी तक तैयार नाही हुई...." रॉकी


" हे बघ...तू एक काम कर तिला घेऊन ये आम्ही जातो...." वेद


"Plz... Guys......थांबा ना...मी येतोच...." रॉकी


" नको .....आज त्या महामाया....I mean..... आमच्या भाभीचा बर्थडे आहे आणि तिला सोडून येणं म्हणजे, तुझी बिन साबणाच्या धुलायीची तयारी करणं..... ? नको...तू ये आरामात. " अम्या


अम्या ....रॉकी...आणि वेद....एकदम बेस्ट फ्रेंड. अगदी कॉलेजपासून या तिघांना त्रिकुट म्हणूनच ओळखलं जायचं.


रॉकी एक पंजाबी मुलगा. पण जन्मापासून मुंबईत असल्यामुळे. मस्त मराठी बोलायचा. त्याचे बाबा CBI मध्ये चीफ होते. त्यांच्या मते रॉकी नेही पोलिस किंवा त्यांच्याबरोबर म्हणजे CBI मध्ये जॉईन व्हावं. पण रॉकी ने सरळ त्यांना नाही म्हटलं. त्याच्या मते एकदा सरकारी नोकरी मिळाली की मान्य नसताना देखील एखाद्या नेत्याला अथवा बड्या राजकीय माणसांना मदत करावी लागते. तो एक जासुस होता.


अम्या. म्हणजे अमित. त्याच्या वडिलांचा बिझनेस सांभाळायचा. तसा डोक्याने भारी हुशार. तो एक यशस्वी उद्योगपती होता. पण त्याचा त्याला कधी गर्व नव्हता. ऑफिस मध्ये तो एक कड बॉस होता पण त्याच्या त्रिकुटाला त्याच्या शिवाय पूर्णत्व नाही..!


आणि वेद....( आपला हिरो)... तो एक शेतकरी होता. म्हणजे त्याला झाडे.. वेली एकूणच वनस्पतीमध्ये जास्त इंटरेस्ट होता. असं म्हणा की तो झाडां चा डॉक्टर होता...!


अम्या आणि वेद पुढे निघून जातात.


" काय यार....या मुलींना चार दिवस अगोदर खबर दिली तरी या तयारी करायला दिवसच लावतील. यांना कुठे घेऊन जाणं म्हणजे...????" म्हणत रॉकी पुन्हा रूमकडे वळतो....


त्याचे डोळे समोर बघून स्थिर होतात. त्याच्या काळजाची धडधड वाढते. जनु त्याचं हृदय बाहेर येऊ पाहतय... ❤️


जस्सिने नेवी ब्लू कलरचा फ्रॉक घातला होता. तिचे कर्ली बोबकट केस तिच्या खांद्यावर स्वच्छंदी फिरत होते. केसांची एक बट तिच्या गोऱ्या गुबगुबीत गालांवर फिरत होती. त्या क्षणी रॉकी ला तिच्या त्या बटांचा हेवा वाटला. त्याला असं वाटलं की जाऊन तिला एक घट्ट मिठी मारावी. तो हळू हळू तिच्या जवळ आला....


"✋ रुक...!✋तिथेच थांबायचं....काय म्हणत होतास.....?? हम्म ?" जस्सी


" अजुन तर मी काही बोललोच नाही. पण माझ्याकडे बोलायला काही शब्दाच नाहीत....??" रॉकी


" काही बोलू सुध्दा नको आणि तो अम्या काय सांगत होता. तुला काय वाटलं....मला काही ऐकायला नाही आलं....?" जस्सी


" अग....तो तर फोन वर बोलत होता....तुला कसं माहित...." रॉकी


"त्याने तुला कॉल केला आणि मला काही बोलला नाही असं कधी झालय का....?" जस्सी


रॉकी ला काय सांगावं ते कळेना...?


जस्सी ने त्याच्याकडे रागात बघितलं आणि खाली गाडीजवळ गेली.


" हेय....जस्सी....! काय यार आज तुझा बर्थडे आहे ना.....आज तरी रागावू नको ना...plzzzzz?


आज ना तू खूप छान दिसतेस....अगदी क्यूट परी??" रॉकी तिला मनवण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यात तो सफल झाला. जस्सी त्याच्याकडे पाहत गोड हसली....


