Login

❤️ अजब प्रेमाची ❤️गजब गोष्ट ❤️

The story of a girl. her struggle... her strange love story.
  
" बापरे...फार उशीर झालाय. आता आपलं काही खर नाही." तेवढ्यात फोन वाजला.

" गार्गी ...कुठे आहेस...? आणि उशीर का झाला...?" गर्गीचे वडील

" बाबा...अहो आज थोडी गर्दी होती शॉपमध्ये. लग्नाचं सिझन आहे ना. बस्त्यासाठी आज एक फॅमिली आली होती. त्यासाठी उशीर झाला. आत्ता सुटले. येतेय मी नका काळजी करू ..." गार्गी

गार्गी... साधी सरळ मुलगी. एकदम गोरीपान नाही पण गव्हाळ रंगाची. छोटे छोटे काळेभोर डोळे. लांबसडक केस ज्यांना नेहमी हेअर stik ने बांधलेले. पंजाबी ड्रेस, दोन्ही हातात गोल्डन कलर च एक एक कडं, कानात छोटे पण लोंबते डुल जे तिचा थोड्या हालचालीने मागेपुढे हलयचे. ती एका कपड्याच्या दुकानात कामाला होती.

गार्गी गडबडीत बाहेर पडली. तिला घरी चालत जायला अर्धा तास लागायचा. ती नेहमी चालत जायची. पण आज तिला उशीर झाला होता. ती रिक्षाची वाट पाहत होती. तिने विचार केला. रीक्षेची  वाट बघण्यापेक्षा चालत जाऊ. वाटेत मिळाली तर थांबवू. म्हणत गार्गी चालत जायला निघाली. रस्ता पायाखालचा होता पण नेहमी ती साडेपाच ला सुटायची. पण आज तिला आठ वाजले होते.


गार्गी चालत होती. तशी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वस्ती होती. रस्त्यावर गाड्यांची गर्दी नव्हती. एखाद दुसरी गाडी जात येत होती. पण आता वस्ती मागे पडली होती. आता फक्त रस्ता. गार्गीला थोडी भीती वाटू लागली. अचानक तिला कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. तिने मागे वळून पाहिले. कुणीही नव्हतं. ती पुन्हा चालू लागली.

एक चिंचोळा रस्ता आणि पंधरा मिनिटांनी तिचं घर....! तिने लवकर पाय उचलले. पण आता मात्र तिला दोघांच्या पायांचा आवाज आला तिने मागे वळून पाहिले. दोन मुलं तिच्या मागे चालत होती. दोंघांच्याही हातात दारूच्या बाटल्या होत्या. ते दोघे तिच्याकडे बघून हसत होते. त्यातील एकाने घाणेरडा इशारा केला तशी गार्गी आता पळू लागली. कुठे झक मारली आणि चालत आले. म्हणत पळत होती. तोच तिच्या समोर एक जीप थांबली. त्या जीप मुळे आता तिचा रस्ता पूर्ण अडला गेला. तिला जाण्यासाठी त्या जीपवरून चढुन जावं लागणार होत. तोच त्या जीपमधून एक माणूस उतरला.

केस विस्कटलेले, लाल भडक डोळे, कानात बाली. त्याने पिवळ्या कलारचा शर्ट घातला होता. त्याच्या  बाह्या वर केल्या होत्या. त्याच्या दांडावर कसलेसे टॅटू होते. तोंडात सिगारेट होती. त्याने एक सीप ओढली आणि गर्गीवर धूर सोडला. गार्गी दोन पावलं मागे गेली. मागे ते दोघे आणि पुढे हा...! गार्गी आता पुरी फसली होती. तिला काय करावं सुचत नव्हतं.

" क...काय काय काम आहे....?" तिने घाबरत विचारले.

"Hey baby..... I want you....!" म्हणत तो तिच्या जवळ येऊ लागला.