"?  आय...हाय..... तेरी ये हसी....मे तो..मर गया ??" रॉकी आपल्या छातीवर हात मारत बोलला.


" बस झाली तुझी नौटंकी....चला उशीर होतोय आपल्याला....?" जस्सी लाजत म्हणाली.


रॉकी ने आपली बुलेट काढली आणि दोघेही निघाले.




अमित आणि वेद दोघेही रॉकी आणि जस्सी ची वाट पाहत होते. अम्या ला तर जाम कंटाळा आला होता शेवटी वैतागून तो उठला...


" आता तर हद्दच झाली यार.....! अजुन किती वेळ वाट पाहावी लागेल.....? त्या म्हशीला तयार व्हायला एवढा वेळ...?? ?च्यायला.....एवढ्या वेळात तर आपण चारदा चेंज करून आलो असतो...." पुन्हा "?यार आपला रॉकी बदलला..... साल्याला gf काय मिळाली.....मित्रांना विसरला...?"


त्याची नाटकं चालू होती. त्याला कळलंच नाही की कधी जस्सी आणि रॉकी त्याच्या मागे येऊन उभे राहिले....


" अरेरे...फार वाईट झालं....." जस्सी


" हो....ना.....फार फार वाईट झालं..." अम्या.


आवाज ओळखीचा वाटल्याने वेद वर पाहू लागला. जस्सी ला पाहताच वेद गार झाला. अम्याचं बडबडण चालूच होतं. वेद ने त्याच्या पायावर आपला पाय मारला. पण श्या.... अम्या काही ऐकायला तयारच नव्हता. त्याचा इमोशनल अत्याचार चालूच होता.


शेवटी ना राहवून वेदने त्याला जबरदस्तीने मागे फिरवलं. अम्या आता काही बोलायच्या मनःस्थितीत नव्हता. जस्सी हळु हळू पुढे पुढे येत होती तर अम्या एक एक पाऊल मागे जात होता. तिने हातातली पर्स मारायच्या पोज मध्ये घेतली आणि.... दणादण त्याच्यावर तुटून पडली.


" सॉरी यार...सॉरी..... ए रॉक्या हिला समजावं ना भावा. थोडी तरी मदत कर ......plz??" अम्या


" जस्सी सोड ना त्याला.....आज बर्थडे आहे ना मग चल आपण केक कापू..." रॉकी


जस्सी ने मन भरे स्तोवर अम्याला बदडले. आणि नंतर केक कापायला आली.....


" काय यार...तुम्हा दोघांना भांडण केल्याशिवाय चैन पडत नाही का....?" वेद


" काय करणार....ही भवानी आहेच तशी...." अम्या बोलायची खोटी. जस्सी ने त्याला भरवायला आणलेला केक सरळ त्याचा तोंडावर फसला. पुन्हा दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली.


" ये जस्से बऱ्या बोलाने माझी माफी माग नाहीतर...नाहीतर... तुझ्यासाठी आणलेलं गिफ्ट बाहेरच्या भिकाऱ्याला देईन हा...." अम्याने जस्सी च्या वर्मावर बोट लावले.


जस्सी ला गिफ्ट फार आवडायची. तिने थोड आवरतं घेतलं आणि त्याच्याकडून गिफ्ट हिसकावून घेतले. जस तिने गिफ्ट सोडून बघायला सुरुवात केली. अम्या मागे मागे जाऊ लागला. जस्सी ने गिफ्ट उघडलं त्यात एक चिठ्ठी होती. तिने ती उघडली त्यात लिहिलं होतं...


" रिकामी डोक्याच्या मुलीला रिकामी बॉक्स माझ्याकडून प्रेम भेट.....?" अम्या


" अम्या तू आज मेलास माझ्या हातून. " तिने अम्याचा पाठलाग सुरू केला. पूर्ण हॉटेल मध्ये अम्या आणि जस्सी धावत होते.


वेद आणि रॉकी दोघेही तिथेच बसले. जस्सी चे भरपूर मित्रमैत्रिणी आले होते. तिने अम्या चा पाठलाग सोडून आपल्या फ्रेंड्स बरोबर बोलायला गेली.


"किती भांडतात ही दोघं.... खरचं....." रॉकी.


" हो....पण कोणाची हिम्मत आहे का जस्सी ला अम्या समोर दुखवायचे ...फाडून काढेल तो..." वेद.