तो जसजसा जवळ येत होता तसतशी गार्गी मागेमागे जात होती. की अचानक ती मागे उभे असणाऱ्या दोघांना आपटली. आता तो तिच्या जवळ येऊ लागला. तिने पळण्याच प्रयत्न केला पण मागच्या दोघांनी तिला घट्ट पकडून ठेवलं.

" नाही नाही सोडा मला....plz" गार्गी त्यांच्यासमोर गयावया करू लागली.

" असं कसं..? आम्ही तुला सोडायला थोडीच पकडली." म्हणत तो तिच्या अजुन जवळ आला. त्याच्या तोंडाच्या सिगरेटचा धूर तिच्यावर सोडला. गर्गीला खोकल्याची उबळ आली पण तिची थोडी सुधा हालचाल आणि त्याचा स्पर्श...! 

तिने जोर लावून मागच्याना मागे ढकलले आणि समोरच्याला हाताने दूर सारले आणि ती पळू लागली. ती जीपवर चडून वर जात होती तोच त्या जीपवल्याने तीचा पाय मागे ओडला. ती पुढच्या पुढे नाकी जिपवर  पडली. त्याने तिला जीप वर टेकवल.

"असा कसा जाऊ देईन....? हातात आलेली शिकार सोडणाऱ्या तला नाही हा....लकी...!" म्हणत त्याने तिला किस करण्याचा प्रयत्न केला. पण गार्गी ने त्याच्या डाव्या पायावर जोरात आपला पाय मारला आणि तसा तो थोडा मागे झाला. गार्गी ने वेळ न लावता त्याचा दोन्ही पायांच्या मध्ये आपलं गुढगा मारला. तो वेदनेने कळवळला आणि गर्गीच्या समोर झुकला गार्गी हातातलं कड काढून मुठीत घट्ट पकडल. तिने मागे उभे असणाऱ्याला पाहून एक जोरदार पंच लकीवर मारला. लकीच्या नाकातून रक्त येत होत. गार्गी आता चालत त्या दोघांकडे आली.

" मेले तरी बेहत्तर...पण तुम्हा तिघांपैकी एकाला तरी ढगात पोचवल्याशिवाय राहणार नाही ही गार्गी....!" म्हणत गार्गी ने ओढणी कंबरेभोवती घट्ट बांधली.

तेवढ्यात लकीने मागून गर्गिला पकडले. तसे समोरचे दोघेही तिच्यावर चालून आले. गार्गी ने अंदाज काढला. ते दोघे जसे जवळ आले तसे त्याच्यातील एकावर तीने जमेल तशी किक मारली तसा तो मागे पडला. आणि त्याच्या हातातली दारूची बाटली खळकन फुटली. गार्गीने आपलं कोपर लकीच्या कुशीत मारलं. 

गार्गीने तिसर्याकडे पाहिलं. त्याने तिच्याकडे पाहिलं.
" ए...तुला माहित नाही आम्ही कोण आहोत ते....समजलं...." म्हणत त्याने तिच्यावर बाटली फेकली. ती तिच्या डोक्याला लागली. तिच्या डोक्यातून रक्त येऊ लागलं. तिने पटकन डोक्यावर आपला हात ठेवला. तोपर्यंत त्याने तिला जोरदार धक्का दिला ती खाली आदळली.

गार्गी ने आजुबाजुला पाहिले आणि हातात एक दगड घेतला अन् त्याच्यावर मारला. त्याने तो वार चुकवला....पण....तो दगड लाकिवर जाऊन आदळला. 

गार्गी स्वतःला सावरले. तिने एका हातात कड आणि एका हातात हेअर स्टिक घेतली. तो तिसरा माणूस दात ओठ खात तिच्यावर चालून आला आणि तिच्या थोबाडीत मारली. 

आता तोही चेकाळला होता. एका मुलीने त्यांना नको पुरे केलं होतं आणि हेच त्यांना सहन होत नव्हतं. 

थोबाडीत बसताच गार्गी थोडी भिरभिरली. पण क्षणात तिने त्याच्यावर कड्याचा वार केला. तो वार झेलतो... न झेलतो.. तोच गार्गी ने हेअर स्टिक त्याच्या कानात घुसवली. आणि बाजूची फुटलेली बाटली त्याच्या पोटात खुपसली. तो विव्हळत खाली पडला. 

तेवढ्यात पाठून लकिने तिला धक्का दिला. ती खाली पडली तसा लकी तिच्यावर बसला. त्याने तिचा गळा दाबायला सुरुवात केली.


" सालि....मला मारते... मला....?? " म्हणत तो जोरात तिचा गळा दाबू लागला.


गार्गी ला काय करावे ते समजत नव्हतं. तिचा श्वास गुदमरून लागला. तिने त्याला बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या पुरुषी तकडीपुढे तिचं काही चालेना. तिने आजुबाजुला पाहिले. तीला बाजुला फुटलेली बाटली दिसली. तिने ती हातात घेतली आणि त्याच्या कुशीत खुपसली. एक गगनभेदी किंकाळी फुटली. अन् मग निरव शांतता....!!



.........




गार्गी अजून घरी आली नाही म्हणून तिचे आईबाबा काळजी करू लागले. शेवटी गार्गीच्या बाबांनी तिला आणायला जायचा निर्णय घेतला. ते बाहेर पडले.

चालत रस्त्यावर आले. त्यांना तिथे एक जीप आडवी उभी केलेली दिसली.

" गाडी कुठे आणि कशी लावली हे सुध्दा आम्हीच सांगायचं का...? ही काय रित झाली गाडी पार्क करायची....? माणसाने कसं जावं...?" म्हणत गार्गीचे बाबा जीप मधून दुसऱ्या बाजूला आले. 

समोर जे काही त्यांनी पाहिलं. त्यांचा स्वतः च्या डोळ्यावर विश्वास बसेना. 

समोर दोन माणसं पडलेली होती. एकाच्या बाजूला एक मुलगी बसली होती. ते हळु हळू तिच्या जवळ गेले आणि ते जागीच खिळले.

" गार्गी....." त्यांना काय बोलावं तेच सुचेना.


त्यांनी तिला उठवलं तिची बॅग घेऊन ते घरी आले. 
तिला पाहताच तिच्या आईला काही समजेना. बाबांनी घरात येऊन दरवाजा बंद केला. आणि गार्गी च्या आईला पाणी आणायला सांगितलं. गार्गी अजून त्या धक्क्यातून बाहेर आली नव्हती. 


बाबा तिच्या जवळ येऊन बसले. प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला...

" गार्गी काय झालं बेटा...? मला नाही सांगणार...? "
गार्गी ने एकवार त्यांच्याकडे पाहिले आणि ती मोठमोठ्याने हुंदके देऊन रडू लागली.

तिला काय सांगावे ते सुचेना. तिला रडताना पाहून तिची आई सुध्दा रडू लागली. थोडावेळ असाच गेला. गार्गी थोडी शांत झाली. तिने सगळं आईबाबांना सांगितलं.

" मी काही चुकीचं केलं का...??"

" नाही बेटा....तू काही चुकीचं नाही केलंस." म्हणत त्यांनी तिला मायेने जवळ घेतलं.

गार्गी ने काय केले...? कोणाला मारले....? तिला काही समजत नव्हतं. बस तिने स्वतः चा बचाव केला होता. कुणाचीही मदत न घेता. तिने स्वतः तिच्यावर जबरदस्ती करणाऱ्यांना शिक्षा केली होती. पण याची तिला पुढे केवढी किंमत मोजावी लागणार होती हे तिला माहित नव्हते...






______________&&&________&&&______________







"नितु ( गर्गीची आई), राघवला कॉल कर बरं." गार्गीचे बाबा.


राघव म्हणजे गार्गीचा मामा. मामा म्हणजे सख्खा नव्हे. तिच्या आईचा मानलेला भाऊ. पण तो त्यांच्यासाठी सख्ख्यापेक्षा होता....! 