" बरं झालं तू आलास. किती दिवसांनी आपण भेटतोय...." रॉकी


वेद रॉकी कडे पाहून हसला.


पार्टी चालू झाली होती. जस्सी ने रोकीला जबरदस्तीने डान्स करायला नेले. वेदला आता तिथे राहणं शक्य होईना. त्याने आजुबाजुला पाहिले आणि तो हॉटेल बाहेर पडला.


थंडगार वारा वाहत होता. वेद ने सभोवार पाहिले. त्या बागेत कुणीही नव्हतं. तो एका बेंच वर बसला कानात हेडफोन्स घालून गाणी चालू केली.




"कच्चे धागे के साथ जिन्हे बांध लिया जाय....


वो बंदी क्या छुटे वही पे जिये ... वही मर जाय..."




रात्रीच्या थंडगार वातावरणात वेद डोळे बंद करून हळू आवाजात जुनी गाणी ऐकत बसला होता..


"छुन...छुन..."


त्याला पैजणीचा आवाज आला. प्रथम त्याला वाटल की गाण्यात कदाचित पैजनीच आवाज असेल. पण नंतर त्याला तो आवाज जरा जास्तच ऐकू येऊ लागला. तो डोळे उघडतो न उघडतो तोचं त्याच्या पायात अडकून कोणीतरी पडल. तो पटकन समोर बघतो...


एक मुलगी त्याच्या पायात अडकून पडलेली असते. तो जरा रागानेतच विचारतो..." दिसत नाही....डोळे फुटले का....?" पण त्याला पुढे तो बोलल्याची लाज वाटते. तो तिच्याकडे पाहतच राहतो....


तिने पंजाबी ड्रेस घातला होता. पण तो फार मळला होता. केस पूर्ण विस्कटलेले होते तर थोडे केस चेहऱ्यावर आले होते. तिच्या केसातुन दिसणाऱ्या चेहऱ्यावर त्याला भीती दिसत होती. तिच्या ओठावर असलेली जखम सुकली होती. पण नाकाला नव्याने जखम झाली होती. कदाचित आता तिला ती जखम झाली असावी....? तिच्याच पायातील पैंजण वाजत होती. त्याचा लक्ष तिच्या पायावर गेला. पायला ही जखमा झाल्या होत्या. तो काही बोलणार तेवढ्यात ती तिथून पळाली .....


"अबे ओ छोकरे.... यहासे किसी लडकी की को भागते हुये देखा क्या...?"


वेद च्या कानावर आवाज आला. त्याने आवाजाच्या दिशेने पाहिले. दोन जीपमध्ये चार पाच मुस्तंडे. त्याच्या कडे पाहून ती माणसं नसावीत अशी शंका येऊन गेली.


वेद ने घाबरत अंगुली दर्शन केले. त्याने ज्या दिशेने बोट दाखवलं ते लोग त्या दिशेने गेले..


वेदने ते गेले याची खात्री केली आणि बेंच च्या मागे लपलेल्या त्या मुलीला सांगितले. त्या मुलीने एकदा वेदकडे पाहिले आणि thanks म्हणत रस्त्याच्या पलीकडे गेली. तो सॉरी म्हणायच्या आत तिने ओढणीने आपला चेहरा लपवला आणि समोरून येणाऱ्या रिक्षेला हात दाखवला आणि रिक्षेत बसून निघून गेली. वेद अजूनही तिलाच पाहत होता.


रोकिने त्याचा डोळ्यासमोर चुटकी वाजऊन त्याला भानावर आणले.


" काय भावा.....? इथे काय करतोस.....?"


" काही नाही....." वेद


" जायचं का घरी की आज इथेच राहायचा विचार आहे....?"


वेद ने मानेनेच नाही म्हटले. वेद अम्याच्या गाडीने आला होता. ते दोघे आणि रॉकी जस्सी चौघे घरी जायला निघाले. जस्सी ला तिच्या घरी सोडण्यासाठी आले. ते घरी जायला निघाली तेवढ्यात अम्याने तिला थांबवलं आणि तिच्या हातात एक बॉक्स दिला.


" माझ्या येड्या सिसो साठी एक छोटीशी भेट...."


जस्सी ने बॉक्स उघडला त्यात एक ड्रेस होता. तिच्या फेवरेट कलर लेमन येल्लो....! ती जाम खुश झाली.