राघव मुंबईत पोलिसात एका चांगल्या पदावर काम करत होता.

गार्गी च्या आईने त्याला कॉल केला. गार्गी फ्रेश व्हायला गेली होती. ती चेंज करून बाहेर आली.

गार्गी येताच फोन गार्गी च्या बाबांकडे देत त्या किचनमध्ये गेल्या. तिच्या पाठोपाठ गार्गी सुध्दा गेली.

" हॅलो...ताई बोल. काय काम काढलास...? तेही एवढ्या रात्री..." राघव

" हॅलो राघव..मी तुझा भावोजी बोलतोय. एक काम होतं तुझ्याकडे. जर तू बिझी नसशील तर बोलू का...?" गार्गीचे बाबा.


" हा बोला ना भावोजी. बोला काय झालं...?" राघव

" ते...कसं सांगू...? काही समजत नाही..." गार्गीचे बाबा शब्दांची जुळवाजुळव करत होते. त्यांना काय सांगावं..? कुठून सुरुवात करावी..? समजत नव्हतं.

त्यांची बोलताना होणारी घालमेल राघवच्या लक्षात आली. एरव्ही गार्गीचे बाबा स्पष्ट बोलणारे....! पण आज त्यांना सुचत नव्हते.

" काय झालं...रम्या ..? (गार्गीचे वडील) तुला कधीपासून माझ्याशी बोलताना त त प प व्हायला लागलं.."
राघव आणि रमेश म्हणजे गार्गीचे वडील कॉलेज चे मित्र.

नितु म्हणजे गार्गीची आई आणि रमेश यांचं सेटिंग सुध्दा राघवनेच लावलं होतं. म्हणून त्या तिघांची फार स्ट्रोंग बाऊंडींग होती. पुढे राघावला जेव्हा पोलिसात जायचं होत त्यावेळी रमेशने आणि नितुने त्याला भरपूर सपोर्ट केला होता. आता गरज रमेशला होती. राघव त्यांची मदत करायला एका पायावर तयार होता पण त्याला काय झालंय हेच कळत नव्हते आणि तो हेच पुन्हापुन्हा विचारात होता.

" रम्या ...काय झालंय ते सांगशील का...? की मी फोन ठेवू." राघव ने जरा रागातच विचारले.


तस रमेश ने ( गर्गिचे वडील)  जस सुचेल तसं पहिल्या पासून सांगायला सुरुवात केली. अगदी न थांबता... नॉनस्टॉप..!

" काय गार्गी....!"

" ह्म््म..."

" अरे..त्या भागुबाईबद्दल बोलतोयस का तू..? अरे तिच्यात इतकी हिम्मत कुठून आली..." राघव

" माहित नाही. म्हणतात ना ...पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही...! ते महत्त्वाचं नाही आता पुढे काय...?" रमेश

" ह्ममम...विषय गंभीर आहे. पण तिथे नक्की काय झालं हे कळलं असतं तर सांगणं सोप झालं असतं. पण काही हरकत नाही. तू एक काम कर तू आणि ती पोलिस स्टेशनला जावा. FIR लिहा आणि हो त्याची कॉपी घ्यायला विसरू नका. हे खरं तर अगोदरच करायला हवं होतं. पण काही हरकत नाही...तुम्ही निघा. एक काम करा तिथे गेल्यावर मला कॉल करा. बर तुम्हाला कोणतं पोलिस स्टेशन लागतं...?" राघव

" पारगड पोलिस स्टेशन...." रमेश

" बरं...मी बघतो...पण तुम्ही जावा. घाबरु नका...आणि हो...गार्गी काय करते...?" राघव

" जेवायला गेली आहे. ती अजुन शॉक मध्ये आहे. पण आता थोडी शांत झाली आहे. thanks यार...खरंच ". रमेश.

" झालं का....ठेवू...? " म्हणत राघवने कॉल कट केला.

मन तर नव्हतं. पण गार्गी जेवत होती. आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती. तेवढ्यात बाबा आले. आणि जेवायला बसले.

" काय बोलला राघव....?" गार्गीचि आई

" आम्ही आता पोलिस स्टेशनला जाऊन येणार...." गार्गीचे बाबा

गार्गिने एकदा बाबांकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर भीती होती. बाबांनी तिच्याकडे पाहिलं आणि एक smile केली. 

थोड्याच वेळात दोघेही आवरून पोलिस स्टेशनला निघाले. नितूताई त्यांच्याकडे बघत होत्या. त्यांनी मनोमन देवाला प्रार्थना केली आणि त्या घरात गेल्या.


गार्गी आणि तिचे बाबा पोलिस स्टेशनला पोहोचले होते. आत जाताच त्यांना अजबच वाटलं. पोलिस स्टेशन वर दोनच हवालदार होते. बाकी कुणीही नव्हतं.

रमेश भाऊ आणि गार्गी आत गेले आणि एका हवालदाराला विचारलं. पण त्याने त्यांच्या प्रश्नावर उत्तर न देता " काय काम आहे...? लवकर सांगा..." म्हणत आपल्या कामात व्यस्त झाले.

" FIR  लिहायची होती..." रमेश भाऊ

त्या हवालदाराने मान वर न करता फक्त एक फाईल उघडली " ह्म्म्...बोला काय झालं...??"

रमेश भाऊ नी सगळं सविस्तर सांगितले. त्या हवालदाराने लिहून घेतलं आणि रमेश भाऊंची सही घेतली.

गार्गी पहिलीच वेळ पोलिस स्टेशन वर आली होती. तिने एकदा त्या हवालदाराला पाहिले. त्याला जणू काही फरक पडत नव्हता. कोण काय सांगतोय ते....?

तिने बाबांकडे पाहिलं. बाबांनी तिला इशाऱ्यानेच चल जाऊ म्हणाले व तेही उठले. अचानक त्यांना राघवचे बोल आठवले " FIR ची कॉपी घ्यायला विसरू नका...."

रमेश भाऊंनी पटकन मागे वळून fir ची कॉपी मागितली.

त्या हवालदाराने आता कुठे मान वर केली...." ओ साहेब आम्हाला आणखी काही कामं नाहीत का....? जा उद्या देतो. येऊन घेऊन जा." म्हणत त्याने पुन्हा मान खाली केली. 

तेवढ्यात रमेश भाऊंनी राघवला कॉल केला. स्पीकर ऑन केला आणि त्या हवालदाराच्या समोर धरला...
" हॅलो...मी इन्सपे. राघव बोलतोय....मुंबईवरून..."

हवालदाराच्या कानावर शब्द पडताच तो जागेवर उठून सेल्युट ठोकत  उभा राहिला आणि लगेच त्याने fir ची कॉपी आणून दिली.

  दोघेही घरी आले तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. गार्गी फार दमली होती. ती तडक रूम मध्ये जावून झोपली. आईबाबा मात्र बोलत होते.


गार्गी झोपण्याचा प्रयत्न करत होती पण तिला झोपच येत नव्हती. आज ती ज्याप्रमाणे त्या गुंडांशी लढली होती. ते आठवून तीला अजूनही विश्वास वाटत नव्हता.

तिच्यात इतकी हिम्मत कुठून आली....?? तिला आठवत होतं. तिचा कॉलेजचा पहिला दिवस. तिच्या सिनियर नी तिची रॅगिंग केली होती. तिला घाबरून ती चार दिवस कॉलेजला गेली नव्हती. शेवटी तिच्या बाबांनी तिला समजाऊन पुन्हा कॉलेजला पाठवलं होतं. दोन दिवस तर ते तिला सोडायला आणि घ्यायला जात. त्यामुळे तिला कॉलेजमध्ये सर्व भित्री भागुबई म्हणत.

" आता मी काही भित्री नाही राहिले...." गर्गिने स्वतः च आपली पाठ थोपटून घेतली. तिला कधी झोप लागली कळच नाही.