"ओ sssss सो बुटिफुल......thanks.... आम्या."


वेद आणि अम्य दोघेही पुढे निघून गेले.


" हमम्म.....आता कुठे....?" जस्सी


" घरी....." रॉकी ने एक स्माईल केली आणि तिला मिठी मारली आणि तो तिथून निघाला.




ते तिघे त्यांच्या रोजच्या अड्ड्यावर गेले. अड्डा म्हणजे एक छोटीशी चहाची टपरी. कॉलेज मध्ये असताना हे तिघे इथेच भेटायचे. त्यांच्या अनेक आठवणी त्या ठिकाणी होत्या.


तिघेही आपल्या जाग्यावर बसले. अम्या त्यांची स्पेशल चहा सांगण्यासाठी गेला. वेद आणि रॉकी तिथेच बसले होते.


रॉकी ने वेद कडे पाहिले...." मग वेद कशी चाललीय तुझी शेती...?" विषय काढायचा म्हणून रॉकी ने विचारलं.


" उत्तम..." वेद


" वेद अजुन किती दिवस असाच राहणार आहेस....?" रॉकी ने सरळ विषयाला हात घातला.


" म्हणजे...?" वेद


" उगाच वेड घेऊन पेडगावला जाऊ नकोस. तुला माहित आहे मी काय विचारतोय.." रॉकी


" ...." वेद


" यार तु असा अजिबात चांगला वाटतं नाहीस. कॉलेज मध्ये असताना तू किती मनमोकळा होतास. सतत मजाक मस्करी हसणं खिदळण....आणि आता...?" रॉकी


" काय आहे ना रॉकी बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि आता मी लहान नाही राहिलो. आयुष्यात जे काही माझ्या हातून घडल न कळत का होईना. पण मी दोषी आहे. आणि हे मला माहीत असताना मी कोणत्या तोंडाने घरी जाऊ..." वेद


" मला कळतंय तुझी अवस्था..." रॉकी.


" नाही...कोणालाही माझी अवस्था नाही कळत..." वेद चिडून म्हणाला. मनातील राग कधी कधी असा उफाळून यायचा. रॉकी ला खबर होती त्याच्या स्वभावाची. तो काहीच बोलला नाही.


थोडावेळ शांततेत गेला....


" सॉरी यार...इतक्या दिवसांनी आपण भेटतोय आणि मी..." वेद शांत झालेला.


" मसणात जा... आलाय मोठा... सॉरी बोलणार..." रॉकी रागात उठून निघून गेला.


तोपर्यंत अम्या तीन चहा घेऊन आला. पण रॉकी ला रागात जाताना पाहून त्याने वेद कडे एक भुवई उंचावून " काय झालं..." म्हणून विचारलं.


वेद ने मानेने काही नाही म्हणून सांगितले. दोघांनी चहा संपवला.


अम्या ने वेद ल त्याच्या हॉस्टेल वर सोडले आणि तो घरी निघून गेला.




वेद आपल्या रूमवर आला. त्याने दार उघडले. पूर्ण रूम मध्ये नजर फिरवली आणि ती फ्रेश व्हायला गेला.


रूम अगदी व्यवस्थित लावलेला होता. अगदी नीटनेटका. टॉयलेट बाथरूम...दोन बेड...आणि एक छोटीशी गॅलरी. त्या गॅलरीत वेद ने स्वतः तयार केलेली गुलाबांची कलमे लावली होती. त्या छोट्याश्या गॅलरीत त्याने बागच तयार केली होती. तसं पाहता पूर्ण रूम मध्ये जागोजागी छोट्या छोट्या गमल्यांमध्ये त्याने अनेक रोपटी लावली होतीnकाही फुलांची...काही शोभेची...तर काही औषधी. त्यामुळे त्या रूममध्ये एक वेगळेच प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते.


वेद फ्रेश होऊन बाहेर आला. त्याच्या हातात एक तसबीर होती. त्यात त्याच्या आईबाबांचा फोटो होता. त्याने एकवार त्या फ्रेमवरून हात फिरवला आणि तो झोपी गेला.


क्रमशः


कथा कशी वाटतेय...? आवडतेय ना..? तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. त्यामुळे लिहायला हुरूप येतो. बाय...



0

🎭 Series Post

View all